Tuesday, December 10, 2013

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

फळभाज्या खा, चपळ बना!

फळांमधून जेवढी पोषकद्रव्यं मिळतात, तेवढीच पोषकद्रव्यं फळभाज्यांमधूनही मिळतात. वांगं, दुधी, पडवळ, घोसाळं, दोडका यांसारख्या फळभाज्या शरीराला पोषक तर असतातच, पण त्याचबरोबर त्या शरीराचं चापल्यही वाढवतात. कसलाही कंटाळा न करता, रोजच्या आहारात अशा अनेक फळभाज्यांचा समावेश केल्यास त्यातील शरीरोपयोगी जीवनसत्त्वं तसंच इतर घटकांमुळे विविध रोगांना प्रतिबंध करण्याचं आणि विषद्रव्यं शरीराबाहेर फेकण्याचं काम त्या करतात.
निसर्ग आपल्याला असंख्य आहारीय (खाऊ शकतो असे पदार्थ) पदार्थाचा ठेवा भरभरून देत असतो. फळभाज्या हा त्यातलाच एक भाग आहे. ज्या शरीराला व पर्यायानं आरोग्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे उपयुक्त आहेत.

फळभाज्या खाताना काही जण वांगं खायला नाकं मुरडतात. पण भरली वांगी किंवा हिवाळ्यात येणा-या वांग्याचं भरीत हे चमचमीत करून खाल्ल्यानं त्यातील लोह, जीवनसत्त्व अ, क व कॅल्शिअम ही महत्त्वाची पोषकद्रव्यं शरीराला मिळतात. आयुर्वेदात वांगं या फळभाजीला हृदयासाठी हितकारक म्हणून गणलं आहे. पण ते वातप्रकोपकारक असल्यानं पावसाळ्यात खाऊ नये.

दुधी भोपळ्यासारख्या फारच बेचव भाज्यांची निर्मिती मानवाच्या आरोग्य हितासाठीच झाली आहे. दुधी भोपळ्याची भाजी फार मसालेदार किंवा चमचमीत न करता, ती सौम्य करून खाल्ल्यास त्याचा शरीराला पुरेपूर लाभ होतो. ही भाजी रक्तदाबाचा त्रास असलेल्यांसाठी उत्तम वरदान आहे. सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी दुधीचा अर्धा ते पाऊण कप रस घ्यावा. अनियंत्रित रक्तदाब किंवा मानसिक ताणतणावामुळे येणारी चक्कर तसंच वाईट कोलेस्टेरॉल विरघळवण्याची क्षमता या रसात आहे. दुधी ही भाजी मुळात थंड गुणाची असल्याने तिच्या रसामध्ये चिमटीभर सुंठपूड घालावी आणि तो प्यावा. म्हणजे कफ, सर्दी होणार नाही. दुधीचा हलवा हा तर अतिशय प्रसिद्ध आणि तितकाच आवडणारा गोडाचा प्रकार आहे. परंतु दुधीची भाजी खाण्यातून वा रस पिण्यातून जितकी पोषणमूल्यं मिळतात, ती त्याचा हलवा बनवल्यावर नष्ट होतात. गोडाची आवड म्हणून कधीतरी हलवा खाणं ठीक आहे.

पडवळ (वेलावर येणारी फळभाजी) ही तर उत्तम त्रिदोषशामक (वात, कफ आणि पित्त या शरीरातील तीन दोषांमुळे होणारा त्रास कमी करणारी) भाजी आहे. या भाजीतील थंड गुण हा पित्तशमनावर उपयुक्त असून यातील विशिष्ट रासायनिक द्रव्यांमुळे शरीरातील विषद्रव्यांचं उत्सर्जन होऊन सांध्यांचंही संरक्षण होतं. चक्षुष्य (दृष्टी व तिचं आरोग्य) उत्तम ठेवण्याचं कार्य ही भाजी करते. पडवळासोबत टोमॅटो उकडून त्यांचा पातळ गर तयार करून सूपही बनवता येतं.

घोसाळं (गिलके) तसंच दोडका (शिराळी) या भाज्याही बाराही महिने मिळतात. परंतु विशेषत: पावसाळी हंगामातील वेलीवर येणा-या अशा या फळभाज्या. या दोन्ही भाज्या वातघ्न (वात कमी करणारे) गुणात्मक असल्यामुळे यांमध्ये सांध्यांसाठी आवश्यक असणारं उत्तम प्रकारचं संरक्षक तत्त्व आहे. दुधीप्रमाणेच घोसाळ्याची भाजी ही मधुमेहींसाठी एक मोठं वरदान आहे. स्वादुपिंडातून स्रवणा-या इन्सुलिनच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवणं, हे मधुमेही व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाचं कार्य घोसाळ्याची भाजी खाल्ल्यानं सुरळीतपणे होतं. हृदयविकार, वाईट कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढलेलं असलेल्यांनी घोसाळं उकडून त्याचं वांग्यासारखंच भरीत करून खाल्ल्यास रक्तातील वाढलेल्या वाईट चरबीचं प्रमाण नियंत्रित राहतं. तसंच शरीरातील विषद्रव्यं (अँटीऑक्सिडंट्स) मूत्राद्वारे शरीराबाहेर काढण्याचे गुणही या भाज्यांमध्ये आहेत.

हे अवश्य करा..

>पडवळ, दुधीभोपळा, घोसाळी, शिराळी या भाज्या आठवडय़ातून दोन ते तीन वेळा तरी अवश्य खाव्यात.
>तान्हं मूल दुधाव्यतिरिक्त पहिल्यांदा तांदळाची पेज प्यायला सुरुवात करतं, त्यावेळी आलटून-पालटून विविध प्रकारच्या फळभाज्या एकत्र करून त्यांचा गर पेजेमध्ये मिसळून त्यांना खायला द्यावा. दात नसलेल्या वा अन्नपचन मंदावलेल्या वृद्ध व्यक्तींना अशा फळभाज्यांचं सूप बनवून दिल्यानं त्यांना आवश्यक असलेली पोषणद्रव्यं मिळतात.
>ऋतुमानानुसार मिळणा-या सर्व प्रकारच्या फळभाज्या विपुल प्रमाणात खाव्यात.

Read More »

करा मात नैराश्यावर

नुकताच 'जागतिक दुर्बलता दिवस' सर्वत्र साजरा केला गेला. या दिनाच्या निमित्ताने नैराश्य कशामुळे येतं, त्याची कारणं कोणती, त्याचे काय परिणाम आहेत याबाबत जगभरात सव्‍‌र्हे करण्यात आला. त्यात भारतात प्रामुख्याने महिलांमध्ये नैराश्याचं प्रमाण वाढलं असून त्याचं निदान स्पष्टपणे होत नसल्याचं सामोरं आलं आहे. त्यामुळे नैराश्य हे जगभरात आढळणा-या मानसिक दुर्बलतेचं दुसरं प्रमुख कारण असल्याचं मानलं जात आहे.
डिप्रेशन (नैराश्य) म्हणजे नेमकं काय? डिप्रेशनची अशी काही नीट व्याख्या करता येत नाही, पण मनाची उदासीन अवस्था म्हणजे डिप्रेशन, अशी याची ढोबळमानाने व्याख्या करता येईल. कोणतंही काम करावंसं न वाटणं, दु:खी असणं, सतत काळजी, चिडचिड करणं, स्वत:ला दोषी समजणं, दैनंदिन कामात अजिबात रस नसणं, थोडक्यात काहीही करावंसं न वाटणं किंवा मूड नसणं म्हणजे डिप्रेशन येणं होय. दिवसेंदिवस वाढणा-या स्पर्धेमुळे हे डिप्रेशन माणसाच्या आयुष्यात डोकावू लागलं आहे. वाढत्या गरजांमुळे किंवा कोणतीही गोष्ट आपल्या मनासारखी न झाल्यामुळे कधी कधी अगदी लहानसहान वाटणा-या गोष्टींमुळे कित्येक जण काही ना काही कारणाने असे नैराश्याच्या गर्तेत इतके अडकतात की, त्यांचं दैनंदिन जीवन विस्कळीत होतं. त्यातून काही जण लवकर बाहेर पडतात, तर काही जण त्याच गोष्टीत गुरफटून राहतात.

जागतिक आरोग्य संस्थे(डब्ल्यूएचओ)च्या म्हणण्यानुसार, एचआयव्ही, अन्य संसर्गजन्य आजार तसंच हृदयरोगानंतर निर्माण होणारे आजार नैराश्येला कारणीभूत ठरतात. आणि हे मानसिक दुर्बलता जगभरात वाढण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण असल्याचं समोर आलं आहे. नव्याने केलेल्या अभ्यासानुसार, नराश्य आल्यास किमान दोन आठवडे टिकतं आणि त्यामुळे झोप उडणं, भूक न लागणं, कामातील रस कमी होणं, कंटाळा येणं तसंच मृत्यूचे विचार वारंवार घोळणं, विचारांमध्ये सुसंगती न राहणं असे परिणाम दिसून येतात. या लक्षणांमुळे त्यांच्या नोकरीविषयक, शैक्षणिक, सामाजिक आणि अन्य महत्त्वपूर्ण क्षेत्रांमधील कामात अडचणी निर्माण होतात.

भारतात नराश्याकडे कायम दुर्लक्षच केलं जातं. अनेक निराश रुग्ण विशेषत: समाजातील निम्न सामाजिक-आर्थिक स्तरातील लोक आपल्या फॅमिली डॉक्टरकडून उपचार घेतात. भीतीमुळे कधीही मानसशास्त्रज्ञांकडे जाण्याचं नाव काढत नाहीत किंवा लक्षणं कधीही दर्शवत नाहीत. अशा रुग्णांना साधारणपणे जीवनसत्त्व, टॉनिक किंवा अन्य औषधं दिली जातात. यापैकी बरेच रुग्ण शारीरिक तसंच मानसिक लक्षणं दर्शवतात. नराश्यावर मात करणारी औषधं त्यांना दिली जातात तेव्हा त्यांचा डोस कमी असतो.

वर्षभरात नराश्याशी निगडित आजारांमध्ये सहा ते १० टक्के वाढ दिसून आली. हे प्रमाण सर्वच गटात दिसून येत असलं तरी प्रामुख्याने महिलांमध्ये जास्त आढळून येतं. परिणामकारक उपचार उपलब्ध असूनही अँटिडिप्रेसंट औषधांचा तसंच काही प्रकारच्या सायकोथेरपीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. हे परिणामकारक उपचार उपलब्ध असले तरी पाच ते १० टक्के नैराश्य आलेल्या रुग्णांना मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डरपासून सुटका मिळत नाही. अशा रुग्णांना ट्रीटमेंट-रेसिस्टंट डिप्रेशनचा त्रास सहन करावा लागतो. या रुग्णांकरता आता डीप ब्रेन स्टिम्युलेशन (डीबीएस) ही नवीन उपचारपद्धती अस्तित्वात आली असून ही सर्जिकल प्रकिया आशियामध्ये पहिल्यांदा मुंबईतील जसलोक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमध्ये उपयोगात आणण्यात आली आहे.

Read More »

थंडीसाठी खास घरगुती फेसपॅक

थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा कोरडी पडणे, त्वचा काळवंडणे, सुरकुत्या पडणे, खाज उठणे असे प्रकार होत असतात. म्हणूनच या दिवसांमध्ये त्वचेची निगा कशी राखावी हे आता आपण पाहूया.
तुळशीच्या सुकलेल्या पानांची पावडर, संत्र्याच्या सालीचा रस, ग्लिसरीन (थोडेसे), आंबेहळद (थोडेसे) हे मिश्रण एकत्र करून फेसपॅक तयार करावा. थंडीमध्ये हा फेसपॅक म्हणजे रामबाण उपाय आहे.

पूर्ण शरीराचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी मध, हळद, बेसन समप्रमाणात घेऊन (पाणी घालू नये) हा स्क्रब अंघोळीपूर्वी शरीराला निदान तीन मिनिटं लावून ठेवावा. हा स्क्रब एक दिवसाआड लावल्यास त्वचा उजळते.

थंडीत फेसपॅकरूपी मॉइश्चरायझर म्हणून लोणी, कच्चे दूध, साय यात बेसन मिसळून अंगभर चोळावे. हा पॅक अंघोळीपूर्वी लावावा. त्यामुळे या दिवसांमध्ये त्वचा कोरडी पडत नाही. वेळ मिळेल तसा एक दिवसाआड हा फेसपॅक लावल्यास सुरकुत्या आणि कोरडी त्वचेपासून तुमची निश्चित सुटका झाली असे समजावे.

त्वचेच्या संरक्षणासाठी खास उटणे : आंबेहळद, कडुनिंबाच्या सुकलेल्या पाल्याची पावडर, नीम पावडर (अगदी थोडी), संत्रा पावडर आणि चंदन एकत्र यांचे उटणे घरात बनवून घ्यावे.

थंडीत कोरडी त्वचा खरखरीत होते. या कोरड्या त्वचेसाठीचा हा खास फेसपॅक -

>अर्जुन पावडर : १०० ग्रॅम,
>मंजिष्ठा : १०० ग्रॅम,
>शंख जिरा : १०० ग्रॅम,
>चंदन पावडर : १०० ग्रॅम,
>साठी : १०० ग्रॅम,
>हळदी : १०० ग्रॅम,
>मायाफळ : ५० ग्रॅम
>जायफळ : ४० ग्रॅम,
>फिटकिरी : ४० ग्रॅम,
>खस्ता : ५० ग्रॅम,
>मूग डाळ : (थोडीशी)
>मसूर डाळ : (थोडीशी)

हे सगळे साहित्य एकत्र करून हा फेसपॅक दूध आणि सायीसह लावावा. हे सर्व साहित्य आयुर्वेदिक दुकानात सहज उपलब्ध आहे.
पार्लरमध्ये जाताना..

>थंडीत त्वचेची निगा राखताना पार्लरला जात असाल तर शक्यतो ब्लिच टाळावे. त्वचा अगदीच काळवंडलेली असेल तर मग कमी अ‍ॅक्टिवेटर वापरून ब्लिच करावे.

>फेशिअलमध्ये कोरड्या त्वचेसाठी बदाम, एलोव्हेरा, कुकुम्बर, फ्रूट फेशिअलला प्राधान्य द्यावे.

>तेलकट त्वचेसाठी या दिवसांमध्ये स्ट्रॉबेरी फेशिअल हा उत्तम पर्याय आहे.

>क्रिम मसाजवर फेसपॅक लावून घ्यावा, जेणेकरून त्वचेतील स्निग्धता कायम राहते.

टीप : थंडीच्या दिवसांत फेसपॅक चेह-यावर सुकवू नये. अधिक वेळ ठेवल्यास चेह-यावर सुरकुत्या पडण्याची शक्यता असते. फेसपॅक लावल्यानंतर दहा मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा.

Read More »

हिवाळ्यात घ्या केसांचीही काळजी

कडक उन्हाळा आणि मुसळधार पावसापेक्षा हिवाळा हा तसा आल्हाददायक ऋतू असला तरी, या ऋतूचाही तुमच्या केसांवर परिणाम होतो. त्वचेप्रमाणे केस कोरडे होतात. कित्येकदा टाळूला खाज येते किंवा कोंडयाच्या प्रमाणात वाढ होते. म्हणूनच या दिवसांत केसांची विशेष काळजी घ्यावी लागते.
वातावरणामध्ये थंडावा यायला सुरुवात झाली आहे. वॉर्डरोबमधून गरम कपडे बाहेर येऊ लागले आहेत. गरम कपडे फक्त थंडी-वा-यापासून तुमच्या त्वचेचं संरक्षण करतात, पण केसांचं नाही. अनेक जण हिवाळी शुष्कतेपासून बचाव होण्यासाठी त्वचेची काळजी घेण्याचा प्रयत्न करतात. पण खूपदा केसांकडे दुर्लक्षच होतं. थंड हवामान केस आणि टाळूमधील आद्र्रता शोषून घेतं. त्यामुळे त्वचेवर खपल्या येतात, कोंडा जमा होतो आणि कमजोर केसांचे फॉलिकल्स तयार होतात. त्यामुळे केसांतील नैसर्गिक तेल निघून जातं. त्यामुळे केस शुष्क आणि निस्तेज बनतात. पुष्कळ वेळा अत्याधिक मेद स्रव केस चिकट बनवतो. परिणामी केसांमध्ये धूळ आणि केरकचरा चिकटतो आणि केस निस्तेज आणि कडक बनतात.

थंड हवामानामुळे टाळूच्या त्वचेची छिद्रं आकुंचन पावतात. त्यामुळे बुरशी येते. कित्येकदा सुक्ष्म जंतूंमुळे कोंडा, पुरळ आणि संसर्ग उद्भवतो. थोडक्यात हिवाळ्यात केसांना इजा पोहोचते. ते शुष्क व अधिक कुरळे होतात. दुभंगलेली टोकं आणि केस तुटणं या सामायिक समस्या झाल्या आहेत. कोंडयासारख्या टाळूच्या समस्येमुळे केस गळतात आणि या मोसमामध्ये संकटांमध्ये अधिक भरच घालतात.

स्नान आणि शॅम्पू लावणं

केस अतिशय काळजीपूर्वक धुवावेत. धुताना एकदम जोराने घासू नयेत. जोर लावून केस ओढू नये. जास्त काळजी घेऊन व्यवस्थित धुवावेत. गरम शॉवर्स घेणं किंवा गरम पाण्याने केस धुणं टाळावंच. कोमट शॉवर केसांसाठी उत्कृष्ट आहे. उकळलेलं गरम पाणी टाळू शुष्क व खपलीयुक्त करून केस कमजोर बनवतं. केसांना वारंवार शॅम्पू लावू नये. अतिरिक्त धुण्यामुळे तुमच्या केसांतील नैसर्गिक तेल जाऊ शकतं. थंड हवामानामध्ये, केस आणि टाळू दोन्ही लवकर वाळतात. केसांतील अतिरिक्त पाणी काही मिनिटं डोक्याला टॉवेल गुंडाळून शोषून घ्यावं. नसर्गिक घटक असलेला नैसर्गिक शॅम्पू निवडा. पहिल्यांदा पृष्ठभागावरील मळ हळुवारपणे धुवा आणि फेस काढा. पुन्हा टाळू आणि केसांच्या मुळाशी रक्तपुरवठा होण्यासाठी डोक्याला मसाज करा. मळ स्वच्छ करणं आवश्यक आहे, कारण मळाच्या संचयामुळे कोंडा होऊ शकतो.

खोलवर कंडिशिनग

केस कोमल आणि चमकदार ठेवण्यासाठी अंघोळीनंतर लिव्ह-इन हेअर कंडिशनर वापरा. ज्यांना नसर्गिक कंडिशनर पाहिजे आहे, त्यांच्यासाठी नारळाचा रस उत्कृष्ट पर्याय आहे.

विचरणं आणि स्टायिलग

>केस ओले असताना कधीच विंचरू नये. बोटांनी गुंता सोडवावा.
>मुलायम आणि गुंता नसलेल्या केसांसाठी रुंद दातांची फणी हळुवारपणे वापरावी. मुळापासून विंचरायला सुरुवात करावी आणि हळुवारपणे खाली आणावी. केसांमध्ये फणी व्यवस्थित फिरण्यासाठी पुढील बाजूने विंचरावी.
>मानेजवळील आणि मागच्या केसांना व्यवस्थितपणा येण्यासाठी लंबगोल ब्रशचा वापर करावा.
>केसांना स्टायिलग करताना हेअर ब्रशवर थोडासा हेअर स्प्रे मारावा. स्टायिलग करून झाल्यावर केसांवरून खालपर्यंत ब्रश करावा.
>हिवाळ्यामध्ये हेअर ड्रायर्स वापरणं टाळावं. कारण त्यामुळे तुमचे केस अधिकच कमकुवत होऊ शकतात. नसर्गिकरीत्या तुमचे केस वाळवा.

ऑइलिंग

शुष्क केसांसाठी केसांना तेल लावणं ही जुनी पद्धत आहे. केसांसाठी महाग तेल वापरण्याची गरज नाही. नेहमीचं साधं नारळतेल उत्कृष्ट ठरेल. केसांचं आणि टाळूचं नैसर्गिक  पोषण भरून काढण्यासाठी टाळूवर बदाम, जोजोबा किंवा रोजमेरी तेलाने मालिश करू शकता. आठवडयामध्ये एकदा ऑलिव्ह तेल वापरणं फायदेशीर असतं. गरम तेलामुळे टाळूतील रक्ताभिसरण सुधारतं. टाळूमध्ये आद्र्रता राखण्यासाठी रात्रीच्या वेळी किंवा धुण्यापूर्वी तीस मिनिटं केसांना तेल लावणं उपयुक्त ठरतं.

हे करा, केस वाचवा..

>धूम्रपान व मद्यपान तुमचे केस कमकुवत बनवू शकतात. योगा, ध्यान किंवा सौम्य भावपूर्ण संगीत यांसारख्या विश्रांतीच्या पद्धतींमुळे निश्चितच मदत मिळते.
>वारा आणि प्रतिकूल हवामान परिस्थितींपासून केसांचं संरक्षण करण्यासाठी स्कार्फ वापरावा.
>केस ओले असताना बाहेर जाऊ नका. कारण यांमुळे केस दुभंगू शकतात.
>कलिरग, पर्मिग, स्ट्रेटिनग, आयर्निग आणि क्रिम्पिगसारख्या केमिकल उपचारपद्धती टाळाव्यात.
>तुमच्या केसांसाठी आणि त्वचेसाठी जीवनसत्त्व ई पोषणाच्या दृष्टीने उपयुक्त आहे. पाच बदाम आणि १-२ अक्रोड नियमितपणे खावेत. यामुळे तुमच्या केसांना चकाकी येईल.
>हिवाळ्यात मेहंदी वापरणं टाळावं. कारण मेहंदीमुळे तुमचे केस अधिकच शुष्क बनतील.
> कोंडा व शुष्कपणा घालवण्यासाठी नसर्गिक कोरफडीचा स्त्राव उपयुक्त ठरतो.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe

No comments:

Post a Comment