Tuesday, February 23, 2016

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

सर्वश्रेष्ठ देहदान

आपल्याकडे देहदान आणि अवयवदान या दोन गोष्टींबाबत आवश्यक तेवढी जागरूकता झालेली नाही. कित्येकांना तर अवयवदान आणि देहदान या दोन भिन्न गोष्टी आहेत याची कल्पनाच नाही. अवयवदान आणि देहदानाची ही माहिती.

साधारणपणे मृत्यूबद्दल चर्चेला कोणी तयार नसतं. त्यात देहदान किंवा अवयवदानाबद्दल अनेक गैरसमजुती असतात. दररोज बेवारस प्रेतं खूप मिळत असतील, मग आपण कशाला देहदान किंवा अवयवदान करावं, दान केलेल्या देहाची?विटंबना होत नसेल, नोंदणी केली?तर दान घेणार नाहीत, एखादा अवयव दान दिला तर पुढील जन्म त्या अवयवाशिवाय मिळेल, ज्येष्ठ नागरिकांना यापैकी?काहीच करता येत नाही. नेत्रदान/त्वचादान केलं तर देह रक्तबंबाळ विद्रूप होत असेल, देहदान घेण्यासाठी हॉस्पिटल आपल्या घरी वाहन पाठवत असेल, देहदानानंतर अंत्यविधी करता येत नसतील.. अशा अनेक गैरसमजुती?असतात. मात्र या समजुती दूर झाल्या तर अनेक लोकांना दृष्टी मिळेल, त्वचेचं दान मिळेल.

फक्त मुंबईतच दरसाल एक लाख व्यक्तींचं निधन होतं. त्या सगळ्यांनी नेत्रदान किंवा त्वचादान केलं तर भारतात एकही?आगीने जखमी?झालेला रुग्ण त्वचेअभावी संसर्गाने निधन पावणार नाही. प्रत्येक कॉर्निअल-अंध बालकाला दृष्टी मिळेल. रस्त्यांवर वाहनांमुळे होणा-या बहुतेक गंभीर अपघातातील रुग्णांचा मेंदू मृत्यू होतो. त्या सर्वाचे अवयव दानात मिळाले तर संपूर्ण आशियायी देशांत अवयव रोपणासाठी अवयवांची?कमतरता भासणार नाही. मृत्यूशय्येवरील रुग्णाला जीवनदान मिळेल. यासाठीच आपटे काकांची राजहंस प्रतिष्ठान ही संस्था गेल्या दशकभरापासून विनामूल्य कार्यरत आहे.

अवयवदान म्हणजे काय?

अवयवदान जिवंतपणी करता येते. दानात लिव्हरचा काही भाग व एक किडनी फक्त जवळच्या नातेवाइकांना दान करता येते. मस्तिश्क स्तंभ मृत्यू (ब्रेनडेड अवस्थे)नंतर पण अवयवदान करता येते. रुग्ण अतिदक्षता विभागात (आयसीयू) कृत्रिम श्वसनावर (व्हेंटिलेटर) असला तरच अवयवदान करता येते. साधारणपणे ब्रेन हॅमरेज व अपघातात मेंदूला इजा झाली असली तर ब्रेनडेड अवस्था येण्याची शक्यता असते, बहुतेक सर्व चांगल्या स्थितीत असलेले अवयव जवळच्या नातेवाइकांच्या संमतीने दान करता येतात. दानाचा लाभधारक सहकारी यंत्रणा ठरवते. अवयवदानानंतर देह अंत्यसंस्कारासाठी परत मिळतो.

नैसर्गिक मृत्यूनंतर

ज्या क्षणी माणसाचं हृदय बंद पडतं, त्या क्षणी अन्य सर्व अवयव दानासाठी निरुपयोगी होतात. नैसर्गिक मृत्यूनंतर अवयवदान करता येत नसलं तरी त्वचादान, नेत्रदान व देहदान यापैकी एक वा तिन्ही दाने करता येतात. तिन्ही दान करायची असतील, तर प्रथम त्वचादान, नंतर नेत्रदान व अखेरीस देहदान हा क्रम अवलंबावा लागतो. या उदात्त दानांनी दात्यास अवयव रूपांनी अजरामर केल्याचे स्वर्गीय समाधान नातेवाइकांस मिळते व दानाबद्दल मेडिकल कॉलेजकडून/ त्वचा, नेत्र पेढीकडून सर्टिफिकेट मिळते. मात्र कोणताही आर्थिक लाभ मिळत नाही. या सर्व उदात्त दानासाठी वयाची अट नाही, मात्र जवळच्या नातेवाइकांची संमती असणे आवश्यक असते. कोणतीही सज्ञान स्त्री-पुरुष व्यक्ती नातेवाइकांच्या संमतीने इच्छादानपत्र नोंदणी करू शकते. तशी नोंदणी झाली नसली तरीही जवळच्या नातेवाइकांच्या संमतीने ही सर्व उदात्त दाने करता येतात. ही सर्व दाने स्वीकारण्याचे कार्य सदा सर्वकाळ (२४ ७ ७) सुरू असते. नातेवाइकांनी कळविल्यानंतर 'राजसंह प्रतिष्ठान'चे कार्यकर्ते प्रत्यक्ष उपस्थित राहून सर्वतोपरी सहाय्य करतात.

त्वचादान

मृत्यूनंतर २-३ तासांत त्वचादान करणे चांगले असते. यासाठी डॉक्टर दात्याच्या घरी येऊन अध्र्या तासाची शस्त्रक्रिया करतात तेव्हा रक्ताचा थेंबही येत नाही. तसेच दात्याचा देह विद्रूपही होत नाही. त्वचादानामुळे आगीने/ अ‍ॅसिडने होरपळून जखमी झालेल्या अनेक रुग्णांचे प्राण वाचवता येतात. प्रक्रिया केलेली त्वचा टिकवून ठेवता येते.

नेत्रदान

मृत्यूनंतर ३-४ तासांत, त्वचादानानंतर लगेच नेत्रदान करणे चांगले असते. डॉक्टर दात्याच्या घरी येऊन अध्र्या तासाची शस्त्रक्रिया करतात तेव्हा रक्ताचा थेंबही येत नाही. नेत्रदानानंतर कृत्रिम नेत्र बसवतात, त्यामुळे देह विद्रूप दिसत नाही. नेत्रदानातून मिळालेल्या कॉर्नियाच्या उपयोगाने दोन वा अधिक अंधांना दृष्टी मिळू शकते. मोतिबिंदू ऑपरेशन झालेली, चष्मा वापरणारी, रक्तदाब/ मधुमेह पीडित व्यक्तीपण निधनानंतर नेत्रदान करू शकते. दानानंतर कॉर्निया प्रयोगशाळेत तपासून, प्रक्रिया करून त्याचे ४८ तासात प्रत्यारोपण केले जाते. ७० वर्षानंतरच्या दात्याचे नेत्र रोपणासाठी उपयुक्त नसल्यास केवळ संशोधनासाठी वापरला जातो. दानानंतर नेत्रपेढीकडून प्रमाणपत्र मिळते. नेत्राचा लाभधारक निवडण्यास वा नाव समजण्यास कायद्याने प्रतिबंध आहे.

देहदान

मृत्यूनंतर ५-६ तासांत देहदान करणे चांगले असते. त्यासाठी दात्याचा देह नातेवाइकांनी मेडिकल कॉलेजमध्ये नेऊन द्यायचा असतो. देहदात्याचा अत्यंत जवळचा नातेवाईक परदेशात असेल व १-२ दिवसांत येणार असेल तर त्यास देहदानानंतर दात्याचे दर्शन देण्याची खास व्यवस्था करता येते. कोणतीही सज्ञान स्त्री-पुरुष व्यक्ती देहदान इच्छा नोंदणी करू शकते. ज्यास वयाची अट नसते. देहदान मृत्यूच्या गावापासून जवळ असलेल्या मेडिकल कॉलेजमध्ये स्वीकारले जाते. ज्याचा उपयोग प्रयोगशाळेत डॉक्टरांच्या प्रशिक्षणासाठी व संशोधनासाठी होतो.

एका देहावर साधारणपणे दहा डॉक्टरांचे प्रशिक्षण अवलंबून असते. अशा प्रकारे निपुण डॉक्टरने आपल्या ४० वर्षाच्या वैद्यकीय सेवेत दररोज एका रुग्णाचा जीव वाचवला तर एका देहदानापासून प्रशिक्षण घेतलेले दहा डॉक्टर १,२०,००० रुग्णांचे प्राण वाचवतील. यावरून देहदानाचे महत्त्व लक्षात येते. जनजागृती व माहितीच्या अभावामुळे दरवर्षी मुंबईत निधन पावलेल्या १ लाख व्यक्तींपैकी फक्त १०० देहच दानात मिळतात यावरून विषयाचे गांभीर्य लक्षात येते.

देहदानानंतर फॉर्मेलीन रसायनाचा वापर करून 'एम्बाल्मिंग' प्रक्रियेने देह काही वर्षे टिकवला जातो. प्रयोगशाळेत अत्यंत आदरपूर्वक प्रार्थना करून प्रशिक्षणार्थी डॉक्टर प्रयोग सुरू करतात. प्रयोगशाळेतील कार्य पूर्ण झाल्यावर सरकारी नियमाप्रमाणे तो देह आदरपूर्वक, गांभीर्याने नष्ट केला जातो.
कोणते देह स्वीकारले जात नाहीत?

अपघाताने मरण पावलेल्या व बेवारस देहांचे पोस्टमॉर्टम करणे बंधनकारक असते. ज्यात नसांना छेद द्यावा लागतो. 'एम्बालिंग' करून असा देह टिकवणे शक्य नसते म्हणून तसा देह दानात स्वीकारता येत नाही. त्याचप्रमाणे संसर्गजन्य रोगाने मरण पावलेल्या व्यक्तींचा देह स्वीकारता येत नाही, म्हणून टीबी, गँगरीन, डेंग्यू, एड्स, हेपिटायटीस, काविळ, सेप्टिसिमिया इ. रोगांनी निधन झालेल्या व्यक्तींचे देह स्वीकारता येत नाहीत, देहदानानंतर मेडिकल कॉलेजकडून महापालिकेच्या वार्ड ऑफिसरला लिहिलेले पत्र नातेवाइकांना मिळते. ते पत्र महापालिकेच्या मृत्यू नोंदणी कार्यालयात दिल्यावर मृत्यूचा दाखला मिळतो.

 त्वचा/ नेत्रदान/ देहदान प्रत्यक्ष करण्याच्या वेळी काय करावे :

» दात्याचा देह स्वच्छ ठेवा.

» एसी असल्यास तो सुरू करावा व पंखा बंद करावा.

» डोळ्यावर थंड पाण्याची घडी ठेवावी व डोक्याखाली २ उशा ठेवाव्यात.

» डॉक्टरांना उदात्त दानाच्या निर्णयाची माहिती द्यावी व मृत्यूच्या कारणाचा दाखला लवकर मिळवावा.

» सर्व नातेवाइकांना उदात्त दानाची माहिती द्यावी.

राजहंस प्रतिष्ठानचे आपटे काका यांना एसएमएस केल्यास घरपोच सर्व माहिती?आणि देहदानाचा फॉर्म पाठवतात. इतकंच नव्हे तर हा फॉर्मपाठवण्यासाठी त्यांचा पत्ता असलेले पाकीटही सोबत पाठवतात.
आपटे काका : ९८२००७८२७३.

Read More »

गुणकारी मटकी

आपल्या रोजच्या आहारातील, पचण्यास हलकी असलेल्या मटकीचं उगमस्थान भारतातील असून हिमालय ते कन्याकुमारीपर्यंत सापडतं. तर वायव्य भारतात १ हजार २०० मी. उंचीपर्यंत मटकीची लागवड केली जाते. 

आपल्या रोजच्या आहारातील, पचण्यास हलकी असलेल्या मटकीचं उगमस्थान भारतातील असून हिमालय ते कन्याकुमारीपर्यंत सापडतं. तर वायव्य भारतात १ हजार २०० मी. उंचीपर्यंत मटकीची लागवड केली जाते. परंतु मटकीचं उत्पादन फक्त भारतातच केलं जात नसून पाकिस्तान, म्यानमार, ऑस्ट्रेलिया, अमेरिकन खंडातील काही देशांतही केलं जातं. विग्नार या वंशात मटकीचाही समावेश करण्यात आला आहे.

यामध्ये आधी फक्त मूग, उडीद, तूर, चवळी यांचा समावेश केला होता. परंतु आता मटकीचाही त्यात समावेश आहे. मटकीची लागवड नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात होते. मटकीचं उत्पादन कोरडय़ा किंवा निमकोरडय़ा जागेत केलं जातं. मटकीचं पीक हे मृद्संधारणासाठी अतिशय उपयुक्त आहे.

याची मुळं मादक असतात. सुश्रुत संहितेत मटकीचा उल्लेख वनमुग्द या नावाने केला आहे. मटकीमध्ये जलांश १०.८ टक्के, प्रथिने २३.६ टक्के, स्निग्ध पदार्थ १.१ टक्के, तंतू ४.५ टक्के व इतर काबरेहायड्रेट ५३.५ टक्के आणि खनिजे १०० ग्रॅममध्ये ३.५ ग्रॅम आढळतात. मटकीमध्ये प्रामुख्याने कॅरोटीन, थायामीन, रिबोरफ्लाविन आणि क जीवनसत्त्वे असतात. अशा या मटकीचे गुणधर्म पुढीलप्रमाणे —

» मटकीमध्ये रोगप्रतिकार क्षमता अधिक आहे, त्यामुळे डॉक्टर आजारपणात मटकी खाण्याचा सल्ला देतात.

» ड्रग्जचं व्यसन असणा-यांना मटकी अत्यंत गुणकारक आहे. मटकीमुळे व्यसनाधीन लोकांना काहीशा प्रमाणात फरक पडतो.

» मटकी वाजीकर, पित्तविकार रोधक, पाचक व हृदयास बल देणारी आहेत.

» मोड असलेल्या मटकीत 'क' जीवनसत्त्व प्रामुख्याने आढळतं. त्याशिवाय मटकी पचनाला सर्वात हलके कडधान्य आहे.

» वजन संतुलित राखण्यासाठीही मटकीचा वापर केला जातो.

» आपल्या वाढत जाणा-या अतिताणावर नियंत्रण ठेवण्यासाठीही मटकीचा वापर केला जातो.

Read More »

भुजंगासन

भुजंग म्हणजे साप. संस्कृतमध्ये सापाला भुजंग असं म्हणतात. या आसनात आपण शरीराचा वरील भाग हाताच्या साहाय्याने उचलतो. उचललेला शरीराचा वरील भाग हा सापाच्या उगारलेल्या फण्यासारखा दिसतो. म्हणून या आसनाला भुजंगासन किंवा सर्पासन असं म्हणतात.

आसन करण्याची पद्धती
योगामॅटवर पोटावर म्हणजे पालथं झोपावं. पूर्ण शरीर एका रेषेत असावं. दोन्ही पाय सरळ आणि ताठ असावेत. दोन्ही पायांचा एकमेकांना स्पर्श केलेला असावा. आता दोन्ही हात छातीच्या जवळ ठेवावेत. कपाळ जमिनीला लावावं. पूर्ण शरीर सैल ठेवावं. आता हळुवारपणे शरीराचा वरील भाग म्हणजे बेंबीपर्यंतचा भाग वर उचलावा. तसंच मागे बघावं. दोन्ही हात कोपरातून थोडे वाकवावेत. बाजूच्या चित्रात दाखवल्याप्रमाणे हे आसन करावं.

श्वास

» शरीराचा वरील भाग उचलताना श्वास घ्यावा.

» आसन स्थितीत नियमित श्वासोच्छ्वास असावा.

» शरीराचा वरील भाग खाली आणताना श्वास सोडावा.

वेळ

सुरुवातीला हे आसन चार वेळा करावे, नंतर हळुवारपणे फायनल स्थितीत वेळ वाढवावी.

आसन करतानाची काळजी

भुजंगासन या आसनात आपण शरीराचा वरील भाग वर उचलतो. सुरुवातीला जेवढा वर आणता येईल तेवढाच वर आणावा. या आसनात मान मागे वळवली जाते. जितकी तुम्हाला मान मागे वळवता येईल तितकीच वळवावी. जास्त वळवू नये. त्याचप्रमाणे दोन्ही हात कोपरातून दुमडावेत. हातांना सरळ अथवा ताठ ठेवू नये. हे आसन करताना ज्यांच्या पाठीवर ताण येतो. त्यांनी हे आसन करूच नये. आसन सोडताना घाई करू नये. शरीराचा वरील भाग हळुवारपणे खाली आणावा.

विशेष नोंद

ज्या व्यक्तींना पेप्टिक अल्सर, हर्निया, हायपर थायरॉईड असे आजार आहेत, त्यांनी हे जाणकारांच्या उपस्थितीतच करावं.
शुक्रासन हे सूर्यनमस्काराची सातवी स्थिती आहे.

फायदे

» दीर्घ श्वास सुधारतो.

» या आसनामुळे पाठीचं दुखणं किंवा पाठीशी संबंधित इतर त्रास कमी होण्यास मदत होते.

» मासिक पाळीच्या तक्रारी दूर होतात.

» या आसनात पोटाच्या स्नायूंवर भरपूर दाब पडतो. त्यामुळे अपचन आणि मलावरोध नाहीसे होतात.

» पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते.

»लिव्हर व किडनीसाठी हे आसन खूप फायदेशीर आहे.

» या आसनाच्या नित्य सरावाने छाती, खांदे मान आणि मस्तिष्काचा भाग सुदृढ आणि मजबूत होतो, तसेच शरीराचा बांधा सुडौल होतो.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe