| ||||
पाचक जिरं
मोहरीनंतर फोडणीसाठी जास्तीत जास्त वापरला जाणारा पदार्थ म्हणजे जिरं होय. इंग्रजी नाव क्युमिन असून शास्त्रीय नाव क्यूमिनम सायमियम असं आहे. मोहरीनंतर फोडणीसाठी जास्तीत जास्त वापरला जाणारा पदार्थ म्हणजे जिरं होय. इंग्रजी नाव क्युमिन असून शास्त्रीय नाव क्यूमिनम सायमियम असं आहे. संस्कृतमध्ये जीरक असं म्हटलं जातं. याचा 'अर्थ अन्न पचायला मदत करणारा' असा होतो. म्हणून हा पदार्थ आपल्याकडे फोडणीत वापरला जातो. सध्या चीन, उझबेकिस्तान, इराण, तुर्की, इजिप्त, मेक्सिको आणि भारतात जि-याची लागवड होते. भारतातही प्रामुख्याने बंगाल आणि आसाममध्ये ही लागवड केली जाते. जिरं दिसायला बडीशोपसारखे असून चपटे लांबट अंडाकृती आणि पिवळट करडय़ा रंगाचं असतं. चवीला काहीसं कडवट असून त्याला विशिष्ट स्वाद असतो. जि-याचे झाड उंचीला ५० सेमी असतं. त्याची पानं १० सेमी लांब असतात. फुलं आकाराने लहान असून पांढ-या किंवा गुलाबी रंगाची असतात. एका मुख्य फांदीला भरपूर फांद्या असतात. जि-याचा औषधी उपयोग पुढीलप्रमाणे- » उत्तम पाचक असून अतिसार, उलटय़ा, अपचन यावर फायदेशीर आहे. » स्तनपानात अडचणी असल्यास जिरा पाणी प्यायल्याने स्तनपानाची प्रक्रिया सुधारते. » तीव्र तापावर जिरे पुड खाल्यास फायदेशीर ठरतं. » तोंडाला चव नसल्यास चिमुटभर जिरं चावून खावं. त्याने तोंडाला चव येते. » खूप घाम येणा-यांनी जिरा पाण्याचं सेवन करावं. » हृदयरोगावरही अतिशय गुणकारी आहे. » मेंदू व डोळ्यांसाठी उत्तम आहे. » लाळविमोचनासाठीही उत्तम आहे. » नियमित जिरा पाणी प्यायल्याने पोटातील स्नायू बळकट होतात. आतडय़ाची हालचाल नियंत्रित राहते. » आहारात नियमित वापर केल्याने गॅसची समस्या कमी होते. Read More »'अँण्टी ऑक्सिडंट्'सचा खजिना
काही हंगामी फळांविषयीची दखल घेणं राहून गेलं होतं. त्यांनाही आपल्या नित्याहारात न्याय द्यायलाच हवा. कारण कोणतीही फळं ही आपल्या आरोग्याला बाधा करणारी नसतात. तेव्हा त्यांनाही योग्य न्याय देऊन त्यांचाही आपल्या दैनंदिन आहाराच्या दिनचर्येत समावेश केल्यास आपलंच भलं होईल.
बाहेरून काटेरी खडबडीत आणि काहीसं कलशासारखं दिसणारं अननस त्याच्या वेगळ्याच आंबट-गोड चवीमुळे खूपच चविष्ट लागतं. अननस हे जरी बाराही महिने मिळत असलं, तरीही हिवाळ्यातील चार महिने हा त्याचा मुख्य हंगाम आहे. अननसाच्या चकत्या करून खाताना त्यावर सैंधव, मिरेपूड, जीरेपूड व थोडीशी पिठीसाखर (आवडत असल्यास) घालून काही मिनिटं तसंच ठेवून मग खावं. म्हणजे त्यातील आंबटपणा बाधत नाही, पाचक बनून ते अधिक चविष्ट लागतं. हे फळ उष्ण गुणात्मक आहे. अननस खाल्ल्याने खाण्यातून अथवा नाकातील पोटात गेलेले केस, मासे खाताना नकळत गिळले गेलेले छोटे काटेही विरघळतात, असं मागील पिढीकडून ऐकायला मिळतं. अननसापासून अनेक प्रकरचे पदार्थ बनवले जातात. जसं मोरंबा, जॅम, सरबत, जेली, चॉकलेट्स, आइस्क्रीम, पेस्ट्री (केकचा प्रकार), विविध प्रकारचे केक. याशिवाय काही पारंपरिक पदार्थ जसं अननसाची कोशिंबीर, हलवा, आमटी. अननसामध्ये ब्रोमोलीन नावाचं द्रव्य असतं. हे द्रव्य पचनास उपयुक्त ठरतं. सांधे आणि स्नायूंना येणारी सूज कमी करण्यावरही अननस गुणकारी आहे. त्यामध्ये मॅँगेनीजचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे हाडं पोकळ होऊन ती सहजपणे तुटण्याचं प्रमाणही कमी होतं. नारिंगी पिवळसर रंगाची मोठी पपई खरेदी करण्याचा मोह आवरत नाही. अतिशय गोड चवीच्या पपई हिवाळ्यात जास्त प्रमाणात दिसतात. पपईमध्ये बीटा कॅरोटीन मुबलक प्रमाणात असतं. त्याचं रूपांतर 'अ' जीवनसत्त्वात होतं, शिवाय ते एक उत्तम 'अँण्टी ऑक्सिडंट (शरीरातील विषद्रव्यं बाहेर काढणारी यंत्रणा)' आहे. याशिवाय उत्तम दर्जाची फ्रुक्टोज (फळातील नैसर्गिक रूपातील साखर) 'क' जीवनसत्त्व, भरपूर तंतूमय पदार्थ दृष्टी दीर्घकाळ उत्तम आणि निरोगी ठेवण्यासाठी पपईइतकं सुंदर फळ नाही. त्याचबरोबर त्वचा तेजस्वी दिसण्यासाठी पपई खाण्यासोबत त्याचा गर, त्यात ४-५ लिंबाच्या रसाचे थेंब आणि अर्धा चमचा मध हे सर्व एकत्र करून त्याने चेह-याला, मानेला हळूवार मसाज करावा. त्वचेवर अकाली येणा-या सुरकुत्या, काळे डागही कमी होऊन त्वचा उजळू लागते. हिरवे, काळसर वर्षानुर्वष दिसणारे द्राक्षांचे घोस, तर गेल्या काही वर्षापासून गडद पारदर्शक अशा चॉकलेटी रंगांचे दिसणारे द्राक्षांचे घोस हे दिसताक्षणीच मन मोहून टाकतात. आयुर्वेदानं 'द्राक्षा फलोत्तमा वृष्या चक्षुष्या सृष्ट मूत्र विट्' याचा अर्थ, द्राक्ष हे सर्व फळात उत्तम फळ असून मधुर, आंबट आणि किंचीत तुरट रसात्मक आहे. तसंच ते थंड गुणात्मक, शुक्रधातूवर्धक, डोळ्यांसाठी उत्तम टॉनिक आणि मलमूत्र सहजतेनं शरीराबाहेर विसर्जन करण्यास उपायकारक आहे, अशा प्रकारे या श्लोकाद्वारे हे फळ खाल्ल्यामुळे संपूर्ण शरीराचं आरोग्य कसं तोलून धरलं जातं, हे पटवून दिलं आहे. काळ्या द्राक्षांमध्ये क्वसेंटिन (अँण्टी ऑक्सिडंट) भरपूर प्रमाणात असतं. काळ्या द्राक्षाच्या सालीतील घटक हे वाईट कोलेस्टेरॉल कमी करतं. आयुर्वेदानं द्राक्षापासून अनेक आसवं बनवतात. द्राक्षासव, द्राक्षकुमारी अशी क्षुधावर्धक (भूक वाढवणारं), दीपन-पाचन करणारी द्रवरूप औषधंही बनवतात. हिवाळ्यात रस्त्यांवर जागोजागी टपो-या पेरूच्या गाडय़ा दिसतात. पेरूही आंबटगोड रसात्मक असून अनेक बियांनी युक्त असं हे फळ आहे. 'क' जीवनसत्त्वाचा प्रचंड मोठा स्रेत असं पेरूला म्हटलं जातं. यामध्येही भरपूर अँण्टी ऑक्सिडंट्सचा साठा आहे. पेरूचं सरबत हे उत्तम पित्तशामक आहे. पेरूपासूनही विविध पदार्थ बनवले जातात, जसं जॅम, जेली, आइस्क्रीम इ. काटेरी झाडाला येणारी बोरांमधून गोड, आंबट व काहीशी तुरट अशा तिन्ही चवी एकत्रितपणे मिळतात. बोरांमध्ये उत्तम प्रकारची फलशर्करा (फ्रुक्टोज), 'अ' आणि 'क' जीवनसत्त्व आणि भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे. हिवाळ्यात येणारी गोड, मोठी बोरं ही गुणात्मकदृष्टय़ा आरोग्याला जास्त हितकारक आहेत. बोर हे फळ पचायलाही हलकं असतं. हे अवश्य करा.. फायदे अॅम्ब्रियोस्कोपीचे
इन व्हिटरो फर्टिलायझेशन अर्थात आयव्हीएफ क्षेत्राशी संबंधित नवीन तंत्र अॅम्ब्रियोस्कोपी हळूहळू सर्वज्ञात होत चाललं आहे. मुंबईच्या लीलावती व डी. वाय. पाटील इस्पितळाशी संबंधित स्त्रीरोग व वंध्यत्वरोग विशेषज्ज्ञ डॉ.ऋषीकेश पै व डॉ. नंदिता पालशेतकर हे एम्ब्रियोस्कोपी तंत्र, त्याचे फायदे व शक्यतांवर प्रकाश टाकत आहेत.
अॅम्ब्रियोस्कोपच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर इन्क्युबेटरच्या आत होणारी संपूर्ण फर्टिलायझेशन प्रक्रिया अॅम्ब्रियो कल्चरला धक्का न पोहोचवता पाहू शकतात व चित्रित करू शकतात. हे एक आधुनिक इन्क्युबेटर असते जे या व्हिटरो प्रक्रियेदरम्यान योग्य तथा आवश्यक तापमानाची स्थिती कायम ठेवण्याबरोबरच भ्रूणाच्या विकास प्रक्रियेचे (अॅम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट) चित्रीकरणही करते. यासाठी त्यात एक कॅमेरा बसवलेला असतो. ही वाढ पाच दिवस निगराणीखाली असते व गुण-दोष परीक्षणानंतर सवरेत्तम अंडेच गर्भाशयात प्रत्यारोपित करण्यात येते. परिणामी एकूणच सफलता दरात सुधारणा होते. अशा प्रकारे हे एक क्रांतिकारी तंत्र सिद्ध झाले आहे. आयव्हीएफचे सर्वात आव्हानात्मक काम म्हणजे गर्भधारणेसाठी सवरेत्तम भ्रूण निश्चित करणं हे होय. सध्या अॅम्ब्रियोजिस्ट्स (भ्रूणशास्त्रज्ञ) यांना प्रचलित इन्क्युबेटर्समधून भ्रूण बाहेर काढून, तीन ते पाच दिवसांच्या दरम्यान ठरावीक कालावधीत मायक्रोस्कोपच्या माध्यमातून त्याच्या विकासाची तपासणी करावी लागते. अॅम्ब्रियोस्कोप विद्यमान आयव्हीएफ प्रोटोकॉलमधील कमतरता दूर करते. भ्रूणाच्या परीक्षणासाठी अॅम्ब्रियो कल्चरमध्ये करावी लागणारी बदलाची आवश्यकता आयव्हीएफ संपवून टाकते. आयव्हीएफच्या प्रक्रियेदरम्यान सर्वसाधारणपणे कोणत्याही महिलेच्या गर्भामध्ये दोन वा तीन भ्रूणांचं प्रत्यारोपण केलं जातं. ज्यामुळे अनेकदा जुळं वा तिळं होण्याच्या शक्यता असतात. अॅम्ब्रियोस्कोपअंतर्गत डॉक्टरांना भ्रूणाची गुणवत्ता पारखणं व सवरेत्तम भ्रूणाची निवड करण्याची सुविधा मिळते, ज्यामुळे आयव्हीएफ प्रक्रियेच्या यशाची टक्केवारी वाढते. वंध्यत्वसमस्येने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी अॅम्ब्रियोस्कोप एक छुपं वरदानच आहे. बाळाच्या भावी जीवनाच्या प्रारंभिक काळाच्या चित्रफितींचं रेकॉर्ड यामध्ये उपलब्ध होतं. यामुळे आयव्हीएफ उपचारांमध्ये सुधारणा होते व एका स्थिर वातावरणात अबाधित अॅम्ब्रियो कल्चरची (भ्रूणविकासाची) सुविधा मिळते. डॉ. ऋषीकेश पै व डॉ. नंदिता पालशेतकर यांच्या ब्लूम आयव्हीएफ अँड फर्टिलिटी सेंटरमध्ये स्थापित डिजिटल अॅम्ब्रियोस्कोप इन्क्युबेटरद्वारे आतापर्यंत २००हून अधिक रुग्णांना लाभ झाला आहे. ज्या महिला ३५ वर्षाहून कमी वयाच्या आहेत व ज्यांचे आयव्हीएफ करण्याचे आधीचे प्रयत्न अयशस्वी झाले आहेत, अशा महिलांच्या बाबतीत असिस्टेड लेजर हॅचिंगच्या कॉम्बिनेशनसमवेत या नव्या तंत्राच्या यशाचा दर प्रत्येक प्रयत्नामागे ३०-४० टक्के इतका आहे. या प्रक्रियेदरम्यान संबंधित तज्ज्ञाला आरोग्य व स्वच्छतेसंदर्भात काही मानकांचं पालन करावं लागतं. निर्जीवाणूकरण (स्टेराइल कंडिशन) तथा डिस्पोजेबल सीरिंजचा वापर आदी बाबी यामध्ये समाविष्ट आहेत. तापमान तसंच आद्र्रता यावर सुरुवातीपासूनच नियंत्रण ठेवण्यात येतं, तसंच कार्बन व एचईपीए फिल्टर्सच्या माध्यमातून हवा फिल्टर करण्यात येतं. आणि होय, अॅम्ब्रियोस्कोपीकरिता अतिरिक्त रकमेचं प्रदान करावं लागतं. कारण यामध्ये वापरात असलेली उपकरणं खूपच महाग असून त्यांच्या देखभालीसाठीही खूप खर्च होत असतो. ज्या रुग्णांसाठी आयव्हीएफचे प्रयत्न वारंवार अयशस्वी ठरले आहेत, अशा रुग्णांसाठी हे तंत्र अत्यंत फायदेशीर असंच आहे. आयव्हीएफ यशस्वी होण्याचा सध्याचा दर ४० ते ३० टक्के आहे. त्यात ५ ते १० टक्क्यांनी आणखीन वाढ करणा-या या उत्तमोत्तम उपकरणांचा उपयोग बघता हा उपचार विशेष महाग ठरू नये. अॅम्ब्रियोस्कोपी आयव्हीएफ इलाजाकरिता विकसित करण्यात आलेलं अत्यंत उपयुक्त ठरलेलं एक अत्याधुनिक असं तंत्र आहे. आयव्हीएफ प्रक्रियेमध्ये भावी भ्रूणसंख्या व त्यांच्या गुणवत्तेच्या परीक्षणाची विशिष्ट सुविधा हे उपकरण देतं. बहुतांश रुग्ण मानक आयव्हीएफ प्रक्रियेऐवजी या तंत्रास प्राधान्य देत आहेत. निश्चितच या तंत्राची लोकप्रियता वेगाने वाढत असून आता ही बाब स्वीकारली गेली आहे. Read More »दुखणं विसरू नका..
आजच्या धावपळीत, कामाच्या व्यापात आजूबाजूच्या परिस्थितीचे ध्यान ठेवून काम करतानादेखील अचानक कधी तरी, कुठे तरी आपटणे, पडणे, मार लागणे अशा घटना घडतच असतात. त्याकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याने म्हणा किंवा गरज वाटत नाही म्हणून असेल, पण त्याची पूर्ण चिकित्सा आणि पुढे जाऊन त्रास होणार नाही याची खात्री करून घेण्यासाठीची खबरदारी घेतली जातेच असं नाही. कालांतराने झालेल्या दुखापतीची वेदना कमी होऊन नाहीशी झाली की, ते दुखणं आणि त्या दुखण्याचं कारणही आपण विसरून जातो, असा अनुभव प्रत्येकाच्या गाठीला असतो. असंच एक दुर्लक्षित दुखणं म्हणजे सांधेदुखी..
अनेकदा एखादा सांधा खूप दुखत असतो. कालांतराने दुखणं थांबतं. वेदना थांबल्या की दुखणं बरं झाल्याची खात्री होते. ती व्यक्ती तो त्रास विसरून जाते. काही वर्षानी किंवा कधी कधी अनेक वर्षानी तेच दुखणं डोकं वर काढतं. त्यानंतर त्याचं कारण शोधणं सुरू होतं. अगदी साधं उदाहरण म्हणजे गुडघेदुखी. विशिष्ट वयानंतर गुडघेदुखी झाली की चिकित्सकाकडे जाऊन औषधोपचार केले जातात. जर वय वर्षे ३०च्या आतील व्यक्तींना व्हायला लागला तर हा त्रास का होतोय याचा गांभीर्याने विचार होऊ लागतो. रुग्ण चिकित्सकाकडे जाऊन सुरुवातीला औषधे घेऊन काही दिवसांत ठीक होतो; परंतु तोच त्रास वारंवार होतच राहातो आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ज्या जागी पूर्वी आघात झाला असेल त्या ठिकाणी झालेला स्थानिक बिघाड नंतरच्या काळात तुलनेने कमी प्रमाणात होतो. शारीरिक दोष बिघडलेले असताना किंवा छोटय़ाशा कारणानेही हे दुखणे पुन्हा उद्भवते. कधी कधी घसरून पडणं, लचकणं यासारखे छोटे वाटणारे आघातही शरीरातील काही सांधे, पेशी आणि स्नायूंवर परिणाम करीत असतात. तत्काळ घेण्यात येणा-या औषधोपचारानंतर आराम मिळाल्यावर त्याचा विसर पडतो; परंतु शरीरघटकांवर झालेला हा आघात पूर्णत: बरा झालेला असतोच असे नाही. कालांतराने अशाच प्रकारच्या सौम्य आघाताने अथवा शारीरिक दोषांच्या बिघाडाने या शरीरघटकांमध्ये पूर्वीच्याच पद्धतीचा त्रास अथवा इतर स्वरूपाचे आजार उद्भवतात. त्याचे कारण पूर्वी झालेल्या त्रासाची (तात्पुरती) केलेली चिकित्सा. अशाच पद्धतीने मोठय़ा अपघातानंतर हाडे व सांध्यांवर जोराने आघात होऊन सांधे निखळणे, हाडे मोडणे यांसारख्या विकृती होऊ शकतात. यामध्ये आधुनिक चिकित्सा घेतल्यावर तसेच फिजिओथेरपीसारखे उपचार केल्यानंतरही काही काळ हे दुखणे सुरू असते. अनेकांना या सगळय़ा दुखण्यातून आराम मिळाल्यासारखा वाटतो. पण छोटय़ा छोटय़ा कारणांनी या भागांत वेदना उत्पन्न होतच राहतात. याचे कारण त्यांची अपूर्ण झालेली चिकित्सा. या वेदना दूर करण्यासाठी आयुर्वेदात वर्णन केलेली वातविध्वंस, योगराज गुग्गुळ यांसारखी औषधे वैद्यकीय सल्ल्यानुसार घेणे आवश्यक ठरतेच. परंतु त्या विशिष्ट भागाची कमजोरी कमी व्हावी यासाठी अस्थिपोषण करणा-या घटकांचा वापर आवश्यक ठरतो. कारण केवळ तात्पुरता त्रास कमी कण्यापेक्षाही, वारंवार होणा-या त्रासानेही पुन्हा दुखणं उद्भवू नये यासाठी ''अपुनर्भव'' अर्थात् पुन्हा पुन्हा त्याच आजाराचा उद्भव होऊ नये म्हणून काम करणारे उपाय करणे आवश्यक ठरते. अस्थिपोषक टॅबलेट्सबरोबरच गरम केलेल्या नारायण तेलाने केलेले मालीश उपयोगी ठरतं. Read More » | ||||
|
Tuesday, January 21, 2014
FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मà¤à¥à¤¤ मसà¥à¤¤ तà¤à¤¦à¥à¤°à¥à¤¸à¥à¤¤
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment