Monday, June 27, 2016

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » ???? ???? ?????????

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » ???? ???? ?????????

सिकल सेलवर २ तासांत उपचार

'सिकल' या इंग्रजी शब्दाचा अर्थ म्हणजे गवत कापण्याचा विळा किंवा कोयता. 'सिकलसेल अ‍ॅनिमिया' हा लाल रक्तपेशींमधील दोषामुळे होणारा आजार आहे.

'सिकल' या इंग्रजी शब्दाचा अर्थ म्हणजे गवत कापण्याचा विळा किंवा कोयता. 'सिकलसेल अ‍ॅनिमिया' हा लाल रक्तपेशींमधील दोषामुळे होणारा आजार आहे. निरोगी माणसाच्या लाल रक्तपेशींचे सूक्ष्मदर्शक यंत्राखाली निरीक्षण केल्यास त्यांचा आकार गोलाकार दिसतो. पण सिकल सेल रुग्णाच्या लाल रक्तपेशी विळ्यासारख्या आकाराच्या, वेडय़ावाकडय़ा दिसतात.

४२ वर्षीय रमाकांत जाधव (नाव बदलले आहे) यांना जनुकीय दोषामुळे रक्ताच्या पेशीमधील हिमोग्लोबीनचे दोष निर्माण करणारा आजार म्हणजेच सिकल सेलचा आजार होता. सिकल सेलच्या पेशींचे आयुष्यमान हे फक्त २० दिवसांचे असल्याने रमाकांत जाधव यांची रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्यामुळे त्याना विविध आजारांची लागण झाली होती.

अशातच त्याना पित्ताशयाच्या खडयांचा भयंकर त्रास होत असल्याने डॉक्टरांनी पित्ताशय काढून टाकण्यास सांगितलं होतं. सिकल सेल हा आजार झालेल्या व्यक्तीच्या शरीरात ७० टक्के रक्त हे अशुद्ध असल्याने ते अशुद्ध रक्त काढून शरीरात शुद्ध रक्त भरणे फार गरजेचे असते व ही प्रकिया टप्याटप्प्याने किमान १ ते २ महिने करावी लागते. परंतु या केसमध्ये रुग्णाची तब्येत सिकल सेल व इतर आजारामुळे फार गंभीर झाली होती.

त्यामुळे मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलचे क्लिनिकल रक्तविकारतज्ज्ञ डॉ. दीपांजन हलदर यांनी वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये असलेल्या आधुनिक वैदकीय तंत्रज्ञानाच्या मदतीने एकाच वेळी अशुद्ध रक्त काढून शुद्ध रक्त चढवण्याची किमया केली. अशा प्रकारची कार्यपद्धत भारतामध्ये फारच थोडय़ा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. याविषयी अधिक माहिती देताना वोक्हार्ट हॉस्पिटलचे क्लिनिकल रक्तविकातज्ज्ञ व रुधिरशास्त्रज्ञ डॉ. दीपांजन हलदर म्हणाले, ''सिकल सेल या आजारावर अद्याप थेट उपचार नाहीत.

जनुकीय दोषामुळे रुग्णाची रोगप्रतिकारकशक्ती कमी होऊन शरीरात अनेक आजाराची लागण होत असते अशा वेळी त्या रुग्णाचे आयुष्य वाचवायचे असेल तर वारंवार शुद्ध रक्ताचा पुरवठा शरीरात करावा लागतो कारण नवीन रक्तही काही दिवसांतच सिकल सेलच्या पेशीना बळी पडते. रमाकांत जाधव यांच्यावर वेळ न दवडता अशुद्ध रक्त बदलण्याची व पित्ताशय काढण्याची शत्रक्रिया करणे गरजेचे होते.

वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये असलेल्या आधुनिक वैद्यकीय सुविधांमुळे रुग्णाच्या शरीरातील ७० टक्के रक्त फक्त २ तासांत बदलण्याची प्रकिया यशस्वीरीत्या पार पाडू शकलो. सिकल सेल असलेल्या रुग्णांनी नियमित रक्त चाचणी व योग्य आहार घेतल्यास वयोमर्यादा वाढू शकते.

सिकल सेल असलेल्या व्यक्तीने सिकल सेल गुणधर्म असलेल्या (वाहक किंवा पीडित) व्यक्तीशी लग्न केल्यास त्यांच्या होणा-या अपत्यातही सिकल सेल गुणधर्म आढळू शकतो. त्यामुळे या आजाराचे रुग्ण मूल जन्मास येऊ नये याबद्दल काळजी घेण्याची संकल्पना वैद्यकीय क्षेत्रात समोर आली आहे.''

सिकल सेल रोगाविषयी

सिकल सेल या आजाराचे रुग्ण जगभर सापडतात. पण आफ्रिका, सौदी अरेबिया आणि भारतात या आजाराचे प्रमाण अधिक आहे. आपल्या देशात मध्य भारतात याचे रुग्ण अधिक सापडतात.

'सिकल सेल' आजार आनुवंशिक असतो. भिल्ल, आदिवासी किंवा वंचित घटकांमध्ये सर्वसाधारणपणे हा रोग आढळतो. छोटे जनसमुदाय किंवा ज्या समुदायांमध्ये नात्यांत विवाह होतात, त्यांच्यात 'सिकल सेल'चे प्रमाण जास्त आढळते. महाराष्ट्रात सातपुड्याचा पट्टा, गडचिरोली, धुळे, विदर्भ आदी भागांत या आजाराचे प्रमाण जास्त आहे.

Read More »

फादर्स मानसिक ताणतणावाच्या विळख्यात

नवी मुंबईत फादर्स डेच्या निमित्ताने एक सर्व्हेक्षण केलं. त्यात अधिकाधिक वडील हे तणावाखाली आढळले.

संपूर्ण भारतात सेलिब्रेट झालेल्या 'फादर्स डे'च्या निमित्ताने वाशी येथील स्टर्लिंग वोक्हार्ट हॉस्पिटलतर्फे ४० वर्षावरील वडिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले होते. या शिबिरात नवी मुंबईतील ८० हून अधिक पालकांनी भाग घेतला होता व यातील ४० हून अधिक पालकांमध्ये मानसिक ताणतणावाची विशेष लक्षणे आढळून आली.

मानसिक ताणतणाव म्हणजे आजच्या युगाचे अविभाज्य अंग असं म्हटल्यास वावगं ठरू नये. आधुनिक जीवनशैलीमुळे आपले आयुष्य एखाद्या यंत्रमानवासारखे झाले असून कायम तणावग्रस्त राहिल्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब व हृदयरोग अशा आजारांना अनेक नागरिक बळी पडत आहेत.

या शिबिरात भाग घेतलेल्या ४० पालकांमध्ये झोपेच्या तक्रारी, डोकेदुखी, रक्तदाब वाढणे, छातीत दुखणे, केस गळणे, वारंवार पचनाच्या तक्रारी उद्भवणे, दम्याचा त्रास, वजन वाढणे किंवा कमी होणे असे आजार आढळून आले. या पालकांवर स्टìलग वोक्हार्ट हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांनी यावर पुढील वैद्यकीय उपचार सुचविले असून ताणतणावांचं व्यवस्थापन कसे करावे यावरही मार्गदर्शन केले.

याविषयी अधिक माहिती देताना स्टìलग वोक्हार्ट हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख डॉ. मेहुल कालावाडिया म्हणाले, ''लॅपटॉप व स्मार्टफोनच्या विळख्यात आजचे पुरुष इतके अडकले आहेत की घरी आल्यावरही कार्यालयातील काम संपत नाही. इतकेच काय तर अनेकदा लॅपटॉपवर उशिरापर्यंत काम करावे लागते.

कुटुंबासोबत बाहेर फिरायला गेले असताना बॉसच्या मेलला उत्तर द्यावे लागते. यामुळे नकळत कुटुंबातील सदस्य तुमच्यावर नाराज होतात व ताण वाढत जातो. याशिवाय आपल्या आयुष्यातले विरोधाभास सुद्धा या मानसिक ताणतणावात भरच घालतात.

बाहेरून घरी येताना पाहिलेलं झगमगीत जगणं आणि आपली राहती वस्ती आणि तिचा बकालपणा, वस्तीतलं नकारात्मक वातावरण, त्यातच असलेलं आपलं लहानसं घर, महागाईमुळे मुलांच्या उच्च शिक्षणात आलेल्या अडचणी या मानसिक ताणतणाव वाढविण्यास हातभार लावतात, याचबरोबर घटस्फोट, जवळच्या नातेवाइकांचा मृत्यू, नोकरीतील आव्हाने, उशिरा झालेले लग्न व नवीन घर घेणे अशी नवीन कारणेही समोर आली आहेत.''

Read More »

हस्त पद अंगुष्ठासन

योगामॅटवर पाठीवर झोपावे. शरीर हे सरळ आणि एका रेषेत असावे. आता हळुवारपणे उजव्या बाजूला टर्न व्हावे म्हणजेच एका कुशीवर झोपावे जसे चित्रात दाखवले आहे अगदी तसे. हात हा सरळ असावा.

हाताला थोडंसं स्ट्रेच द्यावे. उजवा हात हा डोक्याखाली असावा. म्हणजे पूर्ण शरीर हे एका रेषेत राहील तसंच बॅलन्सपण राहील. आता हळुवारपणे डावा पाय उचलावा. त्याचबरोबर डावा हातसुद्धा वरती न्यावा.

डाव्या हाताने डावा पायाचा अंगठा पकडावा. काही सेकंद थांबावे. या आसनात थांबलं असताना शरीर हलता कामा नये. शक्यतो शरीराला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करावा. आता प्रथम हळुवारपणे पायाला खाली आणावं. मग हाताला खाली आणावं. पाठीवर झोपावं. थोडा वेळ विश्रांती घेऊन मग हे आसन डाव्या बाजूने करावं.

श्वास

श्वास घेत हाताला आणि पायाला वरती आणावे. आसन स्थितीत नियमित श्वासोच्छ्वास करावा. श्वास सोडताना हाताला आणि पायाला खाली आणावं.

वेळ

सुरुवातीला हे आसन ४-५ वेळा करावं. एका बाजूने दहा आकडे मोजावेत किंवा सुरुवातीला जेवढे थांबता येईल तेवढे थांबण्याचा प्रयत्न करावा.

काय काळजी घ्यायची

» पूर्ण शरीर एका कुशीवर घेतो तेव्हा थोडा वेळ या आसनात थांबावं. पूर्ण शरीराचा तोल सांभाळावा. नंतर अलगद पायाला वरती आणावं. सुरुवातीला जेवढं वरती नेता येईल तेवढं वरती नेण्याचा प्रयत्न करावा. पायाला वरती आणताना झटका मारून वरती आणू नये. तसंच एकदम जोरात पायाला वरती नेऊ नये. तसं केल्याच कंबरेत चमक भरण्याची शक्यता आहे.

» पायाला वरती आणल्यावर थोडे सेकंद थांबावे. शरीराला बॅलन्स करावे, मग हळुवारपणे हाताला वरती आणून पायाचा अंगठा पकडू शकला नाहीत तरी चालेल. सुरुवातीला होणार नाही, पण हे आसन नित्यनेमाने केल्यास तुम्ही करू शकाल.

» तसंच आसन सोडताना घाई करू नये. जशी आपण आसनाची सुरुवात केली अगदी तसंच त्या पद्धतीने आसन सोडावं. थोडा वेळ विश्रांती करून हे आसन दुस-या बाजूने करावे.

विशेष नोंद

ज्या व्यक्तींना सायटिका आहे, त्या व्यक्तींनी हे आसन करू नये.

फायदे

» हाताला आणि पायाला चांगलाच ताण मिळतो.

» नित्य सरावाने स्नायू लवचिक होतात. लवचिकता वाढते.

» या आसनाच्या मदतीने नितंब आणि मांडयांवरील चरबी कमी होण्यास मदत होते.

» शरीराचा तोल सांभाळण्यास मदत होते.

Read More »

पावसाळ्याचा खास मेनू

सर्वाना हवाहवासा असलेला हा पावसाळा आपल्यासोबत आरोग्याच्या अनेक समस्यांना घेऊनच येतो. पावसाळ्यामध्ये शरीरात दोष उद्भवतात (वात, पित्त आणि कफ) आणि त्याची परिणती पचनसंस्था कमजोर होण्यात, प्रतीकारशक्ती कमी होण्यात होते. त्यामुळे पावसाळ्यात आपले शरीर निरोगी ठेवायचे असेल तर काही खबरदा-या घेणे क्रमप्राप्त आहे. खाण्याच्या चांगल्या सवयी आणि आरोग्यदायी पदार्थ तुम्हाला आजारांपासून लांब ठेवण्यास मदत करू शकतील.

उन्हाळ्याची जबरदस्त काहिली सोसून हैराण झाल्यानंतर आलेल्या पावसाळ्यामुळे सगळ्यांनी हुश्श केले आहे. या वर्षी लोक पावसाची अगदी चातकासारखी वाट पाहत होते. परंतु, सर्वाना हवाहवासा असलेला हा पावसाळा आपल्यासोबत आरोग्याच्या अनेक समस्यांना घेऊनच येतो.

पावसाळ्यामध्ये शरीरात दोष उद्भवतात(वात, पित्त आणि कफ) आणि त्याची परिणती पचनसंस्था कमजोर होण्यात, प्रतीकारशक्ती कमी होण्यात होते. पावसाळ्यात फूड पॉयझिनग, अपचन होणे, जुलाब होणे, कावीळ होणे आणि इतर अनेक समस्या समोर येतात. त्यामुळे पावसाळ्यात आपले शरीर निरोगी ठेवायचे असेल तर काही खबरदा-या घेणे क्रमप्राप्त आहे. खाण्याच्या चांगल्या सवयी आणि आरोग्यदायी पदार्थ तुम्हाला आजारांपासून लांब ठेवण्यास मदत करू शकतील.

पावसाळ्यात आवर्जून खावेत असे पदार्थ

भाजलेले मक्याचे कणीस/भुट्टा

पावसाळ्यात लिंबाचा रस पिळलेला आणि मीठ शिंपडलेला भुट्टा खायला कोणाला आवडत नाही. मका चविष्ट तर आहेच, शिवाय आरोग्यासाठीदेखील लाभदायक आहे. मक्यामुळे किडनी, पोट आणि हृदयाच्या समस्या उद्भवत नाहीत. मक्यात अनेक व्हिटॅमिन्स असल्याने तो पावसाळ्यात आवर्जून खावा. मका मूळत:च कोरडा असल्याने तो शरीरात पाणी साठून राहण्यास प्रतिबंध करतो. मक्यामध्ये मोठय़ा प्रमाणावर विद्राव्य फायबर असल्याने तो पोटाच्या आरोग्यासाठीदेखील उपयुक्त ठरतो. मक्यात व्हिटॅमिन बी ६, थायमिन, नियासिन, फोलेट आणि रायबोफ्लेविन असल्याने तो बी व्हिटॅमिनचा चांगला स्त्रोत ठरतो. मक्यात अगदी थोडय़ा प्रमाणात व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई देखील असते.

गरमागरम रसम

रसम म्हणजे आंबट गोड, झणझणीत असे दक्षिण भारतीय सूप. रसममुळे पोटामध्ये पाचक रस स्र्वण्यात वाढ होते आणि ते पावसाळ्यात कमजोर झालेल्या पचनशक्तीकरिता लाभदायक ठरते. रसममधील टोमॅटो, चिंच, काळीमिरी,कडीपत्ता इ.मुळे रसम स्वादिष्ट आणि पोषक बनतो. रसममधील चिंच आणि टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडण्ट्स आणि व्हिटॅमिन सी असल्याने आपल्या शरीरात ऑक्सिडीकरणाने झालेले नुकसान भरून निघते. या घटकांमुळे कफ आणि थंडीला प्रतिबंध होतो. रसममधील काळ्यामिरीमुळे वजन कमी होण्यास मदत होते. काळ्यामिरीमुळे घाम सुटतो आणि घामावाटे शरीरातील अनेक विषारी द्रव्ये शरीराबाहेर टाकली जातात. काळ्यामिरीमुळे जास्तीत जास्त प्रमाणावर मूत्र तयार होते आणि चयापचयात वाढ होते.

आल्याचा चहा

पावसाळ्यात आल्याचा चहा घेणे म्हणजे सुख असते. त्यात चवीकरिता मध किंवा लिंबूही टाकता येते. आल्याच्या चहामुळे भूक लागते आणि वाढतेदेखील. आल्यामुळे सांध्यांमधील आणि स्नायूंमधील काठिण्य व दाह कमी होत असल्याने आल्याचा चहा आथ्र्राटिसच्या रुग्णांकरिता अतिशय उपकारक ठरतो. कफ झाला असेल, थंडी, ताप असेल किंवा श्वसनाच्या समस्या असतील तर आल्याचा चहा गुणकारी ठरतो. सकाळी मळमळल्यासारखे होत असल्यास केव्हाही आल्याचा चहा घेणे उत्तम!

पावसाळ्यात हेही करा..

» पावसाळ्यात संसर्गाना प्रतिबंध करणा-या चिंच, मेथी, लसून, कांदा अशा पदार्थाचे सेवन करावे. आले आणि लसूनामध्ये मोठय़ा प्रमाणात असणा-या सल्फरमुळे विषाणूंमुळे होणारे आजार आणि इतर अनेक आरोग्यविषयक समस्यांपासून संरक्षण मिळते.

» पावसाळ्यात आरोग्याची सर्वतोपरी काळजी घेतली पाहिजेच. पावसाळ्यात आपला आहार संतुलित असेल याची खबरदारी घ्यावी. आपल्या रोजच्या खाण्यात मोसमी फळांचा आणि भाज्यांचा आवर्जून समावेश करावा.

» शिळे किंवा रस्तावरचे पदार्थ खाऊ नका. ताजे, नुकतेच शिजवलेले अन्न खाण्यावर भर द्या. पावसाळ्यात दूषित पाण्याची समस्या उद्भवत असल्याने पाणी गाळून घेण्याकरिता उत्तम फिल्ट्रेशन सिस्टीम वापरण्याची किंवा पाणी उकळून घेण्याची खबरदारी घ्यावी.

» पावसाळ्यात पाणी पिण्याची इच्छा होत नाही किंवा तहान लागत नाही. पण तरीही दिवसातून दहा ग्लास पाणी पोटात गेलेच पाहिजे.

पावसाळ्यात हे पदार्थ खाणे टाळा

पकोडे / भज्या

पावसाळ्यात चहा आणि भजी खाण्याचा मोह कोणाला होणार नाही. पण हीच भजी रस्त्यावरची असेल तर ती किती वेळा तळली गेली असेल किंवा अस्वच्छ जागी बनली असेल याची कल्पना करवत नाही. तुम्ही ती घरी करत असाल तरीही भजी खाणे शक्यतो टाळाच. कारण पावसाळ्यामध्ये शरीराची पचनशक्ती कमजोर झालेली असते आणि बेसनाने बनलेल्या भज्या पचनशक्तीवर प्रचंड ताण आणतात.

चाट / पाणीपुरी

चाट हे रस्त्यावरचे अजून एक लोकप्रिय खाणे. पाणीपुरी, दहिपुरी, रगडा पॅटिस, भेलपुरी इ. सर्व प्रकार चाटमध्ये मोडतात. हे चटकदार खाणे आहे आणि अर्थातच लोकांच्या अतिशय आवडीचे आहे. पण पावसाळ्यामध्ये प्रदूषित पाण्याची समस्या असल्याने हे पदार्थही तितकेच आपल्याला आजारी बनवू शकतात. या चाटकरिता लागणा-या चटण्या कोथिंबिरीपासून बनलेल्या असतात.

पावसाळ्यात हवेत आद्र्रता जास्त असल्याने कोथिंबीर फार लवकर खराब होते आणि तिच्यात बुरशी किंवा अमिबा असे सूक्ष्म जीव-जीवाणू वाढीस लागण्याची शक्यता असते. पुन्हा हे सर्व पदार्थ उघडय़ावर ठेवलेले असतात. स्वच्छतेच्या दृष्टीने हे पदार्थ सरसकट टाळले जायला हवेत. तुम्ही हे उघडय़ावरचे अस्वच्छ पदार्थ खाल्लेत तर अतिसार, कावीळ, अमिबायसिस आणि इतर आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

चायनीज

कृत्रिमरंग, अजिनोमोटो, मीठ व तेलाचे प्रचंड प्रमाण असलेल्या सॉसेसची भर त्याच्यामुळे चायनीज खाणे आरोग्याकरिता अतिशय वाईट खाणे ठरते. रस्त्यावरचे खाल्ले जाणारे चायनीज म्हणजे हवेतून आणि पाण्यातून पसरणा-या आजारांची बजबजपुरी असते. असे अस्वच्छ आणि शरीरास अपायकारक पदार्थ खाल्ल्याने श्वसनास त्रास होणे, मळमळल्यासारखे वाटणे, डोकेदुखी, मायग्रेन्स, तोंडाची जळजळ, पोटदुखी इ. समस्या होऊ शकतात.

मासे आणि इतर सीफूड

पावसाळा हा माशांच्या प्रजननाचा काळ असतो, त्यामुळे पावसाळ्यात मासे खाणे टाळावे.

पालेभाज्या

पालेभाज्या खाणे शरीराकरिता अतिशय लाभदायक असते ही वस्तुस्थिती असली तरी पावसाळ्यात या भाज्यांना चिखल, घाण लागण्याचे, त्यांमध्ये जीव-जीवाणू वाढीस लागण्याचे, ओलाव्याने भाज्या कुजण्याचे आणि त्यामुळे पोटाचे संसर्ग होण्याचे प्रमाण वाढते.

पालेभाज्या खायच्या असतीलच तर त्या सर्वप्रथम पोटॅशियम परमॅगनेटने धुवून घ्या आणि त्यानंतर स्वच्छ पाण्यात धुवून काढा, जेणेकरून त्यांतील सर्व घाण, माती आणि जीव-जीवाणू निघून जातील.

काबरेनेटेड पेये

काबरेनेटेड पेयांमुळे शरीरातील मिनिरल्स कमी होतात तसेच शरीराची एन्झाईम्स तयार करण्याची क्षमताही मंदावते. याची परिणती अपचन होण्यात होते. पावसाळ्यात पचनशक्ती कमजोर होत असल्याने किमान पावसाळ्यात तरी काबरेनेटेड पेये पिणे टाळलेले उत्तम.

पावसाळ्यात तुमचे खाद्यपदार्थ ताजे आणि स्वच्छ कसे ठेवावेत?

» भाज्यांवर फार काळ पाणी राहू देऊ नका. भाज्या ओल्या किंवा दमट असतील तर त्यांमध्ये बुरशी आणि जीवाणूंची वाढ होण्याची शक्यता वाढते. भाज्या व फळे पूर्णपणे कोरडी करा आणि ती कागदात गुंडाळून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.

» भाज्या आणि फळे कापून फ्रीजमध्ये ठेवू नका.

» खाण्याचे पदार्थ, अन्न नेहमी झाकून ठेवा. घर स्वच्छ ठेवा.

» नेहमी नुकतेच तयार केलेले ताजे अन्न खा. शिळे पदार्थ खाणे टाळा.

» कोबी, कॉर्नफ्लॉवर आणि इतर फुलभाज्या मिठाच्या पाण्यात धुवून मगच वापरा.

» हिरव्या पालेभाज्या देखील मिठाच्या पाण्याने किंवा पोटॅशियम परमॅगनेटने धुवून घ्या.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe