Tuesday, March 8, 2016

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

बळकट हाडांसाठी..

चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी हाडं बळकट असणं आवश्यक आहे. विशेषत: महिलांमध्ये हाडं लवकर ठिसूळ होतात. स्नायू बळकट ठेवण्यासाठी आणि हाडांची झीज रोखण्यासाठी महिलांनी विशिष्ट गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांनी आपली हाडे निरोगी आणि बळकट ठेवण्यासाठी थोडी काळजी घेतली पाहिजे.

स्त्री आपल्या आयुष्यात अनेक भूमिका पार पाडत असते. ती कधी आई असते, तर कधी बहीण असते. कधी ती पत्नीच्या भूमिकेत असते तर कधी मैत्रीण; कधी मुलगी आणि अर्थातच प्रेरणेचा स्रेत म्हणूनही ती खंबीरपणे उभी असते. काम आणि वैयक्तिक आयुष्यात तिची कायमच फरफट होत राहते. सकाळी ती कामावर जाण्यासाठी प्रवास करते आणि रात्री कुटुंबातल्या सदस्यांची काळजी घेते. या सगळ्या जबाबदा-या पार पाडण्यात तिचं बरेचदा स्वत:कडे दुर्लक्षच होतं. विशेषत: हाडांच्या आरोग्याकडे तिचं दुर्लक्ष होतं ज्याचा परिणाम म्हणून भविष्यात तिच्या हाडांची झीज होऊ शकते.

महिलांमध्ये हाडांची झीज होण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. त्यात स्थूलपणा, अ‍ॅनोरेक्झियासारखे खाण्याचे विकार, आहारात कॅल्शियम किंवा 'ड' जीवनसत्त्वाचा अभाव, अजिबात व्यायाम न करणे किंवा जास्त व्यायाम करणे, धूम्रपान, विशिष्ट औषधांचे सेवन आणि इतर अनेक कारणांचा समावेश होतो. रजोनिवृत्तीनंतरच्या पहिल्या काही वर्षात हाडांची झीज झपाटय़ाने होते आणि उतारवयात ती होतच राहते. याचं प्रमुख कारण म्हणजे स्त्री रजोनिवृत्तीपर्यंत पोहोचते, तेव्हा तिच्यातली इस्ट्रोजेनची पातळी कमी होत जाते आणि त्यामुळे हाडांची झीज होऊ शकते. काही महिलांच्या बाबतीत हाडांची झीज अधिक तीव्र आणि जलद असते.

आकडेवारी सांगते की, भारतात होणा-या ६० टक्के जॉइण्ट रिप्लेसमेण्ट शस्त्रक्रिया या स्त्रियांवर होतात. जगभरात ऑस्टिओपोरॉयसिसमुळे वर्षभरात ८९ लाख फ्रॅक्चर्स होतात, ज्यामुळे दर तीन सेकंदाला एक ऑस्टिओपोरॉटिक फ्रॅक्चर होते. भारतात संधिवात हा जीवनशैलीमुळे होणारा एक प्रमुख विकार आहे आणि महिलांना हा विकार होण्याची शक्यता तिप्पटीने अधिक असते. पन्नास वर्षापेक्षा जास्त वय असणा-या तीनपैकी एकीला ऑस्टिओपोरायॅटिक फ्रॅक्चरचा सामना करावा लागतो.

स्नायू बळकट ठेवण्यासाठी आणि हाडांची झीज रोखण्यासाठी महिलांनी विशिष्ट गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. ८ मार्च या 'जागतिक महिला दिना'च्या निमित्ताने महिलांनी आपली हाडे निरोगी आणि बळकट ठेवण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे हे पाहू या.

हाडांचं आरोग्य तपासा

तीस वर्षापुढच्या महिलांनी डॉक्टरांकडून आपल्या हाडांचं आरोग्य नियमितपणे तपासावं. ज्या महिलांच्या हाडांची झीज होत असल्याचं निदान झालं असेल त्यांनी डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे उपचार करून घ्यावेत. हाडांचे आरोग्य आणि त्यासंदर्भातल्या समस्यांची माहिती करून घ्यावी.
व्यायामाला प्राधान्य द्या

प्रत्येक स्त्रीसाठी शारीरिक हालचाली करणं अत्यंत आवश्यक आहे. हाडांची झीज रोखण्यासाठी वेट-बेअिरग व्यायाम करावेत, जसं- चालणं, जॉिगग, जिने चढणं, टेनिस खेळणं किंवा नृत्य.

कॅल्शिअम आणि 'ड' जीवनसत्त्वांचा आहारात समावेश करा

कॅल्शिअम आणि सूर्यकिरणांपासून मिळणा-या जीवनसत्त्वाचा आपल्या नेहमीच्या आहारात समावेश करावा. 'ड' जीवनसत्त्व महत्त्वाचं असतं. कारण रक्तामध्ये कॅल्शिअम शोषून घेण्याचं प्रमाण ते वाढवतं. कॅल्शिअमसाठी दुग्धजन्य पदार्थ, पालक, साíडन मासेआदी पदार्थाचा आहारात समावेश करावा. रंगीत आहारामुळे हाडांचं आरोग्य सुधारतं. 'ड' जीवनसत्त्वाचा उत्तम स्रेत म्हणजे सूर्यप्रकाश. त्यासाठी दररोज ऊन खावं.

वाईट सवयींना पूर्णविराम

धूम्रपान आणि अतिरिक्त मद्यपान तसंच कॅफिनचं अतिरक्त सेवन अशा वाईट सवयी सोडून द्याव्यात. कॅफिनमुळे आरोग्याचे काही फायदे मिळतात. परंतु दुर्दैवाने हा घटक हाडांच्या आरोग्यासाठी फायद्याचा नाही. कारण शरीराच्या कॅल्शिअम शोषून घेण्याच्या क्षमतेवर तो परिणाम करतो.

वजन नियंत्रणात राखा

शरीराचं वजन कमी असल्यास बोन मासचं प्रमाणही कमी असतं आणि त्यामुळे फ्रॅक्चरचा धोका बळावतो. त्याचबरोबर वजन अनियंत्रित असल्यास त्याचा भार थेटपणे सांध्यांवर, विशेषत: वजन पेलणा-या गुडघे किंवा नितंबाच्या सांध्यांवर येतो. त्यामुळे शरीराचं वजन नियंत्रित असणं आवश्यक आहे.

जुन्या वेदनांकडे दुर्लक्ष करू नका

तुम्ही दीर्घकाळ हाडांच्या वेदना सहन करत असाल ज्यामागे कोणतंही थेट कारण नाही तर अशा परिस्थितीत डॉक्टरांची भेट घेणं आवश्यक ठरतं. कारण कदाचित त्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचीही गरज भासू शकते. गेल्या काही दशकांमध्ये शस्त्रक्रियांच्या उपलब्ध पर्यायांमध्ये आमूलाग्र बदल घडून आला आहे. गुडघा आणि नितंब इम्प्लाण्टसच्या निर्मितीमध्ये तांत्रिकदृष्टय़ा प्रगत असणारं ऑक्सिडाइज्ड झिर्कोनियम हा बेअिरग घटक सर्वोत्तम अ‍ॅलॉय म्हणून वापरला जातो. काठीण्य, स्मूथनेस आणि स्क्रॅचिंगला अवरोध या गुणांमुळे त्याचा वापर वाढत आहे. सक्रिय जीवनशैली असणा-या आणि भारतीय महिलांसाठी प्रॉस्थेसिस म्हणून याचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो.

चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी हाडं बळकट असणं आवश्यक आहे. आज सोप्या गोष्टींचे पालन केले आणि योग्य ती काळजी घेतल्यास हाडांचं आरोग्य दीर्घकाळ टिकतं आणि ती बळकटही बनतात. त्यामुळे यंदाच्या महिला दिनी असं काही करा जेणेकरून हाडांना दीर्घ आणि आनंदी आयुष्य मिळेल.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe