वेदना ही खरं तर एक संरक्षणात्मक यंत्रणा असते जी तुमच्या मेंदूला, शरीराला झालेल्या इजेबाबत सूचित करते. वेदना म्हणजे निव्वळ संवेदना नसते तर त्यातून भावनिक परिणामही होत असतात. बहुतांश वेदना या आर्थरायटिसमुळे होतात. आर्थरायटिस म्हणजे संधिवात. हा आजार शरीराच्या सांध्यांना होतो. वेदना ही खरं तर एक संरक्षणात्मक यंत्रणा असते जी तुमच्या मेंदूला, शरीराला झालेल्या इजेबाबत सूचित करते. वेदना म्हणजे निव्वळ संवेदना नसते तर त्यातून भावनिक परिणामही होत असतात. वेदनेमुळे आपण निराश किंवा बेचैन होतो. वेदनेमुळे पुढे आपल्याला रात्री नीट झोप लागत नाही, त्यामुळे थकल्यासारखे वाटते आणि अस्वस्थता वाढू लागते. शरीराच्या कोणत्याही अवयवाला वेदनेची झळ पोहोचू शकते, विशेषत: हाडे, गुडघे आणि कंबरेचे सांधे. गुडघे आणि कंबरेत वेदना होण्याचे सर्वसामान्य कारण म्हणजे लिगामेण्टला दुखापत होणे, कार्टलेज फाटणे, टेण्डोनिटिस आणि रनर्स नी. बहुतांश वेदना या आर्थरायटिसमुळे होतात. आर्थरायटिस म्हणजे संधिवात. हा आजार शरीराच्या सांध्यांना होतो. संशोधन अभ्यासानुसार, आर्थरायटिसचे सर्रास आढळणारे प्रकार म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस (ओए), ऱ्हुमेटॉईड आर्थरायटिस, सोरायटिक आर्थरायटिस आणि गाऊट. नोकरदार महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांना संधिवात इतरांहून लवकर ग्रासतो. त्यामुळे दैनंदिन व्यवहारांवर मोठय़ा प्रमाणावर परिणाम होतो. परिणामी त्यांच्या सक्रिय जीवनशैलीवर मर्यादा पडतात. पुरुष आणि महिला सर्वसाधारणपणे नोकरी सोडून देतात तर विद्यार्थी कॉलेजला जाण्यास नाखूश असतात. गृहिणी स्वयंपाक बनवू शकत नाहीत आणि नेहमीची घरातली कामेही करू शकत नाहीत. इतकेच नव्हे तर जिने चढणे आणि व्यायाम करणे जिकिरीचे बनते. वेदनेची तीव्रता व्यक्तीगणिक वेगवेगळी असते. ती मंद ते मध्यम असू शकते. औषधं तसंच नियमित व्यायामामुळे त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. पेन मॅनेजमेंटमधली सर्वात पहिली पायरी म्हणजे आपल्या वेदनेचे मूळ कळण्यासाठी सर्वप्रथम डॉक्टरांची अपॉइंटमेण्ट घेणे. त्याचबरोबर त्यासाठी पेन मॅनेजमेंटचा कोणता मार्ग सर्वाधिक प्रभावी ठरू शकतो याची माहिती करून घेणे. पेन मॅनेजमेण्टचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तुम्हाला अपेक्षित असलेला आराम मिळण्यासाठी योग्य उपचारांचे कॉम्बिनेशन आवश्यक आहे. जळजळ आणि वेदनांना नियंत्रणात आणण्यासाठी प्रिस्क्रिप्शन आणि डॉक्टरांनी शिफारस केलेली ओव्हर द काऊण्टर औषधे मदत करू शकतील. उपचारांचे इतर शस्त्रक्रियारहित मार्ग म्हणजे- व्यायाम/फिजिओथेरपी, अॅक्युपंक्चर, ध्यानधारणा, मसाज आणि हळदीसारख्या हर्बल सप्लिमेण्टसचा वापर. शस्त्रक्रियेचा मार्ग म्हणजे टोटल नी रिप्लेसमेण्ट (टीकेआर). शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो तेव्हा रुग्ण आणि त्याच्या कुटुंबाने कोणतीही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी त्याची साद्यंत माहिती करून घेणे अत्यावश्यक आहे. गेल्या काही वर्षामध्ये टोटल नी रिप्लेसमेण्ट या शस्त्रक्रियेमध्ये मोठय़ा प्रमाणावर बदल घडून आले आहेत. पिनलेस कॉम्प्युटर नेव्हिगेशनच्या वापरामुळे गुडघेबदल शस्त्रक्रियेचे निकाल आता अधिक सकारात्मक आणि अचूक येऊ लागले आहेत. आजच्या काळातल्या सक्रिय रुग्णांची गरज लक्षात घेता, तांत्रिकदृष्टय़ा अत्यंत प्रगत असणा-या ऑक्सिडाइज्ड झिर्कोनियम या बेअरिंग घटकाचा यशस्वीरित्या वापर केला जाऊ लागला आहे. ते ३० वर्षापर्यंत (प्रयोगशाळेतल्या चाचणीनुसार) टिकते. अशा प्रगत घटकांमुळे अधिक चांगले काम करणारे आणि दीर्घकाळ टिकणारे इम्प्लाण्ट्स बनवता येऊ लागले आहेत. त्यामुळे हे अशा लोकांसाठी बनवण्यात आले आहेत ज्यांना आपल्या सक्रिय जीवनशैलीबाबत कोणत्याच प्रकारची तडजोड करायची नाहीय. वेदनेमुळे आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ लागतो, तेव्हा तुम्हाला मदतीची आवश्यकता असते. सातत्याने होणा-या वेदनेकडे दुर्लक्ष करता कामा नये. वेदनेने अधिक गंभीर स्वरूप धारण करण्यापूर्वीच योग्य ती खबरदारी घ्यावी. |