Tuesday, August 18, 2015

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

मानसिक तणाव आणि मुलं

आजकालची शाळकरी मुलं आत्महत्या करत असल्याच्या बातम्या सतत ऐकायला मिळत आहेत. अशी मुलं मानसिक ताणाची शिकार असतात. जेणेकरून ते आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. असं का होतं? त्याची कारणं जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न

आजकाल लहान मुलांचं आत्महत्या करण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. दर दोन दिवसांनी शाळकरी मुलांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या वर्तमानपत्रातून झळकत आहेत. कधी कोणाचा राग आला म्हणून तर कधी परीक्षेत कमी मार्क मिळाले म्हणून, तर कधी आई-वडिलांचं पटलं नाही म्हणून.. अशी एक ना अनेक कारणं आढळतात. पण आत्महत्येचा पर्याय हा शेवटचा पर्याय आहे.

तो स्वीकारण्यापर्यंत मुलांच्या मानसिक अवस्थेत खूप बदल झालेले असतात. अशी मुलं सतत एका मानसिक तणावाखाली वावरत असतात. इतक्या लहान वयात मुलांना कशामुळे मानसिक तणाव येतो जेणेकरून ते मानसिक तणावाखाली वावरतात. अशा मानसिक अवस्थेत जाण्याची काय कारणं आहेत. हे डिप्रेशन त्यांना का येतं किंवा त्यातून त्यांना बाहेर कसं काढलं पाहिजे, हे जाणून घेऊयात.

डिप्रेशन ही अशी एक मानसिक अवस्था आहे जी दोन आठवडे किंवा त्यापेक्षा अधिक काळ सुरू राहू शकते. मात्र यानंतर ती गंभीर रूपही धारण करू शकते. यात ती व्यक्ती काही काळासाठी उदास असते. कोणत्याही कामात रुची घेत नाही. कोणतीही गोष्ट करायला  कंटाळा करते. सतत नकारात्मक विचार मनात डोकावत राहतात. परिणामी शरीरातील ऊर्जा कमी होते. नेहमीचं आयुष्य कोलमडून जातं. अशा अवस्थेत मुलं असली तर ती दुस-यांचं अधिक नुकसान करू शकतात. त्यातूनच मग ती आत्महत्येचा पर्याय निवडतात. आपली मुलं मानसिक तणावाची शिकार होत आहेत किंवा डिप्रेशनमध्ये जात आहेत हे कसं समजत?

लक्षणं

» मुलांची मानसिक अवस्था ही मोठय़ांप्रमाणे परिपक्व नसते. म्हणून ही मुलं पटकन हताश किंवा उदास होतात. आपल्या मनात काय चाललं आहे हे समोरच्याला नीट मोकळेपणाने सांगू शकत नाहीत.
» सतत उदास किंवा चिडचिड करत राहणं,
»  छोटय़ा छोटय़ा गोष्टींवर प्रत्येकाशी वाद घालणं
»  कोणतंही काम जबाबदारीने न करणं
»  सतत कोणत्या ना कोणत्या आजाराची कारणं देणं
»  खोटं बोलणं
» अभ्यासाकडे दुर्लक्ष करणं
» चोरी अथवा नशा करणं
» अपराधीपणाच्या गर्तेत सतत स्वत:ला ठेवणं
» वेळीच इलाज झाला नाही तर त्यांच्यातील आत्मविश्वास कमी होऊन ते स्वत:ला कमी लेखतात.
या लक्षणांपैकी काही लक्षणं तुमच्या मुलांमध्ये दिसायला लागली तर वेळीच काहीतरी उपचार करा किंवा त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

डिप्रेशनमध्ये जाण्यायामागची कारणं

»आजकालची मुलं अधिक प्रमाणात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसतात. या तंत्रज्ञानावरच ती ब-याचदा अवलंबून असतात. कारण या सोशल नेटवर्किंग साइटवरून सतत एकमेकांशी चढाओढ करत असतात. सतत एकमेकांशी चढाओढ झाल्यामुळे आपण कुठेतरी कमी पडतो आहोत अशी भावना त्यांच्यात निर्माण होते आणि मुलं आपोआपच डिप्रेशनची शिकार होतात.
» मुलं मानसिक आजाराला बळी पडण्याचं मोठं कारण म्हणजे मुलं जेव्हा पालकांना काहीतरी सांगत असतात, तेव्हा पालक त्यांचं काहीही ऐकून घेत नाही.. त्यांच्या शाळेत काय घडतं हे ते सांगण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवं.
» आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी करू नका.
» कधी कधी पालक आपल्या मुलांकडून अवास्तव अपेक्षा करतात, म्हणजे आपली पूर्ण न झालेली स्वप्नं ते मुलांमार्फत पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. या दडपणाखाली मुलं सतत आल्याने ती डिप्रेशनमध्ये जातात.
» आजकाल आई-वडील दोघंही नोकरी करत असल्यामुळे त्यांचे कित्येक तास घराबाहेरच जातात. त्यामुळे मुलांना आई-वडिलांसोबत वेळ मिळत नाही.
» कधी कधी आर्थिक परिस्थिती बेताची असली की मुलं अतिश्रीमंत होण्याची स्वप्न पाहतात.

यामुळे मुलांच्या जीवनावर खूप गंभीर परिणाम होतो. एक तर स्वत:ला नुकसान करण्याचा प्रयत्न करतात किंवा दुस-याचं नुकसान करतात. त्यासाठी ते राग आणि हिंसेचा वापर करतात. कधी कधी बोलण्यातून दुस-यांचा अपमान करतात. मित्र किंवा कुटुंबात भावंडांबरोबर किंवा अन्य कोणाबरोबर मारामारी करतात. काही मुलं आपला राग इतरांवर काढत नाहीत. मनातल्या मनात ती कुढत बसतात. मात्र हे अतिशय धोकादायक आहे. अशी मुलं जेवण न जेवणं, स्वत:ला कुठेतरी कोप-यात किंवा एका बंदिस्त खोलीत ठेवणं, रडणं, पूर्ण झोप न घेणं, वा अन्य कोणत्याही प्रकारे स्वत:ला इजा करून घेतात. त्याकडे त्यांचं लक्षही नसतं, असा सगळ्याचा त्यांच्यावर परिणाम होऊन मुलं डिप्रेशनमध्ये जातात आणि परिणामी आत्महत्येचा पर्याय स्वीकारतात.

आई-वडील दोघंही नोकरीसाठी दिवसभर बाहेर राहतात. घरात मुलं एकटी असतात. त्यातच आता विभक्त कुटुंब पद्धतीच सगळीकडे पाहायला मिळते. ही आजकालची सत्यपरिस्थिती आहे. एकत्र कुटुंब पद्धती हळूहळू नाहीशी होत चालली आहे असं म्हटलं तरी चालेल. एकत्र कुटुंब पद्धतीत मुलांचं म्हणणं ऐकून घ्यायला घरी आजी-आजोबांसारखी माणसं होती. ते मुलांना प्रेम आणि आपुलकी द्यायचे, मात्र आता घरात कोणीच नसतं. त्यामुळे मुलं आपलं मन कोणापाशीही व्यक्त करू शकत नाही.

संध्याकाळी पालकांना त्यांच्याशी बोलायला वेळ नसतो. त्यामुळे ते मानसिक ताणाची शिकार होतात. मात्र एकत्र कुटुंब आणि समाजात वावरणारी मुलं एकमेकांच्या नातेसंबंधांविषयी जाणून घेतात. असं विभक्त कुटुंबात होत नाही. म्हणून पालकांनी आपली जबाबदारी ओळखणं गरजेचं आहे. मुलांशी मुलांचे मित्र बना.

काय कराल?

मुलांच्या भावनांचा कडेलोट झाला की मुलं आत्महत्येचा मार्ग अवलंबतात. म्हणूनच यातून मुलांना बाहेर काढायचं असेल तर मुळात ते मानसिक तणावाची शिकार होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.
» मुलांकडून अवास्तव अपेक्षा न बाळगता त्यांची क्षमता समजून घ्यावी.
» प्रत्येक वेळी ओरडून किंवा मारून सांगण्यापेक्षा त्यांच्या भावना समजून घ्याव्यात.
» त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं. प्रत्येक वेळी ते काय सांगतायेत हे नीट लक्षपूर्वक ऐकावं.
» सतत त्यांना उपदेश करू नका किंवा प्रत्येक वेळी सल्ला देऊ नका
» त्यांचा आत्मविश्वास सतत जागरूक ठेवा.
» पालकांना शक्य असल्यास मुलांच्या कामात मदत करायला हवी.
» कधीही आपल्या मुलाची इतर मुलांच्या बरोबर तुलना करू नका
» एकाग्रता किंवा मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी त्यांना सूर्यनमस्कार, प्राणायाम, कपालभाती आदी आसनं शिकायला सांगा. तज्ज्ञांकडून त्यांनी ती शिकून घ्यावी.
» मुलांच्या खाण्यावर लक्ष ठेवा. ताजी फळं, हिरव्या भाज्या, सलाड, दूध, दही, मीठ, गोड लस्सी, उसाचा रस आदी गोष्टींचा आहारात समावेश करावा. शाळेत डबा देतानाही पचायला हलका आणि पौष्टिक डबा देता येईल याकडे लक्ष द्या.

Read More »

तीर्यक ताडासन

तीर्यक ताडासन हे आसन ताडासनाचाच एक प्रकार आहे. यात शरीराचा आकार झाडाप्रमाणे दिसतो. जे कोणी नव्याने योगा सुरू करतात त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त आसन आहे. कारण त्यामुळे पुढची आसनं करण्यासाठी शरीराची तयारी होते.

तीर्यक ताडासन हे आसन ताडासनाचाच एक प्रकार आहे. यात शरीराचा आकार झाडाप्रमाणे दिसतो. जे कोणी नव्याने योगा सुरू करतात त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त आसन आहे. कारण त्यामुळे पुढची आसनं करण्यासाठी शरीराची तयारी होते.

कृती

» ताठ सरळ उभं राहावं, पायांमध्ये दोन ते अडीच फूट अंतर ठेवावं.
» दोन्ही हात शरीराच्या बाजूने वरती आणून दोन्ही हातांची बोटं एकमेकांत गुंफवावीत.
» हाताला ताण द्या आणि हळुवारपणे डाव्या बाजूला वळा.
» कंबरेच्या दिशेला वाकावं, वाकताना पुढे किंवा मागे जाऊ नये.
» या स्थितीत सुरुवातीला दहा सेकंद थांबावं, नंतर हळुवारपणे पूर्वस्थितीत यावं.
» पाच सेकंद थांबावं आणि पुन्हा दुस-या बाजूने हे आसन करावं.

श्वास घेताना

दोन्ही हात वर करताना श्वास घ्यावा. हात एकमेकांत गुंफवावे आणि कंबरेतून वाकताना श्वास सोडावा
आता श्वास घेऊन पूर्वस्थितीत यावं. मात्र श्वास सोडताना हात मोकळे सोडावेत.

किती वेळ करावं?

» सुरुवातीला दहा सेकंद या आसनात थांबावं आणि नंतर हळूहळू वेळ वाढवावा. मात्र ३० सेकंदांपेक्षा अधिक वेळ या स्थितीत राहू नये.
» या आसनाचे दोन भाग करावे.

आसन करताना काय काळजी घ्यावी?

या आसनात वाकताना हळुवारपणे वाकावं, जेवढा वेळ तुम्ही थांबू शकता तेवढाच वेळ आसनात थांबावं. तसंच जितका वेळ वाकता येईल तितकाच वेळ वाकावं. जास्त ताण देऊ नये. वर येतानाही हळुवारपणे यावं. नाहीतर पाठीत किंवा कंबरेत लचक भरू शकते.

फायदे

» जे फायदे ताडासनापासून मिळतात तेच फायदे या आसनापासून मिळतात. म्हणजे या आसनाने कंबरेला, हाताला, खांद्यांना ताण मिळतो.
» कंबरेतील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते तसंच कंबरेचा आकार पूर्ववत होतो.

टीप

हे आसन करताना आपण दुस-या पद्धतीनेसुद्धा करतात. केवळ पायांच्या टाचांवर तोल सांभाळून हे आसन केलं जातं.

Read More »

आरोग्यवर्धक कोबी

ब्रासिकासिए कुळातील ही फळभाजी आहे. पांढ-या-हिरवट रंगाची फळासारखी दिसणारी ही भाजी म्हणजे बहुसंख्य पानांचा गुच्छच असतो. इंग्रजीत 'कॅबेज' तर हिंदीत 'बंद गोबी' तर मराठीत 'पानकोबी' असंही म्हणतात.

ब्रासिकासिए कुळातील ही फळभाजी आहे. पांढ-या-हिरवट रंगाची फळासारखी दिसणारी ही भाजी म्हणजे बहुसंख्य पानांचा गुच्छच असतो. इंग्रजीत 'कॅबेज' तर हिंदीत 'बंद गोबी' तर मराठीत 'पानकोबी' असंही म्हणतात. हा कोबी हिरवा, पांढरा, लाल आणि जांभळ्या अशा तीन रंगांत उपलब्ध असतो. कोबी विविध प्रकारे खाल्ला जातो. कच्च्या कोबीपासून ते लोणच्यापर्यंत कोबीचं सगळं काही केलं जातं. या कोबीत जीवनसत्त्व 'के', 'सी' आणि पाचक फायबरचं प्रमाण अधिक असतं. अशा या कोबीचे आरोग्यपूर्ण फायदे पुढीलप्रमाणे -

»  ताजा कोबी नैसर्गिकरित्या अँटिऑक्सिडंटचं काम करतो. शरीरात नको असलेली घटकद्रव्यं बाहेर टाकतो.
»  यात पोटॅशिअम, लोह, मॅग्नेशिअमचं प्रमाण अधिक असतं. पोटॅशिअममुळे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब नियंत्रित राहातात. तर मॅग्नेशिअममुळे विकार होत नाही. तसंच त्यातील लोहामुळे लाल रक्तपेशी वाढायला मदत होते.
»  यात जीवनसत्त्व 'के'चं प्रमाण अधिक असल्याने हाडं मजबूत होण्यास मदत होते. त्यामुळे सांधेदुखी कमी होते.
»  कच्चा कोबीच्या सेवनाने रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल अर्थात एलडीएलची पातळी कमी करायला मदत होते. तसंच रक्तातील साखरेचं प्रमाणही नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
»  वजन आटोक्यात ठेवण्यासाठीही कच्च्या कोबीचं सेवन केलं जातं.
»  नियमित सेवनाने कॅन्सरसारख्या गंभीर आजारापासून बचाव करण्यास मदत होते.
»  पाचक असल्याने पोटातील अल्सरपासून बचाव करण्याचं काम होतं.
»  लाल कोबीत मेंदूला पूरक असे घटक असून त्याच्या नियमित सेवनाने एकाग्रता वाढवण्यास मदत होते.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe