|
अर्ध शलभासन , पाचक परवर, प्रजनन काळातील मधुमेह
अर्ध शलभासन
| प्रथम पोटावर झोपावं. आता दोन्ही हातांचे तळवे हे मांडीखाली ठेवावे. हनुवटी ही जमिनीला लावावी. दोन्ही पाय सरळ आणि ताठ ठेवावेत. हळुवारपणे डावा पाय जेवढा वर उचलता येईल तेवढा वर उचलावा.
प्रथम पोटावर झोपावं. आता दोन्ही हातांचे तळवे हे मांडीखाली ठेवावे. हनुवटी ही जमिनीला लावावी. दोन्ही पाय सरळ आणि ताठ ठेवावेत. हळुवारपणे डावा पाय जेवढा वर उचलता येईल तेवढा वर उचलावा. काही सेकंद या आसनस्थितीत राहावे. मग हळुवारपणे पाय खाली आणावा. तसेच उजवा पाय वर उचलावा. हळुवारपणे पायाला खाली आणावं. मांडय़ांखाली ठेवलेला हात अलगद काढावा. पूर्ण शरीराला काही सेकंद रिलॅक्स ठेवावं.
जेव्हा आपण पाय वरती नेतो तेव्हा तो सरळ दिशेने वरती आणावा. ट्विस्ट करू नये. कंबरेखालील भाग ट्विस्ट होता कामा नये. पाय हा सरळ ताठ ठेवण्याचा प्रयत्न करावा. गुडघ्यामध्ये वाकवू नयेत.
श्वास
» श्वास घेताना सुरुवातीची स्थिती असावी. » पाय वरती नेताना श्वास थांबवावा आणि तसंच शेवटच्या स्थितीमध्ये सुद्धा काही सेकंद थांबवावा. » पाय खाली आणताना श्वास सोडावा.
वेळ
» सुरुवातीला दोन वेळा करावं. मनातल्या मनात दहा अंक मोजावेत. नंतर हळुवारपणे अंक वाढवावेत.
आसन करताना घ्यायची काळजी
» हे आसन करताना मानेला जास्त ताण येणार नाही याची काळजी घ्यावी. तसंच पाय वरती आणताना तो सरळ एका रेषेत म्हणजेच शरीराच्या व पायाच्या पातळीला असावा. गुडघ्यातून पायाला वाकवू नये. तसंच पाय सरळ आणि ताठ असावा.
» समजा तुम्ही डावा पाय उचलला आहे पण तो उजव्या पायाच्या दिशेने वळला असेल तर चुकीचं आहे. असं करू नये. पाय उचलताना जोरात किंवा घाईने उचलू नये. पाठीला हादरा बसू शकतो. जेवढा पाय वरती उचलता येईल तेवढाच वरती उचलावा. सुरुवातीला जास्त ताण देऊ नये.
फायदे
» या आसनाने कमरेखालील भाग मजबूत होतात. » या आसनाच्या नित्य सरावाने कंबरदुखीचा त्रास कमी होतो. » गुडघे, कंबर अािण पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते. » शलभासनाने पोटाला चांगलाच व्यायाम मिळतो. » या आसनाने मांडीवरील चरबी कमी होण्यास मदत होते.
विशेष नोंद
ज्या व्यक्तींचे हृदय कमजोर आहे, कॉर्नोरी थ्रॉम्बायोसिस किंवा उच्च रक्तदाब तसेच ज्या व्यक्तींना पेप्टिक अल्सर, हर्निया, आतडय़ांचा क्षयरोग असेल यांनी या आसनाचा सराव करू नये. |
Read More »
पाचक परवर
| दिसायला काकडीप्रमाणे मात्र आकाराने लहान असतं. काकडी वर्गातील हे फळ असून हे चार ते पाच इंच लांब असतं. टोकाला किंचितसं टोक असतं.
दिसायला काकडीप्रमाणे मात्र आकाराने लहान असतं. काकडी वर्गातील हे फळ असून हे चार ते पाच इंच लांब असतं. टोकाला किंचितसं टोक असतं. याचा रंग पिवळा-हिरवा असतो. इंग्रजीत पॉइंटेड गार्ड, हिंदीत परवर तर बंगालीमध्ये पोटोल असं म्हणतात. यात उच्च प्रमाणात जीवनसत्त्व अ आणि क, मॅग्नेशिअमचा साठा आहे.
» फायबरचं प्रमाण भरपूर असल्याने पाचकशक्ती वाढवते. त्यामुळे पोटाचे विकार असलेल्यांनी या भाजीचं आवर्जून सेवन करावं.
» यकृताचं कार्य सुरळीत करण्याचंदेखील काम करतं.
» कमी कॅलरीज असल्याने वजन कमी करण्यास मदत करते. कारण याच्या सेवनाने पोट पटकन भरतं.
» रक्त शुद्धीकरणाचं काम करते. त्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो.
» कफ असलेल्यांनी या भाजीचं आवर्जून सेवन करावं. कारण कफ बाहेर पडण्यास मदत होते.
» शरीरातील प्रतीकारक्षमता वाढवते. त्यामुळे ताप असलेल्यांनी या भाजीचं सेवन करावं. घशाची खवखव आणि ताप यावर बराच आराम पडतो.
» वय झाल्यावर चेह-यावर सुरकुत्या दिसायला लागतात. मात्र या भाजीत असलेला अ आणि क जीवनसत्त्वाचा साठा या सुरकुत्या कमी करायला मदत करतात.
» ही भाजी आतील बियांसकट खाल्ल्यास ते रक्ताची पातळी सुधारण्यास मदत करतात, परिणामी शरीरातील कोलेस्टेरॉल कमी होतं. |
Read More »
प्रजनन काळातील मधुमेह
| मातृत्व हा स्त्रीला येणा-या सर्व अनुभवांपैकी सर्वोत्कृष्ट आणि अमूल्य असा अनुभव असला तरी कधी कधी गर्भवती स्त्रियांमध्ये प्रजनन काळातील मधुमेहाची समस्या निर्माण होते. काही कारणांमुळे मातेच्या शरीरात पुरेशा प्रमाणात इन्शुलिन तयार होत असते, मात्र त्याचा पुरेपूर किंवा योग्य प्रकारे वापर केला जात नाही. त्यामुळे, तिच्या रक्तवाहिन्यांमध्ये मोठया प्रमाणात ग्लुकोज किंवा साखर जमा होते. या परिस्थितीला हायपरग्लिशेमिया म्हणतात. हा त्रास फक्त स्त्री गर्भवती असतानाच होत असला तरीही त्याचे परिणाम दीर्घकाळ राहतात.
मातृत्व म्हणजे जणू आनंदाचा मुकुट परिधान करणे, स्त्रीत्वाचा सर्वात मोठा सन्मान असं चित्र रंगवलं जात असलं तरी हेच मातृत्व त्याच्या काही समस्यांसोबतच येते. ज्यामुळे नव्याने आई झालेल्या स्त्रीला अपयश आल्याप्रमाणे नराश्य येऊ शकते आणि तिच्या क्षमता आणि निर्णयांविषयी तिला असुरक्षित वाटू शकते.
आपल्या गर्भात एका बाळाची वाढ होणे, हा स्त्रीला येणा-या सर्व अनुभवांपैकी सर्वोत्कृष्ट आणि अमूल्य असा अनुभव असला तरी काही वेळानंतर ती स्त्री आणि तिच्या बाळाला आयुष्यभर काही आजार साथ करतात.
दरवर्षी संपूर्ण भारतात एक लाखांहून अधिक गर्भवती स्त्रियांमध्ये प्रजनन काळातील मधुमेहाची समस्या निर्माण होते.
अद्याप अनाकलनीय असलेल्या काही कारणांमुळे मातेच्या शरीरात पुरेशा प्रमाणात इन्शुलिन तयार होत असते, मात्र त्याचा पुरेपूर किंवा योग्य प्रकारे वापर केला जात नाही. त्यामुळे, तिच्या रक्तवाहिन्यांमध्ये मोठया प्रमाणात ग्लुकोज किंवा साखर जमा होते. या परिस्थितीला हायपरग्लिशेमिया म्हणतात. हा त्रास फक्त स्त्री गर्भवती असतानाच होतो.
गर्भवती स्त्रियांना होणा-या त्रासांमध्ये याचं प्रमाण अधिक आहे. साधारणपणे गर्भारपणाच्या मधल्या टप्प्यात म्हणजेच, २४ आणि २८ आठवडे या काळात हा त्रास निर्माण होतो. याच काळात मातेच्या इन्शुलिन वापरण्याच्या क्षमतेवर तिच्या संप्रेरकांचा परिणाम होतो.
गर्भवती स्त्रियांमधील मधुमेह दोन प्रकारचे असतात :
» प्रजनन काळातील मधुमेह, ज्याचे निदान गर्भारपणात होते.
» प्रजनन पूर्व किंवा आधीपासून असलेला मधुमेह (टाईप १ आणि २) याचे निदान गर्भ राहण्यापूर्वीच करता येते.
गर्भवती स्त्रियांना मधुमेह होण्याचे प्रमाण दर वीस स्त्रियांमागे १ इतके आहे. साधारणपणे गर्भारपणाच्या तेराव्या आठवडयापासून २८व्या आठवडयापर्यंत हा त्रास असतो आणि त्यानंतर गर्भारपणाबरोबरच संपतो. संप्रेरकांमधील बदल आणि वजन वाढणे ही निरोगी गर्भारपणाची लक्षणं आहेत.मात्र, काही वेळा हीच लक्षणे आपल्या शरीरावर नकारात्मक परिणाम करू शकतात. तुम्हाला गर्भ राहण्यापूर्वीच मधुमेह असेल तर त्याला प्रसूतीपूर्व मधुमेह असं म्हणतात.
गर्भवती स्त्री मधुमेह रुग्ण असेल किंवा तिला संप्रेरकांमधील बदलांमुळे मधुमेह झाला तर बाळालाही मधुमेहाची लागण होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे ते बाळ काही वैगुण्यांसह जन्माला येण्याची शक्यता असते.
गर्भवती स्त्रियांमधील मधुमेह तिच्यासाठी आणि तिच्या बाळासाठी अनेक प्रकारची गुंतागुंत तयार करू शकतो.
मातेवर परिणाम करणा-या काही बाबी पुढीलप्रमाणे-
» उच्च रक्तदाबामुळे प्री-एक्लप्मेशिया हा आजार उद्भवणे.
» गर्भाशयात बाळाच्या भोवती असलेल्या द्रावणाच्या पातळीत वाढ होणे.
» प्रसूतीच्या संभाव्य तारखेपूर्वीच, अगदी ३७ आठवडय़ांतही मुदतपूर्व प्रसूती.
» सिझर होण्याची आणि त्यातून आणखी गुंतागुंत होण्याची शक्यता.
» त्यानंतरच्या गर्भारपणातही प्रजनन काळातील मधुमेह होण्याची शक्यता.
» उर्वरित आयुष्यात टाईप २ प्रकारचा मधुमेह होण्याची शक्यता.
बाळांवर होणारे संभाव्य परिणाम :
» जन्मानंतर काही दिवस बाळाच्या रक्तात साखरेचे प्रमाण कमी असण्याची (हायपोग्लिशेमिया) शक्यता असते.
» मातेच्या रक्तात गर्भारपणात अतिरिक्त साखर असल्यास मुदतपूर्व प्रसूती होऊ शकते. त्यामुळे, बाळाच्या
» फुप्फूसांची वाढ होण्याची संधीच मिळत नाही. यातून बाळाला श्वसनाचे विकार होण्याची शक्यता फारच जास्त असते.
» ते बाळ भविष्यात स्थूल होण्याची शक्यता अधिक असते.
» ते बाळ वयस्क झाल्यानंतर त्यालाही मधुमेहाचा त्रास होणे साहजिकच असते.
गर्भारपणात स्वत:ची काळजी कशी घ्याल?
प्रजनन काळातील मधुमेह टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढू न देणे. यासाठीची तयारी तुम्ही गर्भार राहण्याआधीपासून करायला हवी. मात्र, तुम्हाला हा त्रास असेल तर त्याच्याशी सामना करण्यासाठी आणि त्याला रोखण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबींचं पालन करणं आवश्यक आहे. या बाबी पुढीलप्रमाणे -
गर्भारपणाचा आराखडा तयार करा गर्भ राहण्याआधीच शक्यतो तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा. गर्भ राहण्याआधीपासूनच तुमचे वजन योग्य असेल, याकडे लक्ष द्या.
रक्तातील साखरेची चाचणी करून घ्या.
रक्तातील साखरेचं प्रमाण धोकादायक पातळीवर नाही ना हे पाहण्यासाठी तुम्ही डॉक्टरांना सांगून त्याची तपासणी करू शकता. तुम्ही गर्भार राहण्याच्या किमान तीन महिने आधीच रक्तातील साखर योग्य प्रमाणात आहे की नाही, हे तपासून घ्या. दर आठवडयाला किमान अडीच तास व्यायाम करा. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य राखण्यास मदत होते. रक्तातील साखरेचे प्रमाण नियमितपणे तपासण्यासाठी 'ब्लड ग्लुकोज मीटर'चा वापर करा.
आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
योग्य आहारपद्धतीचा अवलंब करा. त्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी योग्य प्रमाणात राहते आणि तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या शरीराला योग्य प्रमाणात पोषण मिळते.
व्यायाम
या काळात योग्य आणि सुरक्षित व्यायाम करण्यासाठी तुमच्या फिटनेस एक्स्पर्ट्सशी चर्चा करा.
योग्य तपासणीचा निर्णय :
गर्भारपणातील मधुमेह इन्शुलीनच्या साहाय्याने आटोक्यात ठेवता येतो. ओएचए वादग्रस्त आहे. इन्शुलिन थेरपीच्या साहाय्याने रक्तातील साखरेची पातळी योग्य प्रमाणात राखता येते. रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य पातळीवर ठेवल्याने तुमच्या बाळाचं वजन वाढण्यास मदत होते. तसंच त्यामुळे मुदतपूर्व प्रसूती, गर्भपात रोखले जातात आणि गर्भारपणातून चांगले परिणाम साधण्यास तुम्हाला मदत होते.
चोवीस तासांच्या अंतराने इन्शुलिन पम्प घेतल्याने मधुमेह आटोक्यात ठेवण्यास मदत होते. पम्प अधिक परिणामकारक आहेत. कारण, ही इन्शुलिन देण्याची योग्य, अचूक आणि लवचिक पद्धत आहे. आणि रक्तातील साखरेचे अतिशय अचूक प्रमाण राखले जाते. त्यामुळे, माता आणि बाळ दोघांनाही गुंतागुंतीपासून सुरक्षा मिळते. सोप्या शब्दांत सांगायचे तर, तुम्हाला प्रजनन काळातील मधुमेह होण्याची शक्यता अगदीच कमी असेल तरीही तुम्ही तुमच्या गर्भारपणाची नीट आखणी करायला हवी, तुमच्या डॉक्टरांशी यासंदर्भात बोला, डॉक्टरांकडे जाताना प्रत्येक वेळी तुमची सर्व औषधे सोबत बाळगा, पोषक आहार घ्या, व्यायाम करा आणि गर्भारपणात वजन अधिक वाढवू नका.या प्रकारची काळजी घेतल्याने तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य पातळीवर राखले जाईल आणि प्रजनन काळातील मधुमेहापासून तुमचे संरक्षण होऊ शकेल. |
| |