|
आरोग्यवर्धक किवी
| बाजारात वरून चिकूसारखं मात्र आतून हिरवट-काळं दिसणारं हे फळ चायनीझ गूझबेरी म्हणूनही ओळखलं जातं. याचं शास्त्रीय नाव एक्टीनीडिया डेलिसिओसा असं आहे.
बाजारात वरून चिकूसारखं मात्र आतून हिरवट-काळं दिसणारं हे फळ चायनीझ गूझबेरी म्हणूनही ओळखलं जातं. याचं शास्त्रीय नाव एक्टीनीडिया डेलिसिओसा असं आहे.
या फळाचं वजन ४० ते ५० ग्रॅम असतं. हे फळ अतिशय मऊ असून, त्याला स्वत:चा एक वेगळाच गंध असतो. न्यूझीलंड, इटली, ग्रीक, फ्रान्स आदी देशांमध्ये मोठय़ा प्रमाणात या फळाचं पीक येतं. मात्र आता भारतातही हे फळ मोठय़ा प्रमाणात मिळतं. यात भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व सी तर आहेच याशिवाय त्यात फायबर, प्रोटीन, आयर्न, जीवनसत्त्व क, जीवनसत्त्व ई, जीवनसत्त्व ए, पोटॅशियम, मॅग्नेशियमचादेखील समावेश आहे. अशा
या किवीचे गुणधर्म जाणून घेऊया.
» नियमित खाल्ल्याने त्वचेचा पोत सुधारतो. त्वचेवरील काळे डाग कमी होतात.
» निद्रानाशाचा त्रास असलेल्यांनी या फळाचं जरूर सेवन करावं. कारण यासारख्या समस्यांवर हे फळ अतिशय गुणकारी आहे.
» यात असलेल्या फायबर आणि पोटॅशियममुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. हृदयाचं आरोग्य सुधारतं.
» उच्च रक्तदाब नियंत्रित राखण्यास मदत होते.
» फायबरचं प्रमाण अधिक असल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांनी किवीचं नियमित सेवन करावं. त्यामुळे हा त्रास कमी होतो.
» वयानुसार दृष्टी कमजोर होण्याचा त्रासदेखील कमी होतो.
» अस्थमाच्या रुग्णांनी नियमित किवी खाल्ल्यास धाप लागणं कमी होतं.
» पचनसंस्था सुधारण्याचं कामही हे फळ करतं.
» वजन नियंत्रित राखण्याचां कामही हे फळ करतं.
» रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचं कामंही हे फळ करतं. |
Read More »
आनंदी राहण्यासाठी…
| आपण आनंदी राहावं, असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण धावपळीच्या जीवनात प्रत्येकालाच ते शक्य होतंच असं नाही. पण आपल्या जीवनशैलीत काही बदल करून घेतलेत तर नक्कीच तुम्ही आनंदी राहाल, यात शंका नाही.
आपण आनंदी राहावं, असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण धावपळीच्या जीवनात प्रत्येकालाच ते शक्य होतंच असं नाही. पण आपल्या जीवनशैलीत काही बदल करून घेतलेत तर नक्कीच तुम्ही आनंदी राहाल, यात शंका नाही. हे बदल कोणते करावेत ते पुढीलप्रमाणे
» सकाळी उठल्यावर दोन ते तीन ग्लास पाण्यात लिंबू किंवा भाज्यांचा रस घालून ते पाणी प्यावं. किंवा एक ते दोन कप ग्रीन टी प्यावा.
» योगा किंवा अॅरोबिक्स, जिम यापैकी कोणताही व्यायाम किमान अर्धा तास तरी करावा.
» तुमचं मन शांत ठेवण्यासाठी प्राणायाम किंवा ध्यानधारणा करावी
» सकारात्मक विचार करा आणि तुमचं दिवसभराचं प्लानिंग करावं.
» भिजवलेले बदाम, फ्रूट किंवा ब्राऊन ब्रेडसारखी न्याहारी घ्यावी.
» अंघोळीला जाण्यापूर्वी तेलाने दोन ते तीन मिनिटं मसाज करावा.
» जंकफूड टाळावं.
» दही, दूध, मिल्क क्रीम, नारळाचं दूध, डाळीचं पीठ, हळद, मध किंवा लिंबू आदीचा वापर करून घरच्या घरी फेसपॅक तयार करून तो चेह-याला लावावा.
» केस आणि शरीसाठी शक्यतो नैसर्गिक पदार्थाचा अवलंब करावा.
» स्वत:साठी वेळ काढा. संगीत ऐकणे, वाचन करणे असे काही छंद जोपासावेत किंवा तुम्ही भरभरून हसू शकाल असा एखादा कार्यक्रम कराल.
» टीव्ही पाहत असताना गरम पाण्यात मीठ टाकून त्यात काही वेळ पाय बुडवून ठेवावेत. म्हणजे तुमचा थकवा नाहीसा होईल.
» मित्रपरिवारासोबत वेळ घालवा.
» रात्रीची किमान ७ तास झोप घेणं आवश्यक आहे.
» वर्षातून किमान दोनदा काही दिवस सुट्टी काढून फिरायला जा.
» रात्री झोपण्यापूर्वी किमान एक ग्लास गरम दूध प्यावं.
» महिन्यातून एकदा किमान फूट स्पा, फेशिअम किंवा बॉडी मसाज घ्यावा. |
Read More »
इन्शुलिन इंजेक्शन कसं आणि कधी?
| भारतामध्ये ६७ दशलक्ष मधुमेह रुग्ण असून, यापैकी ३ दशलक्ष रुग्ण इन्शुलिन इंजेक्शनचा वापर करतात.
भारतामध्ये ६७ दशलक्ष मधुमेह रुग्ण असून, यापैकी ३ दशलक्ष रुग्ण इन्शुलिन इंजेक्शनचा वापर करतात. यापैकी बहुतेक रुग्ण हे इन्शुलिन वापराच्या योग्य पद्धतीबद्दल अनभिज्ञ असून, इन्शुलिनच्या अयोग्य वापरामुळे त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावं लागतं. इन्शुलिन इंजेक्शनच्या योग्य वापराबद्दल जागरूकता निर्माण व्हावी या हेतूने इन्शुलिन इंजेक्शन दिनाचे औचित्य साधत इन्शुलिन इंजेक्शन तंत्रासंदर्भात योग्य माहिती पुरविणा-या फोरम फॉर इंजेक्शन टेक्निक्स (एफआयटी)द्वारे एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जसलोक रुग्णालय, टीएनएमसी व बीवायएल नेयर चॅरीटेबल हॉस्पिटल, कम्बाल्ला हिल हॉस्पिटल आणि एफआयटी सल्लागारी मंडळाचे सदस्य यांनी इन्शुलिनच्या योग्य वापराबद्दल माहिती दिली.
मधुमेह रुग्णांना योग्य ठिकाणी इंजेक्शन देण्यासंदर्भात पुरेशी माहिती नसल्यामुळे ब-याचदा त्यांच्या शरीरातील विविध भागांना सूज येते. एफआयटीतर्फे करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात २७ टक्के रुग्णांना इन्शुलिनची योग्य दिशा माहीत नसल्याचं जाणवलं तर १४ टक्के रुग्णांना इंजेक्शन किती वेळ आत ठेवायचे याची माहिती नव्हती. तर ३४ टक्के लोक इंजेक्शन घेताना त्वचा किती फोल्ड करावी याबद्दल अनभिज्ञ असल्याचे समोर आले. यावेळी झालेल्या चर्चासत्रात इंजेक्शनच्या अयोग्य वापरामुळे निर्माण होणा-या समस्या दूर करण्यासाठी इन्शुलीन इंजेक्शनच्या योग्य वापराबद्दल तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे काही शिफारसी करण्यात आल्या. त्या पुढीलप्रमाणे :
» इन्शुलिन इंजेक्शन देण्यासाठी मांडी किंवा हाताचा वरचा भाग यांचा वापर केला जाऊ शकतो
» इंजेक्शन देण्याआधी तो भाग कोमट पाण्याने स्वच्छ करावा
» लहान मुलांसाठी ४ एमएम सुईचा वापर करावा. लठ्ठ मुलं तसेच वृद्धांसाठी ६ एमएम सुईचा वापर करावा
» आधी वापरलेल्या सुईचा पुनर्वापर टाळावा. दरवेळी नव्या सुईचाच वापर करावा
» इंजेक्शन देण्याचा भाग बदलत राहावा जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत
» इंजेक्शन फ्रीझरमध्ये ठेवू नयेत. ते ठेवण्यासाठी १५ ते २५ अंश तापमानाच्या थंड तसेच काळोख्या जागेचा वापर करावा गर्भवती महिलांनी घ्यावयाची काळजी
» गर्भवती महिलांमध्ये, त्वचेची घडी वाढवून पोटामध्ये इंजेक्शन द्यायला हवे
» पहिल्या त्रमासिकात महिलांनी इन्शुलिनची जागा किंवा तंत्रज्ञान बदलू नये
» दुस-या त्रमासिकात इन्शुलिनचे इंजेक्शन देण्यासाठी पोटाच्या पार्श्वभागाचा वापर केला जाऊ शकतो, तसे करताना गर्भावरील त्वचेपासून लांब इंजेक्शन द्यायला हवे
» तिस-या त्रमासिकात पोटावर इंजेक्शन देता येऊ शकते, तसे करताना त्वचेची घडी व्यवस्थित करायला हवी |
Read More »
असा असावा आहार
| आपण कोणत्याही डॉक्टरांकडे गेलो की डॉक्टर आपल्याला सकस समतोल आहार घ्यायला सांगतात; पण सकस आहार म्हणजे नेमकं काय? किंवा काय खावं आणि काय खाऊ नये याची माहिती लोकांना नसते. जंक फूडचा त्यांचा मारा सुरूच असतो आणि मग वजन वाढलं की आहार कमी केला जातो. आहार कमी करण्यापेक्षा तो आहार कसा असावा हे जाणून घेणं आवश्यक आहे.
बदलत्या जीवनशैलीमुळे आजकालची तरुण मंडळी जंक फूडकडे ओढली गेली आहेत. या जंक फूडमुळे तरुण वयातच त्यांना कोणत्या ना कोणत्या तरी आजाराने ग्रासलेलं असतं किंवा स्थूलपणा, सांधेदुखी यासारख्या समस्यांचे बळी ठरलेले असतात. आपली तक्रार घेऊन डॉक्टरांकडे गेलेल्या प्रत्येकाला डॉक्टर समतोल आहार किंवा सकस आहार घ्यायला सांगतात, पण सकस आहार म्हणजे नेमकं काय? किंवा रोजच्या आहारात काय बदल केले म्हणजे आपण समतोल आहाराचं सेवन करू शकतो हे जाणून घेऊया. आहार संतुलित असण्यासाठी आहारात काबरेहायड्रेट्स, प्रोटिन, जीवनसत्त्व, खनिज द्रव्य, फॅट्स, कॅल्शिअम, फायबर अशा घटकांचा समावेश करावा. अशा आहाराने शरीरातील अवयव आणि अणूरेणू सुदृढ होतात. त्यांची वाढ होते. पोषण होते. थोडंसं वजन वाढलं की आहार कमी करण्याची प्रवृत्ती लोकांमध्ये अधिक आहे. परंतु तसं करण्यापेक्षा आहार समतोल, चौरस असावा याकडे लक्ष दिलं पाहिजे. जेवणात भाजी, आमटी, ताक, ज्वारी किंवा बाजरीची भाकरी, कोशिंबीर यांचा समावेश असावा. हे अन्न कमी तेलात असावं. याशिवाय आणखी काय टाळावं हे पाहूया.
फायबरचं प्रमाण वाढवावं
जंक फूडच्या जमान्यात आपल्या लठ्ठपणा किंवा स्थूलतेचं प्रमाण वाढलेलं दिसतं. त्याचं मुख्य कारण म्हणजे कोलेस्टेरॉलची पातळी वाढणे हे होय. ही पातळी जंक फूडमुळेच वाढते. परिणामी हृदय आणि त्या संबंधित आजारांचं प्रमाण वाढतं. त्यावर कोलेस्टेरॉलची पातळी वाढू न देणं हा त्यावरील एक उपाय आहे. म्हणूनच आहारात सोल्युबल फायबरचं प्रमाण वाढलं पाहिजे. त्यासाठी डाळी, ओटमील फळ आणि सगळ्या प्रकारच्या फळभाज्या आणि हिरव्या पालेभाज्या खाणं गरजेचं आहे. भाज्यापेक्षाही भाज्यांचे ज्यूसेसही तुम्ही पिऊ शकता. त्याचा तुमच्या शरीराला फायदाच अधिक होईल. सकाळच्या न्याहारीत ओट्स आणि फळांचा समावेश करावा. त्यामुळे दिवसभर ताजंतवानं वाटत राहतं. सॅलडचा वापरही अधिक करावा. यामुळे फायबर पोटात जाईलच आणि कोलेस्टेरॉलही नियंत्रणात राहील.
सॅच्युरेटेड फॅट्स कमी करण्यासाठी
सध्या लहान मुलंदेखील चीज, बटर, केक अधिक प्रमाणात खाताना दिसतात. अशा पदार्थामध्ये सॅच्युरेटेड फॅट्सचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे साहजिकच अशा पदार्थाचं सेवन केल्यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढते आणि हृदयाशी संबंधित विकार बळावतात. असं घडून नये म्हणून आपल्या आहारात अनसॅच्युरेटेड फॅट्सयुक्त पदार्थाचा समावेश करावा. लो फॅट असलेलं ऑइल, ऑलिव्ह ऑइल, लो फॅड डेअरी प्रॉडक्ट, उकडलेले किंवा भाजलेले मासे अशा पदार्थाचं सेवन करावं या पदार्थात ओमेगा ३ नावाचं फॅटी अॅसिड असतं. हे घटक शरीराला निरोगी ठेवतात. तसंच कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित केली जाते. मात्र चीज, बटर, केक, सॉस आदी पदार्थामध्ये सॅच्युरेटेड फॅट्सचं प्रमाण अधिक असतं त्यामुळे हे पदार्थ टाळणंच अधिक श्रेसस्कर ठरेल.
कॅल्शिअमची पूर्तता कशी कराल?
आजकाल लहान असो वा मोठं, प्रत्येक वयोगटातील माणसाला कॅल्शिअमची गरज भासत असते. कॅल्शिअम हे दात आणि हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असतं. कॅल्शिअमचं प्रमाण कमी असल्यास ऑस्टिओपोरायसिस होण्याची शक्यता अधिक असते. मात्र यापासून बचाव करायचा असेल तर डेअरी प्रॉडक्ट्स म्हणजे दही, द्रूध,पालक-मेथी यासारख्या पालेभाज्या, सगळ्या प्रकारच्या डाळी, कडधान्य, मासे यांचा आहारात समावेश करावा.
तेलाचा वापर टाळाच
काही लोकांना तळलेले, मसाल्याचे झणझणीत पदार्थ खायला खूप आवडतात. त्याशिवाय त्यांना जेवण अपुरं वाटतं. पण मसालेदार, तिखट आणि तेलाने ओथंबलेले पदार्थ शरीराची हानीच करतात. अशा पदार्थामध्ये कॅलरीज आणि फॅट्स प्रमाण अधिक असतं. त्यामुळे चरबी वाढणे, लठ्ठपणा, डायबेटिस टाइप २ आणि कोलेस्टेरॉल संबंधित आजार बळावतात. इतकंच नाही तर जे लोक फ्राइड चिकन किंवा फिश तसंच फ्रेंच फ्राइजसारखे पदार्थ अतिप्रमाणात खातात त्यांना प्रोटेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते. पण तळलेल्या पदार्थाशिवाय काही लोकांना जेवल्याशिवाय वाटत नाही अशा वेळी कमीत कमी तेलाचा वापर करावा. स्वयंपाक करताना तेलावर नियंत्रण ठेवावं. फॅट्समधून सरासरी २० ते ३० टक्के कॅलरीज मिळतात. परिणामी हृदयविकार, पक्षाघात, छातीत धडधड, धाप लागणे आदी विकार होतात. १२० कॅलरीज किंवा त्यापेक्षा अधिक कॅलरीज पचवणे शरीराला जमत नाही. म्हणून गरजेनुसारच तेलाचा वापर करा. तळलेल्या पदार्थापेक्षा वाफेवर उकडलेल्या भाज्या किंवा मासे शरीराला फायदेशीर ठरतात. शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. अशा पदार्थामुळे वेळेचीही बचत होते. पदार्थ उकडल्याने त्यातील जीवनसत्त्व, खनिजं नष्ट होत नाही. तर भाजलेले पदार्थही आरोग्यासाठी हितकारक असतात. म्हणूनच भाजायला अधिक तेल किंवा तूप, लोणी लावण्याची गरज नाही. तेलातुपाशिवाय भाजेल्या पदार्थामध्ये फॅट्स आनि कॅल्शिअमचं प्रमाण कमी असतं जे आरोग्यास हानिकारक नव्हे तर हितकारक ठरतं.
मिठाचा वापर कमी करा
मिठाचं प्रमाण वाढलं की तब्येत बिघडू शकते. आहारातून पोटात गेलेल्या जास्तीच्या मिठाने हायपरटेन्शनसारखी समस्या निर्माण होऊ शकते. अतिरिक्त मिठामुळे मिठात असलेल्या सोडिअमचा हाडांवर वाईट परिणाम होतो. म्हणून अतिखारट पदार्थ किंवा सोडिअमयुक्त पदार्थाचं सेवन करणं टाळावं. सरासरी ९ ते १० ग्रॅम मीठ शरीराला पुरेसं आहे. त्यासाठी सर्वप्रथम जेवणाच्या पानात मीठ वाढण्याची प्रथा टाळावी. स्वयंपाक करताना पदार्थामध्ये मुळातच कमी मीठ घाला. मीठ कमी असेल तर जेवण बेचव लागते अशी टीका केली जाते. पण मुळातच चव येण्यासाठी लाल तिखट, गरम मसाला, हिरवी मिरची, मिक्स मसाला अशा पदार्थाचा समावेश करावा.
साखर कमी करा
साखरेत कॅलरीज जास्त प्रमाणात असतात, तर पोषणमूल्य कमी असतात. यामुळे साखरेमुळे शरीराचं नुकसानच होतं. म्हणून चहा किंवा कॉफीमध्ये साखर एक चमचाच घालावी. बटाटय़ांमध्ये शर्करेचं प्रमाण अधिक असतं म्हणून बटाटा टाळावा. शीतपेयांमध्ये हे प्रमाण अधिक असतं म्हणून शीतपेये टाळावीच. त्यापेक्षा लो शुगरची पेये प्यावीत. केक, कँडी, मिठाया, गोड फळं टाळावी. फळांचा रस पिताना त्यात साखर घालणं टाळावं. ब्राऊन शुगर किंवा साखरेच्या पाकाचं प्रमाण टाळावं. काही जणांना भाजी किंवा आमटीत साखर घालण्याची सवय असते. त्यापेक्षा गूळ घालावा. गरज असेल तरच साखर टाकावी नाहीतर गुळाचाच वापर करावा. |
Read More »
| |
No comments:
Post a Comment