भारतीयांमध्ये सध्या वाढत असलेली ड जीवनसत्त्वाची कमतरता ही वैद्यकीय क्षेत्राच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. भारतीयांमध्ये सध्या वाढत असलेली ड जीवनसत्त्वाची कमतरता ही वैद्यकीय क्षेत्राच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. भारतीय वैद्यक संघटनेच्या (आयएमए) मुंबई शाखेच्या वतीनं ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी राईज अँड शाईन मोहिमेंतर्गत घाटकोपरमध्ये एका प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केलं होतं. ड जीवनसत्त्व हे कॅल्शियम आणि हाडांच्या सशक्तपणामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. मानसिक आजार, मधुमेह, कर्करोग आणि हृदयविकार तसंच शरीराच्या डाव्या बाजूला पोकळीत पेशींची अतिरिक्त वाढ होण्यापासून ड जीवनसत्त्व निर्बंध करते. जवळपास ८० ते ९० टक्के भारतीयांमध्ये या ड जीवनसत्त्वाची कमतरता आढळून येते. त्यामुळेच यावर चर्चा करण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये शहरातील ९० महत्त्वाचे डॉक्टर्स सहभागी झाले होते. दोन वर्षामध्ये देशभरातील ३० राज्ये आणि १७०० शाखांमधील अडीच लाख सदस्यांना ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेबाबत जागरूक करण्याबाबत संवेदनशीलता निर्माण करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. त्याशिवाय डॉक्टरांना काही महत्त्वाची अन्य प्रशिक्षणंही यामध्ये अंतर्भूत आहेत. ज्यामध्ये लोकांसमोर बोलणे, रुग्णांची ऑनलाईन नोंदणी ठेवणे, नवीन मोबाईल अॅप संस्कृतीविषयी माहिती करून घेणे, रुग्णाच्या मृत्यूची त्याच्या नातेवाइकांना बातमी संवेदनशीलपणे कशी सांगायची याबद्दलही प्रशिक्षण दिले जाते. भारतीय वैद्यक संघटनेचे मानद सरसचिव डॉ. एस. एस. अग्रवाल यांनी आपल्या निवेदनात ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेचे दीर्घकालीन परिणाम होतात. 'ड' जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे हृदयाशी संबंधित अनेक आजार जडतात. जसे हृदयविकार, रक्ताच्या गुठळ्यांमुळे हृदय बंद पडणे आणि झटका येण्याची भीती वाढते. २५ हायड्रोक्सिव्हिटॅमिन डीचे प्रमाण २५ पेक्षा कमी असल्यास उच्च रक्तदाब आणि मधुमेहाची, तसंच हृदयाशी संबंधित विकारांची शक्यता वाढते. लोकांना डी जीवनसत्त्वाचं प्रमाण जास्त असलेले पदार्थ घेण्यासाठी, सूर्यप्रकाशात अधिक वेळ घालवण्यासाठी, तसेच आवश्यक तेव्हा आणि तसे पूरक अन्न घेण्यासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे.' आयएमएचे घाटकोपरचे सचिव डॉ. हरेश टोलिया यांनी आपल्या निवेदनात सांगितले की, ''शरीरात ड जीवसत्त्वाचे पुरेसे प्रमाण असल्यास हाडे आणि दात मजबूत राहतात. कर्करोग, टाईप १ मधुमेह, धमन्या आक्रसणे अशा अनेक आजारांशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती निर्माण होते. तसेच शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण नियंत्रित ठेवले जाते आणि फॉस्फरस शोषून घेतला जातो. सारख्या प्रमाणात ड जीवनसत्त्व मिळवण्यासाठी उत्तर अमेरिकी किंवा युरोपीय लोकांच्या त्वचेपेक्षा दक्षिण आशिया किंवा आफ्रिकन्स लोकांच्या त्वचेसाठी जास्त प्रमाणात सूर्यप्रकाश आवश्यक असतो. भारतीय लोकांची २५ टक्के त्वचा सूर्यप्रकाशात उघडी राहत असेल तर (चेहरा, मान, हात आणि तळहात) तर त्यांना १५ ते २० मिनिटे सूर्यप्रकाश पुरेसा होतो. आणि १५ टक्के त्वचा सूर्यप्रकाशात उघडी राहत असेल तर (चेहरा, मान आणि हात) तर २०-३० मिनिटे सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते, असं सुचवण्यात आलं आहे. अर्थात यावर अन्य गोष्टींचाही परिणाम होतोच. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेमधल्या सूर्यप्रकाशात ड जीवनसत्त्वाचं प्रमाण सर्वात जास्त असतं. त्यामुळे या वेळेत सूर्यप्रकाशात बाहेर पडणे चांगलं असतं.'' |