Tuesday, January 12, 2016

आरोग्यपूर्ण संक्रांत मजेत मस्त तंदुरुस्त सुगडातील पदार्थ पौष्टिक चवळी

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त
 
 

आरोग्यपूर्ण संक्रांत
अवघ्या चार दिवसांवर मकरसंक्रांत येऊन ठेपली आहे. संक्रांत आली म्हणजे तीळगूळ आलेच. याचबरोबर घरोघरी सुगडांमध्ये धान्य पुजली जातात. ही धान्य काही ठरावीकच असतात. या सणाचं आणि त्या सणाच्या निमित्ताने येणारे तीळ, गूळ, ऊस, बोरं, गाजर या सुगडातील भाज्यांचं महत्त्व जाणून घेऊ या.
संक्रांत म्हटली की महिन्याच्या यादीत पहिला क्रमांक तीळ आणि गुळाने पटकावलेला आढळतो. तर भोगीची भाजी, गूळपोळी असे पदार्थ ठिकठिकाणी केले जातात. या दिवशी सुगड पूजले जातात. या सुगडात ऊस, गाजर, बोरं, हरबरे असे पदार्थ घातले जातात. नेमके याच दिवसांत या पदार्थाचं काय महत्त्व आहे?
मुळात तीळ आणि गूळ हे दोन्ही पदार्थ प्रकृतीने उष्णच म्हणावे लागतील. म्हणूनच हे थंडीच्या दिवसांत अधिक सेवन केले जातात. आपल्याकडे म्हणजे भारतीय संस्कृतीत तिळाला तितकंच महत्त्व आहे. कित्येक ठिकाणी तिळाच्या तेलाने मालिशही केलं जातं. तिळाबरोबरच गाजर, ऊस, बोरं असे घटकही पूजले जातात किंवा भोगीच्या भाजीत त्याचा वापर करतात. मात्र काहीही असलं तरीही त्या भाजीत किंवा भाकरीत तिळही घातले जातात. बाकीच्या पदार्थाच्या तुलनेत संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत या तिळाला महत्त्व आहे. पण मुळातच या पदार्थाना या दिवसांत स्थान का मिळालं आहे याचा कोणी विचार केला आहे का? या संक्रांतीच्या निमित्ताने याचं महत्त्व जाणून घेऊ या.
संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे तीळगुळाचे लाडू. या दिवसांत हेमंत ऋतू सरत असतो तर शिशिर ऋतू सुरू होत असतो. या काळात थंड वारे वाहत असतात. त्यामुळे वातावरण प्रसन्न असतं. हा गारवा शरीराला बोचत असतो. म्हणूनच या काळात तीळ, गूळ, ऊस, बोरं असं पदार्थाचं सेवन केलं जातं.
तीळ
या तिळाला आयुर्वेदात 'तिल' असाच शब्द आहे. तिळाच्या बिया तेलवर्गीय बिया म्हणूनच प्रसिद्ध आहेत. अगदी प्राचीन काळानुसार या तेलबियांना महत्त्व मिळालं आहे. पूर्वीच्या काळी या थंडीच्या दिवसांत अंघोळीपूर्वी हे तेल लावलं जायचं. आजही कित्येक ठिकाणी या तेलाचा वापर करतात. तिळाच्या बियांच्या रंगांवरून त्यांचे पांढरे, काळे आणि लाल असे प्रकार आहेत. मात्र पांढ-या तिळात तेल अधिक प्रमाणात असतं तर काळे तीळही औषधी गुणांनी ओतप्रोत भरलेले दिसतात. असे हे तीळ कडू तिखट, आणि गोड तुरट रसाचे असतात.
पचायला थोडे जड असले तरीही स्निग्ध उष्ण गुणाचे आणि कफ-वातनाशक असतात. शरीराला बळ देणारे तर केस आणि त्वचेसाठी पोषक आहेत. त्याचप्रमाणे गरोदरपणात अंगावरचे दूध वाढवणारे आणि दंतरोग दूर करणारे आहेत. भूक आणि बुद्धी वाढवणारे आहे. शक्तिवर्धक असून बद्धकोष्ठता, मूळव्याध, सूज येणे, किडनी विकार, वात, पोटातील अल्सर, भाजणे अशा अनेक व्याधींवर तीळ आणि तिळाच्या तेलाचा प्राथमिक उपचार म्हणून वापर केला जातो. तिळाच्या तेलामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवायला मदत होते.
तिळात मोनोअनसॅच्युरेटेड मेदांले अधिक प्रमाणात असतात ही आप्ल रक्तातील कोलेस्टेरॉल वाढू देत नाही. म्हणूनच हृदयाचे आरोग्य नीट राखण्यास मदत होते. सौंदर्य उपायातही तिळाचा वापर केला जातो. अंघोळीपूर्वी तिळाचं तेल लावल्यास थंडीत त्वचेची होणारी तडतड कमी होते. त्वचा फुटण्याचं प्रमाण कमी होतं. त्याच्यातील स्निग्धपणा त्वचेतील आद्र्रता टिकवून ठेवतो. म्हणूनच या दिवसांत तिळाची पूड भाजीत घालणे, फोडणीत तीळ घालणे किंवा चटणी, वडय़ा आणि लाडू याद्वारे पोटात तीळ घातले जातात. भोगीच्या भाजीत आणि भाकरीतही तीळ घातले जातात.
गूळ
तीळगुळाच्या लाडूंमध्ये वापरला जाणारा गूळही औषधीचा असतो. शरीराला हलकेपणा आणतो, पचायला हलका, पथ्यकर, भूक वाढवणारा, पुष्टी देणारा, पित्तवातनाशक आणि रक्त शुद्ध करणारा आहे.
सुगडातील पदार्थ
त्याचप्रमाणे सुगड पूजण्यासाठी वापरले जाणारे ऊस, गाजर, बोरं याचेही प्रत्येकी गुणधर्म आहेत. ऊस शौचाला साफ करणारा तसंच स्निग्ध, पोषक, वात कमी करणारा आहे. गाजर उष्ण, भूक वाढवणारे, कफवातनाशक आहे. बोरं पचायला हलकी आहेत. असे हे पदार्थ आणि त्याचे गुणधर्म आणि हे वातावरण याचा विचार केला तर हेच पदार्थ या काळात का, याचं उत्तरे अगदी सहज मिळून जातं.

Read More »

पादचक्रासन
आसन करताना पाय चक्राकार पद्धतीने फिरवले जातात. त्यामुळे पोट, मांडय़ा, कंबरेवरची चरबी कमी होण्यास मदत होते
आसन करताना पाय चक्राकार पद्धतीने फिरवले जातात. त्यामुळे पोट, मांडय़ा, कंबरेवरची चरबी कमी होण्यास मदत होते.या आसनात आपण पायाने गोलाकार करतो म्हणून याला पादचक्रासन असं म्हणतात.
आसन
पाठीवर झोपावे. दोन्ही हात शरीरालगत असावे. मानही सरळ असावी. आता उजव्या पायाला वर आणणे. जमिनीपासून ५ सेमी.
असे. पाय सरळ असावे. गुडघ्याला वाकवू नये. आता पाय गोलाकार पद्धतीने पिरवावा. गोलाकार फिरवताना गोल हा आरामदायक पण मोठा असावा. टाचेला जमिनीवर ठेवू नये. म्हणजेच पाय गोलाकार फिरवत असताना टाच ही जमिनीला लागता कामा नये. प्रथम क्लॉकवाईज करावं मग अँटिक्लॉकवाईज करावं.
श्वास
  • श्वास घेताना पाय वरती आणावे.
  • श्वास सोडताना पाय गोलाकार पद्धतीने फिरवताना नियमित श्वास घ्यावा किंवा श्वास घेताना पाय वरच्या दिशेने असावेत. तसेच श्वास सोडताना पाय खाली असावा.
वेळ
सुरुवातीला १५ वेळा करावे. क्लॉकवाईटनंतर अँटिक्लॉकवाईज करावं. आसन करताना घ्यावयाची काळजी पादचक्रासनमध्ये आपण पाय गोलाकार पद्धतीने फिरवतो. पाय फिरवताना घाई करू नये. हळुवारपणे फिरवावेत. पाय फिरवत असताना शरीराचा वरील भाग जास्त असता कामा नये. तसं कमरेवर जास्त ताण पडता कामा नये. हात शरीरालगत असावेत. हे आसन करतेवेळी मानेला वर उचलू नये. मान जमिनीलगत असावी. पाय गोलाकार फिरवत असताना जोरात आणि वेगाने फिरवू नये.
फायदे
  • पादचक्रासनाने पोटाच्या खालच्या भागातील चरबी कमी होते.
  • हे आसन हिप जॉइंट्स, ओबेसिटी, मणक्याच्या स्नायूसाठी चांगले आहे.
  • या आसनामुळे पोटाच्या स्नायूंना चांगला ताण मिळतो.
  • कमरेवरची चरबी कमी होते. तसंच मांडय़ांवरची चरबीही कमी होते.

विशेष नोंद : ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाबाचं किंवा गंभीर पाठीचं दुखणं आहे, तसंच सायटिका आणि स्लिप डिस्कचा त्रास आहे, अशा व्यक्तींनी हे आसन करू नये.

Read More »

अ‍ॅलर्जीला करा बाय बाय
दोन दिवसांपूर्वी वाढलेली आद्र्रता आणि थंडीचा पाठशिवणीचा खेळ यामुळे सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे अशा विकारांना सामोरं जावं लागत आहे. त्यातच ठिकठिकाणी खोदून ठेवलेल्या रस्त्यांमुळे अ‍ॅलर्जी किंवा अस्थमा असलेले लोक बेजार झाले आहेत. या अ‍ॅलर्जीपासून बचाव कसा करता येईल हे जाणून घेऊयात.
जरासं हवामान बदललं की कित्येक जणांना सर्दीला सामोरं जावं लागतं. सध्या तर सतत ऊन आणि थंडीचा पाठशिवणीचा खेळ सुरू आहे. त्यामुळे कित्येक जण या त्रासाचे बळी ठरत आहेत. त्यात ठिकठिकाणी सुरू असलेलं खोदकाम यात भरच पाडत आहे. त्यामुळे धुळीची अ‍ॅलर्जी असलेल्यांची पुरती वाट लागते. म्हणून या मोसमात आपलं घरदेखील किटाणूमुक्त ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण अ‍ॅलर्जीचं मूळ घरातच असतं. अशा या अ‍ॅलर्जीक सर्दीपासून स्वत:चा बचाव कसा करायचा हे पाहू या.
अ‍ॅलर्जी किंवा अस्थमाचा त्रास असलेल्यांना थंडीच्या दिवसांत या त्रासाला सामोरं जावं लागतं. कोणाचं नाक वाहतं, तर कोणाला एका मागून एक शिंका येतात. कोणाला कफ होतो तर कोणाला घशात खवखव. कित्येकांना तर तापही येतो. ताप लवकर जातो म्हणा मात्र अ‍ॅलर्जीचा त्रास दीर्घकाळ सतावत राहतो. यात डोळ्यांनाही त्रास होतो. डोळ्यांमध्ये जळजळ, खाज येणे, लाल होणे असेही विकार संभवतात.
असं का होतं?
धूळ-माती, जनावरांचे केस, परफ्युम आदी कारणं अ‍ॅलर्जीला कारणीभूत ठरतात. खरं म्हणजे या सगळ्या गोष्टी वर्षभर असतात. मात्र थंडीच्या दिवसांत या गोष्टी डोकं वर काढतात. कारण थंडीत या गोष्टींना वातावण अनुकूल असतं. याचं कारण असं की थंड हवेमुळे कित्येक जण दरवाजे आणि खिडक्या बंद करून ठेवतात. गरम कपडे घालतात. कंबल/ ब्लँकेट किंवा रजाईचा वापर केला जातो. त्यात हिटरचा प्रयोग केला जातो. या सगळ्या कारणांमुळेही अ‍ॅलर्जीची समस्या वाढते. थोडक्यात घरातलं वातावरण अ‍ॅलर्जीक लोकांसाठी पोषक असतं. म्हणून सर्दी, ताप, खोकला असे त्रास उद्भवातात.
बचाव कसा कराल?
  •  घरात हवा खेळती राहील, असं करावं. ब्लँकेट, गरम कपडे, कार्पेट्स किंवा सॉफ्ट टॉयज उन्हात वाळत घाला.
  • घरात सूर्यप्रकाश येईल याकडे लक्ष द्या. खिडक्या, दरवाजे सताड उघडय़ा ठेवाव्यात. सूर्यप्रकाशामुळे किटाणूंना लपायला वाव मिळत नाही. 
  • सोफा, कार्पेट्स, स्वेटर, कोट, गाडीचे सीट कव्हर्स, सॉफ्ट टॉईज याची नियमित सफाई करा. तेदेखील उन्हात वाळत घाला. म्हणजे त्यात लपलेले किटाणू नष्ट होतील. 
  • एसीसारख्या घरातल्या उपकरणाची स्वच्छता करा. बरेच दिवस न लावल्याने त्यात घाण किंवा धूळ साचण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे या दिवसांत पंख्यांचा वापर होत नाही. त्यावर धूळ साचते. तसंच पडद्याचे कानेकोपरे स्वच्छ कसे राहतील याकडे लक्ष द्या. 
  • घरात असलेली शोभेची झाडंदेखील अ‍ॅलर्जीला कारणीभूत ठरतात. अशी झाडं ठेवण्यापेक्षा खोटी झाडं ठेवावीत. 
  • अस्थमा असलेल्या लोकांनी कार्पेट किंवा पाळीव प्राण्यांपासून लांब राहावं. 
  • घरात धूम्रपान, सुगंधी उदबत्त्या, उग्र वासाचं परफ्युम्स याचा वापर कमीच करावा.
  • छत, बेसमेंट आणि जिन्याचीदेखील नियमित स्वच्छता राखावी.

Read More »

पौष्टिक चवळी
चायनीज स्पिनच, काऊ-पी, चवळी किंवा चवळीची पानं आणि अमरनाथ लिव्हज अशा विविध नावांनी चवळीची भाजी ओळखली जाते.
चायनीज स्पिनच, काऊ-पी, चवळी किंवा चवळीची पानं आणि अमरनाथ लिव्हज अशा विविध नावांनी चवळीची भाजी ओळखली जाते. ही भाजी भारतात सर्वत्र ठिकाणी उपलब्ध आहे. याची पानं छोटी छोटी असतात. पराठा, सलाड, कढी यातही घातली जाते. परतवून किंवा कच्चीच खाल्ली जाते. उकडल्यावर तिची चव निघून जाते. दाणे, शेंगा, आणि पालेभाजी अशा विविध स्वरूपात ही भाजी खाल्ली जाते. या भाजीचे गुणधर्म जाणून घेऊयात.
  • काबरेहायड्रेट्स, प्रथिनं, जीवनसत्त्व के, बी ६, अ आणि क यांचा भरपूर साठा असतो. त्यामुळे शरीराला आवश्यक असणारी नैसर्गिक ऊर्जा या भाजीतून मिळते.
  • मँगनीज, लोह, तांबं, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि फॉस्फरस असल्यामुळे शरीराला आवश्यक असणा-या खनिजांचा साठय़ाचं प्रमाण योग्य राखण्यास मदत होते.
  • फायबरचं प्रमाण उच्च असल्यामुळे पाचकशक्ती सुधारते. बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांनी या भाजीचं आवर्जून सेवन करावं.
  • ही भाजी वजन कमी करण्यास मदत करते. कारण यात असलेलं प्रोटिन रक्तातील इन्शुलिनची पातळी कमी करण्यास मदत करते. तसंच शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे अतिरिक्त वाढलेली चरबी कमी करण्यात मदत करते.
  • लालसर पानं असलेली चवळी रक्तातील हिमोग्लोबीनची पातळी वाढवण्याचं काम करते.
  • अतिसारामुळे बेझार असलेल्या रुग्णांना ताज्या चवळीच्या पानांचा रस प्यायला दिल्याने आराम पडतो.
  • ताज्या पानांचा नियमित रस प्यायल्याने केस गळणे किंवा अकाली पांढरे होण्याचे प्रमाण कमी होते.
  • कॅल्शिअमचं प्रमाण अधिक असल्याने ऑस्टिओपोरोसिससारख्या आजारावर नियंत्रण मिळतं. म्हणूनच भरपूर प्रमाणात कॅल्शिअम मिळत असल्याने या भाजीचं आवर्जून सेवन करावं.
  • कॅन्सरपासून बचाव करण्याची क्षमतादेखील यात असते.
  • दोन चमचे पानं एक कप पाण्यात दहा मिनिटं उकळून त्यानंतर त्या पाण्याने गुळण्या केल्यास तोंडातील अल्सरचं किंवा घसा सुजणे यावर आराम पडतो.
  • गरोदर महिलांनी याचं आवर्जून सेवन करावं. कारण गरोदरपणात होणारी कॅल्शिअमची झीज भरून काढते आणि बाळाची योग्य वाढ करते. प्रसूतीला त्रास होत नाही तसंच प्रसूतीनंतर मातेला भरपूर दूध येण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.

Read More »
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe