नैसर्गिक लोण्यात ५० टक्के प्रमाण सॅच्युरेटेड फॅट्सचे तर ४ टक्के प्रमाण हे ट्रान्सफॅट्सचे असते. मात्र कृत्रिमरीत्या तयार करण्यात आलेल्या लोण्यात २८ टक्के प्रमाण सॅच्युरेटेड फॅट्सचे तर ट्रान्सफॅट्सचे प्रमाण एक टक्क्याहूनही कमी असते. नसर्गिक लोण्याच्या सेवनाचा त्याग करून कृत्रिम लोण्याचा वापर करणे हा एक आरोग्यदायक निर्णय ठरू शकतो. फॅट (चरबीयुक्त पदार्थ) खाणे टाळा. फॅट वाईट आहे.' भरपूर फॅट खा, फॅट चांगले आहे.' थोडे फॅटच खा, खराब फॅटपासून दूर राहा.' अशा प्रकारे फॅट्सविषयी सगळीकडे गोंधळ दिसून येतो. त्यामुळे अगदी सकाळी नाश्त्याच्या टेबलवरील टोस्टपासून सुपर मार्केटमधील रॅकपर्यंत सगळीकडे नेमके काय खरेदी करायचे? याबाबत आपला गोंधळ सुरू असतो. अशा प्रकारच्या गोंधळाच्या वातावरणामुळे नेमकी कोणती निवड करायची हा निर्णय घेणे त्रासदायक ठरते. आहारासाठी योग्य पदार्थाचा शोध घेताना आपला गोंधळ कायमच राहतो. चला आता फॅट्सविषयी काही पथ्ये जाणून घेऊ या. फॅट्सचे असंख्य प्रकार असतात. अतिरिक्त कॅलरीजचे ग्रहण करून आपले शरीर स्वत:ही फॅट्स तयार करत असते. वनस्पती तसंच प्राणी हा स्रेत असणा-या पदार्थामधूनही शरीराला बाहेरून फॅट्सचा पुरवठा होतो, ज्याला 'आहारजन्य फॅट्स' असे म्हणतात. या मॅक्रोन्यूट्रिएंटच्या माध्यमातून शरीरासाठी ऊर्जा उपलब्ध होत असते. आहारजन्य फॅट्समधील सर्वात वाईट प्रकार म्हणजे सॅच्युरेटेड तसेच ट्रान्सफॅट्स. या फॅट्समुळेच अधिक कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा तसेच हृदय आणि रक्तवाहिन्यांचे विकार उद्भवत असतात. वास्तविक या प्रकारच्या विशिष्ट फॅट्समुळे असंख्य प्रकारचे विकार उद्भवतात; परंतु याचा अर्थ असा नाही की, आपल्या शरीराला फॅट्सची गरजच नाही. शरीराला ऊर्जा प्रदान करण्यासाठी तसेच शरीराची विविध कार्य योग्य प्रकारे सुरू राहण्यासाठी फॅट्सची गरज असते. पॉलिअनसॅच्युरेटेड फॅट्स ज्यांना आवश्यक फॅटी अॅसिड्स म्हणूनही ओळखले जाते. यांच्यामुळे एलडीएल कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. मेंदूच्या विकासाला चालना देतात, शरीराचा दाह नियंत्रित करतात तसेच स्वस्थ त्वचा आणि केस वाढीस मदत होत असते. दुसरीकडे सॅच्युरेटेड आणि ट्रान्सफॅट्समुळे हृदयविकाराचा धोका संभवत असतो. त्यामुळे रक्तातील घातक अशा एलडीएल कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढत असते. नसर्गिक लोणी आणि कृत्रिम लोणी यामधील पर्यायांची निवड लोणी हा डेअरीमधून तयार होणारा पदार्थ आहे. गायीचे दूध घुसळून त्यापासून लोणी तयार करता येते. या प्रकारच्या लोण्यात ५० टक्के प्रमाण सॅच्युरेटेड फॅट्सचे तर ४ टक्के प्रमाण हे ट्रान्सफॅट्सचे असते. दुसरीकडे कृत्रिमरीत्या तयार करण्यात आलेल्या लोण्यात २८ टक्के प्रमाण सॅच्युरेटेड फॅट्सचे तर ट्रान्सफॅट्सचे प्रमाण एक टक्क्याहूनही कमी असते. (सुमारे ०.१ ते ०.२ टक्के) तरीही नसर्गिक लोण्याचा पर्याय म्हणून कृत्रिम लोण्याचे सेवन शरीरासाठी खरेच लाभदायक ठरू शकेल काय? अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यास अहवालानुसार या प्रश्नाचे उत्तर होय असेच आहे. हारवर्ड टी.एच.चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमध्ये काम करणा-या संशोधकांनी गेल्या ३० वर्षापासून लोकांच्या आहाराबाबत अध्ययन सुरू ठेवले आहे. त्यांनी केलेल्या अभ्यासानुसार नसर्गिक लोण्यातील सॅच्युरेटेड फॅट्सऐवजी कृत्रिम लोण्यातील अनसॅच्युरेटेड फॅट्सचे सेवन केल्यास हृदयविकाराचा धोका टाळणे शक्य आहे. सॅच्युरेटेड फॅट्समध्ये कॅलरीजचे प्रमाण अधिक असते. त्यांच्या सेवनामुळे रक्तामधील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढत असते. संशोधकांच्या हेदेखील निदर्शनास आले की, काही लोक सॅच्युरेटेड फॅटी अॅसिड घटक असणा-या पदार्थाऐवजी काबरेहायड्रेडयुक्त पदार्थाचा आहारात समावेश करतात तर काही जण आरोग्यदायी फॅट्स असणा-या पदार्थाचे सेवन करतात. सॅच्युरेटेड फॅटसमधून उपलब्ध होणा-या ५ टक्के ऊर्जेऐवजी पॉलिअनसॅच्युरेटेड फॅट्स किंवा मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स तसेच काबरेहायड्रेडसयुक्त पदार्थामधील ऊर्जेचा वापर हा अनुक्रमे २५, १५ आणि ९ टक्के इतक्या प्रमाणात हृदयविकाराचा धोका कमी करतो. २८ टक्के सॅच्युरेटेड फॅट्स असणा-या लोण्याच्या तुलनेत कृत्रिम लोण्यामध्ये हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी पोषक घटक असतात. त्याच्यात कोलेस्टेरॉल नसते. नसर्गिक लोण्याऐवजी स्प्रेड किंवा कृत्रिम लोणी तयार करीत असताना हायड्रोजेनेशन प्रक्रियेचा वापर करण्यात येतो. त्यामुळे ट्रान्स फॅटी अॅसिड तयार होत असते. नवीन तंत्रज्ञानानुसार पदार्थ गोठवण्यासाठी हायड्रोजेनेशन प्रक्रियेची गरज भासत नाही. त्यामुळे ट्रान्स फॅटी अॅसिडची समस्या टाळता येते. ही गोष्टही लक्षात घेण्यासारखी आहे की जगातील खूप कमी प्रकारच्या स्प्रेड्समध्येच कोणत्याही प्रकारच्या हायड्रोजेनरेटेड फॅट्सचा पूर्ण अभाव असतो. भारतातही त्यापैकी काही उपलब्ध आहेत. कृत्रिम लोणी रेफ्रिजरेटरमधून बाहेर काढल्यानंतरही तसेच मऊ असल्यामुळे थेट खाण्यावर स्प्रेड करण्यासाठी वापरता येऊ शकते. नसर्गिक लोण्याबाबत हे अजिबात शक्य नाही. त्यामुळे कंबरेचा घेर तसेच हृदयासाठी कृत्रिम लोणी खूपच उपयुक्त ठरत असते. नसर्गिक लोण्याच्या सेवनाचा त्याग करून कृत्रिम लोण्याचा वापर करणे हा एक आरोग्यदायक निर्णय ठरू शकतो. अधिक कोलेस्टेरॉल आणि हृदयविकाराची परंपरा असणा-या कुटुंबांसाठी तर हा निर्णय खूपच शहाणपणाचा आहे. वजन नियंत्रण तसेच चांगल्या आरोग्यासाठी पोषक आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शेवटी निर्णय तुमचाच आहे. |