Wednesday, May 22, 2013

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS

'कोल्हारे-बोपेले योजना' विद्युतजोडणीअभावी बंद

कोल्हारे-बोपेले पाणीपुरवठा योजनेला विद्युतपुरवठा देण्याबाबत कार्यवाही न करणा-या अधिका-यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महावितरणचे उपअभियंता गुल्हाने यांनी दिली आहे.

नेरळ - नेरळजवळील कोल्हारे-बोपेले येथील नळ पाणीपुरवठा योजनेचे काम ३ महिन्यांपूर्वीच पूर्ण झाले आहे. पण महावितरण कंपनीने विद्युतजोडणी न दिल्याने अद्याप ही योजना कार्यान्वित झालेली नाही. त्यामुळे पाण्यासाठी येथील महिलांना पायपीट करून उल्हास नदीतून पाणी भरावे लागत आहे. दरम्यान, कोल्हारे-बोपेले पाणीपुरवठा योजनेला विद्युतपुरवठा देण्याबाबत कार्यवाही न करणा-या अधिका-यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महावितरणचे उपअभियंता गुल्हाने यांनी दिली आहे.

कोल्हारे ग्रामपंचायतीमधील बोपेले या १५ ते २० घरांची लोकवस्ती असलेल्या वस्तीला पूर्वी धामोते नळपाणी योजनेतून पाणीपुरवठा होत होता. मात्र, धामोते योजना वेगळी झाल्याने बोपेले गावाचा समावेश स्वजलधारा योजनेत करण्यात आला. त्यामुळे आता बोपेले गावाला कोल्हारे नळपाणी योजनेतून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पण दोन जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाल संपून गेला तरी नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण झालेली नाही. या पार्श्वभूमीवर जिल्हा लघु पाटबंधारे विभागाने तालुक्यातील रखडलेल्या नळपाणी योजना कार्यान्वित करण्यासाठी पाठपुरावा करून अनेक योजनांच्या कामांना गती दिली आहे.

या अंतर्गतच कोल्हारे-बोपेले नळपाणी योजनेचे कामदेखील गतीने सुरू झाले. ४९-६५ लाख रुपयांची  ही योजना २०१३ मध्ये पूर्ण झाली. त्यानुसार उल्हासनदीवरील उद्भव विहीर, पाणी साठवण टाक्या (कोल्हारे, बोपेले) आणि वितरण व्यवस्थेची कामे पूर्ण करण्यात आली. तर अन्य किरकोळ कामे आणि दोन्ही गावांत मिळून तीन ठिकाणी असलेले सार्वजनिक स्टँड पोस्टची कामे अशी काही कामे पूर्ण होत आहेत. एप्रिल-मे महिन्यांतील कडाक्याच्या उन्हात महिलांना डोक्यावर हंडे घेऊन उल्हास नदीवर पाणी भरण्यासाठी जावे लागू नये म्हणून पाणीपुरवठा समितीने जानेवारी २०१३ मध्ये नेरळ महावितरण कार्यालयाकडे नळ पाणीपुरवठा योजनेला विद्युतजोडणी देण्यासाठी अर्ज दाखल केला. महावितरणच्या नेरळ कार्यालयाने या जोडणीसाठी अंदाजपत्रक दिल्यानंतर त्याचे ३० हजार रुपयांचे देयकदेखील भरण्यात आले. तरी तीन महिन्यांनंतरही कंपनीकडून विद्युतजोडणी मिळू शकली नाही.

त्यामुळे पाणी योजनेची तपासणी आणि प्रत्यक्ष नळ पाणीपुरवठा सुरू करण्याचे काम मे महिन्यातदेखील सुरू होऊ शकले नाही. दरम्यान, याबाबत महावितरण कंपनीचे कर्जतचे उपअभियंता गुल्हाने यांच्याशी संपर्क साधला असता, पाणी योजनांचे काम कधीही खोळंबून ठेवले जात नाही. पण कोल्हारे-बोपेने नळ पाणीपुरवठा योजनेसाठी विद्युतजोडणी न देणा-या अधिका-यांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

Read More »

बुकींचे 'माया'जाल

नव्वदीत गाजलेल्या 'मॅचफिक्सिंग' प्रकरणातही सट्टेबाजांनी दक्षिण आफ्रिकेचा तत्कालीन कर्णधार हॅन्सी क्रोनिएला जाळ्यात ओढण्यासाठी एका मुलीचाच वापर केला होता.

इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) क्रिकेटपटूंना 'स्पॉटफिक्सिंग'च्या दलदलीत खेचण्यासाठी सट्टेबाज ललनांचा वापर करत असल्याचे दिल्ली पोलिसांच्या चौकशीत पुढे आले. आणि हे कटुसत्य ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. पण ललनांच्या साहाय्याने खेळाडूंना भुरळ घालून जाळ्यात ओढण्याची ही पहिलीच वेळ नाही. नव्वदीत गाजलेल्या 'मॅचफिक्सिंग' प्रकरणातही सट्टेबाजांनी दक्षिण आफ्रिकेचा तत्कालीन कर्णधार हॅन्सी क्रोनिएला जाळ्यात ओढण्यासाठी एका मुलीचाच वापर केला होता.

राजस्थान रॉयल्स संघाचे तीन खेळाडू एस. श्रीशांत, अजित चंडिला व अंकित चव्हाण यांना आयपीएलच्या तीन सामन्यांत स्पॉटफिक्सिंग केल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी अटक केली. त्यामुळे 'जंटलमन्स गेम' म्हणून संबोधल्या जाणा-या क्रिकेटच्या आड चाललेल्या काळा धंदा पुन्हा उजेडात आला. मात्र खेळाडूंना गळाला लावण्यासाठी सट्टेबाज मुलींचाही वापर करत असल्याची बाब तर आणखी लाजीरवाणी होती. दिल्ली पोलिसांच्या चौकशीत पैशांसह खेळाडूंना मुली पुरवल्याची बाबही पुढे आली. विशेष म्हणजे दिल्ली पोलिसांनी वांद्रे-कार्टर रोड परिसरातून जेव्हा श्रीशांतला अटक केली, त्या वेळी त्याच्यासोबत तीन मुलीही होत्या. त्यानंतर श्रीशांतच्या लॅपटॉपमध्ये अनेक मुलींचे फोटो व काही आक्षेपार्ह वस्तू आढळल्या आहेत.

दिल्ली पोलिसांनीही बुकींचे संभाषण रेकॉर्ड केले. त्यातही त्यांनी श्रीशांत व चंडिलाला कमीत कमी तीन वेळा मुली पुरवण्यात आल्याची बाब पुढे आली. पुढे करण्यात आलेल्या चौकशीत सट्टेबाज चंद्रेश पटेल ऊर्फ चांद आणि मनन यांच्या चौकशीतूनही या माहितीला दुजोरा मिळाला होता. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वांद्रे येथील श्रीशांत राहिलेल्या हॉटेलचे सीसीटीव्ही चित्रीकरण मिळवले असून, त्याच्या पाहणीत या प्रकरणावर अधिक प्रकाश पडेल. पण सट्टेबाज एवढयावरच थांबणार नव्हते, तर पुढे ललनांच्या साहायाने खेळाडूंची आक्षेपार्ह चित्रफीत तयार करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचाही त्यांचा कट होता.

सट्टेबाजांची कार्यप्रणाली फार जुनी आहे. क्रिकेटचा काळाकुट्ट अध्याय असलेल्या मॅचफिक्सिंमध्येही परदेशी खेळाडूंना गळाला लावण्यासाठी प्रभावीपणे इंग्रजी बोलणा-या मुलींची निवड केली होती. सोज्ज्वळ क्रिकेटपटू म्हणून ओळख असलेल्या हॅन्सी क्रोनिएलाही मुलगी पुरवण्यात आली होती. त्या वेळीही दिल्लीच्या एका सट्टेबाजाच्या दूरध्वनी संभाषणातून ही बाब त्या वेळी पुढे आली होती. त्यासाठी बुकींनी मुंबईत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका मुलीला फसवले होते. त्या वेळी ड्रग्जमाफियाही या ऑपरेशनमध्ये सहभागी झाले होते. कुख्यात ड्रग्जमाफिया बटला व विक्की यांनीच या मुलीला शोधून काढले व त्यानंतर लक्ष्मीकांत ठाणे या ठाण्याच्या सट्टेबाजामार्फत क्रोनिएपर्यंत पोहोचवले होते. त्यासाठी या मुलीला ४० हजार रुपये देण्याचे ठरले होते. वैद्यकीय शिक्षणासाठी झालेला खर्च भरून काढण्यासाठी ही मुलगी या दलदलीत उतरली होती.

पूर्वी मुंबईतील बडया व्यक्तींच्या पार्टीची शान बनलेल्या या मुलीची अशाच एका पार्टीत ड्रग्जमाफियांशी ओळख झाली होती. त्यातून हा पूर्ण डाव रचण्यात आला आहे. त्या वेळीही दक्षिण मुंबईत एका हॉटेलमध्ये थांबलेल्या क्रोनिएसाठी वांद्रय़ातील एका अपार्टमेंटमध्ये सट्टेबाजांनी विशेष सोय केली होती. तो येण्याच्या आधी तेथे ही मुलगीही उपस्थित होती. त्या वेळीही सट्टेबाजांनी मुलीचा वापर करून क्रोनिएला मॅचफिक्सिंगबाबत विचारण्याचे ठरवले होते. त्यानुसार सर्व व्यवस्थित झाले, मात्र क्रोनिए या वेळी एवढा दारू प्यायला की, त्यामुळे सट्टेबाजांना त्याच्याशी मॅचफिक्सिंगबाबत बोलताच आले नाही. त्यानंतर क्रोनिए त्याच्या ठरल्या कार्यक्रमानुसार दिल्लीला रवाना झाला. पुढे दिल्लीच्या बुकींनीही क्रोनिएसाठी दिल्लीत 'हनी ट्रॅप' रचला व त्याला मॅचफिक्सिंगमध्ये सामील करण्यात यशस्वी ठरले.

मॅचफिक्सिंग प्रकरण पुढे आले आणि क्रोनिए वृत्तपत्रांची हेडलाइन बनला. त्या वेळी वैद्यकीय शिक्षण घेणारी ती मुलगी भलतीच घाबरली व तिने मुंबई सोडून हैदराबाद गाठले. या वेळी तिने तिचे वैद्यकीय शिक्षणही पूर्ण केले नव्हते. पुढे या प्रकरणी देशभर सुरू झालेल्या अटक सत्रात कुलाबा परिसरात छापा टाकून पोलिसांनी ड्रग्जमाफिया बटला व विक्की या दोघांनाही अटक केली. त्या वेळी क्रोनिए आणि या मुलीबाबतची माहिती पुढे आली होती. त्या वेळी पोलिसांसह अनेक क्रिकेटपटूंनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली होती. काळानुसार सट्टेबाज आणि सट्टेबाजांत अनेक बदल झाले आहेत. मॅचफिक्सिंग करणारे सट्टेबाज आता स्पॉटफिक्सिंगला पसंती देऊ लागले आहेत. पण खेळाडूंना जाळ्यात ओढण्यासाठी आजही सट्टेबाज ललनांचाच वापर करत आहेत आणि भविष्यातही त्याचा वापर होणार यात वाद नाही.

Read More »

नागोठण्यात कच-यांचे साम्राज्य

नागोठणे शहर व परिसरातील कचरा अनेक दिवस उचलला जात नसल्याने सर्वत्र कच-यांचे साम्राज्य पसरले आहे

नागोठणे - नागोठणे शहर व परिसरातील कचरा अनेक दिवस उचलला जात नसल्याने सर्वत्र कच-यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यांवर कच-यांचे ढीग साचले असल्याने रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शहरातील वाढती लोकसंख्या पाहता कच-यांची विल्हेवाट लावण्यास असलेली यंत्रणा अपुरी पडत आहे. त्यातच शहरात सुरू असलेली नवी बांधकामे पाहता वाढीव लोकसंख्येसाठी कच-यांची विल्हेवाट लावण्यासाठी नवीन आधुनिक यंत्रणेची मागणी जोर धरू लागली आहे. ग्रामपंचायतीच्या हद्दीत मोठया प्रमाणात होत असलेल्या बांधकामांमुळे नागरी सोयी-सुविधांवर ताण पडत आहे. तसेच पाणीपुरवठा, वीज, कच-यांची विल्हेवाट आदी समस्या उद्भवू लागल्या आहेत. 

नालेसफाईला मुहूर्त नाहीच

पावसाळा सुरू होण्यापूर्वी नागोठणे ग्रामपंचायतीकडून शहरातील गटारे आणि नाले साफ करण्यात येतात. पावसाळा पंधरा दिवसांवर आला असताना ही अद्याप ग्रामपंचायतीकडून नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली नसल्याने रहिवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. शहरातील जोगेश्वरीनगर ते विशाल मेडिकल, मच्छीमार्केट, गुरव आळी येथे मोठे नाले आहेत. या नाल्यातील कचरा वेळेत न काढल्यास पावसाळयात नाल्यांतील पाणी परिसरात साचते. त्यामुळे पावसाळयापूर्वी या नाल्यांची साफसफाई करण्याची मागणी रहिवाशांकडून होत आहे.

Read More »

रायगडमधील सराफांचा आजपासून बंद

एलबीटी म्हणजे आमचा व्यवसाय नष्ट करण्यासाठीचा कटच आहे.स्थानिक संस्था कराविरोधात रायगडमध्ये सराफांचा आजपासून बंद पाळला जात आहे.

कर्जत - स्थानिक संस्था कराविरोधात (एलबीटी) २२ ते २६ मेदरम्यान येथील सराफांची दुकाने बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती रायगड जिल्हा सराफ असोसिएशनचे अध्यक्ष मोहन ओसवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

एलबीटी म्हणजे आमचा व्यवसाय नष्ट करण्यासाठीचा कटच आहे. या करामुळे 'इन्स्पेक्टर राज' येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एलबीटीला विरोध करण्यासाठी कर्जतमधील सराफ असोसिएशनच्या वतीने येथे बंद पुकारण्यात आला आहे. याबाबत माहिती देण्यासाठी नुकतीच येथील सरकारी विश्रामगृह गुलमोहर येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला कर्जत शहर सराफ असोसिएशनचे अध्यक्ष साजन ओसवाल, सुभाश सोलंकी, भाजप तालुकाध्यक्ष रमेश मुंढे, शहराध्यक्ष अशोक ओसवाल, प्रकाश ओसवाल, दीपक बेहरे आदी उपस्थित होते.

एलबीटी कराच्या अटी किती जाचक आहेत, याचा ऊहापोह दीपक बेहरे आणि अशोक ओसवाल यांनी केला.

तर या करामुळे साध्या सराफांची दुकाने बंद करून मॉलमध्ये सोने विकण्याचा हा डाव असल्याचा आरोप मोहन ओसवाल यांनी केला आहे. सहा दिवसांच्या बंदमध्ये निर्णय न झाल्यास बेमुदत बंद करून तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही
त्यांनी सांगितले.

Read More »

उरणमध्ये आधार केंद्रे सुरू करावीत

उरणमध्ये आधार केंद्रे सुरू करावीत.अशी मागणी उरण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मिलिंद पाडगावकर  यांनी केली.

उरण - आधारकार्डचे महत्त्व लक्षात घेऊन उरण शहर आणि ग्रामीण भागात आधार केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी उरण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मिलिंद पाडगावकर यांनी उरण तहसीलदार शेषनाथ पाटील यांच्याकडे केली आहे. 

महिन्याभरापूर्वी शहरातील नगरपालिका क्रीडा संकुलाजवळ आधारकार्ड केंद्र सुरू करण्यात आले होते. परंतु काही कारणास्तव हे केंद्र बंद करण्यात आल्याने उरण शहरवासीयांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे हे केंद्र त्वरित सुरू करावे. तसेच शहरामध्ये आणखी एक आणि तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये चार-पाच केंद्रे विभागवार सुरू करावीत, जेणेकरून नागरिकांना आधारकार्ड बनवणे सोयीचे होईल, अशी मागणी मिलिंद पाडगावकर यांनी केली आहे.

दरम्यान, विमला तलावाजवळील क्रीडा संकुलमधील आधारकार्ड केंद्र दोन-तीन दिवसांमध्ये सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे स्पष्टीकरण उरणचे तहसीलदार शेषनाथ पाटील यांनी दिले आहे.

Read More »

जांभूळवाडीवासीयांनी श्रमदानाने बांधली विहीर

शबरी सेवा समितीच्या पुढाकाराने ग्रामस्थांनी श्रमदान करून अवघ्या वीस दिवसांत विहीर बांधून पाणीटंचाईवर मात केली.

कर्जत - तालुक्यात मुसळधार पाऊस होत असला तरी उन्हाळयात अनेक गावा-वाडयांमध्ये पाणीटंचाई निर्माण होते. जांभूळवाडी (धामणी) या वाडीमध्येही ही परिस्थिती होती. फेब्रुवारी अखेरीस गावातील पाण्याचे स्रेत आटत असल्याने महिलांना पाण्यासाठी दोन-दोन किमीची पायपीट करावी लागत होती. मात्र, शबरी सेवा समितीच्या पुढाकाराने ग्रामस्थांनी श्रमदान करून अवघ्या वीस दिवसांत विहीर बांधून पाणीटंचाईवर मात केली.

राज्यातील जनता पावसाविना दुष्काळाने होरपळत आहे. तर दुसरीकडे मुसळधार पाऊस होणाऱ्या ठाणे व रायगड जिल्ह्यांतील अनेक गावांमध्ये नियोजनाअभावी ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. कर्जत तालुक्यातही मुसळधार पाऊस होत असला तरी येथील काही भागांमध्ये फेब्रुवारी-मार्च महिन्यांपासूनच पाणीटंचाईला सुरुवात होते. येथील जांभूळवाडी (धामणी) या दुर्गम भागातील आदिवासींनाही पाणीटंचाईमुळे दोन-दोन किमी अंतरावरून पाणी आणावे लागत होते. पण शबरी सेवा समितीच्या सहाय्याने ग्रामस्थांनी श्रमदानाने विहीर बांधून पाण्याचा नवा स्रेत निर्माण केला.

तालुक्यातील अनेक दुर्गम भागांमध्ये शबरी सेवा समिती सामाजिक उपक्रम राबवते. त्यामुळे गावातील पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी जांभूळवाडीमधील मंगल पारधी, दत्ता तिटकारे, मंगल दरवडा या ग्रामस्थांनी संस्थेचे सचिव प्रमोद करंदीकर यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत गावामध्ये नवीन विहीर बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला सर्व ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शवत श्रमदान करण्याची तयारी दर्शवली. त्यामुळेच अवघ्या २० दिवसांमध्ये विहिरीचे काम पूर्ण झाले. ग्रामस्थांनी प्रथम पाणी लागेल अशा ठिकाणी नवीन विहीर खोदण्यास सुरुवात केली. तर शबरी सेवा समितीने काही देणगीदारांच्या मदतीतून सिमेंट, दगड, वाळू तसेच गवंडयांचा खर्च केला.

सर्व ग्रामस्थांनी गटागटाने श्रमदान केल्याने अवघ्या वीस दिवसांत विहीर बांधून पूर्ण झाली. या विहिरीला स्वच्छ आणि भरपूर पाणी असल्याने येथील ग्रामस्थांची पाण्याची समस्या सुटली आहे. 

Read More »

मॉलचा वेळ. धमाल वेळ

मॉलमध्ये तासन्तास भटकत राहणं हा तरुणांचा सध्याचा आवडता टाइमपास… कोणतंही कारण असो तरुणांची खूप गर्दी या मॉल्समध्ये पाहायला मिळते. मजा-मस्तीबरोबर त्यांना कधी कधी फजितीलाही सामोरं जावं लागतं. तरुणांसाठी केवळ धमाल, मजा-मस्ती असलेल्या या मॉलमधल्या वातावरणाचा उमंगने घेतलेला वेध…थंडगार एसीची हवा.. एकामागून एक ब्रँडेड आणि कलरफूल दुकानांची रांग.. हलकेच कर्णसुख देणारं संगीत किंवा मग मधूनच कानावर पडणारा लाइव्ह ऑर्केस्ट्रा.. अशा वातावरणात मॉलमध्ये तासन्तास भटकत राहणं हा तरुणांचा सध्याचा आवडता टाइमपास. इथल्या उपस्थितीचं खास कारण असतं, कधी सिनेमा बघायचा म्हणून तर कोणी इथे ओळखीचं भेटणार नाही म्हणून.. कोणी निव्वळ टाइमपास म्हणून तर कोणी टिंगलटवाळकी किंवा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी. यांपैकी कोणतंही कारण असो तरुणांची खूप गर्दी या मॉल्समध्ये पाहायला मिळते. मजा-मस्तीबरोबर त्यांना कधी कधी फजितीलाही सामोरं जावं लागतं. तरुणांसाठी केवळ धमाल, मजा-मस्ती असलेल्या या मॉलमधल्या वातावरणाचा उमंगने घेतलेला वेध…

एसीतला टाइमपास

टाइमपास करायचा आहे, मग कुठे जायचं? कुठेतरी बागेत फिरायला जाऊ नाही, तर पार्कात जाऊ असं प्लानिंग करायचे दिवस केव्हाच गेले. आता टाइमपास करायचा आहे ना मग पार्क आणि बाग कशाला हवी, त्यासाठी मॉल आहेच की!, असं म्हणणारे कितीतरी जण तुमच्या ग्रूपमध्ये असतील. त्याचं काय आहे की, खिशात पैसे असो किंवा नसो. फुकटात मस्त एसीची हवा आणि हवा तेवढा टाइमपास फक्त मॉलमध्येच करता येतो. कदाचित म्हणूनच आपले पाय मॉलकडे आपोआपच वळतात.

निव्वळ टाइमपास किंवा विंडो शॉपिंग अशा कारणांसाठी मॉलमध्ये जाणा-यांची संख्या काही क मी नाही. लेक्चर बंक करून किंवा एखाद्या सुट्टीच्या दिवशी, विकेंडला मॉलमध्ये टाइमपास करत गेट-टू-गेदर करणा-या ग्रूपची संख्याही वाढते आहे. मित्र-मैत्रिणींचे ग्रूप जात असतील तर मग कपल्सने यात मागे का बरं राहायचं! त्यांनाही चौपाटी किंवा एखाद्या गार्डनपेक्षा हाच पर्याय जास्त सोयीस्कर वाटतो. एकमेकांबरोबर बराच वेळ घालवता येतोच शिवाय कोणी हटकणारंही नसतं. याही व्यतिरिक्त मॉलमध्ये नवनवीन गेम्स खेळायला मिळतात, कधी कधी मस्त मूव्ही तिकिट्स, गिफ्ट, पासेसही मिळतात. तसंच टाइमपास सोडून मनोरंजनासाठी म्युझिक कॉन्सर्ट्स तर सदैव सुरूच असतात. बराचसा महाविद्यालयीन क्राउड असल्याने आता तर बॉलिवुडचे कित्येक स्टार आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठीही मॉलची वाट धरू लागले आहेत. त्यामुळे त्यांची एक झलक बघण्याची संधीही मॉलवासीयांना सहज मिळते. एवढं सगळं जर मॉलमध्ये असेल तर, 'हम कही और क्यों जाए?'

बरं, या मॉलमध्ये टाइमपास करणा-या मुलांना कोणाचीही काहीही पडलेली नसते. ते आपल्याच दुनियेत मस्त वावरत असतात. त्यांची आपापसांत मजा-मस्ती, फोटो काढणं, खाणं-पिणं, खिदळणं सुरू असतं. त्यांना दुसरे काय करतात, याच्याशी काहीही घेणं-देणं नसतं. मोठय़ा मॉलमध्ये विशेष करून जिथे परदेशी ब्रॅण्डची दुकानं अधिक आहेत, अशा मॉलमध्ये गेलात तर काही नमुने तुम्हाला नक्कीच दिसतील, जे सगळ्यांपेक्षा कुठेतरी कोपरा पकडून ग्रूपने किंवा एकटं बसून येणा-जाणाऱ्यांवर लक्ष ठेवत असतात. जरा काही वेगळं दिसलं की, मग त्यांच्यावर कमेंट करायला ही मंडळी मोकळी!

'मॉलमध्ये मी माझ्या मित्रांबरोबर नेहमी जातो. आमची लेक्चर्स साडेबारा-एकपर्यंत संपतात. घरी लवकर जाऊन तरी काय करणार म्हणून आम्ही मॉलच्या आवारात किंवा जिन्यापाशी बसतो. तिकडे सहसा कोणी आम्हाला हटकत नाही. त्यामुळे मित्रांबरोबर भरपूर टाइमपास करायला मिळतो आणि कधी कधी तर मॉलमध्ये खूप धमाल पाहायला मिळते. आलेली नवखी मंडळी मॉलमध्ये फिरताना कशी बिचकतात, सरकत्या जिन्यांवर चढण्यासाठी त्यांना कशी कसरत करावी लागते, त्यांची उडालेली भंबेरी किंवा लहान मुलांची रडारड, त्यातच कोणाचं धडपडणं, असं बरंच काही मॉलमध्ये पाहायला मिळतं, ते वेगळंच. असं काही पाहिल्यावर पोट दुखेपर्यंत हसायला होतं. संध्याकाळपर्यंत वेळ कसा निघून जातो ते कळतच नाही. ' - आशीष कदम

मॉलमध्ये आम्ही सततच येत असतो. मात्र खरेदी काही करत नाही. माझ्या एका मित्राने सांगितलं होतं की, मॉलमध्ये संध्याकाळी सुंदर मुली शॉपिंगसाठी येतात. खरं सांगायचं तर त्या मुलींना पाहायलाच आम्ही इथे येत असतो. इथल्या ब-याच गोष्टी आमच्या खिशाला परवडणा-याच नसतात, त्यामुळे खाणं-पिणंही सहसा टाळतो. फक्त नेत्रसुखच घेत असतो आम्ही! - अस्लम

मी मित्रांना भेटण्यासाठी मॉलमध्ये जातो. मॉलमध्ये शांतता असल्यामुळे आम्हाला सविस्तर बोलता येतं. तसंच नवनवीन वस्तू किंवा कपडय़ांचे नवीन पॅटर्नसदेखील पाहायला मिळतात. मॉलमध्ये सगळ्या ठिकाणचं वातावरण थंडगार, वातानुकूलित असल्यामुळे इथे बाहेरच्यासारखं उकडत नाही. त्यामुळे कितीही फिरलो तरी कंटाळवाणं वाटत नाही. मनोरंजनाची तर इथे रेलचेलच असते. - अभिषेक करंडे

रोज रोज कॉलेजला जाऊन कंटाळा येतो. म्हणून कधी तरी कॉलेज बंक करून ग्रूपबरोबरच मॉलमध्ये जातो. इथली मजा वेगळीच आहे. मॉलमध्ये गेल्यावर गेमझोनमध्ये कार व बाइक रेस खेळतो. उगाचच भटकत कित्येक दुकानंही फिरतो. फिरून भूक लागल्यावर पिझ्झा, बर्गर अशा आवडीच्या पदार्थाचा मित्र-मैत्रिणींसोबत आस्वाद घेतो. कधी कधी सिनेमादेखील पाहतो. - समीर लांघी

हे चालायचं नाही..

पूर्वी खरेदी करायची म्हटली की, दादर, फॅशन स्ट्रीट आणि कमी किमतीत वस्तू मिळतात म्हणून शुक्रवारी उघडं असणारं चोर बाजार. ही तरुण वर्गाची आवडती ठिकाणं. पण या ठिकाणांचा तरुणवर्गाला हळूहळू विसर पडला. आणि मग मॉल हे खरेदी करण्याचं एक हक्काचं ठिकाण बनलं. कडक उन्हात खरेदी करायचा त्रास मॉलमुळे नक्कीच टळला. मॉलमधील 'कूल' वातावरणामुळे सध्याच्या कडाक्याच्या उन्हात खरेदीचा सुखद अनुभव येतो, यात काही शंका नाही. पण बाजारात जाऊन एखाद्या वस्तूचा दर कमी करण्याची मजा ही मॉलमध्ये पाहायला मिळत नाही. 'बस काय काका, माझ्या मित्राने ही वस्तू खूप कमी किमतीला घेतली' किंवा 'काय काका, तुम्ही पण रोजच्या ग्राहकासाठी पण तोच भाव लावता..' असा मस्का मॉलमधल्या कोणा काका-मामाला मारू शकत नाही.

एखाद्या वस्तूचा दर कमी करणं किंवा तसा प्रयत्नही मॉलमध्ये करता येत नाही. अर्थातच, इथे येऊन खरेदी करणं म्हणजे, प्रतिष्ठेचा प्रश्न नेहमीच आडवा येतो. त्यामुळे सांगितलेली किंमत देणं, हा एकमेव पर्याय!

खरेदीच्या निमित्ताने जी टवाळकी बाहेर बाजारात करता येते ती, इथे मॉलमधल्या वातावरणात करता येत नाही, हेही तितकंच खरं! कारण कितीही नाही म्हटलं तरी, मित्र-मैत्रिणींसोबत फॅशनस्ट्रीटसारख्या ठिकाणी केलेली शॉपिंगची धम्माल मॉलमध्ये नक्कीच करता येत नाही. चहूबाजूने असणारी शांतता, मॉलमधील स्वयंचलित जिने त्यामुळे 'या ठिकाणी शांतताच राखा' असा काहीशा सूचना यातून दिल्या जातात. त्यामुळे खरेदी करा किंवा काहीही करा, पण गडबड गोंधळ चालायचा नाही, हा नियमच मॉलमध्ये पाहायला मिळतो.

पण याबरोबरच एक चांगला नियम या ठिकाणी आहे. तो म्हणजे, नो स्मोकिंगचा! खरं म्हणजे आतमध्ये दुकानं भरपूर असल्याने आणि त्या ठिकाणी खिडकी नसल्याने सिगारेटचा धूर तिथेच रेंगाळतो. तो बाहेर पडत नाही. याचा त्रास आसपासच्या मंडळींना होतो. म्हणूनच हा 'नो स्मोकिंग झोन' करण्यात आला आहे. त्यामुळे खुल्या बाजारात खरेदी करताना व्यसनी ग्राहकांमुळे होणारं 'पॅसिव्ह स्मोकिंग' तरी त्यानिमित्ताने इथे टाळलं जातं.

फट्फजिती

या मॉलमध्ये कित्येकांची फट्फजिती होते बरं का! आता तरी हे मॉल सगळ्यांना परिचयाचे झाले आहेत. मात्र ज्यांना कोणाला या मॉलमध्ये फिरण्याची सवय नसते त्यांची मात्र हमखास भंबेरी उडालीच म्हणून समजा. कोणाला सरकत्या जिन्यावर चढता येत नाही तर एकांत मिळेल म्हणून मॉलची पायरी चढलेल्या कित्येक कपल्सची पळता भुई थोडी झाली आहे. त्यामुळे केवळ मजा-मस्तीसोबत कित्येकदा मॉलला भेट देणाऱ्यांना फजितीलाही सामोरं जावं लागलं आहे. अशाच काही फट्फजितींचे हे गमतीशीर किस्से..

माझा मित्र नेहमीप्रमाणे आपल्या प्रेयसीसोबत बसला होता. आणि 'आता तुझा दादा इथे येईल', असं तिला चिडवत होता. त्याच्या चिडवण्यात तिचं लक्ष सहजच गेटवर गेलं तर खरोखरच समोर तिची आई आणि दादा तिला दिसले. तिच्या डोक्यात असंख्य प्रश्न थैमान घालू लागले. आईने नक्की आपल्याला पाहिलं असेल, अशी तिला खात्रीच वाटली. आता घरी गेल्यावर काय होईल, या विचाराने ती पार गळून गेली. तिच्या मित्राने तिला भानावर आणलं आणि समोरच्या दुकानात घेऊन गेला. नेमक्या त्याच दुकानात तिचे आई-दादा पण शिरले. नंतर अक्षरश: त्यांचा लपंडाव खेळच सुरू झाला. कपडय़ांच्या मागून आई कुठे जाईल, याचा अंदाज बांधला जात होता. संधी मिळताच त्यांनी आपत्कालीन दाराकडे धाव घेतली. थोडा वेळ ते दोघे तिथल्या पाय-यांवरच बसून राहिले. कारण बाहेर पडायची हिंमतच नव्हती. घरी जाईपर्यंत त्या दोघांच्याही मनाला शांतता नव्हती. - रितेश हेगदे

'मी ब-याचदा माझ्या गर्लफ्रेण्डला घेऊन मॉलमध्ये येतो. कधीतरी मूव्ही बघतो. नाहीतर थिएटरच्या मागच्या बाजूला जिन्यात कोणंच नसतं, तिथे आम्ही बसतो. कधी कधी तिथले सुरक्षारक्षक कपल्सना हाकलतात. पण ते गेले की, आम्ही पुन्हा बसतो. बाहेरच्यापेक्षा इकडे जास्त सेफ वाटतं. मुख्य म्हणजे तिकडे फारसं ओळखीचं कोणी भेटत नाही. कारण आम्ही आता जरा घरापासून लांब असलेल्या मॉलमध्ये येतो. सुरुवातीला आमच्या घराजवळच्या मॉलमध्ये बसायचो. घरगुती वस्तूंवर ऑफर आहे, असं समजल्यापासून सोसायटीतल्या महिला मॉलमध्ये येऊ लागल्या. एकदा आमच्याच बिल्डिंगमधल्या एका काकूंनी मला एका मुलीबरोबर बघितलं आणि त्याची चहाडी आईकडे केली. तेव्हापासून आम्ही दोघांनी जवळच्या मॉलमध्ये जाणंच सोडलं आणि अगदी लांबच्या मॉलमध्ये येऊन बसतो. ' - गिरीष- टिना

मी आणि माझे मित्र शॉपिंगसाठी मॉलमध्ये गेलो होतो. मॉलच्या एन्ट्री गेटजवळ चंदेरी रंगाचा पुतळा उभा केला होता. त्या पुतळ्याजवळ जाऊन फोटो काढण्याचा मोह मला आवरला नाही. मी त्या पुतळ्याच्या गळ्यात हात टाकून वेगवेगळ्या अॅक्शन करत फोटो काढत होतो. अचानक चंदेरी रंगाचा पुतळा जागचा हलला. त्यांनी माझा हात घट्ट पकडला. पुतळा जिवंत झाल्याचं पाहून मी आणि माझे मित्र घाबरलो, मी तर घाबरून ओरडायलाच लागलो. पण आजूबाजूचे लोक मात्र माझ्या मूर्खपणाकडे बघून हसायला लागले. कारण तो पुतळा नव्हता, तर पुतळ्याचे सोंग घेतलेला एक कलाकार होता. आमची चांगलीच फजिती झाली होती. - विघ्नेश

मॉलमध्ये ४ रुपये किलो बटाटे मिळतात, असं सांगून आईने मला मॉलमध्ये पाठवलं होतं. मी आज्ञाधारक, कोणत्याच गोष्टीची चौकशी न करता गेले आणि चांगलेच १० किलो बटाटे घेतले. थोडे आमच्यासाठी, थोडे शेजारच्यांसाठी आणि बिल भरताना मला कळलं की, सर्वात महाग बटाटे मला तिथेच मिळाले. जास्त पैसे देऊन घरी परतावं लागलं. आणि संध्याकाळची वेळ असल्याने माझे मित्र-मैत्रिणीसुद्धा मॉलमध्ये होते, मला बटाटे खरेदी करताना पाहून त्यांच्यात माझं हसं झालं, ते वेगळंच! – श्रद्धा धुरी

इथली महागडी पेटपूजा

बर्गर, पिझ्झा, फ्रँकी, शीतपेय व पॉर्पकॉन हे मॉलमध्ये हमखास मिळणारे पदार्थ. मॉलमधील खरेदीसाठी जाणारा प्रत्येक ग्राहक हा खरेदीबरोबर वेगवेगळ्या पदार्थाचा आस्वाद घेतोच. या पदार्थाचा आस्वाद न घेता कोणी गेलं तर मॉलमध्ये जाऊन खरेदी केल्याचा आनंद त्याला मिळत नाही. मग ते पदार्थ कितीही महाग का असेनात. खरेदी झाल्यावर शेवटचा कोणता कार्यक्रम असेल तर या पदार्थाचा आस्वाद घेऊनच घरी जायचं.

मॉलमध्ये खरेदी करायला खूप आवडतं. कोणत्याही वस्तूची खरेदी करायची म्हटलं की, माझी पावलं आपोआप मॉलकडेच वळतात. मात्र जी चव वडापाव खाण्यात आहे, ती बॅर्गरमध्ये नक्कीच नाही. त्यामुळे सहसा मी मॉलमध्ये जास्त काही खात नाही. पण तसाच काही बेत आखला, तर मला पॉपकॉर्न खायला खूप आवडतात. खासकरून चीज पॉपकॉर्न. पिझ्झाही खायला खूप आवडतो. पण मी एकटा असताना सहसा काही खात नाही. आम्ही सगळी मित्रमंडळी मॉलमध्ये गेलो की, पिझ्झाचा बेत ठरलेला! - विजय देशमुख

मला बर्गर प्रचंड आवडतो. एका हातात बर्गर घेऊन, खात खात अख्खा मॉल फिरण्याची मजा काही औरच! आणि जर आम्ही मित्रमंडळी एकत्र असलो आणि आम्हा सगळ्यांच्याच हातात बर्गर्स असतील तर मात्र अगदी 'गँग ऑफ बर्गर्स'च वाटतो, आम्ही सगळे! बॅर्गर खाल्ल्यानंतर कोल्ड्रिंक्स तर मस्टच आहे. मी महिन्यातून एकदा तरी या दोन्ही गोष्टींसाठी मॉलमध्ये जातोच. - रितेश पावश

खेळ, स्पर्धा आणि भरपूर काही..

शॉपिंगबरोबरच मॉलमध्ये मनोरंजनाच्या अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. त्यामध्ये पारंपरिक पद्धतीने नृत्य करणं, शास्त्रीय नृत्य करणं, इत्यादी नृत्यप्रकार केले जातात. मॉलमध्ये फिरायला आलेले तरुण हे या नृत्यस्पर्धेत सहभागी होऊन बक्षीस मिळवतात. नृत्यस्पर्धेबरोबरच विविध खेळांचंदेखील आयोजन करण्यात येतं. त्यात एका मिनिटात खेळ पूर्ण करा, बॉक्स क्रिकेट यांसारख्या खेळात ही मुलं सहभागी होतात आणि खेळाचा आनंद घेतात. जोडीदाराबरोबरही काही खेळ आयोजित केले जातात. प्रत्येक मॉलमध्ये गेमझोन असल्यामुळे तरुणांसाठी खूप मोठं आकर्षण असतं. या गेमझोन्समध्ये कार रेस, बाइक रेस.. अशा गेम्सचा आनंद लुटता येतो. इतकंच नव्हे तर, गायनाची स्पर्धाही घेतली जाते. काही मॉल्समध्ये तर मध्यभागी असलेल्या मोठया जागेत लाइव्ह ऑर्केस्ट्रा सुरू असतो. यामुळे मॉलमध्ये फिरणाऱ्यांचं सतत मनोरंजन होत असतं. या सर्व कार्यक्रमांना युवकांचा मोठया प्रमाणावर प्रतिसाद मिळतो.

मॉलमध्ये ब-याचदा प्रमोशनल अॅक्टिव्हिटीज घेतल्या जातात. एखादी कंपनी आपल्या उत्पादनांच्या उत्तम प्रसिद्धीसाठी माहितीपत्रकं वाटायची जबाबदारी मुलांवर सोपवते. कधी पंधरा दिवस तर कधी महिनाभरासाठी अशा प्रकारची प्रमोशन्स कंपन्यांद्वारे आयोजित केलेली असतात. यातून अनेक कॉलेजिअन्सना पार्ट टाइम जॉबही उपलब्ध होऊ लागले आहेत. म्हणून या उपक्रमातही मुलं मोठया हिरिरीने सहभागी होतात.

मॉलमधल्या स्पर्धामध्ये भाग घेण्याचं मूळ कारण असतं भरभरून मिळणारी बक्षिसं! या बक्षिसांचं स्वरूप असतं, कधी मूव्हीची तिकिटं, कधी मेकअप कीट तर कधी आणखी काही वस्तू तर कधी मोठयाने नाव पुकारून मिळणारी प्रसिद्धी! कधी कधी तर एखाद्या कलाकाराला भेटण्याचीही संधी मिळते. यासाठीही कित्येक तरुण वेडे असतात. - अमेय साठे

Read More »

प्रेम-पापाची सांगड

माणसाच्या मनात कळत नकळत ब-याचदा प्रेम आणि पाप या दोन संकल्पनांवर एकाचवेळी विचार सुरू असतो. खरोखरंच पाप आणि पुण्य असं काही असतं का हो? निरनिराळ्या धर्मामध्ये, श्रद्धांच्या वाटेवर आपल्याला पाप आणि पुण्य या कल्पना कार्यरत असलेल्या दिसतात. खून, चोरी, फसवणूक या कायद्यानं गुन्हा ठरवलेल्या गोष्टींमध्ये पाप आहे तर वैयक्तिक व सामाजिक स्तरावरील भावनिक ओलावा, तळमळ, दुस-याचं भलं होण्याची भावना अशा सकारात्मक भावभावनांचा गोफ म्हणजे 'प्रेम'. पण हा वरवरचा, ढोबळ दृष्टिकोन झाला. आपण थोडं खोलात डोकवूया.

'पुण्य पर उपकार, पाप हे पर पीडा' अशी पॅ्रक्टिकल आणि उपयुक्त व्याख्या तुकाराम महाराजांनी केली आहे. तुकाराम महाराजांनी या दोन ओळींमधून माणसाच्या मनाचा तळ गाठला आहे. एकाच वेळी 'माइंड ट्रेनर'ची भूमिका पार पाडत मूल्यशिक्षण देणा-या अशा या अभंगाच्या ओळी आहेत. एक निराळं पारूप (मॉडेल) विचारात घेऊ या. कांद्याचे आडवे काप केल्यानंतर आतपर्यंत निरनिराळी वलयं असल्याचं आपल्याला दिसतं. त्याचप्रमाणे सामाजिक, संस्थात्मक, व्यावसायिक, वैयक्तिक असे पापांचेसुद्धा अनेक प्रकार मानता येतील. एखादी व्यक्ती समाजात वावरताना 'जंटलमन' सारखी वागत असेल. परंतु दुसरीकडे घरामध्ये सदैव मुलांचा छळ, पत्नीचा सारखा पाण-उतारा करून जुलूम जबरदस्ती करणारी असेल तर तो कांदा बाहेरील वलयावर ठीकठाक दिसत असला तरी आतून सडलेलाच आढळतो. 

प्रेमालाही हेच पारूप आपण वापरू शकतो. माणूस म्हणून आपली जडणघडण होत असताना जर आपल्याला समाजाविषयी, अनाथ मुलांविषयीची आपुलकी, प्रेम मनात असेल, तर आपण त्यांना सहजपणे मदत करतो. आपला अमूल्य वेळ, पैसा किंवा अनुदान सढळपणे देण्याची वृत्ती आपल्यात बळावते.

रोजच्या जगण्यातील काही उदाहरणं पाहू या. एकाच बांधकाम किंवा डागडुजी कंत्राटासाठी दोघा मित्रांनी टेंडर भरलेलं असताना, एकाला ते काम मिळालं तर दुस-याचा जळफळाट होणं, हे पाप असतं का, की ती सहज-सुलभ भावना समजावी? तसंच समजा हीच गोष्ट पुढे वाढवायची तर, ज्याला कंत्राट मिळालं नाही, त्याने दुस-याच्या कामात सतत अडथळे आणणं, हे पाप असतं का?..

एकाच नाटकात काम करण्यासाठी दोघींनी टेस्ट दिली आहे. आता त्यातील एकीची निवड झाल्यावर दुसरीचा संताप होणं, हे पाप आहे का.. मी म्हणेन होय, आहे. म्हणूनच आपल्या आधुनिक शिक्षणपद्धतीमध्ये आपल्याला स्पर्धा करायला शिकवलं जातं. परंतु ती स्पर्धा कशी करावी, स्पध्रेमागे काय दृष्टिकोन असावा, याबाबत आपल्याकडे विद्यार्थ्यांचं मूल्यशिक्षण होत नाही. चांगले पालक आणि शिक्षक यासाठीच नेहमी सांगत असतात की, स्पर्धा स्वत:शीच करा..

एका गोष्टीचे बराच वेळ अवलोकन करा. ते म्हणजे तुमचं मन. तुमच्या मनात येणा-या संमिश्र विचारांच्या बैठकीवर तुमची मानसिक परिपक्वता ठरते. ज्या ज्या भावनांमुळे आपल्या मनाचा नितळ तळ ढवळून निघतो त्यामध्ये गर, अवास्तविक/चुकीच्या विचारांचं 'बी' रुजू लागतं, अशा गोष्टींबद्दलचे विचार हे पापच!
वैयक्तिक प्रेमाचा विचार करता, कुटुंबातील व्यक्तिंव्यतिरिक्त इतरांवरही आपण प्रेम करतो. यात मित्रमैत्रिणी, आवडता नट/नटी यांचा समावेश असतो. आपला सहचर सोडून दुस-या कोणा व्यक्तीवर प्रेम बसणं, हे पाप असतं का? आधुनिक पिढीसाठी हा प्रश्न अत्यंत जटिल असा आहे. या प्रश्नाचं उत्तर हे माणसा-माणसानुरूप भिन्न असू शकतं. पण तरीदेखील कायद्यानं आणि नात्यानं आपण ज्यांना बांधील आहोत, त्यांच्या वाटेचं प्रेम हे दुस-याला देऊन पाप करू नये. आपल्या नात्यागोत्यांमधून आपल्या वाटयाला येणारं प्रेम हे आपण नेहमी तपासून पाहावं. सर्वसाधारणपणे, प्रेमातून एक भावनिक ओलावा, आस्था, तळमळ, दुस-याचं भलं होण्याची भावना अशा अनेक सकारात्मक भावभावनांचा गोफ 'प्रेम' वाटणाऱ्याला मनामध्ये अनुभवता येतो.

प्रेम ही साक्षात ईश्वरी शक्ती आहे. तिचं सामर्थ्य हे साक्षात ईश्वराचं सामर्थ्य आहे. विश्वामित्र ऋषींच्या कठोर योगसाधनेमध्ये खंड पाडण्याचं कारस्थान मेनकेनं केलं, तरीदेखील त्यांचं प्रेम हे विलोभनीय होतं. अनेक अप्सरा पृथ्वीवर येऊनही ज्यांच्या साधनेमध्ये तीळमात्रही खंड पडला नाही, ते विश्वामित्र ऋषी मेनकेमुळेच का बरं विचलित झाले असतील. अप्सरा असूनही मानवी जीवनाच्या प्रेम या भावनेची परिसीमा गाठण्याचा मेनकेचा गुण विश्वामित्रांना भावला असावा. तिने केलेल्या प्रेमाच्या पराकाष्ठेमुळे ऋषीच्या तपोभंगाचं पाप माथ्यावर घेऊनही मेनकेसारख्या अप्सरेला ते निभावून न्यावं लागलं. कर्ण नावाची दुखरी नस जन्मभर मनामध्ये बाळगून कुंतीसारख्या आईलाही मातृप्रेम न निभावल्याच्या पापाला सामोरं जावं लागलं.

आपल्या भावनेच्या अत्यंत निकोप, पवित्र आणि अलौकिक जातकुळीमुळे राधेसारखी गौळण प्रेमाचं अविस्मरणीय आणि अपरिवर्तनीय प्रतीक बनते. दुर्योधनाच्या मनातील सत्ता आणि राज्य या गोष्टींवरील नितांत प्रेम, जेव्हा अहंकाराचा हात धरून पाप करू लागतं, त्या वेळी जीवनाचा सर्वनाश आणि युद्ध याच गोष्टी मानवाच्या पदरात पडतात.

म्हणूनच प्रेमासाठी पाप करू नये आणि पापावर प्रेम करू नये. सर्व समस्यांचं उत्तर जेव्हा प्रेम होऊ पाहतं, तेव्हा पापाला अटकाव घालण्यास आपल्याला वाव असतो. प्रेम जेव्हा समस्यांचं उत्तर बनतं, तेव्हा ते नक्कीच व्यापक होत जातं. आडव्या चिरलेल्या कांद्याच्या प्रत्येक वलयामध्ये प्रेम झिरपतं, तेव्हा ख-या सार्थकाच्या वाटेवर आपली वाटचाल सुरू होते.. असं जगणं हा प्रेमाचा सोहळा असतो. 

Read More »

तीव्र दुष्काळातही तग धरणारा गोवंश 'लाल कंधारी'

मराठवाडयात सातत्याने पडणारा दुष्काळ आणि तीव्र उन्हाळा या दोन भीषण समस्या आहेत. अशा परिस्थितीतही या भागात तग धरून राहणारा आणि सर्वसाधारण मेहनतीवर जास्त काळ दूध देणारा गोवंश येथे आढळतो. राष्ट्रीय पातळीवरील पशू प्रदर्शनांमध्ये अनेकानेक मानांकने मिळवणारा गोवंश अशी 'लाल कंधारी' गोवंशाची ओळख आहे. शेतीची कामे नेटाने व चपळाईने करण्यासाठी हा गोवंश प्रसिद्ध आहे. या बैलांची उभे राहण्याची ढब, चालण्यातील नजाकतता व अंगावरील चमक कोणत्याही शेतकऱ्याला या गोवंशाच्या प्रेमात पाडते.

'लाल कंधारी' विशेषत: महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील कंधार, मुखेड, नांदेड, बिलोली आणि नायगाव या तालुक्यांमध्ये आढळते. त्याचबरोबर लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, चाकूर, शिरूर, अनंतपाळ, 

औसा, उद्गीर यांसोबतच बीड जिल्ह्यातील परळी व हिंगोली या भागातील शेतकरी हौसेने मोठया प्रमाणावर या गोवंशाची पैदास व विक्रीदेखील करतात.

या गोवंशाच्या गायी मध्यम आकारमानाच्या व आटोपशीर असतात. या गायीचा रंग किंचित फिकट लालसर ते गडद लालसर अशा छटांमध्ये असतो. या गायींमध्ये अन्य कोणत्याही रंगाचा ठिपका किंवा पट्टा नसतो. गायींचे मस्तक कानाच्या वरच्या बाजूला किंचित आत गेलेले व मध्यभागी फुगीर असते. शिंगे कधीही कोचर नसतात, बाहेरच्या बाजूला निघालेली फुगीर तसंच काळी किंवा लालसर काळी असतात. कान पसरट, आखूड व टोकाला गोलाकार असून जमिनीला समांतर असतात. नाकपुडी संपूर्णत: काळी, जबडा चेह-यांच्या मानाने किंचित रुंद असतो. डोळे टपोरे, तेजस्वी, काळेभोर असतात.

डोळ्यांभोवती काळ्या रंगाचे आकर्षक वर्तुळ असते. पाय शरीराच्या मानाने उंच व भक्कम असतात. खूर काळ्या रंगाचे किंवा गुलाबी रंगाचे परंतु जरा विलग असतात. पाठ सपाट व मागील चौक उताराचे असतात. या गायींची कास किंचित शरीराबाहेर दिसणारी असते. चारही सड (आचळ) लहानसर व गुलाबी असतात. बहुतेक गायी या मेणकासी असतात. शेपूट लांबलचक मागच्या नखीपर्यंत पोहोचणारी असते, शेपटाचा गोंडा काळा असतो. या बैलांचे वशिंड
गडद काळसर छटेचे, देखणे व भरदार असते.

गोवंशाच्या कालवडींच्या प्रथम माजाचा कालावधी फक्त ८ ते १० तासांचा असतो. त्यामुळे माज लक्षात येताच त्वरित संकर घडवून आणावा लागतो. ऐन दूध देण्याच्या भरामध्ये दिवसाकाठी ४ ते ५ लिटर दूध सहज देण्याची क्षमता असते. परंतु सलग दूध देण्याचा कालावधी १० ते १२ महिन्यापर्यंतचा आहे. दुधातील स्निग्धतेचे प्रमाण ३.५० ते ४.०० पर्यंत असते. दोन वेतांमधील अंतर १८ ते २० महिन्यांपर्यंत असते व संपूर्णत: भाकड कालावधी १२० ते १८० दिवसांपर्यंत असू शकतो.

ओढकाम, शेतीकाम व शर्यतींसाठी या जातीचे बैल विशेष प्रसिद्ध आहेत. खिलारी गोवंशाखालोखाल या बैलांमध्ये चपळाई असते. या गायी एका जागी चांगल्या पद्धतीने सांभाळल्यास १० ते १२ वेणी सहज देतात. तसेच १८ ते २० वर्षे बैल उत्तम पद्धतीने काम करतात. या गोवंशामध्ये मारकेपणा सहसा नसतो. या जातीच्या उत्तम बैलजोडीची किंमत दीड लाखांपर्यंत तर उत्तम गायीची किंमत ३५ ते ४० हजारांपर्यंत आहे.

मराठवाडयातील मु. पो. मावलगाव येथील प्रगतिशील शेतकरी व निष्ठावान गोसेवक शरद पाटील यांना या गोवंशाच्या संवर्धनाबद्दल केंद्र शासनाचा 'बाबू जगजीवनराम किसान' पुरस्कार प्राप्त झाला आहे. कंधारी बैलजोडी दारात असणे, ही मराठवाडयातील शेतक-यांच्या दृष्टीने भूषणास्पद गोष्ट आहे.

Read More »

भजन-कीर्तनातून 'अखंड' समाजप्रबोधन!

कॉटन ग्रीनच्या पूर्वेला १९४० मध्ये स्थानिक मंडळींकडून श्रीराम मंदिराची स्थापना करण्यात आली. इंग्रजांच्या 'ईस्ट इंडिया कंपनी'तील तत्कालीन कर्मचारी दामले यांनी कंपनीतील कर्मचारीवर्गाला एकत्र आणून १९४१पासून 'श्रीराम भजनी मंडळ' सुरू केलं. अनेक ज्येष्ठ-श्रेष्ठ कीर्तनकारांचा सहवास आणि गाडगेबाबांसारख्या थोर संतांचे कीर्तनरूपी आशीर्वाद लाभलेलं असं हे भजनी मंडळ. या भजनी मंडळाचं आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील प्रबोधनाचं कार्य आजतागायत निष्ठेनं, नित्यनेमानं सुरू आहे.

 अध्यात्मासोबतच समाजप्रबोधन करून समाजाच्या तळागाळातील जनमानसाची उन्नती साधणं आणि वाईट विचार व कृतींपासून लोकांना दूर ठेवून परमेश्वराप्रति आसक्ती वाढवणं, हाच भजन आणि कीर्तनाद्वारे साधायचा खरा हेतू. बदलत्या काळानुसार मात्र भजनी मंडळांचं स्वरूपही बदलत चाललं आहे. वाढता ताणतणाव, वाईट प्रवृत्ती, नोकरी-धंद्यात वाढलेली प्रचंड स्पर्धा, लोप पावत चाललेली माणुसकी या सर्वावर मानसिक शांततेसाठीचा रामबाण उपाय म्हणून भजन-कीर्तनाचा मार्ग स्वीकारणं अत्यंत आवश्यक आहे

'महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील भागांतून अनेक ठिकणांहून आलेल्या कर्मचारीवर्गास योग्य संगत मिळावी, त्यांनी निव्र्यसनी राहावं, असा दामले यांचा तत्कालीन उद्देश होता. सुरुवातीस दीडशे वा त्याहून अधिक संख्येनं भाविकांची उपस्थिती असायची. परंतु कालांतराने मिल बंद पडल्या, गोदामांतील कामही कमी होत गेलं. याचा परिणाम भजनी मंडळात उपस्थित राहणा-या भाविकांच्या संख्येवरही झाला. तरी आजही भजन-कीर्तनाचं महत्त्व जाणणा-या जाणकारांचा प्रतिसाद चांगला आहे,' असं श्रीराम भजनी मंडळाचे विश्वस्त बाबासाहेब मिसाळ सांगतात.

श्रीराम मंडळाचे संयोजक तुकाराम सांगळे म्हणतात, 'वारकरी संप्रदायात अभंग, गवळणी, भारूड अशा प्रकारचे संतसाहित्य गायलं जातं. परंतु सध्याच्या भजन, कीर्तनांमध्ये सद्य:परिस्थितीवर आधारित विषयांचाही समावेश असतो. तरुणवर्गाला भजन-कीर्तनाची गोडी लागून, त्यांनी सन्मार्गाला लागावं या उद्देशाने थोर विचारवंतांच्या विचारांनी प्रभावित झालेल्या तरुण कीर्तनकार मंडळींना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याकडे मंडळाचा जास्त कल आहे.' ते पुढे सांगतात, 'संत गाडगेबाबांसह आळंदीमध्ये पहिली 'वारकरी शिक्षण संस्था' सुरू करणारे जोग महाराज, बंकट स्वामी महाराज तसेच मामासाहेब दांडेकर, रामदास महाराज मनसुख, कोंडाजी बाबा डेरे अशा अनेक विद्वान मंडळींनी मंदिराच्या विविध उत्सवांमध्ये भजन, कीर्तनाचे कार्यक्रमात केले आहेत.'
श्रीराम भजनी मंडळातर्फे योजले जाणारे उपक्रम 

श्रीराम नवमी उत्सवानिमित्त वारकरी संप्रदायाचे अविभाज्य अंग असलेला 'अखंड हरिनाम सप्ताह' आयोजित करण्यात येतो. गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत हा सप्ताह असतो. या सप्ताहात २४ तास वीणेच्या तालावर नामस्मरण केलं जातं, यालाच 'वीणा पहारा' असंही म्हटलं जातं. 'ज्ञानेश्वरी'चे सामुदायिक पारायण होतं. या दरम्यान विविध मंडळं येऊन भजन, कीर्तन आणि रात्री जागर करतात. न थकता उत्साहाने, आनंदाने पहाटेच्या काकड आरतीपर्यंत हे कार्यक्रम चालतात. आळंदी ते पंढरपूर दरम्यानचा पायी दिंडी सोहळा कसा असतो, याचा अनुभव तरुणाईलाही घेता यावा, यासाठी जानेवारी महिन्यातील पहिल्या रविवारी श्रीराम मंदिर ते वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरापर्यंत पायी चालत दिंडी सोहळ्याचं आयोजन केलं जातं. आषाढी एकादशीनिमित्त भाविकांसाठी आळंदीपर्यंत, पौष महिन्यातील वद्य एकादशीला त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथांचा समाधी सोहळा आणि मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्यानिमित्त भाविकांसाठी बससेवा आयोजित केली जाते.

सामाजिक उपक्रम

मंदिराजवळील परिसरात असणा-या 'ईस्ट इंडिया कंपनी'च्या गोदामातील सभागृहात मंडळातर्फे गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या दरम्यान लहान मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप, विभागातील विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा दरवर्षी पार पडतो. त्याचबरोबर लालबागमधील हकोबा कंपाउंडमध्ये एक महिन्याचे मोफत संगणक प्रशिक्षणही मुलांना दिलं जातं. प्रत्येक सणावाराला मंदिराच्या परिसरात वृक्षारोपण करून पुढील संवर्धनाची जबाबदारीही मंडळातर्फे घेतली जाते. तसंच आळंदी ते पंढरपूर या वारीच्या अंतरातील प्रत्येक मुक्कामांच्या ठिकाणीही मंडळातर्फे वृक्षारोपण केलं जातं.
भजनी मंडळाची दैनंदिनी

गेली ७२ र्वष भजन-कीर्तनाच्या परंपरेत कोणत्याही प्रकारचा खंड न पाडता योजलेले उप्रकम सुरू ठेवणं, हे श्रीराम भजनी मंडळाचं वैशिष्टयच म्हणता येईल. त्यानुसार दर रविवारी सकाळी ९ ते ११ व दर एकादशीला रात्री ९ ते ११ या वेळेत विविध मंडळे या मंदिरात भजन करण्यासाठी येतात. प्रत्येक मराठी सण, राष्ट्रीय दिन या वेळी सकाळी ९ ते ११ या वेळेत विविध आध्यात्मिक व सामाजिक विषयांवर कीर्तनाचे कार्यक्रम होतात. तसंच दररोज सकाळी ६ वाजता काकड आरती, दुपारी ११ ते १२ या वेळेत महिलांच्या भजनी मंडळातर्फे भजन, सायंकाळी ५ ते ६ या वेळेत भागवत कथांचं अर्थासहित वाचन केलं जातं.

भावार्थ रामायण, श्रीमद् भागवत, नवनाथ भक्तिसार, हरी विजय, पांडव प्रताप, अठरा पुराणे इत्यादी अनेक धार्मिक ग्रंथांचा या वाचनामध्ये समावेश असतो. त्यानंतर साडेसहा ते सात वाजेपर्यंत 'पंचपदी'चे भजन आणि हिंदी भाषिक भाविकांसाठी रात्री आठ ते साडेनऊ वाजेपर्यंत 'तुलसी रामायण' कथनाचा कार्यक्रम असतो. हिंदी कथनाच्या कार्यक्रमासाठी वृंदावन, काशी यांसारख्या तीर्थक्षेत्रांवरून कीर्तनकार येतात.

Read More »

'लग्नानंतर करिअर संपत नाही'

लग्नानंतर मुलींचं करियर संपतं, अशी एक समजूत रूढ आहे. पण घरच्यांचा पाठिंबा आणि आपले ध्येय मिळवण्याची जिद्द असली की, आपोआपच सारं काही शक्य होतं, हे यंदाच्या 'यूपीएससी'च्या परीक्षेत ४६९ वा क्रमांक पटकावणा-या वैशाली पतंगे हिने सिद्ध केले आहे.

मूळची साता-याची असलेली वैशाली १० वी आणि १२ वी च्या परीक्षेतही गुणवत्ता यादीत झळकली होती. पदवीनंतर लगेचच लग्न झाले असले तरी त्यानंतर तिने 'एमपीएससी'ची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाली. यावरच न थांबता तिने केंद्रीय लोकसेवा आयोगाचीही परीक्षा दिली व त्यातही प्रथम प्रयत्नातच यश संपादित केले. परंतु वैशालीचे ध्येय 'आयएएस'साठी निवड हे आहे.

तुमच्या मते भारतात प्रशासकीय यंत्रणांचे नेमके महत्त्व काय?

याकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन सकारात्मक आहे. सामान्य लोक आजही प्रत्येक गोष्टीसाठी सरकारवर अवलंबून असतात. सरकार आणि जनता यांना जोडण्याचे काम प्रशासकीय अधिकारी करतात. त्यामुळे अधिका-यांची जबाबदारी वाढते. सरकारी व्यवस्थेला नावे ठेवण्यापेक्षा त्यासाठी कामे करणा-यांची बाजूही समोर यायला हवी.

परीक्षा प्रक्रियेविषयी काय मत आहे?

कोणतीही यंत्रणा ही परिपूर्ण नसते, त्याप्रमाणेच यूपीएससीची परीक्षा पद्धतीही सदोष आहे. विद्यार्थी पास किंवा नापास का होतात, याचे नेमके कारण सापडत नाही. एखाद्या मुलाला एका वर्षी मुलाखतीत १९८ गुण मिळतात, तर त्याच मुलाला पुढच्या वर्षी मुलाखतीत १२० गुण मिळतात, हे अनाकलनीय आहे.

घरातून पाठिंबा मिळाला का?

घरच्यांचा पाठिंबा असल्याशिवाय ही परीक्षा देऊन त्यात यशस्वी होणं कठीण आहे. त्यातही मुलांसाठी घरच्यांचा पाठिंबा खूप महत्त्वाचा असतो. मी माझ्या लग्नानंतर ही परीक्षा दिली. त्यात मला तीन वर्षाची एक मुलगी आहे. त्यामुळे जर घरच्यांचे पाठबळ नसते तर हे यश मिळवणं मला शक्यच झालं नसतं.

या परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल?

आपल्याकडे ब-याचदा मुलं एमपीएससी आणि यूपीएससी अशा दोन्ही परीक्षांची तयारी करताना दिसतात. पण तसे न करता मला वाटतं विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम त्यांचं ध्येय निश्चित करावं की, त्यांचं प्राधान्य कशाला आहे. कारण एकाच वेळी आपण अनेक ठिकाणी पुरेसे लक्ष देऊ शकत नाही. त्यामुळे दोन्ही विषयांतील अभ्यासाकडे पुरेसे लक्ष देता येत नाही.

एमपीएससी आणि यूपीएससी या दोन्ही परीक्षांमध्ये तुम्हाला काय फरक जाणवला?

या दोन्ही परीक्षांमध्ये नक्कीच फार फरक आहे. एमपीएससीमध्ये प्रश्नांचा साचा बराचसा ठरलेला असतो. शक्यतो अभ्यासक्रमातीलच प्रश्न विचारले जातात. परंतु यूपीएससीत मात्र विश्लेषणात्मक प्रश्नांवर भर दिलेला असतो. तसेच ही परीक्षा व्यापक स्वरूपाची असल्याने देशभरातील मुलांशी स्पर्धा असते. त्यामुळे काठिण्य पातळीही जास्त असते. शिवाय दोन्ही स्तरांच्या कार्यपद्धतीत तसेच अधिकारांमध्येही बरेच अंतर असते. राज्यासाठी काम करताना राज्य सरकारच्या मर्यादा लक्षात येतात. या उलट केंद्रासाठी काम करताना कर्मचारी वर्ग आणि उपलब्ध साधनांतील फरक जाणवतो.

Read More »

तिढा सुटला, अढी कायम

 

कुठल्याही प्रश्नावर पटकन आंदोलन पुकारायचे व जनतेला वेठीला धरायचे, हा अलीकडे काही संघटनांचा शिरस्ता झाला आहे. महाराष्ट्रातील प्राध्यापकांच्या संघटनांनी नुकताच ९० दिवसांचा संप केला व विद्यार्थ्यांना वेठीस धरले. या संपासंबंधातआणि प्राध्यापकांच्या मागण्यासंबंधात सरकारने ठाम भूमिका घेतली आणि अखेर हा लांबलेला किंवा मुद्दाम लांबवण्यात आलेला हा संप अखेर चच्रेनंतर मागे घेण्यात आला. या संपाने प्राध्यापकांच्या हाती खास काय लागले, हा संशोधनाचा विषय आहे. हा संप चालू असतानाच जकातीऐवजी एलबीटी म्हणजेच स्थानिक संस्था कर लागू करण्याचे सरकारने ठरवल्याने व्यापा-यांनी या कराला विरोध करून बेमुदत बंद पुकारला व सरकार आणि जनतेची नाकेबंदी करण्याचा डाव टाकला. पण राज्य सरकारने व्यापा-यांच्या या संपाबाबतही ठाम भूमिका घेतली व गेले काही दिवस चालू असलेल्या संपाची सोमवारी काही ठिकाणी इतश्री झाली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी झालेल्या चच्रेनंतर नवी मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील व्यापा-यांनी एलबीटीविरोधातील बंद मागे घेण्याची घोषणा केली. परंतु अद्याप पीळ न जळालेल्या ठाणे व मुंबईच्या 'मालदार' व्यापा-यांनी मात्र बंद चालूच ठेवण्याचा निर्णय घेतल्याने ठाणे-मुंबईतील बंद चालूच आहे. तसेच नागपूर येथील व्यापा-यांचा बंदही चालू आहे. सरकारने जरी चर्चा करून व व्यापा-यांच्या काही अपेक्षांना प्रतिसाद देऊन बंदमधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला तरी हा तिढा पूर्णपणे सुटलेला नाही. एलबीटी चालू ठेवण्याच्या मुद्यावर सरकार जरी ठाम असले तरी या संबंधात व्यापा-यांच्या अडचणी आणि रास्त मागण्यांबाबत विचार करण्याची सरकारची केव्हाही तयारी होती. सोमवारी झालेल्या चच्रेत सरकारने बरीच लवचिक भूमिका घेतली व बंदची कोंडी ब-याच प्रमाणात फोडली. महाराष्ट्रात चालू असलेल्या व्यापा-यांच्या या बंदने लोकांचे फार हाल झाले व त्यांना जीवनावश्यक वस्तू मिळवण्यासाठी खूप धावपळ करावी लागली.  जकातीऐवजी एलबीटी लागू करण्याच्या मुद्यावर पहिला बंद पुण्यात सुरू झाला व तो परवापर्यंत चालू होता. मुंबईत मात्र काही दिवसांनी व्यापा-यांनी 'जनतेच्या सुविधेसाठी' दुकाने उघडली व बंदमध्ये काहीशी फूट पडली. पण व्यापा-यांच्या संघटनेने मात्र जनतेच्या हालअपेष्टांचा प्रश्न खुंटीवर टांगून बंद चालूच ठेवण्याचा निर्धार केला. एलबीटीबाबत सरकारची ठाम भूमिका पाहून व्यापा-यांची संघटना ढेपाळत होती. बंद लांबलेला पाहून केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी या संबंधात तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री चव्हाण यांना भेटण्याचा इरादा व्यक्त केला होता. बंदची इतक्या दिवसांची कोंडी फुटण्याचे वारे वाहू लागले. सोमवारी बैठकांचे सत्र सुरू झाले. व्यापा-यांच्या शिष्टमंडळाने प्रथम मुख्य सचिव बांठिया यांच्याशी चर्चा केली व त्यानंतर सायंकाळी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर काही भागातील बंद मागे घेण्यात आला. सरकारशी झालेल्या चच्रेमध्ये सरकारने व्यापा-यांना चांगलाच दिलासा दिला आहे, हे विशेष होय. सरकारने लागू केलेल्या एलबीटीच्या नव्या तरतुदीनुसार कर लागू करण्याच्या उत्पन्नाची मर्यादा एक लाखावरून पाच लाखांवर नेण्यात आली आहे. म्हणजे एलबीटीमुळे छोटय़ा व्यापा-यांना त्रास होईल, अशी जी व्यापारी संघटनेची तक्रार होती ती आता राहणार नाही. तसेच पाच लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त उलाढाल असणा-या व्यापा-यांना स्थानिक खरेदी-विक्रीची नोंद ठेवण्याचे बंधन नाही. तसेच त्यांनी दर महिन्याला विवरणपत्र भरण्याची गरज नाही, त्यांनी वर्षातून एकदाच विवरणपत्र दाखल करावे. एलबीटीबाबत व्यापा-यांची अशीही तक्रार होती की, त्यांना मालाच्या खरेदी-विक्रीच्या सर्व नोंदी ठेवाव्या लागणार आहेत. पण सरकारने त्यांच्या याही तक्रारीचे निवारण केले आहे. कारण व्यापा-यांना आता आयात मालाच्याच खरेदीची नोंद ठेवावी लागणार आहे. व्यापा-यांची सर्वात महत्त्वाची तक्रार ही होती की, कर मूल्यांकन आणि करवसुली करणा-या अधिका-यांकडून आपली पिळवणूक होईल व लाचखोर अधिका-यांचे फावेल. अर्थात कुठल्याही व्यावसायिकाला अशी भीती नेहमीच वाटत असते. पण ज्याचा व्यवहार चोख व प्रामाणिक असतो व जो काही छपवाछपवी करत नाही त्याला कसलीही भीती बाळगण्याचे कारण नाही. सरकारने व्यापा-यांची ही शंकाही दूर केली आहे. एलबीटीचे मूल्यांकन इतर कुठल्याही अधिका-याकडे राहणार नसून ते महापालिका आयुक्तांकडेच राहणार आहे. हे काम पाहण्यासाठी निवृत्त विक्री अधिका-याच्या अध्यक्षखाली एक कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. दुकानात वाटेल त्यावेळी अधिकारी येऊन तपासणी करील व आपल्याला त्रास देईल, अशीही व्यापा-यांची भीती होती. पण दुकानात येऊन तपासणी करण्याचे अधिकार महापालिकेकडे राहणार नाहीत. नगरविकास खात्याच्या मान्यतेनंतरच अशी तपासणी करता येईल. या आंदोलनामध्ये व्यापा-यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हेही सरकार मागे घेणार आहेत. तडजोडीचे हे सगळे मुद्दे पाहिल्यास सरकारने व्यापा-यांना बराच दिलासा दिला आहे, यात शंका नाही. पण व्यापा-यांनी मोकळ्या मनाने अद्याप सहकार्याचा हात पुढे केलेला नाही. एकूणच व्यापा-यांची संघटना हळूहळू बंदमधून काढता पाय घेत असली तरी त्यांच्या या आंदोलनाने राज्य सरकारवर दबाव टाकण्याचा व महागाईने, दुष्काळाने हैराण झालेल्या जनतेला वेठीस धरण्याचा जो प्रयत्न केला तो निषेधार्हच आहे. केवळ यापा-यांकडे आíथक ताकद आहे, आपण जनतेवर बंदूक रोखून सरकारवर दबाव आणू शकतो, असे व्यापा-यांच्या संघटनेला वाटले व त्यांनी बंदचे हत्यार उपसले. आधीच दुष्काळामुळे महागाई आकाशाला भिडलेली. त्यात व्यापा-यांच्या बंदमुळे व घाऊक व्यापा-यांनी माल रोखून धरल्याने मालाची आवक अनेक ठिकाणी रोडावली तर काही ठिकाणी बंदच झाली. सरकार दुष्काळाशी सामना करताना व जनता महागाईत होरपळत असताना व्यापा-यांनी सरकारला कोंडीत व जनतेला वेठीस पकडण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे व्यापा-यांच्या या बंदला राजकारणाची झगमगती झालरही होती. कारण या बंदला भाजपचा पाठिंबा होता व तो भाजपने उघडपणे दिला होता. त्यामुळे व्यापा-यांनी सरकारविरुद्ध राजकीय दंड थोपटून सत्ताधारी पक्षाला निवडणुकीत एलबीटीचे परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही दिली. दरम्यान, राज्यातील व्यापा-यांच्या संघटनेने मुंबईतील बंद तुर्तास मागे घेतला असल्याचे जाहीर केले असले तरी एलबीटीला आपला विरोध कायम असल्याचे स्पष्ट केले. या संदर्भात गुरुवारी २३ तारखेला व्यापा-यांची संघटना 'फाम'ची एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत एलबीटीबाबतची भूमिका ठरणार आहे. त्यानंतर शुक्रवारी कृषीमंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर होणा-या बैठकीत व्यापारी आपली अंतिम भूमिका स्पष्ट करणार आहेत.

'बीसीसीआय' हतबल, सट्टेबाज मोकळे

'आयपीएल'मधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची व्याप्ती वाढतच चालली असून याचे धागेदोरे विदर्भापर्यंतही पोहोचले आहेत. दिल्ली पोलिसांनी विदर्भाचा माजी रणजीपटू मनीष गड्डेवार याच्यासह आणखी तिघांना अटक केली आहे. हे तिघेही औरंगाबाद आणि नागपुरातून सट्टा खेळत असत.

 

Read More »

कर्नाटकच्या पराभवाने नरेंद्र मोदींची कोंडी

कर्नाटकातील दारुण पराभवानंतर भाजपच्या गोटात विचारमंथन व 'चिंतन' सुरू झाले आहे. यामध्ये मोदींचा करिष्मा चालला तर नाहीच पण कर्नाटकमधील पराभवानंतरही त्याची जबाबदारी राष्ट्रीय म्हणवणा-या मोदी यांनी स्वीकारली नाही. मोदींनी ज्या भागात प्रचारमोहिमा राबवल्या त्या भागात तर भाजपची मोठय़ा प्रमाणात पिछेहाट झाली. मनोधर्य गमावून बसलेल्या भाजपच्या आणि संघ परिवाराच्या कार्यकर्त्यांमध्ये मोदींच्या आगमनामुळे थोडा तरी उत्साह आला असता. पण,  भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या भाजपला तळागाळातील लोकांनीही नाकारले. पराभवानंतर मोदींनी लागलीच त्याची जबाबदारी घ्यायला हवी होती. पराभवही खुल्या मनो स्वीकारण्याची तयारी मोदींनी दाखवायला हवी होती. तसे न केल्यामुळे गुजरातच्या 'विकासपुरुषा'ची राष्ट्रीय पातळीवरही कोंडी झाली आहे. ऑक्टोबरमध्ये दिल्लीसह सहा राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यात भाजपचे संभाव्य पंतप्रधानपदाचे उमेदवार व राष्ट्रीय नेते बनण्यास उत्सुक असलेल्या मोदींकडे कोणती जबाबदारी सोपवावी किंवा सोपवू नये, यावरच चिंतन करण्याची वेळ भाजपवर आली आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाच्या पराभवाची चर्चा अजून चालूच आहे. तेथील मतदारांनी भारतीय जनता पक्षाला का नाकारले, येडियुरप्पा यांच्या पक्षाने घेतलेल्या मतांचा भारतीय जनता पक्षाच्या पराभवात किती वाटा आहे, याची कारणमीमांसा करण्यापेक्षा नरेंद्र मोदी यांचा करिष्मा कर्नाटकात अपयशी ठरला का आणि मोदी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित करणे कितपत बरोबर आहे, याचीच चर्चा राजकीय विश्लेषकांनी चालू केली आहे. प्रसारमाध्यमांनी मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीचे ढोल स्वत:हून वाजवण्यास प्रारंभ केला होता. त्याचा परिणाम मोदी नामाचा गजर सगळीकडे चालू झाला. त्यामुळे कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून मोदी तिकडे प्रचारास जाणार की नाही याची चर्चा चालू झाली. एकदा का एखाद्या नेत्याच्या प्रतिमेला वलय प्राप्त झाले की, त्याच्या प्रत्येक गोष्टींची चर्चा होऊ लागते. मोदींची प्रतिमा ही काही दिवसात 'लार्जर दॅन लाईफ' अशी झाल्याने सकारात्मक आणि नकारात्मक अशी दोन्ही प्रकारची प्रसिद्धी त्यांच्या सतत वाटय़ाला येत आहे आणि लोकसभा निवडणूक पार पडेपर्यंत असे होतच राहणार.

मुद्दा होता तो नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकात प्रचार सभा घेऊनही तेथे भाजपला यश मिळाले नाही, याचा. मोदी यांनी कोणकोणत्या मतदारसंघात सभा घेतल्या आणि तेथे भाजपची कामगिरी कशी झाली याचा आढावा घेण्याचे काम निकालाचे ट्रेंड जाहीर होत असतानाच चालू झाले होते. बंगळुरू शहर, मंगलोर आणि बेळगाव येथे मोदी यांच्या सभा झाल्या. या तीनही ठिकाणी भाजपला जबरदस्त पिछेहाटाचा सामना करावा लागला, हे सत्य आहे. बंगलोर शहर-परिसर, मंगलोर-उडपी हा किनारपट्टीचा भाग गेल्या काही वर्षात भाजपचे आणि संघ परिवाराचे प्रभाव क्षेत्र बनला होता. श्रीराम सेना नामक संघटना मंगलोर-उडपी पट्टय़ातच फोफावली होती. असे असताना बंगलोरचा शहरी भाग आणि मंगलोर उडपी या भागात झालेला पराभव भाजपच्या जिव्हारी लागणारा ठरला आहे, यात शंका नाही. यात खरे तर मोदींचा करिष्मा चालला नाही, असे म्हणण्याऐवजी भाजपची संघटना अयशस्वी ठरली आणि पक्षाची गेल्या पाच वर्षातील राजवट लोकांच्या पसंतीला पडली नाही, हे घटक कारणीभूत होते. उलट असेही म्हणता येईल की, बंगलोर, मंगलोर आणि बेळगाव या ठिकाणी मोदींनी सभा घेतल्याने भारतीय जनता पक्षाच्या विजयी उमेदवारांची संख्या वाढली. याचे कारण शहरी भागातील तरुण, सुशिक्षित, माहिती-तंत्रज्ञानमध्ये नोकरीला असणारा वर्ग भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडून पायाभूत नागरी सुविधा, सक्षम प्रशासन, भ्रष्टाचार इत्यादींबाबत मोठय़ा अपेक्षा बाळगून होता. त्यामुळेच बंगलोर महानगर, मंगलोर-उडपी भागात गेल्या निवडणुकीत तरुण मतदारांनी भाजपला भरभरून मते दिली. याच्या बदल्यात त्याला काय दिसले तर येडियुरप्पा आपल्या मुलाला बंगलोरात मोठा भूखंड अत्यंत स्वस्तात दरात मिळवून देत आहेत, बेल्लारीचे रेड्डी बंधू आपल्या धनशक्तीच्या जोरावर प्रशासनाला वाकवत आहेत. निवडून आलेले भाजपचे आमदार मतदारांच्या समस्या सोडवण्याऐवजी आपल्याला मंत्रीपद कसे मिळेल, यासाठीच प्रयत्न करताना दिसत होते.

येडियुरप्पा सरकार सत्तारुढ झाल्यावर वर्षा-दीड वर्षाच्या आतच भाजपच्या नाराज आमदारांनी मंत्रीपद मिळवण्यासाठी पक्षातून बाहेर पडण्याचा पवित्रा घेतला होता. त्यांच्या या पवित्र्यामुळे येडियुरप्पा सरकार जवळपास पडले होते. मात्र विधानसभा सभापतींकडून काही अपक्ष आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करून येडियुरप्पा यांनी पक्षातील नाराज आमदारांना गप्प बसवले. अशा लाथाळ्यांचे प्रदर्शन दररोज होऊ लागल्यावर पक्षाच्या प्रतिमेच्या तडा जायला वेळ लागला नाही. भाजपशी अथवा संघ परिवाराशी संबंधित नसलेल्या शहरी अनेक तरुण मतदारांनी एका पक्षाचे स्थिर सरकार यावे, म्हणून भाजपला मतदान केले. मात्र पहिल्यांदा कर्नाटकमध्ये आलेल्या भाजपने पाच वर्षात तीन मुख्यमंत्री दिले. अशा स्थितीत भाजपचा सुपडा साफ होणारच होता. पक्षाने सहा महिन्याआधीच सर्वेक्षण करून घेतले होते. सगळ्या चाचण्यांनी पक्षाचा धुव्वा उडणार, असे सांगितले होते. त्यामुळे मोदींनी प्रारंभी कर्नाटकात प्रचाराला जाण्यास नकार दिला होता. त्यांच्या प्रतिमेशी हे विसंगत होते. पक्ष पराभूत होवो अथवा काहीही होवो कर्नाटकातल्या प्रचाराची धुरा मी सांभाळेन, असे मोदींनी जाहीर करावयास हवे होते. पराभवाच्या भीतीने त्यांनी बोटचेपेपणा केला, असे म्हणता येईल. त्यांनी शंभर सव्वाशे सभा जरी घेतल्या असत्या तरी भाजपची आज जी वाताहत झालेली दिसते तशी कदाचित झाली नसती. कारण मनोधर्य गमावून बसलेल्या भाजपच्या आणि संघ परिवाराच्या कार्यकर्त्यांमध्ये मोदींच्या आगमनामुळे थोडा तरी नवचैतन्य आले असते.

शरीफ अराजकता संतुष्टात आणतील ?

पाकिस्तानात लोकशाहीच्या मार्गाने सत्तांतर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. पाकिस्तानातील लोकशाहीने यानिमित्ताने छोटेसे का होईना एक पाऊल पुढे टाकले, याबद्दल जगभरात समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र म्हणून त्या देशातील अराजक जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे संपुष्टात येईल, असे मानण्याचे कारण नाही. विशेषत: भारताने ही बाब लक्षात ठेवायला हवी.

मोदींच्या विकासाबाबत गप्पा आणि चुकांबाबत मौन

राष्ट्रीय राजकारणात इतक्या लगेच फायद्या-तोटय़ाचा विचार डोक्यात ठेवून गणिते मांडायची नसतात, हे मोदींना कोणी तरी सांगायला हवे होते. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांनी अनेक विधानसभा निवडणुकांच्या प्रचार मोहिमेत भाग घेतला आहे. आपल्या पक्षाला यश मिळाले नाही तर आपल्या राष्ट्रीय नेता या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उभे राहील, असा विचार या नेत्यांनी कधी केला नाही. १९८७मध्ये गुजरातेत अहमदाबाद, बडोदा इत्यादी महापालिकांच्या निवडणुका होत्या. त्यावेळी वाजपेयींनी अहमदाबादेत चार-पाच प्रचार सभा घेतल्या होत्या. याचे कारण भारतीय जनता पक्ष त्या निवडणुकीत सर्वशक्तीनिशी उतरला होता. पक्षाच्या दृष्टीने वातावरणही चांगले होते. वाजपेयींनी सभा घेतल्यास पक्षाला फायदा होईल म्हणून पक्षाने अटलजींना सभा घेण्यास सांगितले. अटलजींनी त्यावेळी आपला पक्ष महापालिका निवडणुकीत हरला तर आपल्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या प्रतिमेविषयी शंका घेतली जाईल, असा विचार केला नाही. 'मी राष्ट्रीय नेता आहे, महापालिका निवडणुकीच्या प्रचारात मी कसा भाग घेऊ.' असेही त्यांनी विचारले नाही. पक्षाने दिलेला आदेश त्यांनी पाळला. त्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले. मोदींनी असा व्यापक विचार करावयास हवा होता. मोदींच्या कार्यकाळात गुजरातच्या झालेल्या विकासाची चर्चा देशभर चालू असते. 'मागच्या पाच वर्षात आमच्या हातून चुका झाल्या, हे मान्य करतो. जनतेने पुन्हा संधी दिली तर कर्नाटकाचाही गुजरातच्या धर्तीवर विकास करून दाखवू,' असे मोदींनी सांगितले असते तर तरुण, सुशिक्षित मतदारांनी त्यावर नक्कीच विश्वास दाखवला असता. विशेषत: 'फ्लोटिंग व्होटर्स'ची मते भाजपकडे वळू शकली असती. गुजरातेत काय केले हे सांगण्याची संधी त्यांना मिळाली असती. त्यातून त्यांची प्रतिमा तयार झाली असती. एक वर्षाने होणा-या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी मोदींकडे पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून आपसूक पाहिले असते. पराभवही खुल्या दिलाने स्वीकारण्याची तयारी मोदींनी दाखवली पाहिजे.

Read More »

रहिवाशांचा जीव टांगणीला!

निजामपूर शहर महानगरपालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे शहरातील ३८७ इमारतींमधील रहिवाशांना धोकादायक घरात राहावे लागत आहे.

भिवंडी- निजामपूर शहर महानगरपालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे शहरातील ३८७ इमारतींमधील रहिवाशांना धोकादायक घरात राहावे लागत आहे. महापालिकेकडून या रहिवाशांना धोकादायक इमारत रिकामी करण्याच्या सूचना दिल्या जातात. मात्र, या रहिवाशांना राहण्याची पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून न दिल्यामुळे मोडकळीस आलेल्या इमारतीतच रहिवासी राहत आहेत. शिळफाटासारखी इमारत दुर्घटना घडल्यानंतर महापालिका आणि संबंधित यंत्रणा या रहिवाशांची दखल घेणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.

यंत्रमागची नगरी म्हणून ओळखल्या जाणा-या भिवंडीत अनेक यंत्रमाग कामगार राहतात. अन्य राज्यांतून आलेले हे कामगार मोडकळीस आलेल्या इमारतीतील घरे कमी भाडे असल्याने राहण्यास घेतात.

भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेत एकूण पाच प्रभाग समित्या आहेत. या समितीक्षेत्रात एकूण ३८७ धोकादायक इमारती आहेत. यात ५० हजारांपेक्षा जास्त कुटुंबे राहतात. मागील वर्षी शास्त्रीनगर भागातील एका इमारतीचा स्लॅब कोसळल्यामुळे एक मुलगा जखमी झाला होता. या घटनेनंतर महापालिकेने २४ तासांच्या आत ही इमारत रिकामी करण्याची नोटिस देऊन 'सोपस्कार' पूर्ण केले. मात्र, रहिवाशांची पर्यायी व्यवस्था न केल्यामुळे या नोटिशीला अर्थ नव्हता. त्यामुळे केवळ 'जबाबदारी' पार पाडण्याचेच धोरण महापालिकेचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी नवी वस्ती भागातील एक इमारत कोसळून ८ जणांचा बळी गेला होता. महापालिकेने त्यानंतरही धडा घेतलेला नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांचेही या समस्येकडे दुर्लक्ष झाले आहे.

इमारत पाडण्यास टाळाटाळ

शहरातील वेताळपाडा येथील वकील कंपाउंडमध्ये असलेली चार मजली धोकादायक इमारत पाडण्यास महापालिका टाळाटाळ करत आहे.
या इमारतीच्या बांधकामाला २५ वर्षे झाली असून इमारत मोडकळीस आली आहे. इमारतीच्या स्लॅब व पाय-यांचा काही भाग कोसळला आहे. ठिकठिकाणी तडे गेले असून सळय़ा उघडय़ा पडल्या आहेत. प्रभाग क्रमांक १ चे अधिकारी पी. एस. माने, क्षेत्रीय अधिकारी रमाकांत म्हात्रे यांनी इमारत पाडून टाकण्याबाबत दोन वेळेस येथील रहिवाशांना नोटिसा बजावल्या आहेत. इमारतीच्या तळमजल्यावर यंत्रमाग कारखाना आहे. कारखान्यातील २० पेक्षा जास्त संख्येने असलेल्या कामगारांनाही धोका आहे. या धोकादायक इमारतीच्या लगत ६० घरे आहेत, त्यामुळे इमारत कोसळल्यास जीवितहानीची शक्यता आहे.

प्रभाग समिती क्रमांक धोकादायक इमारती
५६
२   ८७
४२
८९
११३

Read More »

सुपर गर्ल

झोपेचा कालावधी सोडून इतर सर्व वेळ मोबाइल फोन वापरण्याची सवय सगळय़ांनाच लागली आहे. मात्र, मोबाइल फोन सतत सुरू ठेवल्यावर त्याची बॅटरी उतरत असल्याने, ही बॅटरी पुन:पुन्हा चार्ज करणे एक मोठी समस्या असते. काही मोबाइलच्या बॅटरींची क्षमता मोठी आणि उत्तम असते तर काही बॅटरींची क्षमता खूपच कमी असते. बॅटरी चार्ज केली नसेल तर मात्र हा सोबती चालत नाही आणि सगळे व्यवहार बंद पडतात. त्यातही या मोबाइलची बॅटरी चार्ज करण्याचा वेळही दोन ते चार तास इतका असू शकतो. हा कालावधी कमी करून मोबाइल जर फक्त ३० सेकंदात कोणी चार्ज करून दिला तर मग ती जादूच ठरेल. अशी जादू आता प्रत्यक्षात येणार आहे. ज्या वस्तूंच्या बॅट-या रिचार्जेबल असतात अशा मोबाइल फोनसह सर्वच इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी असा सुपर कॅपॅसिटर वरदान ठरणार आहे. हा 'सुपर कॅपॅसिटर' प्रत्यक्षात आणला आहे १८ वर्षाच्या भारतीय वंशाच्या ईशा खरे या मुलीने. आधीच असलेल्या कॅपॅसिटरमध्ये सुधारणा करून त्याला सुपर कॅपॅसिटर करण्याचे काम महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या ईशा हिने केले.
इंटेल ही अभियांत्रिकी-तंत्रज्ञानातील आघाडीची कंपनी दरवर्षी आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि अभियांत्रिकी प्रदर्शन भरवते. प्रदर्शनात देशविदेशातील विद्यार्थी आपले विज्ञान प्रकल्प सादर करतात. फिनिक्स येथे गेल्या आठवडय़ात भरलेल्या प्रदर्शनात ईशाच्या 'सुपर कॅपॅसिटर'ला दुसरे पारितोषिक मिळाले. इंटेल प्रतिष्ठानने तिला 'युवा वैज्ञानिक पारितोषिक' देत २५ लाख रुपयांची रक्कम दिली. कॅलिफरेनियातील सारागोटा येथील राहणा-या ईशाने अत्यंत कमी खर्चात याची निर्मिती केली आहे. ईशाचा हा सुपर कॅपॅसिटर प्रायोगिक तत्त्वावरचा आहे. मात्र, त्याची व्यावसायिक स्वरूपात निर्मिती करू गेल्यास त्याची किंमत वाढू शकेल. परंतु आजच्या आधुनिक जीवनात मोबाइल ही अत्यावश्यक गरज झाल्यामुळे झटपट बॅटरी चार्ज करणारा कॅपॅसिटर सगळय़ानाच हवासा वाटेल. जगभरात आणि भारतातही स्वस्त किमतील मोबाइलसह स्मार्ट फोनची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. स्मार्ट फोनमध्ये अनेक सुविधा उपलब्ध असल्यामुळे त्याचा वापर जास्त वेळ होतो आणि म्हणूनच त्याची बॅटरीही अतिशय वेगाने संपते. म्हणून ईशाच्या कॅपॅसिटरचा सर्वाधिक फायदा स्मार्टफोन धारकांना होणार आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रिक गाडय़ांच्या बॅट-या चार्ज करण्यासाठीही याचा व्यावसायिक तत्त्वावर वापर होऊ शकतो. असे झाले तर वाहन उत्पादक कंपन्या मोठय़ा प्रमाणात इलेक्ट्रिकवर चालणा-या गाडय़ा बाजारात आणतील. तसेच लॅपटॉप आणि इतर चार्जिग करू शकणा-या इलेक्ट्रिॉनिक्स वस्तूंसाठी हा झटपट चार्ज करणारा सुपर कॅपॅसिटर वरदान ठरणार आहे.
सध्या मोबाइलमध्ये बॅटरीचे आयुष्य आणि चार्जिगसाठी लागणारा वेळ ही मुख्य समस्या आहे. गुगलसारख्या मोठय़ा कंपनीने तिच्या या सुपर कॅपॅसिटरची दखल घेतली आहे. त्यामुळे भविष्यात त्यात सुधारणा करण्यासाठी आणि त्याला व्यावसायिक स्वरूप देण्यासाठी मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक केली तर त्याची वास्तविक आवृत्ती लवकरच बाजारात यायला मदत होईल.
प्रदर्शनात पहिले पारितोषिक रोमानियातील लोनट बुधिस्टेनू या १९ वर्षीच्या तरुणाला मिळाले आहे. यांत्रिक (कृत्रिम) बुद्धीचा वापर करत गाडी चालवण्याच्या (स्वयंचलित गाडी) विज्ञान प्रकल्पासाठी त्याला पहिले पारितोषिक मिळाले. येत्या काळात ईशा आणि लोनट यांच्यासारख्या सुपर बॉय आणि सुपर गर्लमुळे इलेक्ट्रिॉनिक्सची दुनिया आमूलाग्र बदलली तर नवल नाही.

Read More »

रॉकेलवर चालणा-या अनधिकृत रिक्षा

वांद्रे पूर्वेकडील रेल्वे स्थानकाजवळील फाटकालगत अनेक वर्षापासून बेकायदा रिक्षा वाहतूक सुरू आहे.

मुंबई- वांद्रे पूर्वेकडील रेल्वे स्थानकाजवळील फाटकालगत अनेक वर्षापासून बेकायदा रिक्षा वाहतूक सुरू आहे. वांद्रे स्थानकातून टर्मिनसकडे जाणा-या प्रवाशांकडून हे रिक्षाचालक अवाच्या सव्वा भाडे आकारून त्यांची लुबाडणूक करत आहेत. या काळ्या रंगांच्या नादुरुस्त रिक्षांमध्ये पाच ते सहा प्रवासी कोंबले जातात. प्रत्येक प्रवाशाकडून १५ ते २० रुपये घेतले जात आहेत. धूर ओकणा-या या काळ्या रंगांच्या रिक्षा रॉकेलमिश्रित पेट्रोलवर चालवल्या जातात, त्यामुळे प्रदूषण होते. या रिक्षाचालकांकडे बॅच, गणवेश असा कुठलाही पुरावा नसतो. या बेकायदा रिक्षातळापासून हाकेच्या अंतरावर पोलिस ठाणे आहे. मात्र, पोलिसांच्या समोरच ही बेकायदा वाहतूक सुरू आहे.

वांद्रे स्थानकातून वांद्रे टर्मिनसचे अंतर कमी आहे. त्यामुळे स्थानकाबाहेरील अधिकृत रिक्षा भाडे कमी मिळण्याचे कारण देऊन मनमानी करत प्रवाशांना नकार देतात. त्याचा फायदा अनधिकृत रिक्षाचालक घेतात व प्रवाशांकडून जास्त भाडे घेतात. एका फेरीमागे पाच प्रवाशांकडून एकूण १०० रुपये किंवा शक्य असल्यास त्यापेक्षा जास्त रक्कमही घेतली जाते. सामान असेल तर त्याचेही वेगळे पैसे आकारले जातात. टर्मिनसवर जाणारे प्रवासी गावी जाणारे किंवा मुंबईत नुकतेच आलेले असतात. त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत त्यांच्याकडून जास्त भाडे आकारले जाते.

रेल्वे स्थानकाजवळून ३१०, ३१६, ३१७ व अन्य क्रमांकाच्या काही बेस्ट बसेस एक दोन मिनिटांच्या फरकाने वांद्रे टर्मिनसपर्यंत जातात. मात्र, प्रवाशांना त्याची माहिती दिली जात नाही. रेल्वेस्थानक परिसरातही याबाबत फलक लावण्याची गरज आहे. विशेष म्हणजे ही वाहतूक ज्या ठिकाणाहून चालते त्यापासून परिवहन आयुक्तालय हाकेच्या अंतरावर आहे. तरीही या रिक्षांवर कारवाई केली जात नाही. कुटुंबासह टर्मिनसहून लांबच्या प्रवासासाठी निघालेल्या अनेक प्रवाशांकडे सामान असते. मात्र, काळी-पिवळी पट्टी असलेल्या अधिकृत रिक्षांचे चालक भाडे नाकारतात त्यामुळे अनधिकृत रिक्षाचालकांचे फावले आहे. टर्मिनसकडे जाणारा रस्ता हा मोकळा असल्यामुळे अनधिकृत रिक्षाचालकांकडून वेगमर्यादाही पाळली जात नाही, त्यामुळे अपघाताची शक्यता आहे.

'कारवाईत रिक्षा पसार होतात'

याबाबतच्या तक्रारी परिवहन आयुक्तांकडे आल्या आहेत. त्यानुसार भरारी पथकाद्वारे कारवाईही केली जाते. मात्र कारवाई दरम्यान हे अनधिकृत रिक्षाचालक आपल्या गाडय़ा घेऊन पसार होतात. असे परिवहन आयुक्त, व्ही. एन. मोरे यांनी सांगितले. मात्र, या रिक्षाचालकांना भरारी पथकाच्या कारवाईची माहिती आगाऊ कशी मिळू शकते, हा प्रश्न आहे.

कुर्ला, मालाड, विक्रोळीमध्येही सुळसुळाट 

कुर्ला, मालाड, विक्रोळी, सांताक्रूझ या भागातही शेअर रिक्षा आणि अनधिकृत रिक्षांचा सुळसुळाट आहे. येथेही क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केली जाते. या भागात तर भाडे नाकारणे नित्याचेच आहे. विशेष म्हणजे या रिक्षांबाबत तक्रारी केल्या तरी त्यांच्यावर त्याचा कोणताही एक परिणाम होत नाही.

पन्नास रुपयांत नियम धाब्यावर!

स्थानक ते रेल्वे टर्मिनस हा परिसर कमी वर्दळीचा आहे. त्यामुळे वाहतूक पोलिस या ठिकाणी फिरकत नाहीत. वाहतूक पोलिस जरी आले तरी ५० रुपये दिले की रिक्षांना कुणीही अडवत नाही, असे एका रिक्षाचालकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. तसेच हे अनेक रिक्षाचालक समूहाने आपसात तडजोड करून या भागात आपला बेकायदा व्यवसाय करतात. त्यामुळे एकटय़ा पोलिस कर्मचा-यांला ही वाहतूक बंद करणे कठीण होते.

लांबच्या भाड्यासाठी अडवणूक 

वांद्रे पूर्वेकडील स्कायवॉकच्या दिशेला असलेल्या स्थानकाबाहेर लांबचे भाडे मिळवण्यासाठी रिक्षाचालक प्रवाशांची अडवणूक करतात. रेल्वे स्थानकाच्या पाय-या ज्या दिशेला उतरतात त्या ठिकाणी आडव्या रिक्षा टाकून चालक लांबचे भाडे मिळवण्यासाठी ओरडत असतात. त्यामुळे प्रवाशांना स्थानकात प्रवास करण्याचा मार्ग पूर्णपणे बंद होऊन जातो. कुर्ला स्थानक, वांद्रे-कुर्ला संकुलातील कार्यालये किंवा अन्य ठिकाणचे लांबवरचे भाडे मिळवण्यासाठी हे रिक्षाचालक प्रवाशांची अडवणूक करतात. त्यामुळे सरकारी वसाहत किंवा कलानगर, गांधीनगर व रेल्वेस्थानकापासून एक दोन किमी अंतरावर राहणा-या प्रवाशांना रिक्षाचालक सेवा नाकारतात. येथील बससाठी थांबलेले प्रवासी मिळवण्यासाठी बसस्थानकाच्या जागेवरही रांगेत रिक्षा थांबल्या जातात, त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होते. बसेसना थांब्यासमोर येण्यास कसरत करावी लागते. बेस्टचे कर्मचारी, टीसी किंवा वाहक, चालकांनी रिक्षा हटवण्यास सांगितल्यावर हे रिक्षाचालक त्यांना जुमानत नाहीत.

Read More »

रिव्हर्स स्विंग, २२ मे २०१३

जाणून घ्या क्रिकेटच्या इतिहासात २२ मे रोजी घडलेल्या रंजक घडामोडी

१८२६
इंग्लंडचे माजी कर्णधार जॉर्ज पार यांचा जन्म. परदेश दौ-यात (कॅनडा आणि अमेरिका, १८५९) कर्णधारपद भूषवण्याचा मान त्यांनी प्रथम मिळवला.


१८५९
जगप्रसिद्ध 'डिडेक्टिव्ह' शेरलॉक होम्सची निर्मिती करणारे सवरेत्तम इंग्लिश लेखक सर आर्थर कॉनन डॉयल (१८५९-१९३०) यांचा जन्म. त्यांनी डोमेस्टिक सामन्यांत एमसीसीचे प्रतिनिधित्व केले. पहिल्या डोमस्टिक सामन्यांत डॉयल यांनी शतक ठोकले. एका डावात १० विकेट्स घेण्याची करामत त्यांनी दोनदा साधली. महान फलंदाज डब्ल्यू. जी. ग्रेस यांची घेतलेली विकेट हे डॉयल यांच्या कारकीर्दीचे आणखी एक वैशिष्टय़. १९ कडव्यांची कविता लिहून त्यांनी ग्रेस यांच्या विकेटचा आनंद साजरा केला.


१८७९
ऑस्ट्रेलियाचे माजी 'फँटास्टिक' कर्णधार वॉर्विक आर्मस्ट्राँग (१८७९-१९४७) यांचा जन्म. त्यांनी ५० कसोटी सामन्यांत २८६३ धावा केल्या. त्यात सहा शतकांचा समावेश आहे. मध्यमतेज आणि लेगब्रेक मारा करत आर्मस्ट्राँग यांनी ८७ विकेट्सही घेतल्यात. त्यांच्या नेतृत्वाखाली १९२०-२१ मध्ये इंग्लंडविरुद्ध सलग आठ अॅशेस सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले. त्यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला पहिला ५-० 'व्हाइटवॉश' दिला. १४० किलो वजनाचे आर्मस्ट्राँग 'बिग शिप' म्हणून ओळखले जात. त्यांची कर्णधार म्हणून विजयाची टक्केवारी ८० टक्के इतकी आहे. ऑस्ट्रेलियाचा कुठलाही कर्णधार त्यांच्या इतका यशस्वी ठरलेला नाही.


१९०७
एका डावात दोनदा हॅटट्रिक घेण्याची करामत क्रिकेटच्या इतिहासात केवळ दोनदा साधली गेली आहे. मिडलसेक्सचे मध्यमतेज गोलंदाज अल्बर्ट ट्रॉट यांनी याच दिवशी लॉर्ड्सवर सॉमरसेटविरुद्ध ही करामत पहिल्यांदा साधली. मात्र तो मदतनिधी सामना होता. त्या सामन्यात ट्रॉट यांनी २० धावांत ७ विकेट्स घेतल्या. त्यापैकी चार सलग आहेत. ट्रॉट यांच्यानंतर भारताचे मध्यमतेज गोलंदाज जोगिंदर राव (१९३८-१९९४) यांनीही एका डावात दोनदा हॅटट्रिक घेतली आहे.


१९२७
न्यूझीलंडचे माजी यष्टिरक्षक इरिक पेट्री (१९२७) यांचा जन्म. १० वर्षाच्या कारकीर्दीत १४ सामने खेळताना त्यांनी २५८ धावा केल्यात. तसेच २५ झेल टिपले.


१९३६
लॉर्ड ब्रेबर्न यांनी मुंबईत त्यांच्या नावाच्या स्टेडियमचे भूमिपूजन केले. चर्चगेटजवळ असलेले ब्रेबर्न स्टेडियम म्हणून मान्यता पावलेले हे स्टेडियम भारतातील पहिले स्टेडियम आहे. १९७५ पर्यंत येथे कसोटी सामने खेळले गेले. मात्र डिसेंबर २००९ मध्ये भारत वि. श्रीलंका यांच्यात झालेल्या तिस-या कसोटीचे यजमानपद ब्रेबर्नने भूषवले. वानखेडे स्टेडियमच्या नूतनीकरणामुळे ब्रेबर्न स्टेडियमवर कसोटी सामना झाला.


९४०
१९७०च्या दशकातील भारताच्या प्रसिद्ध 'स्पिन' त्रिकुटापैकी एक माजी ऑफस्पिनर इरापल्ली प्रसन्ना यांचा जन्म. १६ वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी ४९ सामन्यांत १८९ विकेट्स घेतल्या. सामन्यांत दहा विकेट्स घेण्याची करामत त्यांनी दोनदा साधली. प्रसन्ना हे अस्सल ऑफस्पिनर होते. चेंडूला भरपूर उंची द्यायला ते कधी कचरले नाहीत. त्यांना बाउन्सरही छान मिळायचा. त्यांच्या सर्वोत्तम सहा कामगिरींपैकी पाच देशाबाहेर झालेल्या आहेत, हे विशेष.

Read More »

संजय दत्तची रवानगी येरवडा तुरुंगात

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी दोषी असलेल्या अभिनेता संजय दत्तची रवानगी बुधवारी सकाळी अतिशय गुप्ततेत पुण्याच्या येरवडा तुरुंगात करण्यात आली.

मुंबई – १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी दोषी असलेल्या अभिनेता संजय दत्तची रवानगी बुधवारी सकाळी अतिशय गुप्ततेत पुण्याच्या येरवडा तुरुंगात करण्यात आली.

बेकायदा शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी दोषी असलेल्या संजय दत्तला सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईच्या ऑर्थर तुरुंगात दोन दिवसांपूर्वी ठेवण्यात आले होते. एक आठवड्यापूर्वी गेल्या १६ मे ला संजय दत्तने विशेष टाडा न्यायालयापुढे शरणागती पत्करली होती. संजयला पुढील ४२ आठवडे पुण्यातील येरवडा तुरुंगात काढावे लागणार आहेत.

Read More »

अति मोह, उद्ध्वस्त करी

पश्चिम बंगालमधल्या शारदा चिटफंड योजनेत सामान्य गुंतवणूकदारांचे तीन हजार कोटी रुपये बुडाल्याचे उघड झाले. या आधीही असे प्रकार घडलेले आहेत. पश्चिम बंगालमधील कोलकात्यामध्ये मुख्यालय असलेल्या एका बचत संस्थेने देशभरातील लोकांचे पैसे बुडवले. हा प्रकार उघड झाल्यानंतर जीवनाचे सर्वस्व गमावलेल्या अनेक गुंतवणूकदारांनी आपल्याला गुंतवणूक करण्यास भाग पाडणा-या आपापल्या गावातल्या एजंटांना गाठले खरे; परंतु त्या एजटांचीसुद्धा फसवणूक झालेली होती. अशा नवनव्या कंपन्या निघतात आणि लोकांना बुडवतात. पण लोक पुन्हा पुन्हा या कंपन्यांच्या जाळ्यात अडकतात. कारण बँकांसारख्या वैध मार्गाने मिळणा-या मोबदल्यापेक्षा जादा मोबदला देण्याचे आमिष या कंपन्यांनी दाखवलेले असते. त्याला भुलून लोक आपल्या कष्टाचा पैसा अशा कंपन्यात गुंतवतात. मात्र वारंवार प्रश्न असा पडतो की, या प्रकारावर सरकारचे नियंत्रण आहे की नाही? तसा विचार आता सरकार करू लागले आहे. मर्यादेपेक्षा अधिक मोबदल्याचे आमिष दाखवून लोकांकडून पैसा गोळा करणा-या कंपन्यांवर सरकार आता सेबीमार्फत नियंत्रण आणणार आहे. सेबी ही यंत्रणा शेअर बाजारावर नियंत्रण ठेवते. तिने आता या कंपन्यांवरसुद्धा नियंत्रण ठेवावे, अशी सरकारची अपेक्षा असल्यामुळे सरकारने या कंपन्यांच्या संबंधातील नियम तयार करण्याची जबाबदारी ‘सेबी’वरच टाकली आहे. एका परीने विचार केला तर आपल्या देशातल्या गुंतवणूकदारांना अशा पाँझी कंपन्यांचे आकर्षण वाटते. यामागे लोकांना गुंतवणुकीचे अनेक पर्याय मार्ग उपलब्ध नाहीत, हे उघड होते. देशात गुंतवणूकदारांची संख्या वाढत आहे. लोकांच्या हातातील पैसा वाढत आहे. तो पैसा गुंतवून व्याजावर जगावे, ही भावनाही वाढत आहे. परंतु या प्रचंड गुंतवणूक क्षमतेला न्याय देण्याइतपत सुरक्षित आणि अधिक फायदेशीर गुंतवणूक पर्याय देशात पुरेसे उपलब्ध नाहीत. त्यामुळे असे उपटसुंभ लोक वेगवेगळ्या शब्दात आकर्षकरित्या मांडणी करून लोकांना आकृष्ट करतात. यापुढे सरकारने सेबीमार्फत या कंपन्यांवर काही बंधने लादली तर निदान एक गोष्ट तरी नक्की होईल की, ती योजना अवाजवी मोबदला देणारी आहे की नाही. जिथे अवाजवी मोबदला असतो, तेथे गुंतवणूक बुडण्याची शक्यता असते. आता सेबीचे प्रमाणपत्र घेतल्याशिवाय आणि त्या वाजवी मोबदला देणारा आहेत, हे सिद्ध झाल्याशिवाय कोणालाही अशा योजना सुरू करता येणार नाहीत. परिणामी, यात गुंतणारे गुंतवणूकदारासुद्धा सेबीची अनुमती आहे की, नाही हे पाहिल्याशिवाय तिच्यात पैसा गुंतवणार नाहीत. शेअर बाजारात पैसे गुंतवण्याच्याबाबतीत अजूनही लोकांमध्ये जागृती नाही. त्याचा परिणाम म्हणून अशा योजना फोफावतात. सरकारने या पाँझी योजनांवर नियंत्रण आणि बंधने आणलीच पाहिजेत.

Read More »

जॉर्ज मायकेलचे दैव बलवत्तर

‘केअरलेस व्हिस्पर’ या आणि इतर लोकप्रिय गीतांचा गायक जॉर्ज मायकेलचे दैव बलवत्तर असल्याने नुकताच एका रस्ता अपघातातून तो थोडक्यात बचावला.

चार पदरी रस्त्यावर भरधाव वेगाने जाणा-या वाहतुकीमध्ये त्याच्या गाडीचा दरवाजा चुकून उघडा राहिल्याने तो अचानक रस्त्यावर पडला. या वेळी त्याच्या रेन्ज रोव्हरचा वेग ताशी ७०मैल होता. या वेळी त्याच्या गाडीच्या मागून तितक्याच वेगाने येणा-या महिलेने तिच्या गाडीला शिताफीने नियंत्रित केल्यामुळे जॉर्ज मायकेल तिच्या गाडीखाली चिरडला गेला नाही. मात्र, त्याच वेळी या महिलेने प्रसंगावधान दाखवून तिची गाडी त्याच्या समोर आडवी लावून ठेवल्याने पाठीमागून भरधाव वेगाने येणा-या गाडय़ांपासून मायकेलचे संरक्षण झाले. रस्त्यावर पडलेल्या मायकेलच्या मदतीसाठी गेल्यावर तो सुरक्षित असल्याचे व त्याला किरकोळ जखमा झाल्याचे लक्षात आले.

त्याचा ट्रॅक सूट पूर्ण फाटला होता आणि त्याची विशेष ओळख असलेला गॉगल तुटला होता असे या महिलेने सांगितले. जर तो या चार पदरी रस्त्याच्या दुस-या लेनमध्ये पडला असता तर कदाचित त्या लेनमध्ये असलेल्या भरधाव गाडय़ांखाली त्याचा मृत्यू झाला असता. या अपघातानंतर हा मार्ग तात्पुरता बंद करण्यात आला व मायकेलला विमानाने रुग्णालयात नेण्यात आले.

Read More »

नक्षलविरोधी मोहिमांमध्ये कोणाचे बळी

छत्तीसगडमध्ये नुकत्याच झालेल्या कथित बनावट चकमक प्रकरणामुळे नक्षलग्रस्त भागातील नक्षलवाद्यांची समस्या हाताळताना होत असलेली हलगर्जी प्रकाशात आली आहे. नक्षलवाद्यांचे उच्चाटन करण्यासाठी त्यांना मिळणारी स्थानिकांची सहानुभूती कमी करण्याचे प्रयत्न होत असतात. पण नक्षलविरोधी मोहिमा हाताळताना जर काळजी घेतली नाही तर त्यामध्ये निरपराध लोकांचा विनाकारण बळी जातो आणि त्याचा परिणाम नक्षलविरोधी प्रयत्नांवर होतो. छत्तीसगडमधील आतापर्यंतच्या ब-याच मोहिमांमध्ये हेच दिसून आले आहे.

छत्तीसगडमध्ये १७ व १८ मे रोजी झालेल्या कथित बनावट चकमकीमुळे राज्य सरकारची कोंडी झाली आहे. या चकमकीत मारले गेलेले लोक हे नक्षलवादी नव्हते आणि ते गरीब आदिवासी होते, असे स्थानिकांकडून बोलले जात आहे. या प्रकरणावरून छत्तीसगडमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सीआरपीएफने दिले आहेत. तसेच राज्य सरकारनेही या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. पण नक्षलविरोधी मोहिमा राबवताना सुरक्षा दलांना खरे नक्षलवादी आणि निरपराध गावकरी यांच्यातील फरक ओळखता येत नसल्याचे या घटनेने दिसून आले आहे. दुसरीकडे सुरक्षा दलानेही या चकमकीची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला आहे.

बिजापूर आणि नक्षलवाद

छत्तीसगडमधील बिजापूर जिल्हा म्हणजे राज्यातील नक्षलग्रस्त असलेल्या सात जिल्ह्यांपैकी एक आहे. सुमारे ४०,००० चौरस किमीच्या क्षेत्रफळामध्ये असलेल्या या जिल्ह्यांचा मिळून बस्तर प्रदेश तयार झाला आहे. त्यातही बिजापूर हा माओवाद्यांच्या प्रभावाखालील या जिल्ह्यांचा केंद्रबिंदू आहे. या जिल्ह्यातील नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी सुरक्षा दलांकडून सातत्याने प्रयत्न होत असतात.

चकमकीचे गूढ

१७ आणि १८ मे रोजी सीआरपीएफने बस्तर भागातील बिजापूर जिल्ह्यामधील आरसमेट्टा गावामध्ये एक मोठी मोहीम सुरू केली होती. सुमारे ७०० जवानांचा समावेश असलेल्या पाच तुकडय़ांना वेगवेगळ्या दिशांकडून चढाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. या भागात मोठय़ा संख्येने माओवादी लपले असल्याच्या संशयावरून त्यांच्यावर जोरदार हल्ला करण्याच्या उद्देशाने आखणी करण्यात आली होती. यावेळी एका तुकडीने या गावामध्ये रात्री ११ वाजता जोरदार गोळीबार सुरू केला व दोन्ही बाजूंकडून सुमारे तासभर हा गोळीबार सुरू होता. त्यानंतर ही तुकडी एका जखमी अधिका-याला, एका गावक-याला व तीन संशयितांना घेऊन त्यांच्या तळावर परतली. दुस-या दिवशी या भागात गस्त घालणा-या तुकडीला काही मृतदेह आढळल्याने त्याची माहिती या तुकडीच्या प्रमुखाने सीआरपीएफला दिली आणि सापडलेले मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले. मात्र, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या चकमकीनंतर तेथे आठ गावक-यांचे व ‘कोब्रा’ तुकडीच्या एका जवानाचा मृतदेह सापडला. गावक-यांमध्ये तिघा अल्पवयीन मुलांचा समावेश होता.

गावक-यांचा गंभीर आरोप

या गावामध्ये सीआरपीएफने केलेल्या कारवाईबाबत गावक-यांनी वेगळाच आरोप केला आहे. या गावामध्ये बियाणे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते व या महोत्सवासाठी सर्व गावकरी जमले असताना सीआरपीएफने त्यांच्यावर चहू बाजूने गोळीबार केल्याचा गावक-यांचा आरोप आहे. तर ही चकमक बनावट नसल्याचा व गावक-यांना मारण्याचा आपला कोणताही उद्देश नसल्याचा बचाव सीआरपीएफने केला आहे.

मोहिमेच्या यशस्वितेबाबत सीआरपीएफला विश्वास

या मोहिमेमध्ये झालेल्या जोरदार गोळीबारामुळे काही स्थानिकांचा मृत्यू झाल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने म्हटले आहे. मात्र, या गोळीबाराची झळ सर्वसामान्यांना पोहोचू नये यासाठी सर्व प्रकारची खबरदारी घेतली होती. या भागात लपलेल्या सशस्त्र नक्षलवाद्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आखलेली ही योजना परिणामकारक होती, असा विश्वास या अधिका-याने व्यक्त केला आहे. गुप्तचरांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर तिची आखणी केली होती व जेव्हा ‘कोब्रा’ तुकडीचे कमांडो तेथे दाखल झाले तेव्हा पहिली गोळी प्रतिपक्षाकडून चालवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

सरकारची मदत

या घटनेनंतर जनमत तीव्र झाल्यावर छत्तीसगड सरकारने या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे या घटनेत बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांनी मुख्य सचिव सुनील कुमार व पोलिस महासंचालक रामनिवास यांच्याशी या प्रकरणाबाबत चर्चा केली. कोब्रा या सीआरपीएफच्या कमांडो पथकाने बनावट चकमकीचा दावा अमान्य केला आहे. उलट या चकमकीत जे गावकरी ठार झाले होते ते सीआरपीएफच्या पथकाकडून नव्हे तर माओवाद्यांनी केलेल्या गोळीबारात ठार झाल्याचे कोब्रा पथकाचे म्हणणे आहे.

चकमकीविरोधात संतापाची लाट

या चकमकीनंतर बस्तर भागामध्ये नागरिकांकडून जोरदार निदर्शने करण्यात आली. तर छत्तीसगडमधील विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि मानवी हक्क संघटनांनी या चकमकीत झालेले मृत्यू म्हणजे क्रूर हत्या असल्याचे म्हटले आहे. या चकमकीत गुंतलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

बनावट चकमकींचा इतिहास

बिजापूरमध्ये झालेली चकमक बनावट नसल्याचा आणि गुप्तचरांनी दिलेल्या खात्रीलायक माहितीवर आधारित असल्याचा दावा सरकारने आणि सीआरपीएफने केला आहे. मात्र, अशा प्रकारच्या चकमकी यापूर्वीही छत्तीसगडमध्ये झालेल्या आहेत व त्यामध्ये अनेक गावक-यांचे बळी गेले आहेत. या चकमकींच्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरू आहे. न्या. व्ही. के. अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील आयोगाकडून याची चौकशी सुरू आहे. त्यांच्याकडेच नुकत्याच झालेल्या चकमकीच्या चौकशीचा भार सोपवण्यात आला आहे. गेल्या वर्षी बिजापूर जिल्ह्यात सरकेगुडा गावात अशाच प्रकारची चकमक झाली होती व त्यामध्ये २० गावकरी ठार झाले होते. तर त्या आधीही छत्तीसगडमध्ये चकमकींमध्ये गावक-यांचा मृत्यू झाला आहे. चकमकींच्या या इतिहासामुळे बिजापूरमधील या महिन्यातील चकमकही संशयास्पद समजली जात आहे. या चकमकींमध्ये मारले गेलेले गावकरी निरपराध असतील तर त्याचा परिणाम छत्तीसगडमधील गावक-यांच्या मानसिकतेवर होणार आहे. नक्षलवाद्यांऐवजी गावकरी चकमकीत मारले जाऊ नयेत, याची काळजी मोहिमा राबवताना घेतली जात असेलच. तरीही एखाद्या त्रुटीमुळे किंवा नक्षलवाद्यांनी जाणीवपूर्वक पसरवलेल्या चुकीच्या माहितीमुळे गावक-यांचे बळी जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचा परिणाम या भागातील नक्षलविरोधी मोहिमांवर होण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षा दलांना अधिक सावधगिरी बाळगावी लागणार आहे.

Read More »

व्यापाराचे नवे पर्व

चीनने लडाखमध्ये आठवडाभर केलेल्या घुसखोरीमुळे भारत आणि चीन यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आणि त्यानंतर आठवडाभरानंतरच चीनचे पंतप्रधान ली केकियांग हे तीन दिवसांच्या भारत दौ-यावर आले. दरम्यानच्या काळात भारताचे परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद हे चीनला जाऊन आले आणि यादरम्यान दोन देशांच्यामध्ये विविध पातळ्यांवर चर्चाही झाली. डॉ. मनमोहन सिंग यांनी सीमेवरच्या अतिक्रमणाच्या बाबतीत चीनच्या पंतप्रधानांना काही गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या आहेत. भारतीय जनतेच्या या संबंधातल्या भावना फारच तीव्र आहेत आणि चीनकडून सातत्याने अशी घुसखोरी होत असल्यामुळे चीनला आपण बजावलेच पाहिजे, असेही भारतीयांना वाटत असते. आंतरराष्ट्रीय राजकारणात मात्र सगळ्याच गोष्टी इतक्या सोप्या नसतात. तरीही मनमोहन सिंग यांनी घुसखोरीच्या संबंधातली आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली. त्यामुळे उभय देशांनी मिळून काढलेल्या संयुक्त निवेदनामध्ये सीमेच्यासंबंधात आपण बरेच काही शिकलो आहोत, असे म्हटले आहे. या पुढे दोन देशांच्या सुरक्षा सल्लागारांनी या सगळ्या परिस्थितीचा बारकाईने विचार करावा, हे उभय देशांनी मान्य केले असल्याचे म्हटले आहे. भारताचे सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन हे त्या दृष्टीने लवकरच बीजिंगला जाणार आहेत. भारत-चीन दरम्यानच्या सीमेचा प्रश्न नेमका काय आहे आणि भारताची नेमकी तक्रार काय आहे, यावर नेमकेपणाने चर्चा करणार आहेत. आता चीनचे पंतप्रधान भारतात आले असले तरी आणि घुसखोरीतला विषय ताजा असला तरी या भेटीत त्याविषयावर चर्चा होईलच असे नाही. कारण ही भेट व्यापारी विषयावर होती. पंतप्रधान ली केकियांग हे व्यापा-यांचे भले मोठे शिष्टमंडळ घेऊन आलेले होते. तेव्हा या दौ-याचा विषय व्यापार होता. तरीही सिंग यांनी बैठकीचा अजेंडा बाजूला ठेवून का होईना पण घुसखोरीच्या प्रश्नाला वाचा फोडली. चीनचे भारताशिवाय इतरही शेजारी देशांशी अनेक प्रकारचे वाद आहेत. आता तैवानचा प्रश्न आहेच आणि त्यावरून चीन आणि अमेरिका यांच्यात तणाव आहे. चीन आणि अमेरिका यांचे संबंध काही कमी ताणलेले नाहीत. पण या दोन देशांमध्ये प्रचंड व्यापार आहे. तसा भारताशी करता येऊ शकतो आणि चीनसाठी ती एक संधी आहे. भारत आणि चीन यांच्यामध्ये सध्या दरसाल ६५ अब्ज डॉलर्स इतका व्यापार होतो. त्यामध्ये भारत चीनकडून ५० अब्ज डॉलर्सचा माल आयात करतो, तर चीन भारताकडून केवळ १२ अब्ज डॉलरचा माल आयात करतो. भारताला चीनमध्ये ब-याच गोष्टी पाठवण्याची संधी आहे आणि या दोन्ही देशांनी आपला हा व्यापार १०० अब्ज डॉलरवर नेण्याचे ठरवले आहे. कदाचित लोकांना ही गोष्ट माहित नसेल की भारत देश चीनला तांदूळ निर्यात करत आहे. गेल्या वर्षी भारताने चीनला ४० लाख तांदूळ पाठवलेला आहे. त्यामुळे यावेळी ही निर्यात ६० लाख टनावर जाण्याची शक्यता आहे. जगातील दुस-या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणवल्या जाणा-या चीनला आपण धान्य निर्यात करत आहोत, ही गोष्ट भारताच्या दृष्टीने अभिमानाची आहे. भारताकडून चीनला पाठवल्या जाणा-या वस्तूंमध्ये मोठी वाढ होऊ शकते आणि सीमाप्रश्नावर चर्चा होत असतानाच भारत आणि चीनदरम्यान आíथक संबंधांचे नवे पर्व सुरू होऊ शकते.

Read More »

विमानतळाच्या प्रवेशद्वारापर्यंत सेवा देण्यास बेस्ट उत्सुक

मुंबईतील दोन्ही विमानतळांच्या प्रवेशद्वारापर्यंत तसेच नजीकच्या रेल्वे स्थानकांपर्यंत बससेवा सुरू करण्याची बेस्ट प्रशासनाची इच्छा आहे.
मुंबई - मुंबईतील दोन्ही विमानतळांच्या प्रवेशद्वारापर्यंत तसेच नजीकच्या रेल्वे स्थानकांपर्यंत बससेवा सुरू करण्याची बेस्ट प्रशासनाची इच्छा आहे. त्या दृष्टीने मुंबई इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडशी (एमआयएएल) चर्चा सुरू असल्याची माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक ओ. पी. गुप्ता यांनी दिली. 'एमआयएएल'ने हिरवा कंदील दिल्यानंतर ही सेवा सुरू करण्यात येईल, असे बेस्टने स्पष्ट केले. यामुळे प्रवाशांची रिक्षा-टॅक्सी चालकांकडून होणारी लुटमार थांबू शकेल.

प्रवाशांना विमानतळांवरील टॅक्सी-रिक्षाचालक भरमसाट भाडे आकारून लुटतात. तसेच खासगी वाहने घेऊन येणा-यांना विमानतळावर पार्किंगसाठी ६० ते १०० रुपये मोजावे लागतात. त्यामुळे थेट विमानतळाच्या प्रवेशद्वारापासून टॅक्सी-रिक्षांप्रमाणे बेस्टची सेवा सुरू झाल्यास त्याचा फायदा प्रवाशांना होईल. विमानातून उतरलेले प्रवासी विमानतळाच्या तळमजल्यावरून बाहेर येतात. त्यांना पुन्हा दुसरे विमान पकडायचे असल्यास पहिल्या मजल्यावर जावे लागते. त्यासाठी त्यांना खासगी बस, रिक्षा-टॅक्सींचा आधार घ्यावा लागतो. बेस्टची सेवा सुरू झाल्यास प्रवाशांना त्याचा मोठा लाभ मिळेल.

बेस्टची विमानतळ परिसरात आणि नजीकच्या रेल्वे स्थानकांपर्यंत सेवा सुरू करण्याची योजना आहे. शिवाय वातानुकूलित बससेवा सुरू करण्याची तयारी आहे. त्यासाठी स्वतंत्र पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी बेस्टने 'एमआयएएल'कडे केली. मात्र, प्राधिकरणाने त्यासाठी बेस्टकडे वेगळे भाडे मागितले असल्याचे समजते. या मुद्दय़ावर बेस्ट आणि प्राधिकरणामध्ये अजूनही निर्णय झालेला नाही. त्यामुळे गेल्या काही महिन्यापासून बेस्टचा हा प्रस्ताव 'एमआयएएल'कडे पडून आहे. याबाबत माहिती देण्यास 'एमआयएएल'कडून टाळले जात आहे.

रिक्षा-टॅक्सीला 'बेस्ट' पर्याय
सध्या बेस्टचे थांबे विमानतळापासून लांब असल्याने प्रवाशांना तिथे जाणे शक्य होत नाही. त्यामुळे ते रिक्षा-टॅक्सींचा आधार घेऊन ते विमानतळाच्या प्रवेशद्वारापर्यंत जातात. दरम्यान, विमानतळ परिसरात बेस्टला जागा मिळाल्यास बससेवा सुरू केली जाईल. विमानतळापासून नजीकच्या रेल्वे स्थानकांपर्यंत बससेवा सुरू करण्याचा बेस्टचा विचार आहे.

Read More »

युपीए सरकारची नऊ वर्षे पूर्ण

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी युपीए सरकारची नऊ वर्षे तर युपीए २ ची चार वर्षे बुधवारी यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत.

नवी दिल्ली – पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी युपीए सरकारची नऊ वर्षे तर युपीए २ ची चार वर्षे यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग हे बुधवारी युपीए सरकारच्या या नऊ वर्षांतील कार्यकालाचे प्रगती पुस्तक सादर करणार आहेत.

नऊ वर्षांपूर्वी २००४ मध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी २२ मे याच दिवशी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. तर २००९ मध्येही याच दिवशी दुस-यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती.

Read More »

'फाम'चा बंद तूर्तास मागे

राज्यातील व्यापा-यांनी सोमवारी बंद मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतरही बंदवर ठाम राहणा-या फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (फाम) या संघटनेने मंगळवारी तूर्तास बंद मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई – राज्यातील व्यापा-यांनी सोमवारी बंद मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतरही बंदवर ठाम राहणा-या फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (फाम) या संघटनेने मंगळवारी तूर्तास बंद मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार २४ मे रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करणार आहेत. या चर्चेत सकारात्मक निर्णय झाला नाही, तर २४ मेपासून पुन्हा बंद पुकारू, असा इशाराही 'फाम'चे मोहन गुरनानी यांनी दिला.

सरकार राज्यातील इतर व्यापा-यांना परस्पर बोलावून सामंजस्याचा आव आणत आंदोलनात फूट पाडत असल्याचा आरोप 'फाम'च्या प्रवक्ते विनेश मेहता यांनी केला. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांमधून फामला पाठिंबा असल्याचे दावा करणा-या गुरनानी यांनी गेले काही दिवस फुटीच्या बातम्यांवर मौन बाळगले होते. आता त्यांना केवळ होलसेल व्यापाऱ्यांचाच पाठिंबा आहे. व्यापा-यांच्या मागण्यांची गरज लक्षात घेऊन सरकारने निर्णय घेतल्यास व्यापा-यांकडून बंदला कायमस्वरूपी स्थगिती मिळेल, अशी स्पष्टोक्तीही फामकडून करण्यात आली. दरम्यान, 'फाम'ने गुरुवारी 'एलबीटी' प्रतिबंधित २५ महापालिका व नगरपालिकांची बैठक बोलावली आहे. त्यात 'बंद'बाबत पुढील निर्णयाची चर्चा होईल.

Read More »

दूध महागणार?

अमूल पाठोपाठ राज्यातील सर्व ब्रॅण्डच्या दूध दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

मुंबई – अमूल पाठोपाठ राज्यातील सर्व ब्रॅण्डच्या दूध दरात वाढ होण्याची शक्यता आहे. बुधवारी होणा-या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. गायीच्या दुधामागे प्रतिलिटर दोन रुपये तर म्हशीच्या दूधामागे प्रतिलिटर चार रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थिती, चा-याची कमतरता, पशुखाद्यातील दरवाढ, डिझेल व मजुरीच्या वाढत्या दरामुळे दूध खरेदी दरात वाढ देण्याची मागणी शेतक-यांकरुन करण्यात येत होती. याबाबत अलीकडेच राज्य सहकारी दूध संघ कृती समितीच्या बैठकीत दरवाढीचा ठराव एकमताने मंजूर केला होता.

Read More »

औषध कंपन्यांची अडवणूक करणा-यांना 'एफडीए'चा दणका

एखादे औषध बाजारात विक्रीसाठी आणायचे असल्यास ठराविक रक्कम दिली पाहिजे, अन्यथा औषध दुकानांमध्ये विक्री होऊ देणार नाही, अशा प्रकारच्या धमक्या देणा-या औषध विक्रेत्या संघटना, विक्रेते आणि कंपन्याविरोधात आता अन्न व औषध प्रशासन विभाग कारवाई करणार आहे.
मुंबई – एखादे औषध बाजारात विक्रीसाठी आणायचे असल्यास ठराविक रक्कम दिली पाहिजे, अन्यथा औषध दुकानांमध्ये विक्री होऊ देणार नाही, अशा प्रकारच्या धमक्या देणा-या औषध विक्रेत्या संघटना, विक्रेते आणि कंपन्याविरोधात आता अन्न व औषध प्रशासन विभाग कारवाई करणार आहे. अशा प्रकारची अडवणूक करणा-या एका संघटनेला सुमारे ४७ लाख रुपयांचा दंड करण्यात आला होता. तर घाऊक विक्रेत्यांना औषध विक्रीस नाकारणा-या चार जणांविरोधातगुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

राज्यात औषध किंमत नियंत्रण आदेश १९९५ च्या परिच्छेद ९८च्या अंमलबजावणीनुसार, औषध विक्री क्षेत्रातील मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी आता अन्न व औषध प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. औषध ही जीवनावश्यक वस्तू म्हणून अधिसूचित आहे. त्यानुसार औषधांची निर्मिती आणि विक्रीमध्ये अडथळे येऊ नयेत, याची खबरदारी घेतली जाते. गेल्या काही वर्षापासून काही औषध विक्रेते संघटना या बेकायदा मक्तेदारी करत आहेत. एखादे नवीन औषध बाजारात आल्यास त्याच्या विक्रीपासून नवीन एजन्सी ठरवण्यापर्यंतचे काम काही संघटना हे संबधित कंपन्यांशी करार करून करत आहेत.

मक्तेदारी कायम ठेवण्यासाठी काही ठराविक लोकांनाच ना हरकत प्रमाणपत्र देत आहेत. त्याचा परिणाम औषध वितरणावर होत असल्याच्या तक्रारी अन्न व औषध प्रशासनाकडे आल्या होत्या. याची दखल घेऊन मागील वर्षी अन्न व औषध प्रशासनाने एक परिपत्रक काढले होते. त्यानुसार, जे औषधनिर्माते, विक्रेते हे विरोधी भूमिका घेत असल्यास त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. नुकतीच/फ 'कॉम्पेटिशन कमिशन ऑफ इंडिया'ने औषध विक्रेत्या संघटनांविरोधात कारवाई करून ४७ लाख रुपयांचा दंड आकारला होता. यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असे कृत्य करणा-यांविरोधात कारवाई केली जाईल, असे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त महेश झगडे यांनी सांगितले. ग्लेनमार्क फार्मास्टयुटिकल, मे. युनिकेम लॅबोरेटरीज, मे. एफडिसी लिमिटेड या कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जादा किमतीने औषध विक्रीप्रकरणी दोन कोटींचा दंड वसूल
राज्यात कित्येक दुकानांमध्ये औषध हे छापील किमतीपेक्षा अधिक किमतीत विकले जात होते. अशा विक्रेत्यांवर प्रशासनाने कारवाई करून सुमारे दोन कोटी रुपयांचा दंड वसूल केला. दंडाची ही रक्कम फार्मा प्राईस फंडमध्ये जमा करण्यात आली. मुदत संपलेल्या सौंदर्य प्रसाधनांची विक्री केल्याप्रकरणी २० दुकानांतून सुमारे आठ लाख रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला. तसेच परदेशात आयात होणा-या महागडय़ा लेन्सप्रकरणी चार लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

Read More »

राज्यातील ३७६४ औषध दुकाने औषधतज्ज्ञांविना

राज्यातील सुमारे ३७६४ दुकानांमध्ये औषधतज्ज्ञच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुंबई – औषधांच्या दुकानांमध्ये नियमानुसार औषधतज्ज्ञ (फार्मासिस्ट) असणे बंधनकारक आहे. मात्र, राज्यातील सुमारे ३७६४ दुकानांमध्ये औषधतज्ज्ञच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाई सुरू केली आहे. तरीही या नियमाला धाब्यावर बसवून औषध विक्रेते कारवाईला जुमानत नाहीत. त्यामुळे आता औषधतज्ज्ञ नसणा-या दुकानांमधून औषधांची खरेदी करू नये, असे फलक लावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

औषधतज्ज्ञ उपलब्ध होत नसल्याचे कारण पुढे करून कित्येक औषध विक्रेते हे नियम पाळत नाहीत. अशांच्या विरोधात आता एफडीएने कडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. औषधतज्ज्ञ नसल्यामुळे चुकीची औषध दिली गेल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. राज्यात सुमारे ५०१२३ औषधांची दुकाने आहेत. त्यांची एफडीएने तपासणी केली होती. त्यानुसार, राज्यात ३७६४ दुकानामध्ये औषधतज्ज्ञ नसल्याची बाब उघड झाली आहे.

त्यांपैकी ११६७ औषधतज्ज्ञांचे एक महिन्यासाठी परवाना रद्द करण्यात आला आहे, तर ५४५ औषधांच्या दुकानांचे परवाने ठराविक कालावधीसाठी रद्द करण्यात आले असून, चार जणांच्या विरोधात खटले दाखल करण्यात आल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त महेश झगडे यांनी सांगितले. एवढच नव्हे तर औषधतज्ज्ञ नसलेल्या औषध दुकानांवरील कारवाईनंतर २३८४ जणांनी आणि ६२१ घाऊक विक्रेत्यांनीही परवाने जमा केले आहेत. तसेच कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी प्रशासनातील अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे ग्राहकांनी औषधतज्ज्ञ नसलेल्या दुकानांतून औषधे खरेदी करू नयेत, असे फलक प्रशासनाकडून औषध दुकानांबाहेर लावण्यात येणार आहेत.

Read More »

सहा वर्षानंतर पतीला मिळाले हक्काचे घर

पतीच्या छळामुळे पत्नी घर सोडून गेल्याच्या घटना नेहमीच घडतात. पण पत्नी आणि तिच्या नातेवाइकांच्या छळामुळे घर सोडावे लागलेल्या पतीने तब्बल सहा वर्षे हॉटेलमध्ये दिवस काढले.
मुंबई – पतीच्या छळामुळे पत्नी घर सोडून गेल्याच्या घटना नेहमीच घडतात. पण पत्नी आणि तिच्या नातेवाइकांच्या छळामुळे घर सोडावे लागलेल्या पतीने तब्बल सहा वर्षे हॉटेलमध्ये दिवस काढले. घरासाठी त्याने उच्च न्यायालयात दाद मागितली असता न्या. एफ. एम. रईस आणि न्या. व्ही. एम. कानडे यांच्या खंडपीठाने नुकताच त्याच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे आता सहा वर्षानंतर त्याला हक्काचे घर मिळाले आहे.

वांद्रे येथील ७०० चौरस फुटांच्या फ्लॅटमधील एका बेडरूममध्ये पतीने तर दुस-या बेडरूममध्ये पत्नीने राहावे, पत्नीने फ्लॅटच्या 'डुप्लिकेट' चाव्या दोन आठवड्यांत पतीला द्याव्यात, असे निर्देश या वेळी खंडपीठाने दिले. त्याचबरोबर पती आणि पत्नीने परस्परांच्या बेडरूममध्ये जाऊन हस्तक्षेप किंवा अडथळा आणू नये, स्वयंपाकघर आणि सामायिक सुविधांचा दोघांनी वापर करावा, असेही आदेश खंडपीठाने दिल आहेत. या वेळी पत्नीने या आदेशावर स्थगिती अर्ज केला पण खंडपीठाने तो फेटाळला.

वांद्रे येथे राहणा-या पत्नीने आणि तिच्या नातेवाइकांनी पतीचा छळ करून त्याला घर सोडण्यास भाग पाडल्यावर त्याने २२ जुलै २००७ पासून हॉटेलचा आसरा घेतला होता. त्याला घरी परतण्यास मज्जाव केला होता. एकदा त्याने फ्लॅटमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला असता मेव्हण्याने त्याला मारहाण केली होती. यामुळे हॉटेलमध्ये राहण्याशिवाय पर्याय नव्हता, असे पतीने न्यायालयास सांगितले. मात्र, पत्नीने न्यायालयात पतीचे आरोप खोडून काढले. 'माझ्या आईला चांगली नोकरी मिळाल्यापासून मी तिच्या घरी राहत आहे. पतीनेच शारीरिक आणि मानसिक छळ केल्यामुळे मी त्याच्याबरोबर राहू शकत नाही. त्याला घरात राहण्याची परवानगी दिल्यास आणखी गुंता वाढेल,' असे तिने या वेळी खंडपीठाला सांगितले.

पत्नी आणि तिच्या नातेवाइकांच्या छळामुळे पतीने घटस्फोट मागितला होता, पण न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला. विवाहाच्या आधीच पतीने फ्लॅट खरेदी केल्यामुळे, त्याला स्वत:च्या घरात राहण्याची मुभा उच्च न्यायालयाने दिली. 'त्याला त्याच्या घरात राहण्यापासून मनाई करता येणार नाही,' असे मत न्या. रईस आणि न्या. कानडे यांच्या खंडपीठाने नोंदवले. पती-पत्नीमध्ये सलोखा निर्माण करण्याचे बरेच प्रयत्न मध्यस्थाने केले पण त्यातून काहीच मार्ग निघत नसल्याचे खंडपीठाने म्हटले आहे. पतीने पत्नीला दरमहा २० हजार रुपये देखभाल खर्च देण्याचे निर्देश कौटुंबिक न्यायालयाने २१ एप्रिल रोजी दिले होते. त्याला खंडपीठाने स्थगिती दिली.

Read More »

मालेगाव, भिवंडीत'एलबीटी'साठी मुदतवाढ नाही

मालेगाव आणि भिवंडी महापालिकेत 'एलबीटी'ची अंमलबजावणी करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मालेगाव आणि भिवंडीतील व्यापा-यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
मुंबई – मालेगाव आणि भिवंडी महापालिकेत 'एलबीटी'ची अंमलबजावणी करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मालेगाव आणि भिवंडीतील व्यापा-यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

'एलबीटी' लागू करण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी करणारी व्यापा-यांची याचिका उच्च न्यायालयाचे न्या. ए. पी. जोशी आणि न्या. एम. एल. तहलियानी यांच्या खंडपीठापुढे सुनावणीसाठी आली होती. पण त्याला मुदतवाढ देण्यास सरकारी वकिलांनी विरोध केला. यामुळे खंडपीठाने मुदतवाढ देण्यास नकार देत याचिका फेटाळून लावली.

मालेगाव महापालिकेत एक ऑक्टोबर २०१२ पासून 'एलबीटी' लागू होणार होता. पण २७ सप्टेंबर २०१२ रोजी उच्च न्यायालयाने त्यावर स्थगिती आदेश दिला होता. पण त्याची मुदत २१ मे रोजी संपणार होती. त्यामुळे 'एलबीटी' लागू करण्यासाठी मुदतवाढ देण्याची याचिका पुन्हा उच्च न्यायालयात दाखल झाली. मात्र, ती फेटाळण्यात आली.

Read More »

राज्यभरात तापमानवाढ कायम?

राज्यातील अनेक शहरांमधील तापमानाचा पारा सरासरीपेक्षा उंचावला असल्याने नागरिक उन्हाच्या चटक्यांनी हैराण झाले आहेत.
मुंबई – राज्यातील अनेक शहरांमधील तापमानाचा पारा सरासरीपेक्षा उंचावला असल्याने नागरिक उन्हाच्या चटक्यांनी हैराण झाले आहेत. खान्देश-विदर्भासारख्या भागांमध्ये तर तापमानाने उच्चांक गाठला आहे. सोमवारी चंद्रपूर येथे राज्यातील सर्वाधिक ४८.२ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले. दरम्यान, आणखी तीन-चार दिवस पारा चढलेलाच असेल, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले.

राज्यभरात वाढलेल्या तापमानामुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत असताना मुंबईतील तापमान मात्र ३१ ते ३५ अंश सेल्सिअसदरम्यान स्थिर आहे. मुंबईला लाभलेल्या सुमद्रकिना-यांमुळे येथील तापमान स्थिर असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत ढगाळ वातावरण असल्याने मुंबईकरांना आतापासूनच पावसाचे वेध लागले आहेत. परंतु मुंबईत पावसाचे ढग जमा होण्यासाठी जूनचा दुसरा आठवडा उजाडण्याची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र खात्याचे उपमहासंचालक एन. वाय. आपटे यांनी वर्तवली आहे.

साधारणत: केरळमध्ये पाऊस दाखल झाल्यानंतर तो मुंबईत कधी येईल ते ठरते. त्यामुळे आताच त्याबाबत अंदाज व्यक्त करता येणार नाही. अंदमानात दरवर्षी २० मे रोजी येणारा पाऊस यंदा तीन दिवस आधी आल्याने साधारणत: तो एक ते चार जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर अंदाजे १० ते १५ दिवसांत त्याचे मुंबईत आगमन होईल, असेही ते म्हणाले.

Read More »

अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांचे पावसाळ्यापूर्वी स्थलांतर

म्हाडाने नुकत्याच जाहीर केलेल्या १६ अतिधोकादायक इमारतींतील ८८ रहिवाशांना पावसाळ्यापूर्वी स्थलांतरित केले जाणार आहे.
मुंबई – म्हाडाने नुकत्याच जाहीर केलेल्या १६ अतिधोकादायक इमारतींतील ८८ रहिवाशांना पावसाळ्यापूर्वी स्थलांतरित केले जाणार आहे. या धोकादायक उपकर इमारतीत मागील वर्षीच्या नऊ इमारतींचा समावेश करण्यात आला आहे.

अतिधोकादायक इमारतींमध्ये ६८३ रहिवासी आहेत. यातील दोन इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाल्याने त्यातील १४४ रहिवाशांची पर्यायी व्यवस्था विकासक करणार आहेत. बोटावाला चाळ – सी व डी या दोन इमारतींना पुनर्विकासासाठी सरकारने मान्यता दिल्याने यातील १८६ रहिवाशांपैकी १७९ रहिवाशांची पर्यायी व्यवस्था करण्यात आली असून, उर्वरित सात रहिवाशांची विकासकामार्फत पर्यायी व्यवस्था केली जाणार आहे. तसेच १७५ रहिवाशांपैकी ८७ रहिवाशांनी स्वत:च इतरत्र राहण्याची सोय केली आहे. त्यामुळे उर्वरित ८८ रहिवाशांना येत्या पावसाळ्यापूर्वी स्थलांतरित करण्यात येणार आहे.

म्हाडाची १८०० संक्रमण शिबिरे सध्या उपलब्ध आहेत. यातील ४०० गाळे धारावीत आहेत. पुनर्विकासादरम्यान रहिवाशांनी या संक्रमण शिबिरात राहण्याची तयारी दर्शवल्यास त्यांना संक्रमण गाळे उपलब्ध केले जाणार आहेत. येत्या १० ते १२ दिवसांत ८७ रहिवाशांना या धोकादायक इमारतीतून स्थलांतरित करण्याबाबतची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सहमुख्य अधिकारी डॉ. रमेश सुरवाडे यांनी दिली.

Read More »

चिपळुणात कोकण रेल्वेचा आणखी एक प्रताप

गेली वीस वर्षे वाशिष्ठी नदीचे पाणी वापरल्यानंतर येथील कोकण रेल्वे स्थानक प्रशासन आपल्या आवारातील सांडपाणी वाशिष्ठी नदीत सोडत आहे.

चिपळूण – गेली वीस वर्षे वाशिष्ठी नदीचे पाणी वापरल्यानंतर येथील कोकण रेल्वे स्थानक प्रशासन आपल्या आवारातील सांडपाणी वाशिष्ठी नदीत सोडत आहे. हा प्रकार अन्याय निवारण समितीने उघडकीस आणला आहे. याबाबत जिल्हाधिका-यांकडे तक्रार करणार आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी दिली आहे.

माजी सभापती शौकत मुकादम यांनी नुकतीच चिपळूण रेल्वेस्थानकाची पाहणी केली. त्या वेळी रेल्वेस्थानकातील शौचालयाचे दूषित पाणी भुयारी मार्गालगत असलेल्या गटारात सोडले जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हे पाणी वाशिष्ठी नदीला मिळत असल्याने चिपळुणात रोगराई पसरण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच वालोपे हे गाव हागणदारीमुक्त असून रेल्वे प्रशासन मात्र याबाबत बेफिकीरपणा दाखवत आहे.जिल्हाधिकारी राजीव जाधव यांनी संपूर्ण जिल्ह्यात स्वच्छता अभियान राबविले आहे. त्यांच्या आदेशाची पायमल्लीसुद्धा कोकण रेल्वे प्रशासन करीत आहे.रेल्वे स्थानक परिसरात कच-याचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे जिल्हाधिका-यांनी चिपळूण रेल्वेस्थानकाची पाहणी करावी, अशी मागणी मुकादम यांनी केली आहे.

Read More »

दापोलीत 'गाव तेथे मैदान' योजनेला गती

क्रीडा विभागाची तांत्रिक शिक्षणाअंतर्गत असणारी 'गाव तेथे मैदान' या वर्षी दापोली तालुक्यात जवळपास सर्वच ठिकाणी राबवणार आहे.

दापोली – क्रीडा विभागाची तांत्रिक शिक्षणाअंतर्गत असणारी 'गाव तेथे मैदान' या वर्षी दापोली तालुक्यात जवळपास सर्वच ठिकाणी राबवणार आहे. हा निर्णय तहसीलदार कल्पना गोडे, गटविकास अधिकारी डॉ. मनीषा देवगुणे, तालुका क्रीडा अधिकारी चंद्रशेखर शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या ग्रामसेवकांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. 'गाव तेथे मैदान' उभारणीसाठी जागांची माहिती घेऊन तात्काळ प्रस्ताव करण्याच्या सूचना सर्व ग्रामसेवकांना दिल्या आहेत. त्यामुळे योजनेची तालुक्यामध्ये अंमलबजावणी होणार आहे.

ही योजना २००८-०९ या वर्षापासून सुरू आहे. मात्र, दापोली तालुक्यातून या योजनेला सक्षम क्रीडा अधिकारीच नसल्याने ही योजना या तालुक्यात अद्याप यशस्वी होऊ शकलेली नाही. मात्र, अलीकडेच नव्याने रुजू झालेले क्रीडा अधिकारी चंद्रशेखर शिंदे यांनी तालुका प्रशासनाच्या सहकार्याने ही योजना दापोली तालुक्यात यशस्वी करण्याची ग्वाही दिली.

ज्या गावात शाळेची, हायस्कूल अथवा महाविद्यालयाची जागा असेल त्या ठिकाणी उत्तम क्रीडांगण यांचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना संबंधित ग्रामसेवक व ग्रामस्थांना दिल्या आहेत. तसेच याबाबत रखडलेल्या सर्वच बाबींचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

यामध्ये वाकवली, असोंड, नवशी, सारंग, सुकोंडी,आडे, अडखळ,आंजर्ले, करजगाव, साखळोली, पंचनदी, उंबरशेत, पाटपन्हाळे, गव्हे, गुडघे, हर्णे आदी गावांमध्ये क्रीडांगण उभारणीविषयी असलेल्या प्रस्तावावर चर्चा केली. तांत्रिक शिक्षण गुणवत्ता उपक्रमाअंतर्गत असलेल्या क्रीडा विभागाच्या 'गाव तेथे क्रीडांगण' या योजनेतून संबंधित मंजूर प्रस्तावाला क्रीडांगणाची सुसज्जता व क्रीडा साहित्यासाठी निधी दिला जातो. ग्रामीण भागात निर्माण व्हावेत, त्यांच्यातील अंगभूत असलेल्या खेळाडूला वाव मिळावा, यासाठी सरकारकडून 'गाव तेथे मैदान' हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

दापोली तालुक्यात टाळसुरे येथे तालुका क्रीडांगण उभारणीच्या प्रस्तावावरही या वेळी चर्चा करण्यात आली. गटविकास अधिकारी डॉ. देवगुणे, तहसीलदार गोडे यांनी याविषयी शाळांच्या असलेल्या जमिनींचा आढावा घेऊन संबंधित सरपंच यांच्याजवळ संपर्क करून, बैठक घेऊन ही योजना तालुक्यात साकारण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.या वेळी बैठकीला नायब तहसीलदार विनायक जोशी, उपविभागीय अभियंता टी. एस. सब्बुराज, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. शिंदे, लीपिक राजू कांबळे, तालुका क्रीडा मार्गदर्शक सत्यवान दळवी तसेच तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक उपस्थित होते.

Read More »

शाळांच्या फेरमान्यतेचा अहवाल गुलदस्त्यात

शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार राज्यातील सर्व शाळांच्या फेरमान्यतेसाठी प्राथमिक शिक्षण विभागाकडून तयार करण्यात येणारा अहवाल अजूनही गुलदस्त्यात आहे.

मुंबई – शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार राज्यातील सर्व शाळांच्या फेरमान्यतेसाठी प्राथमिक शिक्षण विभागाकडून तयार करण्यात येणारा अहवाल अजूनही गुलदस्त्यात आहे. शाळा सुरू होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी उरला असतानाही फेरमान्यतेचा अहवाल तयार झाला नसल्याने गोंधळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यात सरकारी, अनुदानित आणि खासगी प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि माध्यमिक एकूण एक लाख तीन हजार ६२५ शाळा आहेत. यापैकी मुंबईत एक हजार ३६५ माध्यमिक तर महापालिकेच्या एक हजार १८९ शाळा आहेत. या सर्व शाळांना शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार प्रत्येक तीन वर्षानी नव्याने मान्यता घेणे आवश्यक आहे. या मान्यतेसाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार ठरवण्यात आलेले निकष शाळांनी पूर्ण करणे आवश्यक होते. यासाठी प्रत्येक शाळांनी या निकषांसंदर्भातील आपले प्रस्ताव ३१ मार्चपर्यंत सादर केले आहेत. मात्र, शाळांनी हे प्रस्ताव प्राथमिक शिक्षण विभागाकडे सादर करून दीड महिना उलटला असला तरी याबाबत प्राथमिक शिक्षण मंडळाने अजूनही अहवाल तयार केलेला नाही.

यासोबतच शिक्षण हक्क अधिकार कायद्याची मुख्य जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद आणि शालेय मुंबईतील शिक्षण विभागाकडे या फेरमान्यतेच्या अहवालासंदर्भात अजूनही कोणत्याच प्रकारची माहिती आली नसल्याचेही माहीतगारांनी सांगितले.

राज्यात सध्या ज्या शाळा सुरू आहेत, त्यांना त्या वेळी सर्व निकष पूर्ण केले असल्याने सरकारने त्यांना मान्यता दिली आहे. यामुळे त्या शाळा त्या वेळच्या निकषाप्रमाणे बरोबर होत्या. मात्र, शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे या शाळांवर अधिक निकष लादण्यापूर्वी सरकारने याचा विचार करायला हवा होता. जे अधिकारी या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सोंग घेत आहेत. त्यांना राज्यातील शिक्षण व्यवस्थेबद्दल कोणतेही गांर्भीय नाही. यामुळेच नको त्या जाचक अटी लादल्या गेल्या आहेत. दुसरे असे की, आपल्याकडे मुळातच शिक्षण हक्क कायदा उशीरा लागू झाला असल्याने हे निकष लगेच पूर्ण होतील, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. - रामनाथ मोते, शिक्षक आमदार

राज्यात सरकारकडून कोणत्याही अनुदानित आणि खासगी विनाअनुदानित शाळांना योग्य त्या सुविधा पुरवल्या जात नाहीत. यामुळे त्यांच्याकडून निकष पूर्ण करण्याच्या अपेक्षा करणे हेच चुकीचे आहे. ज्या सरकारी अधिकाऱ्यांनी आता असलेल्या शाळांना मान्यता दिल्या त्यांचीही शिक्षण हक्क कायदा आल्याबरोबर माहिती देण्याची आणि निकष पूर्ण करण्यासाठी सोयी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी होती. ती त्यांनी केली नाही, यामुळेच हा फेरमान्यतेचा प्रश्न उभा राहिला असून, त्याला शिक्षण विभागच जबाबदार आहे.- प्रशांत रेडीज, प्रवक्ते, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ

Read More »

रत्नागिरी तहसीलची ई-सेवा बंद

संगणकीकृत सातबारा उता-यासह अनेक योजना संगणकाच्या एका क्लिकवर उपलब्ध होत असतानाच, गेल्या महिनाभरापासून रत्नागिरी तहसील कार्यालयातील ही सेवा बंद पडली आहे.
रत्नागिरी – संगणकीकृत सातबारा उता-यासह अनेक योजना संगणकाच्या एका क्लिकवर उपलब्ध होत असतानाच, गेल्या महिनाभरापासून रत्नागिरी तहसील कार्यालयातील ही सेवा बंद पडली आहे. संगणकसेवा पुरविणा-या कंपनीला 'पार्ट' उपलब्ध होत नाही त्यामुळे 'सव्‍‌र्हर' डाउन झाला आहे.

रत्नागिरी तहसीलदार कार्यालयातील एक खिडकी योजनेंतर्गत संगणकीकृत सातबारा उतारे व अन्य योजनांचे दाखले दिले जातात. एप्रिल-मे महिन्यामध्ये सुट्टय़ांचा कालावधी असल्याने कोकणवासीय मोठय़ा संख्येने गावी येऊन, अत्यावश्यक दाखले मिळविण्यासाठी अर्ज करीत असतात. मात्र गेल्या २५ दिवसांपासून तहसील कार्यालयातील एक खिडकी योजनेतील संगणकाच्या सव्‍‌र्हरमध्ये बिघाड निर्माण झाला आहे. त्यामुळे ही खिडकीच बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना तहसील कार्यालयातून माघारी परतावे लागत आहे.

संगणकाचा बिघाड झालेला पार्ट पुणे येथे पाठविण्यात आला असल्याचे उत्तर येथील अधिका-यांकडून देण्यात येत आहे. मात्र हा पार्ट कधी येईल याचे कोणतेचे उत्तर अधिका-यांकडे नाही. संगणक देखभाल दुरुस्तीचे काम पाहणा-या कंपनीचे कर्मचारीही याठिकाणी फिरकत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांचे दाखल्याशिवाय कामे रखडली आहेत.

Read More »

रत्नागिरी तालुक्यात २० वाड्या तहानलेल्याच

रत्नागिरी तालुक्यातील तहानलेल्या गावांना 'मे' महिना संपत आला तरी अद्याप पाण्याचा एक थेंबही मिळालेला नाही.
रत्नागिरी – तालुक्यातील तहानलेल्या गावांना 'मे' महिना संपत आला तरी अद्याप पाण्याचा एक थेंबही मिळालेला नाही. सरकारी आदेशांना खासगी पाणी टँकर व्यावसायिकांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्यामुळे एप्रिलमध्ये आदेश होऊन, गावामध्ये टँकर पोहोचलेला नाही. रत्नागिरी तालुक्यातील सहा गावांमधील २० वाडय़ा अद्यापही पाण्यासाठी भटकत आहेत.

तालुक्यामध्ये गेल्या दीड-दोन महिन्यापासून काही वाडय़ांमधील लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. खानू व पोमेंडी बुद्रुक येथील सात ते आठ वाडय़ांना गेले दोन महिने पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावत आहे. ही आकडेवारी दिवसेंदिवस वाढतच आहे. तालुक्यातील मजगाव, साखरतर, सडामि-या, राई या गावांमध्येही पाणीटंचाईचा प्रश्न काही गावांमध्ये आ वासून उभा राहिला आहे. यामध्ये बौद्धवाडी, चौसोपीवाडी, गावणवाडी, खालचा वठार, मधला वठार, मि-याबंदर या वाडय़ांचा समावेश आहे. पोमेंडी बुद्रुक येथील कारवांचीवाडी, आदिशक्तीनगर, महालक्ष्मीनगर, द्वारकानगर, जोशीवाडी, कांबळेवाडी या वाडय़ांचा समावेश आहे.

यातील वाडय़ांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी गेल्या दीड-दोन महिन्यांपासून केली आहे. काही गावांमध्ये दोन-चार दिवसांपासूनच पाणीटंचाई जाणवत आहे. पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता तहसिलदारांनी काही खासगी टँकर व्यावसायिकांना पाणी पुरवठ्याविषयी पत्र दिले आहे. मात्र सरकारी 'रेट' कमी असल्याने टँकर व्यावसायिकांनी सरकारच्या सूचनेकडेकडे दुर्लक्ष केले आहे.

खासगी टँकर व्यावसायिकांना कंपन्या, बांधकाम व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिकांकडून वारंवार पाण्याची मागणी होत आहे. त्यामुळे व एप्रिल, मे या महिन्यामध्ये पाण्यासाठी चांगला दरही मिळत आहे. त्यामुळे टँकर व्यावसायिक सरकारला कमी दरात टँकर भाड्याने देण्यास नाखूष असतात. त्यातच नेहमीचे ग्राहक तुटतील ही भीतीही या टँकर व्यावसायिकांना असते. त्यामुळे सरकारच्या आदेशाकडे ते ढुंकूनही पाहत नसल्याचा प्रत्यय सध्या रत्नागिरी तहसीलदारांना येत आहे.

सरकारी टँकर नसल्यामुळे पाणीपुरवठय़ाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने टँकर मंजूर केला एवढीच खुशी ग्रामस्थांच्या चेह-यावर असून, टँकरची वाट पाहत पाण्यासाठीची भटकंती मात्र अद्याप सुटलेली नाही. दोन-चार किलोमीटरवरून आजही ग्रामस्थ पाणी आणत असल्याचे चित्र आहे.

Read More »

कोकणवासीयांना लागले परतीचे वेध

मे महिन्याच्या हंगामात कोकणात आंबे, फणस व रानमेव्याची चव चाखण्यासाठी आलेल्या कोकणवासीयांना आता परतीचे वेध लागले आहेत.
रत्नागिरी – मे महिन्याच्या हंगामात कोकणात आंबे, फणस व रानमेव्याची चव चाखण्यासाठी आलेल्या कोकणवासीयांना आता परतीचे वेध लागले आहेत. त्यामुळे कोकण रेल्वे, राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस, खासगी बस यांना प्रचंड गर्दी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

मे महिना म्हणजे सुट्टीचा आणि पर्यटनाचा महिना म्हणून ओळखला जातो. त्यामुळे कोकणवासीयांना कोकणात येणे अधिक पसंत केले जाते. तसेच पर्यटकांचीही मे महिन्यात कोकणामध्ये खूप गर्दी झालेली असते. कोकणातील आंबे, फणस खाणे, रानमेव्याची चव चाखणे, समुद्र व नदीच्या पाण्यातून मनसोक्त पोहण्यामध्ये कोकणवासीयांना समाधान वाटते.

शहरातील धकाधकीच्या जीवनातून काही दिवस विसावा म्हणून शांतता व मनासारखा उन्हाळा कोकणवासीयांना कोकणामध्ये घालवता येतो. कोकणची मजा काही औरच असते. त्यामुळे कोकणातील आनंदाचे व मौजमजेचे दिवस संपवून कोकणवासीयांना तसेच पर्यटक आता मुंबई, पुणे शहरांकडे परतु लागले आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. कोकणवासीयांना परतताना आपल्याबरोबर आंबे, फणस घेऊन जात असल्याने असंख्य ठिकाणी आंबा, फणस विक्री करण्यासाठी स्टॉल लावण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांच्या परीक्षा आटोपून चार-आठ दिवसांसाठी कोकणवासीय गावाला आले. आता मे महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात चाकरमानी परतीला लागले आहेत. येथील मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली असून, यामध्ये मुंबईकडे जाणा-या वाहनांची संख्या अधिक आहे. जिल्ह्यातील एसटी आगाराने प्रवाशांच्या सोयीसाठी जादा गाडय़ांची व्यवस्था केली असून, या गाडय़ा हाउसफुल्ल झाल्या आहेत. सर्व आगारातून मुंबई, बोरिवली, ठाणे, पुणे या मार्गावर जादा गाडय़ा सोडण्यात आल्या आहेत. या सर्व गाडय़ा फुल्ल भरून जात आहेत.

कोकण रेल्वे गाडय़ांनाही गर्दी असल्यामुळे मुंबईकर कोकणवासीयांना गर्दीतूनच प्रवास करावा लागत आहे. आपला प्रवास सुखकर व्हावा यासाठी मुंबईकर व गावाकडील मंडळींनी आरक्षण करून घेतले आहे. तरीही हजारो प्रवासी गर्दीमुळे प्रतीक्षा यादीवर आहेत. त्यामुळे कोकणवासीयांना प्रवासासाठी त्रास होत आहे. सुट्टीच्या हंगामामुळे रेल्वे प्रशासनाने या मार्गावर जादा गाड्या सोडलेल्या असतानासुद्धा रेल्वेला गर्दी वाढत आहे.

राजापूर आगार सज्ज
आगारात आता परतीच्या प्रवासासाठी प्रवाशांची गर्दी होऊ लागली असून, प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई व बोरिवली मार्गावर जादा गाड्या सोडण्यात येत आहेत. भू, आडिवरे येथून मागणीप्रमाणे जादा गाडय़ाही सोडण्यात येत आहेत.

राजापूर आगारातून बोरिवली, नालासोपारा, मुंबई मार्गावर यापूर्वीच जादा गाडय़ा सुरू केल्या आहेत. तर पाचल, ताम्हाणे, भू या परिसरातूनही जादा गाडय़ा सोडण्यात आल्या आहेत. नियमित गाडय़ांचे आरक्षण फुल्ल होत असल्याने प्रवशांसाठी आता खास जादा गाडय़ा सोडण्यात येत आहेत. याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. भू व आडीवरे भागातूनही बोरिवली व मुंबई गाडय़ांसाठी प्रवाशांकडून मागणी येत असून येथे प्रवाशांच्या मागणीप्रमाणे जादा गाडय़ा सोडल्या जात आहेत. आता २२ ते २५ मेपासून परतीच्या प्रवासासाठी प्रवाशांची मोठय़ा प्रमाणावर होणारी गर्दी असते. त्यामुळे आगाराने योग्य ते नियोजन केले आहे. जादा बोरिवली व मुंबई गाड्यांबरोबरच ग्रामीण भागातून प्रवाशांची मागणी आल्यास जादा गाडय़ा सोडल्या जाणार आहेत. प्रवाशांनी एसटीच्या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आगारप्रमुख पी. जी. ढावरे यांनी केले आहे.

Read More »

मुंब्य्रात १०६ कोटींची वीजबिल थकबाकी

भारनियमनातून मुक्त करण्याचे शरद पवार यांनी अश्वासन दिले.

 ठाणे - वीजचोरीच्या आणि थकबाकीच्या चुका दुरुस्त करण्यास मुंब्यातील नागरिक तयार असतील, तर त्यांना भारनियमनातून मुक्त करण्यासाठी सरकारकडे शिफारस करेन, असे आश्वासन केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहे. मात्र गेल्या वर्षापासून १०६.८ कोटींची वीजबिल थकबाकी मुंब्रा-शिळ आणि दिवा परिसरातून झालीच नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे ही थकबाकी वसूल करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींना महावितरणाला मदत करावीच लागेल, असा सूर आहे.

मुंब्रा, शिळ आणि दिवा परिसरात महावितरणचे १ लाख ११ हजार ३६२ ग्राहक आहेत. या परिसरात महावितरणला वीजपुरवठा करण्यासाठी प्रति युनिट ५ रुपये २० पैसे खर्च येतो. पण २०११-१२ या वर्षात प्रति युनिट या परिसरातून महावितरणला १ रुपया १३ पैसे मिळायचे. २०१२-१३ मध्ये प्रति युनिट २ रुपये ३३ पैसे मिळत आहेत. मुंब्रा-शिळ आणि दिवा परिसर ठाणे-३ या विभागात मोडतो. महावितरणने वीजवितरण हानी कमी करण्यासाठी तसेच वीजबिलाची वसुली वाढवण्यासाठी २०१२-१३ या आर्थिक वर्षात विशेष मोहीम राबवली. २०१२-१३ मध्ये ठाणे-३ विभागात २,११६ ग्राहकांवर वीज कायदा २००३च्या कलमांतर्गत कार्यवाही करण्यात आली.

या ग्राहकांना २६७.३ लाख रुपयांची बिले देण्यात आली आणि त्यांच्याकडून ७६.१ लाख रुपयांची वसुली करण्यात आली. नवीन वीज ग्राहकांना वीजपुरवठा देण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. त्यामुळे २५,४३९ ग्राहकांना वीजपुरवठा झाला. वीजबिलाच्या दुरुस्तीसाठी मुंब्रा व शिळ उपविभागांतर्गत विशेष शिबिरे घेण्यात येत आहेत. थकबाकीदार ग्राहकांच्या वीजबिल वसुलीसाठी भांडुप नागरी परिमंडळातील इतर विभागांतील अभियंते आणि कर्मचा-यांना ठाणे-३ विभागात प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आलेले आहे. ग्राहकांना वीजबिलाचा भरणा सोयीचा करण्यासाठी ४ एटीपी केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. ग्राहकांना नियमित व मीटर वाचनाप्रमाणे वीजबिल देण्यासाठी स्पीड फोटो बिलिंग योजना महावितरणकडून सुरू करण्यात आली.

ठाणे-३ विभागात करण्यात आलेल्या कार्यवाहीमुळे लघुदाब वितरण हानी मागील वर्षीच्या ५१.६ टक्क्यांवरून ४८.३ टक्क्यांपर्यंत आली आहे. २०१२-१३ या वर्षात बिलाच्या तुलनेत वसुलीचे प्रमाण ५८ टक्के आहे. जानेवारी ते मार्च २०१३ या तीन महिन्यांत वीज वितरण हानी ५९ टक्के तसेच वीजबिलाच्या तुलनेत वसुलीचे प्रमाण ८५ टक्के होते. जानेवारी ते मार्च २०१३चे डीसीएल (वीज वितरण व वाणिज्य हानी) ६५ टक्के आहे. ठाणे-३ विभागांत या हानीमुळे ७ तासांचे भारनियमन करण्यात येते.

या विभागास भारनियमनमुक्त करण्यासाठी लघुदाब वीज वितरण हानी ४० टक्क्यांपर्यंत कमी करणे तसेच मासिक वसुली १० कोटींच्या पुढे करण्याचे उद्दिष्टय महावितरणने ठेवले आहे. मात्र मागील एक वर्षात १०६.२ कोटींची वीजबिल थकबाकी आहे. ही वसूल करणे महावितरणसमोर मोठे आव्हान आहे. ही थकबाकी जोपर्यंत मुंब्रा-शिळ आणि दिवा परिसरातून होत नाही, तोपर्यंत हा परिसर भारनियमनमुक्त होणे सध्या तरी अशक्यप्राय आहे. 

Read More »

'बीएसयूपी' योजनेत समावेश करण्याची मागणी

अण्णाभाऊ साठे नगरमधील रहिवाशांना 'नागरी घरकुल योजने'(बीएसयूपी)मध्ये समाविष्ट करून त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे या मागणीसाठी अखिल भारतीय मातंग  संघाने मोर्चा काढला होता.

कल्याण - येथील अण्णाभाऊ साठे नगरमधील रहिवाशांना 'नागरी घरकुल योजने'(बीएसयूपी)मध्ये समाविष्ट करून त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय मातंग संघाच्या वतीने नुकताच केडीएमसीवर मोर्चा काढण्यात आला होता.

अण्णाभाऊ साठे नगरातील रहिवाशांना पालिका प्रशासनाने आधारवाडी येथील डंपिंग ग्राउंडमागील बाजूस स्थलांतरीत केले. त्या वेळी एकूण १७२ घरांचा सव्र्हे करून या रहिवाशांचे बीएसयूपी प्रकल्पात पुनर्वसन करण्यात येईल, असे आश्वासन पालिका प्रशासनाने दिले होते. मात्र आठ वर्षे उलटूनही घरे मिळाली नसल्याने संतप्त रहिवाशांनी पालिका मुख्यालयावर मोर्चा काढला.

या वेळी पालिका आयुक्त रामनाथ सोनावणे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करून पालिका प्रशासनाच्या ढिम्म कारभाराचा निषेध करण्यात आला. बीएसयूपी योजनेत समाविष्ट करण्यात यावे, याबरोबरच अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभारण्यात यावा, पालिकेत कंत्राटी पद्धतीवर मातंग समाजाच्या तरुणांची भरती करण्यात यावी इत्यादी मागण्याही करण्यात आल्या. मात्र पोलिसांनी हा मोर्चा पालिकेच्या प्रवेशद्वाराबोहरच अडवून धरला.

मोर्चाच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता रवींद्र पुराणिक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. गेल्या काही महिन्यांपूर्वी मातंग समाजाने पालिकेबाहेर उपोषणही छेडले होते. त्या वेळी पालिको प्रशासनाने मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रशासनाकडून केवळ आश्वासनेच दिली जात असल्याने आंदोलन अधिकच तीव्र करणार असल्याचे संघाच्या वतीने सांगण्यात आले. या मोर्चात रतन चव्हाण, काका गवळी, सुखदेव तुपसौदर, चक्रधर घुले, गणेश सोनावणे यांच्यासह शेकडो महिला व पुरुष सहभागी झाले होते.

Read More »

दुष्काळग्रस्तांच्या दारात मदतीची गंगा

ठाण्यातील काही कॉलेज युवक 'पाण्याचे टँकर' घेऊन दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावून गेले आहेत.

ठाणे - प्रार्थनेसाठी जोडलेल्या हजार हातांपेक्षा दोन हातांनी केलेली टिचभर मदत अधिक मोलाची असते, या सुविचाराचा प्रत्यय ठाण्यातील काही कॉलेज युवकांनी आणून दिला आहे. महाराष्ट्राच्या कित्येक खेडयात दुष्काळ आहे. घागरभर पाण्यासाठी कित्येक मैलांची पायपीट करावी लागत आहे. शहरात मात्र नळाला धो-धो पाणी आहे. त्यामुळे शहरवासीयांना दुष्काळाची धग जाणवत नाही. हे ओळखूनच ठाण्यातील काही कॉलेज युवक 'पाण्याचे टँकर' घेऊन दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावून गेले आहेत.

ओनिल कुलकर्णी, सौरभ मंगरुळे, अक्षय हेगडे, मयुर जोशी, हिमांशू कोळी, कुश कोडे, सुप्रिया शिवांकर, निकिता धर्माधिकारी, ज्योती बोराडे आणि कमलेश सावळ या ठाण्यातील जोशी-बेडकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना वर्तमानपत्रांतून दुष्काळाबद्दल येणा-या बातम्या नेहमीच अस्वस्थ करत होत्या. सरकारी यंत्रणा सर्वच ठिकाणी पोहोचू शकत नाही, हेही त्यांना त्यातून उमजत होते. त्यामुळे स्वत:च दुष्काळग्रस्त भागात टँकर घेऊन जाण्याची मोहीम या विद्यार्थ्यांनी आखली. त्यासाठी ते सुट्टीच्या काळातील सामाजिक कार्यकर्ता शिबिरास उपस्थित राहिले.

काही दुष्काळग्रस्त गांवाना भेटी दिल्या. सरकार आपल्या पद्धतीने काम करत आहे, परंतु आम्हाला आमच्या वैयक्तिक पातळीवर त्यांचे दु:ख कमी करण्यासाठी काय करता येईल, याबाबतचा विचार करत असतानाच पाण्याचे टँकर सरळ या दुष्काळग्रस्तांच्या दारातच नेण्याचे आम्ही ठरवल्याचे ओनिलने सांगितले. ओनिल हा जोशी-बेडकरमध्ये पॉलिटेक्निकचा विद्यार्थी आहे.

सर्वप्रथम आपल्याजवळचा पॉकेटमनी त्यांनी या कामासाठी वापरला आणि एकूण १२ टँकर टप्प्याटप्प्याने दुष्काळग्रस्त भागात घेऊन जाण्याचे या विद्यार्थ्यांनी निश्चित केले. टँकरमालकाला सत्य परिस्थिती सांगितल्यानंतर त्यानेही सवलतीच्या दरात पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले. साधारण २ हजार रुपयांच्या आसपास पडणारा टँकर १२०० रुपयांत उपलब्ध झाला. यात ८०० रुपयांची बचत झाली. मागील आठवडयात सौरभ आणि त्याच्या मित्रांनी औरंगाबाद-अजंनडोह गावात टँकर नेऊन गावाला पाणी दिले. प्रत्येक आठवडयाला तीन याप्रमाणे संपूर्ण महिनाभर ते १२ टँकर पुरवणार आहेत.

कसारा जवळच्या आटगाव परिसरातील गावांनाही हे विद्यार्थी पाणी देणार आहेत. या कामासाठी त्यांनी दोन गट स्थापन केले आहेत. टँकरसाठी लागणारी रक्कम हे विद्यार्थी आपले मित्रमैत्रिणी, नातेवाइक व पालकांच्या मदतीने उभी करत असून, पावसाळा सुरू होईपर्यंत ही मोहीम अशीच सुरू राहणार आहे.

Read More »

आमदार धस पोलिसांना शरण

स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या पाटोदा शाखेत गोंधळ घालून फर्निचरची मोडतोड आणि मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आ. सुरेश धस सोमवारी रात्री पोलिसांना शरण आले.
बीड – स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या पाटोदा शाखेत गोंधळ घालून फर्निचरची मोडतोड आणि मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आ. सुरेश धस सोमवारी रात्री पोलिसांना शरण आले. न्यायालयाने आ. धस यांच्यासह १५ जणांचा जामीन नाकारून न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. धस यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी मंगळवारी आष्टी-पाटोदा-शिरूरमध्ये बंद पाळण्यात आला.

पाटोदा तालुक्यातील शेतक-यांना तलावातील गाळ काढून शेतात टाकण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेकडून कर्जपुरवठा करण्याची मागणी जिल्हा-प्रशासनाच्या बैठकीत झाली होती. त्यानंतर कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण झाल्याने शेतक-यांनी ही बाब आमदार धस यांच्या निदर्शनास आणून दिली. १६ मे रोजी आमदार धस यांनी स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या अधिका-यांशी चर्चा केली. जाचक अटीमुळे कर्ज मिळत नसल्याने शेतक-यांनी संताप व्यक्त करत फर्निचरची तोडफोड केली. शाखाधिकारी बन्सीधर थिगळे यांनी पाटोदा पोलिसांत फिर्याद दिली असून, या प्रकरणी पोलिसांनी यापूर्वीच सात जणांना अटक केली होती. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत सोमवारी संपली. त्यामुळे आ. सुरेश धस, जिल्हा परिषद अध्यक्ष सय्यद अब्दुल यांच्यासह १५ जणांना पोलिसांसमोर शरण जावे लागले. सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश बी. बी. शेळके यांनी जामीन फेटाळून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. आमदार धस यांनी तुरुंगात उपोषण सुरू केले आहे.

Read More »

कोकणी रानमेव्याला कोकणवासीयांची पसंती

आंबा फळाबरोबरच फणस, जांभूळ, करवंद या अस्सल कोकणी मेव्याची आवक या वर्षी बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात वाढली आहे.
रत्नागिरी – आंबा फळाबरोबरच फणस, जांभूळ, करवंद या अस्सल कोकणी मेव्याची आवक या वर्षी बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. विक्रीसाठी दाखल झालेल्या या मेव्याची परतीच्या प्रवासास लागलेल्या कोकणवासीयांकडून उत्स्फूर्तपणे खरेदी केली जात आहे.

ग्रामीण भागातील महिला सकाळपासून जयस्तंभ, बसस्थानक, गोखलेनाका, धनजीनाका, मच्छीमार्केट व गर्दीच्या ठिकाणी हा मेवा विकताना दिसत आहेत. करवंदांची विक्री पानांपासून बनवलेल्या छोट्या खो-यातून पाच रुपये याप्रमाणे केली जात आहे. जांभळे ६० ते ८० रुपये प्रतिकिलो रुपयांच्या भावाने विकली जात आहेत. विक्रीसाठी कापे आणि रसाळ फणसही दाखल झाले आहेत. ५० ते ९० रुपयांपर्यंतच्या दराने त्यांची खरेदी केली जात आहे. कोकणी मेव्याच्या खरेदीसाठी पर्यटकांच्याही उडय़ा पडत आहेत.

या वर्षी आंबापीक कमी आले आहे. रायवळ आंब्याचे पीक अत्यल्प असल्याने या वर्षी बाजारपेठेत हापूस आंब्याला त्याचा फायदा झाला आहे. यामुळे हापूस आंब्याला असलेली मागणी वाढली आहे. बाजारपेठेत हापूस आंब्याचा डझनाचा दर १८० ते २५० रुपये असा आहे. त्याचप्रमाणे प्रतिपेटीचा दर ८०० ते १००० रुपये आहे. तरीही हापूस आंब्याची मागणी आजही वाढतच असल्याने आंबा व्यापा-यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोकणी मेव्याबरोबरच कोकणवासीयांची पावले 'सुक्या म्हावऱ्या'कडेही वळत आहेत. कोकणातील माणसाचे मुख्य अन्न भात व मासे हेच आहे. मुंबई, पुण्यात जाऊनही कोकणवासी 'फास्ट फूड'च्या जगात माशांना विसरलेले नाहीत. त्यामुळे परतीच्या प्रवासाला लागताना त्यांच्याबरोबरची एक पिशवी सुक्या मासळीने भरलेली असते. मच्छीमार्केट व बंदर परिसरात सुक्या मासळीची उलाढालही मोठय़ा प्रमाणात होताना दिसत आहे. येथे उपलब्ध असलेला खारा बांगडा १० ते १५ रुपये प्रतिनग, कोलीम १५० ते २०० रुपये किलो, काड २०० रुपये किलो, सुके बोंबील १५० ते २०० रुपये शेकडा याप्रमाणे सुक्या मासळीची विक्री होत आहे. रानमेव्याला कोकणवासीयांकडून असलेली मागणी लक्षात घेऊन विक्रेते आगारांमध्येही थांबलेल्या गाडय़ांमध्ये विक्री करत आहेत.

Read More »

मोडकाघर धरण दुरुस्तीवरील खर्च पाण्यात

मोडकाघर  धरणाच्या भिंतीच्या आत साठलेला मातीचा गाळ उपसून धरणातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी राज्य सरकारच्या लघु पाटबंधारे विभागाने कंत्राटदाराची नेमणूक करून गेल्या दोन-अडीच वर्षात ९५ लाख रुपये खर्च केले. परंतु हा सर्व पैसा पाण्यात गेल्यासारखा आहे.


गुहागर – तालुक्यातील गुहागर नगरपंचायतीला व परिसरातील अन्य ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करण्यासाठी उपयोगात आणलेल्या मोडकाघर धरणाच्या भिंतीमधून सुरू झालेली गळती थांबवण्यासाठी तसेच धरणाच्या भिंतीच्या आत साठलेला मातीचा गाळ उपसून धरणातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी राज्य सरकारच्या लघु पाटबंधारे विभागाने कंत्राटदाराची नेमणूक करून गेल्या दोन-अडीच वर्षात ९५ लाख रुपये खर्च केले. परंतु हा सर्व पैसा पाण्यात गेल्यासारखा आहे.

तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेली सध्याची गुहागर नगरपंचायत व त्या बाजूला असलेली अन्य काही गावे ओलिताखाली आणण्याकरिता १९७३ मध्ये सरकारच्या लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने मोडकाघर धरण बांधण्यात आले. या धरणाचे पाणलोट क्षेत्र ११.६५ चौरस किलोमीटर असून २० मीटर उंची असलेल्या या धरणाची साठवण क्षमता ४४.७० लाख घनमीटर इतकी आहे. गेल्या ३७ वर्षात या धरणाच्या डागडुजीवर कोणत्याही प्रकारचा खर्च करण्यात आला नव्हता. धरणाचे गेटवॉल गंजून बंद पडल्याने पाणी बाहेर सोडता येत नव्हते. त्यामुळे धरणाच्या भिंतीवर दाब वाढून त्यातील गळतीचे प्रमाण वाढू लागले.

यासंदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री भास्कर जाधव यांनी तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांच्याकडे या धरणाची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली. त्यानुसार नोव्हेंबर २०१० मध्ये सरकारच्या समितीने दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करून तो सरकारच्या संबंधित खात्याकडे मंजुरीसाठी पाठवला. बदललेल्या निकषानुसार २०१०-११ या आर्थिक वर्षात ९५ लाख रुपयांचा निधी महाराष्ट्र जलसुधारणा प्रकल्पांतर्गत जागतिक बँकेकडून उपलब्ध झाला आहे. चिपळूण येथील सुदीन कन्स्ट्रक्शन यांना हे काम मिळाल्यानंतर या संपूर्ण दुरुस्तीसाठी मार्च २०११ पर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आला.

वर्षभरात पूर्ण होणारे हे काम गेली दोन-अडीच वर्षे संबंधित कंत्राटदाराकडून सुरू होते. हे काम चालू असताना पाण्याची पातळी कमी करावी लागल्याने धरणावर अवलंबून असलेल्या अनेक गावांच्या नळ पाणी योजनेवर काही प्रमाणात परिणाम झाला. संबंधित कंत्राटदाराकडून हे काम निविदेमध्ये ठरल्याप्रमाणे दर्जेदार व ठिकाऊ होण्यासाठी लक्ष ठेवणे अपेक्षित होते. परंतु धरणाची गळती बंद करण्याचे मुख्य काम अद्यापही पूर्ण झालेले नसल्याचे दिसते. अजूनही ही गळती सुरूच आहे. याशिवाय धरणाच्या भिंतीच्या आत इतके वर्ष साठलेला गाळ काढून धरणाच्या पाण्याची पातळी वाढवणे आवश्यक असताना कंत्राटदाराने तो गाळ उपसण्याचा प्रयत्न पूर्णपणे अयशस्वी ठरला. यातच धरणाच्या कामासाठी पाण्यामध्ये मातीचा भराव टाकून तयार केलेली कृत्रिम भिंतही आज तशीच पाण्यामध्ये राहिल्याने धरणाच्या भिंतीच्या आत पूर्वीपेक्षा अधिक मातीचा गाळ पुन्हा साचला आहे.

या गाळामुळे पावसाळ्यात धरणात जमा होणारे पाणी खोली नसल्याने धरणाच्या भिंतीवरून वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या धरणाच्या दुरुस्तीच्या कामावर राज्य सरकारच्या वतीने लाखो रुपये खर्च करण्यात आले असले तरी या धरणाच्या मुख्य भिंतीमधून होत असलेली पाण्याची गळती व भिंतीच्या आतील बाजूला साठलेला मातीचा गाळ संबंधित कंत्राटदाराने काम पूर्ण केल्यानंतरही कायम असल्याने सरकारने खर्च केलेले लाखो रुपये धरणाच्या पाण्यातच गेल्यासारखे आहेत.

Read More »

पुण्यात बंद संपला, बाजारपेठा फुलल्या

राज्य सरकार आणि व्यापारी यांच्यात एलबीटीबाबत यशस्वी चर्चा झाल्याने एलबीटीचा तिढा सुटला.

पुणे – राज्य सरकार आणि व्यापारी यांच्यात एलबीटीबाबत यशस्वी चर्चा झाल्याने एलबीटीचा तिढा सुटला. मंगळवारी तब्बल तेरा दिवसांच्या बेमुदत संपानंतर पुणे, पिंपरी-चिंचवडमधील बाजार पूर्ववत सुरू झाले. अन् पाहता पाहता बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या.

गेल्या तेरा दिवसांपासून बंद असलेल्या दुकानामुळे सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडून पडले होते. ऐन लग्नसराईच्या काळात व्यापा-यांचा बंद असल्याने ज्यांची लग्नाची खरेदी रखडली होती अशा नागरिकांची कपडे व सराफांच्या दुकानात सर्वाधिक गर्दी केल्याचे दिसून आले. बंदमधून दि पूना मर्चंट्स चेंबरने शनिवारी माघार घेतल्याने सोमवारी सुरू झालेल्या मार्केट यार्ड येथील किराणा व भुसार मालाच्या दुकानातही मोठी गर्दी होती. शहरातील व्यापा-यांनी एप्रिल महिन्यात आठ दिवस, तर मे महिन्यातील आठ ते २० मेदरम्यान बाजारपेठा बंद आंदोलन केले. लग्नसराई, अक्षय्य तृतीया, गुरुपुष्यामृतचा मुहूर्त असूनही उत्स्फूर्तपणे बंद पाळला होता. कपडे, सोने-चांदी, इलेक्ट्रॉनिक, टिंबर, किराणा दुकानदार, मिठाई अशा विविध ८० संघटना यात सहभागी झाल्या होत्या. परिणामी, बाजारातील सर्व व्यवहार बंद झाले होते. लग्न बस्ता, टीव्ही, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी अनेकांना शहर हद्दीलगतच्या ग्रामीण भागातील बाजारपेठांचा आसरा घ्यावा लागला होता.

तिढा सुटला, अढी कायम

  कुठल्याही प्रश्नावर पटकन आंदोलन पुकारायचे व जनतेला वेठीला धरायचे, हा अलीकडे काही संघटनांचा शिरस्ता झाला आहे.

Read More »

ठाणे जिल्ह्यात रेती उपसा जोरात

ठाणे जिल्ह्यात रेती उपशावर बंदी असताना चोरट्या पद्धतीने रेती उपसा सुरूच आहे.

ठाणे – ठाणे जिल्ह्यात रेती उपशावर बंदी असताना चोरट्या पद्धतीने रेती उपसा सुरूच आहे. महसूल व ठाणे ग्रामीण पोलिसांचा खिसा गरम होत असल्याने हे उपशा जोरात सुरू आहे. भिवंडीत मोठ्या प्रमाणावर रेती उपशा होत असून, येथील खारबाव, काळू, कामवारी, सूर्यमाळ जवळील नदी, शहापूरजवळील अंबरजेगावालगत रोशा उपनदीत सक्शन पंप, ड्रेझरच्या मदतीने रेती उपसा सुरू आहे.

या परिसरातील रेती उद्योजक महसूल खाते व पोलिसांना आर्थिक रसद पुरवत असल्याने जिल्ह्यातील अनेक भागात अवैध रेती उपसा सुरूच आहे. महसूल खाते व पोलिसांचे हप्तेही बांधले गेल्याने दक्षता विभागाचा छापा पडणार असल्याचे लक्षात येताच रेती व्यावसायिकांना यासंबधीची सूचना दिली जाते. त्यामुळे छापा पडल्यावर हे व्यवहार बंद असतात. रेती व्यावसायिक प्रति ट्रकमागे चार हजार रुपयांचा हप्ता देऊन पोलिसांना 'मॅनेज'करत आहेत. महसूल विभागातील अधिका-यांचे हातही अशाच पद्धतीने ओले केले जात आहेत. पूर्वी रेतीचा एक ट्रक सहा हजारांना मिळायचा. मात्र, आताच हाच ट्रक १८ हजार रुपयांना मिळत आहे.

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या 'जनता दरबारा' जिल्ह्यातील अवैध रेती उपशाबद्दल तक्रारी आल्या होत्या. त्यांनी याची तातडीने दखल घेऊन रेती उपसा थांबवण्याचे आदेश दिले. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांनी कल्याण खाडीतअवैध रेती उपसा होत असल्याची चित्रफीतच दाखवून अधिका-यांना धारेवर धरले होते. त्यानंतरही रेती व्यावसायिकांकडून उपसा थांबलेला नाही.

तक्रार करणा-यालाच घडवला तुरुंगवास
कल्याणमधील दक्ष नागरिक साद खोत यांनी या परिसरातील अनधिकृत रेती उपशाबद्दल अनेक तक्रारी केल्या होत्या. मात्र, काही रेती व्यावसायिकांनी पोलिसांच्या मदतीने त्यांनाच तुरुंगाची हवा खायला लावली. इतकेच नाही तर तुरुंगातही त्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यापर्यंत रेतीमाफियांची मजल गेली आहे.

Read More »

वाड्यातील आखाडा गावात दारूमुक्तीचा 'आदर्श'

दारूच्या थेंबालाही न शिवता सुमारे २२ वर्षापासून 'दारूमुक्ती'ची परंपरा जपणारा वाडा तालुक्यातील आखाडा-वडवली गाव परिसर राज्यातील अनेक गावांसाठी आदर्शच ठरत आहे.
वाडा - दारूच्या थेंबालाही न शिवता सुमारे २२ वर्षापासून 'दारूमुक्ती'ची परंपरा जपणारा वाडा तालुक्यातील आखाडा-वडवली गाव परिसर राज्यातील अनेक गावांसाठी आदर्शच ठरत आहे. शंभर टक्के आदिवासी लोकवस्ती असलेल्या या गावात २३३ कुटुंबे राहत असून, मद्यपानापासून अलिप्त राहण्याचा वसा येथील लोकांनी घेतला आहे.

आखाडा- वडवली गावात वारली जमातीचे लोक राहत असून, अनेक कुटुंबांनी वारकरी संप्रदायाची जपणूक केली आहे. वाडय़ापासून ४० किमी अंतरावर अतिदुर्गम भागात डोंगरकाठी वसलेल्या या गावात स्वातंत्र्याची पासष्ठी उलटूनही वीज, पाणी आदी मुलभूत सुविधांची वानवा आहे. आखाडा गावात ८०, वडवलीत ५५, भगतपाडा येथे ५६, धोडीचा पाडा येथे ३५ आणि बरफपाडय़ातील सात कुटुंबे मिळून सुमारे २३३ कुटुंबे येथे राहत आहेत. मात्र, पाचवीला पुजलेल्या दारिद्रयाने त्यांचा पिच्छा सोडला नसून आजही येथील अनेक गावांतील लोक हालाखीचे जीवन जगत आहेत. गावात अलिकडेच रस्तेकाम झाले आहे. मात्र, या रस्त्याचा बराचसा भाग हा नदीला येणाऱ्या पुराच्या पाण्याखाली जात असल्यानेपावसाळय़ात या गावांचा संपर्क तुटतो. येथील अनेक कुटुंबांकडे शेतजमीन असली तरी अतिअल्प भूधारक गटात मोडणा-या या शेतक-यांना वर्षभर पुरेल एवढेही पीक घेता येत नाही. वर्षभर मोलमजुरीवर कुटुंबाची गुजराण करणारी जवळपास ८० टक्के आहेत. येथील संपूर्ण गाव संघटित असल्याने ग्रामपंचायतीची निवडणूकही बिनविरोध होते. श्रमदानातून विविध उपक्रम राबवणारे या गावला नुकताच 'महात्मा गांधी तंटामुक्त गाव' पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

प्रामुख्याने वारकरी संप्रदायाची जपणूक करणारे या गावातील रहिवासी मंदिर उभारण्यासाठी झटत आहे. त्यांच्यासाठी ओमप्रकाश शर्मा, मदन पाटील (भिवंडी), गोविंद पाटील (कुडूस) आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी मदतीचा हात पुढे केल्याने विठ्ठल रखुमाईचे मंदिर लवकरच आकारास येण्याचा विश्वास व्यक्त होत आहे.

Read More »

कसा-यात ७८० घरांना वनविभागाची नोटिस

मध्य रेल्वेचे शेवटचे टोक असलेल्या मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा गावातील ७०० हून अधिक घरांना शहापूर वनविभागाने अतिक्रमणे हटवण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत.

शहापूर - मध्य रेल्वेचे शेवटचे टोक असलेल्या मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा गावातील ७०० हून अधिक घरांना शहापूर वनविभागाने अतिक्रमणे हटवण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. वनविभागाच्या जागेवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी गावक-यांना अवघ्या २४ तासांची मुदत देण्यात आली असून, ऐन पावसाळ्यात बेघर होण्याच्या भीतीने ते धास्तावले आहेत.

कसारा गावची लोकसंख्या आजघडीला २५ हजारांच्या जवळपास आहे. येथे मर्यादित असलेल्या गावठाणाच्या जमिनीमुळे कसारा गावच्या हद्दीतील वन जमिनीवर सुमारे ७०० ते ८०० झोपड्या व घरे उभारण्यात आली आहेत. गेल्या २५ ते ३० वर्षापासून उभी असलेली ही घरे हटवण्याचे निर्देश वनविभागाने नुकतेच जारी केल्याने शेकडो रहिवाशांपुढे यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. ही अतिक्रमणे संबधितांनी न हटवल्यास ते वनविभागातर्फे ती हटवण्यात येणार आहेत. कसा-यातील वाढती अतिक्रमणे हा वन विभागासाठी गंभीर विषय बनला आहे. या भागात नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार वनखात्याच्या जागेवर अतिक्रमण केलेल्या वसाहतीला रस्ते, वीज, पाणी आदी मुलभूत सोयीबद्दल अडथळ निर्माण केला जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

शहापूर तालुक्यातील २०० हेक्टर वनजमिनीपैकी १८३ हेक्टर क्षेत्रात तात्पुरती भातशेती केली जाते. तर कसारा येथे सुमारे दहा हेक्टर क्षेत्रात ८०० ते ९०० कच्ची व पक्की बांधकाम केलेली घरे उभारण्यात आली आहेत. हा आकडा कागदोपत्री कमी असला तरी त्याच्या कितीतरी पट जागेत घरे अस्तित्वात आहेत. यासंबंधी वनखात्याने १५ सप्टेंबर २००३ रोजी नोटिसा जारी केल्या होत्या. दोन वर्षापूर्वी नव्याने अतिक्रमणे हटवण्यासंबंधी नोटिसा बजावण्यात आल्या. अतिक्रमित घरांवर महसूल विभागाने विशिष्ट दंड आकारून घरे न हटवण्याबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार करण्यासंबंधी वरिष्ठ स्तरावर झालेल्या प्रयत्नांमुळे कसारावासीयांना दिलासा मिळाला होता. शिळफाटा येथे अनधिकृत बांधकाम झालेले इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली असून, डोंगरकाठावर वसलेली अतिक्रमित घरे व झोपडय़ा हटवण्यासाठी नोटिसा जारी केल्या आहेत. सध्या कसा-यात वनविभागाच्या जागेवरील अतिक्रमित बांधकामांना वनविभागातर्फे नोटिसा बजावण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत १०० ते १२५ घरमालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. उर्वरित घरांनाही नोटिसा बजावण्याचे काम सुरू आहे. कसारा गावाच्या विकासात वन विभागाचा अडसर दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीने वेळोवेळी पाठपुरावा केला. वनखात्याने अतिक्रमित व गावासाठी आवश्यक असलेली २८ हेक्टर नऊ गुंठे जागा ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करावी, असा पर्याय संबंधित विभागाला सूचवण्यात आला होता. मात्र, वनखाते व महसूल विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे यासंबंधीचा प्रस्ताव अद्याप पुढे सरकलेला नाही. मुंबई शहर व उपनगर भागातील अनेक अतिक्रमणे नियमित करण्यासाठी सर्वपक्षीयांचा खटाटोप सुरू असताना कसा-यातील सुमारे २५ ते ३० वर्षापूर्वीची घरे कोणत्या नियमाने अतिक्रमित ठरवली जातात, असा सवाल स्थानिक कार्यकर्ते शाम धुमाळ यांनी उपस्थित केला आहे.

सरकारने शहरी भागातील अतिक्रमणांसाठी एक न्याय व ग्रामीण भागातील अतिक्रमणांसाठी दुसरा न्याय करणे दुर्दैवी आहे. एकीकडे ठाणे, मुंब्रा परिसरात अतिक्रमण झालेल्या लोकवस्तीला पर्यायी निवाऱ्याची व्यवस्था होईंपर्यंत अतिक्रमणे हटवण्याची मोहीम थांबवली जाते. तर दुसरीकडे कसाऱ्यात २५ ते ३० वर्षापूर्वीच्या वसाहतीला हटवण्याची नोटिस बजावली जाते. – मंजुषा जाधव, माजी सभापती

Read More »

प्रशिक्षक मॉरिन्यो मोसमाअखेर रेआल माद्रिद सोडणार

प्रशिक्षक जोस मॉरिन्यो या मोसमाअखेर रेआल माद्रिदला सोडचिठ्ठी देणार आहेत. माद्रिदचे अध्यक्ष फ्लोरेंटिनो पेरेझ यांनी ही माहिती दिली.
माद्रिद – प्रशिक्षक जोस मॉरिन्यो या मोसमाअखेर रेआल माद्रिदला सोडचिठ्ठी देणार आहेत. माद्रिदचे अध्यक्ष फ्लोरेंटिनो पेरेझ यांनी ही माहिती दिली.

''मॉरिन्यो हे या मोसमापर्यंत माद्रिदचे प्रशिक्षक असतील. त्यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर क्लब तशा निर्णयाप्रत आला आहे. करार संपुष्टात आणण्याची हीच योग्य वेळ आहे, असे आम्हाला वाटते. माद्रिदचे प्रशिक्षकद भूषवताना दिलेल्या सवरेत्तम योगदानाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत,'' असे पेरेझ यांनी सांगितले. मॉरिन्यो यांना काढून टाकण्यात आल्याच्या वृत्ताचाही पेरेझ यांनी इन्कार केला. ''त्यांना निलंबित करण्यात आलेले नाही. चर्चेनंतर त्यांनी करार संपवला,''असे ते म्हणाले. मॉरिन्यो यांचा उत्तराधिकारी म्हणून अद्याप कुणाच्याही नावाची चर्चा नाही, असे पेरेझ यांनी स्पष्ट केले. मॉरिन्यो यांचा माद्रिदसोबतचा करार २०१६ पर्यंत होता. माद्रिदला रामराम ठोकल्यानंतर मॉरिन्यो पुन्हा एकदा चेल्सीचे प्रशिक्षकपद भूषवतील, अशी दाट शक्यता आहे. २००४ आणि २००७ मध्ये त्यांनी चेल्सीचे प्रशिक्षकपद सांभाळले होते.

Read More »

भारताविरुद्ध खेळणे नेहमीच स्पेशल

पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध जगात कुठेही खेळणे 'स्पेशल' असते, असे पाकिस्तानचा अष्टपैलू मोहम्मद हफीझने सांगितले.
कराची - पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध जगात कुठेही खेळणे 'स्पेशल' असते, असे पाकिस्तानचा अष्टपैलू मोहम्मद हफीझने सांगितले.

''भारतासोबत खेळण्याची आम्ही आतुरतेने वाट पाहतो. दोन परंपरागत प्रतिस्पर्धी भिडत असल्याने या लढतीची उत्सुकता सर्व जगभर असते. तसेच दोन्ही संघ जिंकण्याचा प्रयत्न करत असल्याने क्रिकेटपटूंच कस लागतो. इंग्लंडमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ भिडतील, तो एक नवा अनुभव असेल. कारण चँपियन्स ट्रॉफी इंग्लंडमध्ये होत आहे. तेथील वातावरण आणि खेळपट्टय़ांशी जुळवून घेण्याचे मोठे आव्हान दोन्ही संघांच्या क्रिकेटपटूंसमोर असेल,''असे हफीझने म्हटले.

सध्याचा सर्वसमावेशक पाकिस्तानची कामगिरी उंचावेल, असा विश्वास हफीझने व्यक्त केला. ''आमच्या संघात नव्या-जुन्या क्रिकेटपटूंचा सुरेख समन्वय साधण्यात आला आहे. तसेच विद्यमान संघातील अनेक क्रिकेटपटूंना इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. इंग्लंडसह स्कॉटलंड आणि आर्यलडमध्ये आम्ही खेळलोय. तो अनुभव चँपियन्स ट्रॉफीत उपयोगी पडेल. परिणामी यावेळी पाकिस्तान संघाची कामगिरी नक्की उंचावेल,''असे हफीझने सांगितले. हफीझसह पाकिस्तानचे क्रिकेटपटू सध्या आर्यलडमध्ये होणाऱ्या वनडे मालिकेच्या तयारीत गुंतले आहेत. चँपियन्स ट्रॉफीपूर्वीचा सराव म्हणून पाकिस्तान या मालिकेकडे पाहत आहे.

Read More »

पत्रकारितेतील 'व्यक्ती आणि वल्ली'

४० वर्षापूर्वी एक व्यक्ती आपल्या बँकेतर्फे जलदगती गोलंदाज म्हणून खेळत असे. तसेच फावल्या वेळात 'मुक्त क्रीडा पत्रकार' म्हणून लेखन करीत असे.

आता पत्रकारितेतील 'व्यक्ती आणि वल्ली' पाहूया. कवींप्रमाणे पत्रकारही काही वेळेस तर्क लढवून माहिती प्रसारित करत असतात किंवा एखाद्याबद्दलचा आकस लेखनात प्रकट करत असतात. ४० वर्षापूर्वी एक व्यक्ती आपल्या बँकेतर्फे जलदगती गोलंदाज म्हणून खेळत असे. तसेच फावल्या वेळात 'मुक्त क्रीडा पत्रकार' म्हणून लेखन करीत असे. त्यात सदैव पंचांवर टीका असे. पंचांचा निर्णय कसा चुकला, हे मुद्दामहून लिहित असे. तसेच पंचांच्या नियमांच्या कथित अज्ञानाबद्दल ब-याचदा तोंडसुख घेत असे. त्याच्या ऑफिसच्या एका सामन्यात पंचगिरी करण्यासाठी मला विनंती केली तेव्हा याला मी सहकारी पंच म्हणून घेऊन गेलो. सामना सुरू झाल्यानंतर प्रत्येक षटकांदरम्यान मला किंवा स्कोअररला 'किती चेंडू झाले किंवा किती शिल्लक आहेत,' असे विचारत असे. पाणी पिण्यासाठीच्या वेळेत (मध्यंतराला) मी त्याला, 'अरे नुसते चेंडू सुद्धा मोजता येत नाहीत. मग इतर गोष्टी, निर्णय वैगेरे कसे लक्षात येतील' असे विचारले. तेव्हा त्याने कपाळाला हात लावून 'पुन्हा पंचगिरी करणार नाही. तसेच पंच तसेच त्यांच्या निर्णयाबद्दल आक्षेपार्ह लिहिणारही नाही,' असे म्हणून आत गेला. नंतर या दोन्ही गोष्टी त्याने कटाक्षाने टाळल्या. नंतर कळले की, हा गोलंदाजी करत असताना १-२ पंचांनी याला चेंडू 'फेकतो' (थ्रो) म्हणून 'नोबॉल' दिले होते. वर्तमानपत्रातही तसे छापून आले होते. म्हणून त्याचा पंचांवर राग होता.

काही वेळा पत्रकार आपलेच तर्क लढवून काहीही छापतात. सर्वसाधारणपणे अशी समजूत असते की, जड रोलर वापरला की, खेळपट्टी भुसभुशीत होऊन नंतर फिरकी गोलंदाजांना अनुकूल होते. अशाच एका सामन्यात एका पत्रकाराने आपल्या रकान्यात 'संघनायकाने जड रोलर वापरल्यामुळे खेळपट्टी फिरकी गोलंदाजांस अनुकूल झाली,' म्हणून लिहिले होते. हे कळताच दुसरे दिवशी खुलासा करण्याची नामुष्की त्याच्यावर ओढवली. दुसरा एक गंमतीदार किस्सा. गुजरात वि. महाराष्ट्र यांच्यात झालेल्या रणजी सामन्यात मी पंच होतो. गुजरातचा पंकज जव्हेरी गोलंदाजी करत असताना एक चेंडू मी स्क्वेअर लेगकडून 'नो बॉल' दिला. कारण दोनपेक्षा जास्त क्षेत्ररक्षक पॉपिंग क्रीझ रेषेच्या मागे होते. जव्हेरी तसेच संघनायकाला तसे खूण करून दाखवले. मात्र तेथील एका गुजराती वर्तमानपत्रात 'जव्हेरी चेंडू फेकतो म्हणून मी त्याला 'नोबॉल' दिला,'असे छापून आले होते. दोन दिवसांनी सामना संपल्यानंतर मुंबईला परत आल्यावर गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या सचिवांचे मला पत्र आले. 'जव्हेरीला तुम्ही चेंडू 'फेकल्या'बद्दल 'नो बॉल' दिला, असे वाचले. तरी वस्तुस्थिती काय, याचा खुलासा करावा,'अशी विचारणा त्यांनी केली होती. मी चकीत झालो. त्यानंतर लगेच कळवले की, पॉपिंग क्रीझमागे तीन क्षेत्ररक्षक असल्यामुळे 'नो बॉल' दिला. त्याप्रमाणे संघनायक आणि गोलंदाजास सांगितले होते. गोलंदाजांने चेंडू 'फेकला' असता तर तुम्हाला किंवा क्रिकेट बोर्डाला लेखी अहवाल दिला असता, असे गुजरात क्रिकेट असोसिएशनला कळवले. संबंधित पत्रकाराने माहिती न घेता चुकीचे लिहिल्याबद्दल खुलासा मागवा, असा सल्लाही दिला. पत्रकाराने दिलेल्या चुकीच्या बातमीमुळे गोलंदाज आणि संघटना मात्र बदनाम झाले.

Read More »

राजस्थान की हैदराबाद?

आयपीएल-६ च्या 'प्ले ऑफ' फेरीच्या दुस-या लढतीत म्हणजे 'एलिमिनेटर'मध्ये बुधवारी (२२ मे) तिस-या राजस्थान रॉयल्स चौथ्या क्रमांकावरील हैदराबाद सनरायझर्सशी दोन हात करेल.


नवी दिल्ली – अव्वल चार संघातील कुठल्या संघाचा पत्ता कट होणार? आयपीएल-६ च्या 'प्ले ऑफ' फेरीच्या दुस-या लढतीत म्हणजे 'एलिमिनेटर'मध्ये बुधवारी (२२ मे) तिस-या राजस्थान रॉयल्स चौथ्या क्रमांकावरील हैदराबाद सनरायझर्सशी दोन हात करेल. या लढतीतील पराभूत संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.

स्पॉट फिक्सिंगप्रकरणी राजस्थानच्या तीन क्रिकेटपटूंना अटक झाली. शांताकुमारन श्रीशांतसह अंकित चव्हाण आणि अजित चंडिलाच्या 'कर्तबगारी'नंतर संघव्यवस्थापन आणि क्रिकेटपटू अडचणीत आले आहे. सध्या सर्वच क्रिकेटपटूंकडे संशयाने पाहिले जात आहे. मात्र राजस्थानची या मोसमात सवरेत्तम कामगिरी झाली, हेही विसरून चालणार नाही. त्यामुळे 'फिक्सिंग'चे आरोपांकडे तात्पुरते दुर्लक्ष करून कामगिरीत सातत्य राखण्याचे मोठे आव्हान द्रविड आणि सहका-यांवर आहे. नवी मालकी असलेल्या हैदराबादची कामगिरी दृष्ट लागण्यासारखी झाली आहे. 'स्टार' क्रिकेटपटू नसूनही त्यांनी दाखवलेले सातत्य निश्चितच कौतुकास्पद आहे.

पहिल्या आणि दुस-या क्रमांकावरील अनुक्रमे चेन्नई आणि मुंबईमध्ये एक साम्य होते. दोघांनी प्रत्येकी ११ विजय मिळवलेत. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील राजस्थान आणि हैदराबादमधील समान बाब म्हणजे दोन्ही संघांनी प्रत्येकी १० सामने जिंकलेत. अव्वल चार संघांनी दहा किंवा त्याहून अधिक विजय मिळवलेत. तिसऱ्या क्रमांकावरील राजस्थानचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे त्यांनी चेन्नई आणि मुंबईप्रमाणे घरच्या मैदानावरील (होम) सर्वच्या सर्व आठ सामने जिंकण्याची करामत साधली आहे.

राजस्थानची फलंदाजीची भिस्त शेन वॉटसनसह अजिंक्य रहाणे आणि कर्णधार राहुल द्रविडवर आहे. या त्रिकुटाने चांगले सातत्य राखले आहे. या तिघांना स्टुअर्ट बिन्नी आणि ब्रॅड हॉजची चांगली साथ लाभत आहे. मात्र हैदराबादची गोलंदाजी प्रभावी असल्यामुळे त्यांच्या फलंदाजांचा कस लागेल. राजस्थानचा मध्यमतेज गोलंदाज जेम्स फॉकनरने संघांतर्फेच नव्हे तर संपूर्ण मोसमात सर्वाधिक विकेट घेत प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व राखले आहे. त्याला केवॉन कूपर, शेन वॉटसन आणि सिद्धार्थ त्रिवेदीची सवरेत्तम साथ लाभली आहे. राजस्थानने पहिल्या हंगामात जेतेपद पटकावले होते. त्यावेळी शेन वॉर्न कर्णधार होता. द्रविडच्या नेतृत्वाखालील विद्यमान संघ तशी करामत करून दाखवतो का, याची उत्सुकता आहे.

प्रभावी गोलंदाजी हे हैदराबादचे बलस्थान आहे. फिरकीपटू अमित मिश्रासह थिसरा परेरा आणि वेगवान गोलंदाज डेल स्टेन फॉर्मात आहेत. त्यांना इशांत शर्मा आणि करन शर्माची उपयुक्त साथ लाभली आहे. प्रमुख पाच गोलंदाजांचे यश पाहता फलंदाजांचा भार खूपच हलका झालाय. वास्तविक पाहता हैदराबादकडे टी-२० ला लायक फलंदाजांचा भरणा नाही. मात्र शिखर धवन, पार्थिव पटेल, हनुमा विहारी आणि थिसरा परेराने अपेक्षित योगदान देत फलंदाजीचा भार वाहिला आहे.सांघिक कामगिरीवर दोन्ही संघांचा अधिक भर असला तरी राजस्थानचे फलंदाज किंवा हैदराबादचे गोलंदाज अशी लढत अपेक्षित आहे.

यंदा चौकारांची संख्या दोन हजारावर जाणार
आयपीएलच्या सहाव्या हंगामात साखळी फेरीपर्यंत चौकारांची संख्या १९३९ वर पोहोचली आहे. उर्वरित चार सामने पाहता हीच संख्या दोन हजाराच्या आसपास नक्की जाईल. साखळीपर्यंत सर्वाधिक चौकार चेन्नईचा सलामीवीर माइक हसीच्या नावावर आहेत. त्याने १५ सामन्यांत ७१ चौकार लगावलेत. त्याच्या पाठोपाठ बंगळूरुचा कर्णधार विराट कोहली (६४) आणि ख्रिस गेल (५७) आहे. मात्र बंगळूरु बाहेर पडल्याने हसीच्या नावावरच सर्वाधिक चौकार राहणार, हे निश्चित. सहाव्या मोसमात सात फलंदाजांनी ५० हून अधिक चौकार ठोकलेत. त्यात हसी, कोहली आणि गेलसह पुण्याचा आरोन फिंच (५४), राजस्थानचा कर्णधार द्रविड (५४) , राजस्थानचा शेन वॉटसन (५३) आणि कोलकात्याचा कर्णधार गौतम गंभीरचा (५१) समावेश आहे. मुंबईचा दिनेश कार्तिक (४७), चेन्नईचा सुरेश रैना (४५) यांना चौकारांचे अर्धशतक पूर्ण करण्याची संधी आहे.

६३५ षटकारांची नोंद
सहाव्या हंगामात साखळी फेरीपर्यंत ६३५ षटकारांची नोंद झाली आहे. सर्वाधिक षटकार बंगळूरुचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर आहेत. त्याने १६ सामन्यांत ५१ षटकारांची आतषबाजी केली आहे. गेलचा संघ अंतिम चार संघात नसला तरी त्याच्या आसपास कुणी नाही. दुस-या क्रमांकावर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आहे. मात्र १६ लढतींमध्ये त्याला केवळ २८ षटकार ठोकता आलेत. तिस-या क्रमांकावर पंजाबचा डेव्हिड मिलर (२४), चौथ्या क्रमांकावर मुंबईचा कीरॉन पोलार्ड (२३) तसेच पाचव्या क्रमांकावर राजस्थानचा शेन वॉटसन (२२) आहे.

Read More »

बार्कलेजने विकासदराचा अंदाज घटवला

आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी सरकारकडून फारशी गांभीर्याने पावले उचलली जात नसल्याने बार्कलेजने चालू वर्षाचा विकासदराचा अंदाज घटवला आहे.

नवी दिल्ली – आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी सरकारकडून फारशी गांभीर्याने पावले उचलली जात नसल्याने बार्कलेजने चालू वर्षाचा विकासदराचा अंदाज घटवला आहे. २०१३-१४ मध्ये भारताचा सहा टक्के दराने विकास होईल, असे बार्कलेजने म्हटले आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेने गेल्या काही पतधोरणांमध्ये व्याजदरांमध्ये कपात केली आहे, मात्र त्याचा फारसा परिणाम बँकांच्या व्याजदरांवर झालेला नाही. बँकांचे व्याजदर अजूनही जास्तच असल्याचे बार्कलेजने म्हटले आहे. त्याचबरोबर विकासाला चालना देण्यासाठी सरकारचे सुधारणांचे निर्णय थंडावले आहेत. ज्यामुळे मानांकनाला फटका बसू शकतो. येत्या काळात मानांकन कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे बार्कलेजने म्हटले आहे.

२०१२-१३ च्या चौथ्या तिमाहीत अर्थव्यवस्थेचा ४.५ टक्के दराने विकास झाला होता. वित्तीय तूट कमी करण्यासाठी सरकारकडून काटकसरीच्या योजनांवर भर दिला गेला असल्याचे बार्कलेजने म्हटले आहे. दरम्यान, अजूनही मंदीचा प्रभाव कायम आहे. मात्र गेल्या महिन्यात महाईचा पारा उतरल्याने रिझव्‍‌र्ह बँकेकडून पतधोरणात आणखी ०.२५ टक्क्याची कपात केली जाईल, असा विश्वासही बार्कलेजने व्यक्त केला आहे. तसेच वर्षभरात बँकेकडून व्याजदरांमध्ये किमान ०.७५ टक्क्याची कपात केली जाईल, असेही बार्कलेजने म्हटले आहे.

Read More »

सोने आयात कमी करण्यासाठी प्रयत्न वाढवणार

चालू खात्यातील तूट वाढवण्यास कारणीभूत ठरत असलेल्या सोन्याच्या आयातीला कमी करण्यासाठी सरकारकडून आणखी प्रयत्न करण्यात येतील, असे अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली – चालू खात्यातील तूट वाढवण्यास कारणीभूत ठरत असलेल्या सोन्याच्या आयातीला कमी करण्यासाठी सरकारकडून आणखी प्रयत्न करण्यात येतील, असे अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे. सोन्याची आयात वाढत असल्याने आयात बिलाचा आकडा वाढत असून सरकारच्या चिंता वाढल्या आहेत.

एप्रिलमध्ये सोन्याच्या आयातीमध्ये १३८ टक्क्यांची वाढ झाली होती. गेल्या महिन्यात भारतात ७.५ अब्ज डॉलरचे सोने आयात करण्यात आले. या वर्षातील ही

उच्चांकी पातळी होती. सोन्याची आयात वाढल्याने व्यापारी तूटही १७.७ अब्ज डॉलपर्यंत वाढली आहे. सोने आयातीवर अंकुश ठेवण्यासाठी आणखी उपाययोजना केल्या जातील, असे चिदंबरम यांनी म्हटले आहे. सोनाचे असलेले आकर्षण मर्यादित ठेवण्याचे आवाहन चिदंबरम यांनी भारतीयांना केले आहे.

गेल्या वर्षभरात सरकारने सोने आयातीवर निर्बंध घालण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये सोन्यावरील आयात शुल्कात वाढ करण्यात आली. तसेच रिझव्‍‌र्ह बँकेकडूनही काही उपाययोजना करण्यात आल्या असल्याची माहिती चिदंबरम यांनी दिली. सोन्याचे आकर्षण वाढत असल्याने त्याचा परिणाम आयातीवर होत आहे. ज्यामुळे चालू खात्यातील तुटीमध्ये मोठी वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले.

२०००-०१ मध्ये देशात ४७१ टन सोन्याची आयात करण्यात आली. तर गेल्या दहा वर्षामध्ये सोने आयातीत मोठी वाढ झाली आहे. २०१२-१३ मध्ये तब्बल १,०१७ टन सोन्याची आयात करण्यात आली. सोन्याची आयात चालू खात्यातीत तुटीच्या ७२ टक्के होती. सोन्याची आयात वर्षाला ७०० टनांपर्यंत कमी करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, असे गेल्याच आठवडय़ात पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष सी. रंगराजन यांनी म्हटले होते.
आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था स्टँडर्ड अँड पुअर्सने मानांकन कमी करण्याचा इशारा दिला असला तरी सध्याची स्थिती ही मानांकन वाढवण्यासाठी अनुकूल असल्याचे चिदंबरम यांनी म्हटले आहे. सध्याची आर्थिक स्थिती ही चांगली असून काळजी करण्याचे कारण नाही. आर्थिक स्थिती झपाटय़ाने सुधारत असून उच्च विकास दराच्या दिशेने तिची वाटचाल सुरू असल्याचे चिदंबरम यांनी सांगितले.

 

Read More »

रुपयाने गाठला सहा महिन्यांतील नीचांकी स्तर

आयातदारांकडून डॉलरला असलेली वाढती मागणी आणि देशांतर्गत शेअर बाजारातील कमजोरीने मंगळवारी डॉलरच्या तुलनेत रुपया ३० पैशांनी घटून ५५.४१ वर बंद झाला.

मुंबई - आयातदारांकडून डॉलरला असलेली वाढती मागणी आणि देशांतर्गत शेअर बाजारातील कमजोरीने मंगळवारी डॉलरच्या तुलनेत रुपया ३० पैशांनी घटून ५५.४१ वर बंद झाला. सलग तीन सत्रांत घसरण कायम राखणा-या रुपयाचा हा गेल्या सहा महिन्यांतील नीचांकी स्तर ठरला आहे. सोमवारी रुपया ५५.११वर बंद झाला होता. डॉलरची युरो आणि इतर चलनांच्या तुलनेत सरस कामगिरी आणि देशांतर्गत शेअर बाजारातील कमजोरी रुपयातील घसरणीला कारणीभूत ठरत आहे. या आठवडय़ात रुपया ५६ चा स्तर गाठण्याची शक्यता असल्याचे एचडीएफसी बँकेचे मुख्या वितरक आशुतोष रैना यांनी सांगितले.

Read More »

फनीश मूर्तीची हकालपट्टी योग्यच

महिला सहका-याचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आयगेटचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी फनीश मूर्ती दोषी आढळले आहेत.

बंगळूरु – महिला सहका-याचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आयगेटचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी फनीश मूर्ती दोषी आढळले आहेत. यामुळे संचालक मंडळाने घेतलेला त्यांच्या तात्काळ हकालपट्टीचा निर्णय योग्यच असल्याची प्रतिक्रिया आयटी कंपन्यांची संघटना नासकॉमने दिली आहे. अशा प्रकरणांमध्ये तत्परतेने निर्णय घेतल्यास ते भविष्यात माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रासाठी फायदेशीर ठरतील, असे नासकॉमने
म्हटले आहे.

'आयगेट'च्या संचालक मंडळाने कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी फनीश मूर्ती यांच्यावर महिला सहकाऱ्याचे लैंगिक शोषण केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यामध्ये मूर्ती यांनी महिलेशी असलेले लैंगिक संबंध जाहीर केले नाहीत. त्यामुळे त्यांनी कंपनीच्या आचारसंहितेचा भंग केला असल्याचे संचालक मंडळाने म्हटले आहे. त्यामुळेच त्यांची ताबडतोब हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मूर्ती यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय योग्यच आहे. यामुळे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचा नैतिक स्तर उंचावला असून यामुळे आयटी क्षेत्रातील उच्च दर्जाचे प्रशासन, शिस्त आणि एकजूट दिसून आली, असे नासकॉमचे अध्यक्ष कृष्णकुमार नटराजन यांनी सांगितले. 'आयगेट'च्या संचालक मंडळाने या प्रकरणाची सर्व बाजू लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घेतला असल्याचे नटराजन यांनी सांगितले. भारतीय आयटी क्षेत्रातील हा एक महत्त्वपूर्ण आणि वेगळी बाजू दाखवणारा निर्णय आहे. यामध्ये दोषी व्यक्तीच्या पदाचा विचार न करता योग्य कारवाई केली असल्याचे त्यांनी सांगितले.

माहिती आणि तंत्रज्ञानमध्ये जवळपास ३० ते ४० टक्के महिला कार्यरत आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी त्यांच्यामध्ये लैंगिक शोषणाबाबत प्रबोधन करणे आवश्यक आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये मी स्वत: विविध शहरांमधील आयटी कंपन्यांमध्ये लैंगिक शोषणाबाबत एक दिवसीय शिबिर घेतले असल्याचे नटराजन म्हणाले.

महिलांमध्ये प्रबोधन करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम राबवणे आवश्यक असल्याचे नटराजन यांनी सांगितले. कंपन्यांच्या अंतर्गत बाबींमध्ये नासकॉम थेट हस्तक्षेप करू शकत नाही. मात्र काही अनुचित प्रकारांमुळेजर संपूर्ण क्षेत्रालाच काळिमा लागत असेल तर संबंधित स्थानिक अथवा बहुराष्ट्रीय कंपन्यांनी त्या प्रकरणांमध्ये कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

Read More »

दूधाचे दर वाढले

आधीच महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्य लोकांना आता दूध दरवाढीला सामोरं जावे लागणार आहे.

मुंबई – आधीच महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्य लोकांना आता दूध दरवाढीला सामोरं जावे लागणार आहे. गाईच्या दूधात दोन रुपयांनी तर म्हशीच्या दूधात चार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत बुधवारी हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील दुष्काळी परिस्थिती, पशुखाद्यातील दरवाढ,चा-याची कमतरता, डिझेल दरवाढ यांमुळे दूधदरवाढ करण्याची मागणी शेतक-यांनी केली होती. ह्या मागणी संदर्भातला ठराव राज्य सहकारी दूध संघ कृती समितीच्या बैठकीत मान्य करण्यात आली होती.

Read More »

श्रीनिवासन यांच्या नातेवाइकाची चौकशी होणार

स्पॉट फिक्सिंग प्रकरणी चेन्नई सुपर किंग्सचे मालक श्रीनिवासन यांच्या नातेवाइकाची चौकशी करण्यात येणार आहे.

मुंबई – स्पॉट फिक्सिंग प्रकरणी चेन्नई सुपर किंग्सचे मालक श्रीनिवासन यांच्या नातेवाइकाची चौकशी करण्यात येणार आहे. या नातेवाइकाचे अभिनेता विंदू दारासिंग रांधवा याच्याशी जवळचे संबंध होते अशी माहिती मुंबईच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या सुत्रांनी दिली आहे.

स्पॉट फिक्सिंग प्रकरणी विंदूने या नातेवाइकाशी अनेकवेळा फोनवरुन संवाद साधला आहे. मात्र अंतिम निर्णयापर्यंत पोहण्यासाठी या फोन कॉल्सचा उपयोग करण्यात येणार असला तरी स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील श्रीनिवासन यांच्या नातेवाइकाच्या भूमिकेबद्दल अद्याप काही बोलणे उचित ठरणार नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे .

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अभिनेता विंदू याच्या अटकेनंतर या प्रकरणातील बॉलिवूड कनेक्शन अधिक उघडे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भात पोलिसांना विचारले असता विंदूने यासंबंधात बॉलिवूडमधील अनेकजणांना फोनवरुन संपर्क साधला होता, अशी माहिती समोर येत असल्याचे त्यांनी सांगितले.

बीसीसीआय'चे बोटचेपे धोरण! »

आयपीएलमधील स्पॉटफिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयवर सर्वोच्च न्यायालयाने खरमरीत शब्दांत ताशेरे ओढले.…

Read More »

ब्राम्होसची चाचणी यशस्वी

भारत आणि रशिया यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या ब्राम्होस क्षेपणास्त्राची बुधवारी गोव्याच्या समुद्र किना-यावरुन यशस्वीपणे चाचणी करण्यात आली.

पणजी – भारत आणि रशिया यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या ब्राम्होस क्षेपणास्त्राची बुधवारी गोव्याच्या समुद्र किना-यावरुन यशस्वीपणे चाचणी करण्यात आली. आयएनएस तारकश या युद्धनौकेवरुन अंदाजे २९० किमीचा पल्ला गाठण्यास या क्षेपणास्त्राला यश आले.

भारतीय युद्धनौकेमध्ये या क्षेपणास्त्राचा अंतर्भाव करण्यासाठी ही चाचणी घेण्यात आल्याचे ब्राम्होस एरोस्पेसचे अध्यक्ष ए.शिवथणू पिल्ले यांनी सांगितले. आयएनएस तारकश ही तलवार जातीची युद्धनौकेसहित आयएनएस त्रिकांड, आयएनएस तारकश या युद्धनौकेमध्ये ब्राम्होसचा अंतर्भाव केला जाणार आहे.

Read More »

भावपूर्ण श्रद्धांजली…

माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या ताश्कंदमधील पुतळ्याजवळ बुधवारी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी पुष्पहार अर्पण केले.

Read More »

जेसिका हत्या, अभिनेता शावन मुन्शी अडचणीत

 जेसिका लाल हत्याकांड प्रकरणात बॉलिवुड अभिनेता शावन मुन्शी आणि बॅलेस्टिक तज्ञ पी.एस.मानोचा यांनी दिलेली खोटी साक्ष त्यांच्या अंगलगट आली आहे.

नवी दिल्ली – संपूर्ण देशात गाजलेल्या मॉडेल जेसिका लाल हत्याकांड प्रकरणात बॉलिवुड अभिनेता शावन मुन्शी आणि बॅलेस्टिक तज्ञ पी.एस.मानोचा यांनी दिलेली खोटी साक्ष त्यांच्या अंगलगट आली आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणात साक्ष फिरवण्याच्या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, या दोघांविरोधात खटला चालवण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयाने मात्र अन्य १७ साक्षीदारांची कायदेशीर कारवाईतून सुटका केली आहे. या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालय स्वधिकाराचा वापर करुन हा खटला चालवत आहे.

खटल्याची सुनावणी सुरु असताना, सर्व साक्षीदार कसे उलटले असा सवालही न्यायालयाने सरकारी पक्षाला विचारला आहे. एप्रिल १९९९ मध्ये दिल्लीतील एका पार्टीत जेसिकाने मद्य द्यायला नकार दिला म्हणून मनू शर्माने त्याच्याजवळील रिव्हॉलवरमधुन गोळी झाडून जेसिका लालची हत्या केली होती. मनू शर्मा हरियाणा काँग्रेसमधील वजनदार नेते विनोद शर्मा यांचा मुलगा आहे.

Read More »

चक्रीवादळाचा तडाखा…

अमेरिकेत झालेल्या चक्रीवादळाच्या तडाख्याने महागड्या गाड्यांचा चुराडा झाला.

Read More »

इरॉन इरॉम…

ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्या हस्ते इरॉम शर्मिला यांच्या ‘इरॉन इरॉम’ पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी नवी दिल्ली येथे करण्यात आले.

Read More »

सिंह वाचवा…

गुजरातमधील सिंहांना मध्य प्रदेशात स्थलांतरीत केल्याने अहमदाबाद येथील ज्येष्ठ नागरीकांनी ‘सिंह वाचवा’ अशा घोषणा देत निदर्शने केली.

Read More »

यह जवानी है दिवानी…

‘यह जवानी है दिवानी’ या चित्रपटाच्या मुंबईत झालेल्या प्रमोशनसाठी अभिनेता रणबिर कपूर आणि दीपिका पदुकोण उपस्थित होते.

Read More »

मालेगाव स्फोट, आरोपपत्र दाखल

मालेगावमध्ये स्फोटा प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने लोकेश शर्मा, धान सिंह, मनोहर सिंह आणि राजेंद्र चौधरी या चार आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले.

संग्रहित छायाचित्र

मुंबई - मालेगावमध्ये २००६ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटा प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने लोकेश शर्मा, धान सिंह, मनोहर सिंह आणि राजेंद्र चौधरी या चार आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले. एनआयएने मकोक्का न्यायालयात चारही आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले.

आरोपपत्रात रामसिंह कालसागराला फरार दाखवण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये आठ सप्टेंबर २००६ रोजी साखळी बॉम्बस्फोटांची मालिका घडवण्यात आली होती. या स्फोटांमध्ये ३७ जणांचा मृत्यू झाला होता तर १२५ हून अधिकजण जखमी झाले होते.

Read More »

सहा बुकींना न्यायालयीन कोठडी

आयपीएलमधील बेटिंग रॅकेटशी संबंधित असलेल्या सहा बुकींना स्थानिक न्यायालयाने पाच जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मुंबई – आयपीएलमधील बेटिंग रॅकेटशी संबंधित असलेल्या सहा बुकींना स्थानिक न्यायालयाने पाच जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या सहा बुकींची पोलिस कोठडी मिळावी म्हणून मुंबई पोलिसांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.

तपासकर्त्यांना पुरेशी संधी देऊनही ते कोणाची फसवणूक झाली आणि का ? हे सिध्द करु शकले नसल्याचे निरिक्षण अतिरिक्त न्यायदंडाधिकारी एम.एन.सलीम यांनी नोंदवले.

माहिती-तंत्रज्ञान कायदा आणि आयपीसीच्या ४२०, ४६५ कलमांखाली आरोपीं बुकींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  बुधवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने पोलिसांवर ताशेरे ओढले.

Read More »

पुणे वॉरियर्सचे आरोप बीसीसीआयने फेटाळले

फ्रॅंचायझी शुल्क कमी करण्यासाठी कोणतीही पावले न उचलल्याचा पुणे वॉरियर्स संघाने केलेला आरोप बीसीसीआयने फेटाळून लावला आहे.

मुंबई - फ्रॅंचायझी शुल्क कमी करण्यासाठी कोणतीही पावले न उचलल्याचा पुणे वॉरियर्स संघाने केलेला आरोप बीसीसीआयने फेटाळून लावला आहे. आम्ही नियमानुसार वागलो आहोत. त्यामुळे आम्हाला जबाबदार धरु नका असे बीसीसीआयने म्हटले आहे.

फ्रॅंचायझी शुल्कावरुन बीसीसीआय बरोबर झालेल्या मतभेदांनंतर सहार इंडियाच्या मालकीचा पुणे वॉरियर्स संघ आयपीएलमधुन बाहेर पडला आहे.

पुणे वॉरियर्सकडून फ्रॅँचायझी शुल्क भरले न गेल्याने बीसीआयने पुणे वॉरियर्स संघाची बॅक हमी वटविण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे पुणे वॉरियर्सने तडकाफडकी आयपीएलमधून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले.

फ्रॅंचायझी शुल्काचा तिढा सोडविण्याचा आमचा प्रयत्न होता असे बीसीसीआयने म्हटले आहे. आयपीएलमधून बाहेर पडण्याच्या निर्णयासंबंधी सहारासमूहाने अद्याप कळवलेले नाही असे बीसीसीआयने सांगितले.

Read More »

आयपीएल LIVE हैदराबादची प्रथम फलंदाजी

राजस्थान रॉयल्सचा संघ आणि हैदराबाद सनरायझर्समध्ये आज प्लेऑफचा दुसरा सामना होत आहे. हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली - आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे अडचणीत सापडलेला राजस्थान रॉयल्सचा संघ आणि हैदराबाद सनरायझर्समध्ये आज प्लेऑफचा दुसरा सामना होत आहे. हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आजच्या सामन्यात पराभूत होणा-या संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे. तर, विजेत्या संघाला अंतिम फेरीत दाखल होण्यासाठी मंगळवारी पराभूत झालेल्या मुंबई इंडियन्सशी दोन हात करावे लागणार आहेत.

लाईव्ह स्कोर पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

आयपीएलच्या चालू मोसमात हैदराबादच्या तुलनेत राजस्थानने सरस कामगिरी केली आहे. मात्र स्पर्धेच्या अंतिम टप्यात त्यांच्या संघातील तीन खेळाडू स्पॉट फिक्सिंगमध्ये सापडल्याने संघात निराशेचे वातावरण आहे. आजच्या सामन्यातील जय-पराजयाने राजस्थानच्या खेळाडूंचे मनोधैर्य दिसून येणार आहे.

आयपीएलच्या सर्व अपडेटसाठी येथे क्लिक करा 

Read More »

नागोठणेनजीक बस झाडावर आदळून ३ ठार

लक्झरी बस झाडावर आदळून झालेल्या अपघातात तिघे ठार तर २९ जण जखमी झाल्याची घटना मुंबई गोवा महामार्गावर नागोठणेजवळ घडली.

संग्रहित छायाचित्र

नागोठणे- भरधाव लक्झरी बस झाडावर आदळून झालेल्या अपघातात तिघे ठार तर २९ जण जखमी झाल्याची घटना बुधवारी पहाटे मुंबई गोवा महामार्गावर घडली. नागोठणेनजीक पळस गावाजवळ घडलेल्या या दुर्घटनेत संदीप राणे (३५, रा. मालवण), सुहास गोडे (३२ रा. सोमलेवाडी देवगड), अतुल तावडे (३५, रा. बागडेआळी, कणकवली यांचा मृत्यू झाला. जखमी झालेल्या प्रवाशांत ठाणे व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवाशांचा समावेश आहे.

मालवणजवळील मसूरा येथून मुंबईकडे निघालेली ही बस नागोठणेनजीक पळस गावाजवळ पहाटे चारच्या सुमारास पोहोचली. त्या वेळी तंद्रीत असलेल्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर जाऊन आदळली. त्यानंतर सहा ते सात फूट खोल असलेल्या शेतात जाऊन कोसळली. अपघातातील जखमींना पनवेल व मुंबई येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. नागोठणेतील प्राथमिक आरोग्य केंद्र व डॉ. सुनील पाटील खासगी रुग्णालयातही जखमींवर उपचार सुरू आहेत.

Read More »

प्रहार बातम्या – २२ मे २०१३

नमस्कार प्रहार बातम्यामध्ये आपलं स्वागत…
»संपुआच्या काळात देशाची प्रगती – पंतप्रधान
»श्रीनिवासन यांच्या जावयाची चौकशी होण्याची शक्यता

»दूधाचे दर वाढले 

»संजय दत्तची रवानगी येरवडा कारागृहात

»आयपीएलमधुन बाहेर पडण्यासंबंधी सहराने संपर्क साधला नाही – बीसीसीआय

ऐकण्यासाठी येथे क्लिक करा…22052013

Read More »

राशिभविष्य, २३ मे २०१३

दैनंदिन राशिभविष्य…

मेष : ज्ञानी माणसे ओळखण्यास थोडा विलंब लागेल.



वृषभ : समाजकार्यात पूर्ण दिवस व्यस्त राहाल.

मिथुन : आनंदी बातमी समजेल.
कर्क : नाटय़ाभिनयाचा सराव कराल.

सिंह : धाडसी निर्णय घ्याल.

कन्या : वैवाहिक जोडीदारास सुसंधी प्राप्त होतील.
तूळ : पारंपरिक आहार घ्यावा.

वृश्चिक : संपादकीय लेखाची प्रशंसा होईल.

धनू : क्रीडाक्षेत्र गाजवाल.

मकर : दूरदृष्टीने निर्णय घ्याल.

कुंभ : होतकरूंना अनेक बारकावे सांगाल.

मीन : पाणी उकळून पिणेच हितकारक.

Read More »

रेसकोर्समधील अनधिकृत बांधकामाला मुंबई महापालिकेचेच समर्थन?

महालक्ष्मी रेसकोर्स व रॉयल वेस्टर्न टर्फ क्लबमध्ये करार संपल्यानंतर एकूण जागेपैकी ३० टक्के जागा पालिकेच्या ताब्यात येणार आहे

मुंबई- महालक्ष्मी रेसकोर्स व रॉयल वेस्टर्न टर्फ क्लबमध्ये करार संपल्यानंतर एकूण जागेपैकी ३० टक्के जागा पालिकेच्या ताब्यात येणार आहे. पालिकेच्या जागेत टर्फ क्लबने अनधिकृत बांधकाम त्यांनी तोडून टाकावे किंवा तसेच ठेवल्यास त्याचा बांधकाम खर्च पालिका देईल, असा पर्याय ठेवणार असल्याचे महापौर सुनील प्रभू यांनी स्पष्ट केले.

अनधिकृत बांधकाम केल्याने भाडेकरार संपुष्टात आणणारे महापौर आणि पालिका प्रशासन तेच अनधिकृत बांधकाम कायम ठेवत बांधकाम खर्च देण्याचा प्रस्ताव ठेवून त्याचे समर्थन करत आहे. त्यामुळे पालिका नागरिकांच्या अनधिकृत बांधकामावर कशी काय कारवाई करू शकते, असा सवाल विचारला जातो.

Note: There is a poll embedded within this post, please visit the site to participate in this post's poll.

रेसकोर्सची जागा महापालिकेने १९ वर्षासाठी भाडय़ाने दिली होती. टर्फ क्लबने पालिकेची परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम, अंतर्गत नूतनीकरण केले. भाडेकराराचा ३१ मेपर्यंत असताना बी. जे. आर यांच्याशी १ जुलै २००८ ते ३० जून २०१८पर्यंत हॉटेल चालवण्याचा करार केला. पालिकेच्या संमतीशिवाय रेस्टॉरंटअंतर्गत बांधकामात सुधारणा व नूतनीकरणाचे अधिकार दिले. पालिकेच्या नोटिशीला उत्तर न दिल्याने भाडेकरार संपुष्टात आणण्याचे पत्र या कंपनीला पाठवले असून, या जागेवरील ताबा सोडून महापालिकेच्या स्वाधीन करा, असे बजावण्यात आले होते.

रेसकोर्सची २ लाख ५५ हजार चौ. मी. क्षेत्रफळाची जागा पालिकेची असून उर्वरित जागा नगरविकास खात्याची आहे. ३१ मे रोजी भाडेकरार संपुष्टात आल्यानंतर पालिकेची जागा पुन्हा ताब्यात मिळणार आहे, असे प्रभू यांनी सांगितले. बीजेआर कंपनीचे अनधिकृत बांधकाम तोडून टाकावे किंवा बांधकाम ठेवल्यास बांधकाम खर्च दिला जाईल, असे ते म्हणाले. पालिकेच्या अखत्यारीतील जागेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात येण्यासाठी निश्चित केली आहे.

Read More »

विंदू बुकीच!

'बिग बॉस'फेम विंदू दारासिंग हा बुकीच असल्याचे गुन्हे शाखेच्या तपासात निष्पन्न झाले असून, सट्टेबाजारात तो 'जॅक' या नावाने सट्टेबाजी करत असल्याचे समोर आले आहे.

मुंबई- 'बिग बॉस'फेम विंदू दारासिंग हा बुकीच असल्याचे गुन्हे शाखेच्या तपासात निष्पन्न झाले असून, सट्टेबाजारात तो 'जॅक' या नावाने सट्टेबाजी करत असल्याचे समोर आले आहे. त्याच्या घरातील झाडाझडतीत पोलिसांना सराईत बुकींचे मोबाइल सापडले असून, विंदूनेच या सट्टेबाजांना देशाबाहेर पळण्यात मदत केली असल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, बीसीसीआयचे अध्यक्ष व 'चेन्नई सुपर किंग्ज' या आयपीएलमधील संघाचे मालक एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरूनाथ मय्यपन याचे विंदूसोबत असलेले मैत्रीपूर्ण संबंध सध्या वादाच्या भोव-यात सापडले आहेत.

सट्टेबाजीप्रकरणी अटक केलेल्या विंदू दारासिंग ऊर्फ वीरेंद्र रंधावा याच्या जुहू येथील ममता सोसायटीतील सहाव्या माळ्यावरील घरावर बुधवारी सकाळी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापे टाकले. त्यात तीन मोबाइल, एक लॅपटॉप, एक आयपॅड जप्त केले आहे. जप्त केलेले तीन मोबाइल संजय जयपूर व पवन जयपूर या दोन सट्टेबाजांचे आहेत. दिल्ली पोलिसांनी स्पॉटफिक्सिंगप्रकरणी तीन खेळाडू व सट्टेबाजांना अटक केल्यानंतर संजय व पवन या दोघांचाही याप्रकरणात सहभाग आढळला होता. त्यानंतर घाबरून मुंबईत आलेल्या या दोघांना मुंबईतून पळून जाण्यास विंदूने मदत केली होती. त्यासाठी १६ तारखेला विंदूने जुहूमध्ये हॉटेलही बुक केले होते आणि संजय जयपूर, पवन जयपूर, रमेश व्यास व ज्युपिटर(दिल्ली) या सट्टेबाजांच्या तो कायम संपर्कात होता. आनंद सक्सेना या दिल्लीतील मित्रामार्फत सात वर्षापूर्वी त्याची या सट्टेबाजांशी ओळख झाली होती. त्यानंतर विंदूने 'जॅक' या नावाने सट्टा घेण्यास सुरुवात केली होती. अनेक मॉडेल्स व बॉलिवूड कलाकारांनी त्याच्याकडे सट्टा खेळल्याची माहिती आहे.

मय्यपनशी मैत्रीपूर्ण संबंध

बीसीसीआयचे अध्यक्ष व चेन्नई सुपर किंग्ज संघाचे मालक एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरूनाथ मय्यपनचे विंदूशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे पुढे आले आहे. पहिल्या आयपीएलच्या वेळी चेन्नईत झालेल्या एका क्रिकेट पार्टीत या दोघांची ओळख झाली होती. तेव्हापासून तो विंदूचा चांगला मित्र आहे. मय्यपन हा चित्रपट निर्मितीच्या व्यवसायात असल्याने या दोघांची ओळख झाली असावी. पण सट्टेबाजी व स्पॉटफिक्सिंगप्रकरणी मय्यपनचा सहभाग आहे, अशी कोणतीही बाब तपासात पुढे आलेली नाही. त्यामुळे, याप्रकरणाशी त्याचा आताच संबंध जोडणे योग्य होणार नाही, असे गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले. दरम्यान, मय्यपनला क्रिकेटबद्दल अधिक माहिती नसल्याचा दावाही चौकशीदरम्यान विंदूने केला आहे.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe

No comments:

Post a Comment