Tuesday, February 16, 2016

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

तिशीनंतरची काळजी

स्वत:च्या आरोग्याच्या बाबतीत असलेला हलगर्जीपणा आणि दिवसेंदिवस बदलत जाणारी जीवनशैली यामुळे स्त्रियांदेखील आता विविध गंभीर आजारांना बळी पडताना दिसत आहे. मात्र असे आजार उद्भवू नये म्हणून स्त्रियांनी तिशीनंतर काही चाचण्या करणं आवश्यक आहे.

कित्येकदा आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यात महिला वर्ग इतका गुंतलेला असतो की त्यांना स्वत:कडे लक्ष द्यायला वेळच नसतो. आपल्या लहान-सहान दुखण्याकडे त्या दुर्लक्ष करतात परिणामी आजारी पडतात. खासकरून तिशी उलटल्यानंतर महिलांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. त्यासाठी वर्षातून एकदा तरी काही चाचण्या नियमित तपासणी करणं गरजेचं आहे.

ब्रेस्ट कॅन्सर

एकदा का तिशी उलटली की प्रत्येक स्त्रीने ब्रेस्ट कॅन्सरच्या बाबतीत जागरूक असणं आवश्यक असतं. या गंभीर आजारापासून बचाव होण्यासाठी महिलांनी स्वत:च आपली ब्रेस्ट चेक करणं आवश्यक आहे. म्हणजे काखेत कोणत्याही स्वरूपाची गाठ नाही ना, ब्रेस्टचा आकार किंवा त्वचेत काही बदल झाले आहेत का? निपल्समधून पाणी येणे, किंवा दुखणे, खाज येणे अशी काही लक्षणं दिसल्यास ताबडतोब एमआरआय किंवा मेमोग्राफी करणं आवश्यक आहे.

काळजी : तुमच्या कुटुंबात कोणाला अशा स्वरूपाचा आजार असल्यास तुम्ही प्रतिवर्षी ही चाचणी करून घेणं आवश्यक आहे.

गर्भाशयासंबंधित आजार

विवाहित स्त्रियांमध्ये गर्भाशायासंबंधित आजार होण्याची शक्यता असते. सर्वाकल कॅन्सची भीती अधिक असते. म्हणून पेप्स्मीअर किंवा पेल्बिक अल्ट्रासाऊंड करणं आवश्यक आहे. कारण याद्वारे गर्भाशयाशी संबंधित कॅन्सरपोषक पेशी दिसू शकतात.

काळजी : अनियमित मासिक पाळी, अतिरिक्त ब्लिडिंग किंवा गाठी पडणे.. अशा स्वरूपाचा त्रास असलेल्यांनी विशेषज्ञाचा सल्ला जरूर घ्यावा.

अ‍ॅनिमिया

भारतातील बहुतांश महिलांमध्ये रक्ताची कमतरता जाणवते. अनावश्यक थकवा जाणवू लागतो. डोळ्यांखाली काळी वर्तुळं जमा होतात. नखं आणि डोळे अधिक पांढरे होतात. म्हणूनच वर्षातून एकदा सीबीसी (कम्पलीट ब्लड काऊंट) ही चाचणी करणं आवश्यक आहे. स्त्रीयांनी आपल्या जेवणाकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. रोजच्या जेवणात लोहयुक्त वस्तू उदा. पालक, गाजर, बीट, सफरचंद, केळं, खजूर किंवा गुळाचा समावेश करावा. गर्भावस्थेनंतर किंवा गरोदरपणात आपल्या खाण्याकडे विशेषत: लक्ष द्यावं. कारण त्या दिवसांत योग्य प्रमाणात आहार मिळाला नाही तर स्त्रिया दगावण्याचाही धोका असतो.

ऑस्टिओपोरोसिस

हा आजार कुटुंबातील कोणाला झाला असेल किंवा तो अनुवंशिक असेल तर हा तुम्हाला होण्याचा धोका अधिक असतो. ज्यांचं वजन मुळातच अधिक असतं. त्यांना हा धोका अधिक असतो. तसंच मेनोपॉजनंतर महिलांमध्ये हा आजार अधिक प्रमाणात आढळतो. कारण हाडं, स्नायू आणि मांसपेशी त्यानंतर दुखायला लागतात. म्हणून मेनोपॉजनंतर डॉक्टरांकडे अवश्य जावं. तुमच्या पैकी कोणाला अशा समस्या जाणवत असतील तर तुम्ही तुमच्या शरीरातलं कॅल्शिअम वाढवणं आवश्यक असतं. तुम्ही ताबडतोब दूध, अंडी, फळं खाणं आवश्यक असतं. तिशीनंतर साधारणत: प्रत्येक महिलेला हजार ते बाराशे मिलिग्राम कॅल्शिअमची गरज असते. दररोजच्या जेवणातून हे मिळत नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हाडं आणि मांसपेशीच्या मजबुतीसाठी व्यायाम किंवा औषधं घेणं गरजेचं आहे.

उच्च रक्तदाब

तणावपूर्ण जीवनशैलीमुळे आजकालच्या स्त्रिया उच्च रक्तदाबाच्या शिकार होतात. मेनोपॉजच्या अवस्थेमध्ये हा आजार बळावण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच नियमित रूपात रक्तदाबाची चाचणी करणं आवश्यक आहे. वजन अधिक असल्यास किंवा परिवारात हा आजार असल्यास विशेष काळजी घ्यावी. तसंच डॉक्टरांकडून योग्य आहाराचा सल्ला घ्यावा.

मधुमेह

तुमचं वजन वाढलं आहे, तुमच्या कुटुंबात कोणाला मधुमेह असल्यास आणि तुम्हाला उच्च रक्तदाब असल्यास तुम्ही तुमच्या शरीराची विशेषत्वाने काळजी घेणं आवश्यक आहे. तीस वर्षानंतर तर वर्षातून एकदा तरी रक्तातील साखरेची पातळी तपासून घ्यावी. विशेषत: तुम्हाला आई व्हायचं असेल तर अशा महिलांनी स्वत:ची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. कारण गरोदरपणात रक्तातील साखरेची पातळी वाढते. कारण ती वाढल्यास नवजात बाळालाही हा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

थायरॉईड

थायराईडच्या ग्रंथी गळ्याच्या खालच्या बाजूला असून त्यात टी-३, टी-४ असे स्रव स्र्वत असतात. त्यांची मात्रा असंतुलित झाल्यास त्याचा परिणामा स्त्रियांच्या आरोग्यावर होतो. परिणामी झटक्यात वजन वाढणं किंवा कमी होणं, थकवा येणे, त्वचा कोरडी होणे, चिडचिड होणे, उदास होणे, स्मरणशक्ती कमी होणे अशी लक्षणं नजरेस येतात. गर्भावस्थेत थायरॉडसंबंधी समस्या आढळल्यास नवजात शिशूलाही त्रास होण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच तुमच्यामध्ये यापैकी कोणतंही लक्षण दिसल्यास ताबडतोब थायरॉईड स्टिम्युलेटिंग हार्मोन्सची चाचणी करून घ्यावी.

Read More »

आई होऊ इच्छिणा-यांसाठी

आपल्या अभिनयामुळे हिंदी चित्रपटसृष्टीवर आपली छाप पाडणारी करिष्मा कपूर आपल्याला सर्वानाच माहिती आहे. मात्र प्रसिद्धीचं हे वलय बाजूला ठेवून लग्न आणि मूल होऊ देण्याचा निर्णय तिने घेतला. मुलांचा जन्म हेच तिच्यासाठी ध्येय होतं.

आपल्या अभिनयामुळे हिंदी चित्रपटसृष्टीवर आपली छाप पाडणारी करिष्मा कपूर आपल्याला सर्वानाच माहिती आहे. मात्र प्रसिद्धीचं हे वलय बाजूला ठेवून लग्न आणि मूल होऊ देण्याचा निर्णय तिने घेतला. मुलांचा जन्म हेच तिच्यासाठी ध्येय होतं. खरं म्हणजे स्त्रीच्या मातृत्वाचा प्रवास हा वैयक्तिक किंवा व्यक्तिसापेक्ष असतो. असं असलं तरी हा प्रवास करिष्मा कपूरला सगळ्यांसोबत शेअर करावासा वाटतो. म्हणून या प्रवासातला प्रेम, हसू, शंका, थकवा, ग्लानी, सामर्थ्य अशा सगळ्या गोष्टी तिने आई ते सुपरमॉम या पुस्तकात मांडल्या आहेत.

त्या काळात काय बोलायचं, कोणते कपडे आणि दागिने घालायचे, शरीरात होणारे बदल, योग्य आहार, व्यायाम करणे, आनंदी राहणे, करिअरचा समतोल ढळू न देणे हा सगळा प्रवास तुम्हाला या पुस्तकात वाचायला मिळणार आहे. थोडक्यात गर्भधारणा झाल्यापासून ते नऊ महिन्यांचा संपूर्ण प्रवास, प्रसूतीची प्रक्रिया, बाळाची काळजी, आईची काळजी, त्या काळातील आहार, बाळंतपणानंतर शरीर सुडौल करणे असे सगळे अनुभव या ठिकाणी देण्यात आले आहेत.

कित्येक महिला करिअरकडे दुर्लक्ष करतात. मात्र यानंतरही करिअरकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा ढळू न देता उभं राहायचं हे सांगण्याचा प्रयत्नही यातून करण्यात आला आहे. थोडक्यात गर्भारपण किंवा मातृत्व आणि त्याबाबतचे करिष्माचे विचार यातून तुम्हाला वाचायला मिळणार आहेत. आजकाल करिअर आणि मातृत्व यांच्या कचाटय़ात सापडलेल्या महिलांना हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शन करणारं ठरेल.

लेखिका : करिष्मा कपूर; अनुवाद : मीना शेटे-शंभू
प्रकाशक : अमेय प्रकाशन, पुणे
पृष्ठ : ३२०
मूल्य : ३०० रुपये

Read More »

सिंहासन

या आसनास 'लायन पोज' असंदेखील म्हटलं जातं. हे आसन आपण दोन वेगवेगळ्या पद्धतीनेही करू शकतो. प्रथम आपण शांत स्वभावाने करतो तर दुसरे सिंहाच्या गर्जनेने करतो. 

या आसनास 'लायन पोज' असंदेखील म्हटलं जातं. हे आसन आपण दोन वेगवेगळ्या पद्धतीनेही करू शकतो. प्रथम आपण शांत स्वभावाने करतो तर दुसरे सिंहाच्या गर्जनेने करतो. अशा या आसनाची माहिती पुढीलप्रमाणे -

प्रथम वज्रासनात बसावं. आता हळूहळू गुडघ्यांमध्ये ४५ सेमी एवढे अंतर ठेवावं. (चित्रात दाखवल्याप्रमाणे) मागे पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श झालेले पाहिजेत. तसंच हाताच्या तळव्यांना मांडय़ांच्या खाली ठेवावं. हातांची बोटे ही शरीराच्या बाजूला असावी. हात पूर्णपणे ताठ असावेत. पाठ ही ताठ आणि सरळ ठेवावी. सरळ हातांवर शरीर ताठ व सरळ ठेवावे. मान ही सरळ आणि ताठ असावी. आता डोळे बंद करावेत. भुवायांच्या मध्ये फोकस करावा. काही वेळाने हळुवारपणे डोळे उघडून वर बघावे. यादरम्यान तोंड हे बंद असावं. शरीर आणि डोकं यांना रिलॅक्स ठेवावे.

श्वास

या आसनात श्वास हा नॉर्मल असावा.

आसन करताना घ्यायची काळजी

या आसनात जेव्हा आपण मांडय़ा हळूहळू गुडघ्यापासून ४५ सेमीवर नेतो म्हणजेच मांडय़ा पसरवतो तेव्हा जेवढे शक्य होईल, तेवढेच अंतर ठेवावं. कारण त्यादरम्यान मांडय़ांमध्ये खूप ताण येतो. त्यामुळे शक्य होईल तेवढाच ताण द्यावा.

फायदे

» या आसनाने आपला पाठीचा कणा आणि पाठीलाच चांगला ताण मिळतो.

» या आसनाने फिजिकल स्टेबिलिटी वाढते.

» मांडय़ांना आणि संपर्ण शरीरालाही ताण मिळतो.

Read More »

बहुगुणी मूग

हे द्विदल कडधान्य असून शास्त्रीय नाव बिगना सैडिएटा असं आहे. स्वयंपाकात वापरला जाणारा पदार्थ आहे. चीन, थायलंड, फिलिपाईन्स, इंडोनेशिया, बह्मदेश, बांगलादेश आदी ठिकाणी याची लागवड केली जाते. 

हे द्विदल कडधान्य असून शास्त्रीय नाव बिगना सैडिएटा असं आहे. स्वयंपाकात वापरला जाणारा पदार्थ आहे. चीन, थायलंड, फिलिपाईन्स, इंडोनेशिया, बह्मदेश, बांगलादेश आदी ठिकाणी याची लागवड केली जाते. काळे, हिरवे, पिवळे, पांढरे आणि लाल रंगाचे मूग असतात.

पैकी हिरव्या रंगाचे मूग स्वादिष्ट आणि गुणकारी असतात. काही ठिकाणी मुगापासून खिर किंवा गोड पदार्थ बनवले जातात. भारतातही शिरा, खिचडी, सांडगे, पापड, सलाड, पराठे किंवा वरण केलं जातं. प्रथिनं, जीवनसत्त्व, खनिजं, आदी पोषकतत्त्वांचा भरणा यात अधिक आहे. इतर कडधान्यांपेक्षा यात जीवनसत्त्वांचा साठा भरपूर आहे.

» जीवनसत्त्व 'के'चा भरपूर साठा असल्याने हाडांची मजबुती राखण्यास मदत होते.

» 'क' जीवनसत्त्वाचा साठा असल्यामुळे पेशींचं आणि त्वचेचं आरोग्य सुधारतं.

» शरीराला आवयक असणारं लोह यातून मिळत असल्यामुळे प्रतीकारशक्ती सुधारते.

» गरोदर महिलांनी एक कप मूग उकडून खावेत कारण या दिवसांत आवश्यक असणारं ब जीवनसत्त्व यातून मिळतं.

» नियमित सेवनाने केसांचं आरोग्यही सुधारतं.

» शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे मधुमेही रुग्णांसाठी अतिशय चांगलं खाद्य आहे.

» उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळते जेणेकरून हृदयविकारांपासून आपण लांब राहतो.

» अँटिऑक्सिडंट असल्यामुळे कॅन्सरसारख्या आजारापासून संरक्षण होण्यास मदत मिळते.

» मासिक पाळीदरम्यान होणारी पोटदुखी, डोकेदुखी, सांधेदुखी किंवा मूड बदलणे यावर नियंत्रण मिळतं.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe