Tuesday, June 23, 2015

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

आला पाऊस जपा खाण्याची हौस!

आला पावसाळा तब्येत सांभाळा असं सर्रास म्हटलं जातं. पण तब्येत सांभाळा म्हणजे नेमकं काय? किंवा तब्येत सांभाळण्यासाठी आपण काय खावं आणि खाऊ नये हे लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण त्यावरच आपल्या आरोग्याचं गणित अवलंबून असतं.

बाहेर मस्त पाऊस पडायला लागला की आपल्याला चमचमीत खाण्याचे वेध लागतात. मग घरात आईला किंवा बायकोला गरमागरम भजीची किंवा वडय़ांची, ब्रेड पॅटिस किंवा अन्य कोणत्या पदार्थाची फर्माईश केली जाते. ऑफिसमध्ये असू तर ऑफिसच्या बाहेर मिळणा-या वडे-भजींवर ताव मारला जातो.

मात्र अशा पदार्थामुळे वात निर्माण होण्याची शक्यता असते. घरात आपण आपल्या खाण्याची किंवा पिण्याच्या पाण्याची काळजी घेतोच. मात्र घराबाहेर पडलेल्या किंवा ऑफिसमध्ये जाणा-या मंडळींना ते शक्य होतंच असं नाही. मग बाहेरच्या पदार्थावर ताव मारला जातो आणि मग विविध आजारांना आमंत्रणच मिळतं. म्हणूनच घराबाहेर पडणा-या मंडळींनी नेमकी कशी काळजी घ्यावी हे जाणून घेऊ या.

काय टाळाल आणि काय खाल?

»  सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑफिसमध्ये घरातून जेवणाचा डबा घऊन जाणं आवश्यक आहे. बाहेर मिळणारे विविध चॅटचे प्रकार, फास्ट फूड, सँडविचेस, फ्रूट ज्युस आपल्याला भुरळ घालतात खरे, पण ते खाणं शक्यतो टाळावंच. तसंच रस्त्यावर मिळणारं ताक, लिंबूपाणी, गोळा, कुल्फी घेणं टाळावंच. कारण या गोष्टी आरोग्याच्या दृष्टीने तितक्याशा सुरक्षित नसतात. किंवा त्या करताना तितकीशी काळजी घेतली जात नाही.

»  या दिवसांत कच्चे पदार्थ टाळावेत. उदाहरणार्थ, भाज्यांचे सलाड. कच्च्या भाज्या खाण्यापेक्षा तेलावर फ्राय केलेल्या भाज्या खाव्यात.

»  सगळी फळं आणि भाज्या पाण्याने व्यवस्थित धुवाव्यात. विशेषत: पालेभाज्या आणि फ्लॉवर. या भाज्या चार ते पाच पाण्यात स्वच्छ धुवाव्यात. म्हणजे त्याला लागलेली माती निघून जाते. कारण या भाज्या आपण रस्त्यावरून आणतो.

»  गरज असेल तितकंच खा. कारण या दिवसांत पचनक्रिया मंदावते. म्हणूनच गरजेपेक्षा अधिक पदार्थ खाऊ नका.

»  शक्यतो गरम पदार्थच खावेत. तसंच पुदिना किंवा आल्याचं आहारात समावेश करावा. आल्याचा चहा या दिवसांत खूप चांगला असतो.

»  नैसर्गिक आंबट पदार्थाचा आहारात समावेश करावा. उदाहरणार्थ चिंच, लिंबू, पातळ ताक आणि कोकम यांचा सूप, सार, आमटी किंवा भाज्यांमध्ये याचा समावेश करावा.

»  मूगडाळ ही पचायला चांगली असते. म्हणूनच मुगाच्या डाळीची खिचडी किंवा वरण यांचा आहारात समावेश करा.

»  आलं, मिरी, लसूण, हिंग, सुंठ, हळद, कोथिंबीर, जिरं यांसारखे पदार्थ तुमची पचनशक्ती सुधारते.

»  भेंडी, दुधी, पडवळ, सुरण, भाजलेली वांगी किंवा कारली यांसारख्या भाज्यांचा आहारात समावेश करावा.

»  डाळिंब, चिकू, केळी आणि स्ट्रॉबेरी ही फळं पावसाळ्यात आवर्जून खावीत. तसंच दोन खारीका दररोज खाव्यात म्हणेज तुमच्या शरीराला आवश्यक असणारं लोह आणि ऊर्जा त्यातून मिळते.

»  मांसाहारी पदार्थ खाणा-यांनी करी किंवा रश्श्याचे पदार्थ खाण्यापेक्षा सूप्सला प्राधान्य द्यावं.

»  थोडक्यात तुरट, कडवट किंवा तिखट पदार्थ खाणं कधीही चांगलं असतं.

»  केवळ उकळलेलं आणि गाळलेलं पाणी प्यावं.

ऑफिसला येणा-यांसाठी खास डाएट

ऑफिसला जाणा-या मंडळींची घर आणि ऑफिस अशी नेहमीच तारेवरची कसरत असते. अशा वेळी डाएटकडे दुर्लक्ष केलं जातं. आपलं डाएट नियंत्रित ठेवणं हे ऑफिसला जाणा-यांसाठी तारेवरची कसरत असते. प्रत्येक वेळी त्यांना हेल्दी फूड घेणं जमेलच असं नाही. त्यामुळे पावसाळ्यात अधिकाधिक नोकरदार मंडळी आजारी पडताना दिसतात. कारण बाहेरचं वातावण बदललेलं असतं. त्यात ते योग्य आहार घेत नाहीत आणि कामाच्या नादात खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष होतं, परिणामी आजारी पडतात. म्हणूनच काही गोष्टींचं पालन केलं तर आपलं आरोग्य ते चांगलं राखण्यास मदत करू शकतात.

न्याहारीत काय घ्याल?

»  भरडलेल्या मिक्स धान्याची भाकरी किंवा पोळी, गव्हाचा ब्रेड, ओट्स, मोड आलेले मूग, उकडलेलं किंवा फ्राय केलेलं अंडं.

दुपारचं जेवण

»  चपाती, इडली किंवा सोयाबीन सूप

»  भाज्या, डोसा किंवा गव्हाचा ब्रेड

»  डाळ किंवा सांबार किंवा ग्रील्ड चिकन

»  परतवलेल्या हिरव्या फळभाज्या

संध्याकाळची न्याहारी

»  केळ / संत्र/ लिंबू/ बदाम किंवा भाजलेले चणे

रात्रीचं जेवण

»  पोळी आणि रस्सा भाजी किंवा चिकन रस्सा

»  गार्लिक ब्रेड किंवा भात

»  परतवलेल्या हिरव्या भाज्या

»  डाळ किंवा दही

सध्याच्या घडीला आपण आपल्या आहाराबाबत खूपच सतर्क झालो आहोत. आपण ज्या आजारांना तोंड देतो त्यातले कित्येक आजार हे आपण जे पदार्थ सेवन करतो त्यामुळेच होत असतात. म्हणूनच पावसाळ्यात आपण योग्य तो आहार घेतलाच पाहिजे. संतुलित आहार घ्यावा. तसंच आपल्यासोबत योग्य तो आहार बरोबर ठेवावा.

कुजलेले, वास येणारे किंवा किडे पडलेल्या पदार्थाची ताबडतोब विल्हेवाट लावावी. जेवण्यापूर्वी किंवा काहीही खाताना इतकंच नव्हे कोणत्याही पदार्थाला हात लावताना प्रथम हात धुवावेत. कारण पावसाळ्यात आरोग्याच्या दृष्टीने ठेवलेली स्वच्छता आजारांशी दोन हात करायला मदतच करते.

Read More »

प्राणायामचे प्रकार

मागच्या वेळी आपण प्राणायाम म्हणजे काय किंवा त्याचा अर्थ काय हे पाहिलं. तसंच त्याच्या काही प्रकारांविषयी सविस्तर जाणून घेतलं. आता प्राणायामच्या पुढील प्रकारांविषयी जाणून घेऊ या.

उज्जायी

उद् + जय यापासून 'उज्जायी' हा शब्द तयार झाला. उद् म्हणजे 'जोराने' व 'जय' म्हणजे यश. ही क्रिया करताना कंठातून शिट्टीसारखा आवाज निघतो. या प्राणायामच्या सरावाने शरीरात उष्णता निर्माण होते म्हणून हा आपण हिवाळ्यात करावा.

क्रिया

मांडी घालून अथवा पद्मासनात बसावं. तोंड बंद ठेवा. आता हनुवटी गळपट्टीच्या हाडामध्ये व उरोस्थीवरील खोबणीत टेकू द्या. मानेला जास्त ताण देऊ नये.

डोळे बंद करा आणि दोन्ही नाकातून हळुवारपणे दीर्घ श्वास घ्या. फुप्फुसे पूर्ण भरेपर्यंत श्वास घ्या. त्यावेळी 'सस्' असा आवाज होणे आवश्यक आहे. आता जीभ उलटी करून जिभेचा शेंडा तळ्याला आतल्या बाजूस लावून शक्य जितक्या वेळ रोखता येईल तेवढा वेळ रोखावे याला कुंभक म्हणतात. नंतर डोळे वर करा. व हळुवारपणे श्वास बाहेर सोडावे.

यावेळी उजव्या हाताने उजवे नाक बंद करून डाव्या नाकाद्वारे छाती फुगवत श्वास बाहेर सोडावा. श्वास बाहेर जाताना घर्षणयुक्त आवाज येतो. हा आवाज एकसारखा असला पाहिजे.

फायदे

या प्राणायामामुळे डोक्यातील उष्णता कमी होते तसेच दमा, क्षय व फुप्फुसाचे रोग बरे होतात. या प्राणायामाच्या नित्य सरावाने जठराग्नी प्रदीप्त होते. त्यामुळे पचनक्रिया श्वसनक्रिया आणि ज्ञानक्रिया कार्यक्षम बनतात.

सीत्कारी

या प्राणायाममुळे शरीरात थंडावा निर्माण होतो. याचा सराव उन्हाळ्यात केला तर तो अधिक परिणामकारक होतो. तहान लागली असताना हा प्राणायाम केल्यास तहान भागल्याचं समाधान मिळतं.

क्रिया

प्रथम पद्मासनात किंवा मांडी घालून बसावं. आता दात एकमेकांवर दाबून ठेवा, जीभ दातांना लावा. जिभेचं टोक टाळ्याला लावा. ओठ किंचित विलग ठेवा आणि 'सी.. सी..सी' असा आवाज करून तोंडाने पूरक करा म्हणजेच श्वास आत घ्या. श्वास आत घेऊन झाल्यावर तोंड बंद करा व शक्य होईल तितका वेळ कुंभक करा व त्यानंतर दोन्ही नाकाने रेचक करा म्हणजे श्वास बाहेर सोडा.

फायदे

या प्राणायामच्या सरावाने भूक, तहान, आळस, झोप दूर पळतात. डोळे व कान यांना थंडावा येतो, यकृत, प्लीहा कार्यान्वित झाल्याने पचनक्रिया सुधारते. शारीरिक शक्ती व मनोबल वाढते. छातीत जळजळ होणे व पित्तासारखे दोष नष्ट होतात.

शीतली

या प्राणायाममुळे देखील शरीरात थंडावा निर्माण होतो. हा प्राणायाम वसंत आणि ग्रीष्म ष्टद्धr(7०)तूत केल्यास जास्त फायदा होतो. पंधरा ते वीस मिनिटांपर्यंत या प्राणायामचा सराव करावा.

क्रिया

पद्मासन किंवा वज्रासन या आसनात बसून, तोंड उघडून जीभ बाहेर काढा आणि पक्षाच्या चोचीप्रमाणे जिभेची नळी करून 'सी..सी..सी' असा आवाज करीत तोंडाने जिभेवरून श्वास आत खेचा (पूरक करा). पूरक पूर्ण होताच तोंड बंद करा. थोडा श्वास रोखून ठेवा व दोन्ही नाकाद्वारे हळुवारपणे श्वास बाहेर सोडा. म्हणजेच रेचक करा.

फायदे

या प्राणायाममुळे रक्तात असणारे विषारी घटक बाहेर फेकले जातात, त्यामुळे रक्तशुद्धी होते. या प्राणायामच्या सरावाने प्लीहा, त्वचारोग, ताप, अजीर्ण होणे व बद्धकोष्ठता यांसारखे रोग बरे होतात. रागट व क्रोधी व्यक्तीसाठी हा प्राणायाम खूप लाभदायी आहे, कारण या प्राणायाममुळे डोके शांत राहते.

भस्त्रिका

या प्राणायामात लोहाराच्या भात्याप्रमाणे जोरात हवा आत घेतली जाते व बाहेर फेकली जाते म्हणून या प्राणायामास 'भस्त्रिका' असं म्हणतात. लोहार ज्याप्रमाणे त्याचा भाता जोरजोराने चालवतो त्याचप्रमाणे श्वास हा झपाटय़ाने घेतला जातो. कपालभाती व उज्जायी प्राणायामाचं मिश्रण यात दिसून येतं. कुंभकाच्या सर्व प्रकारांत भस्त्रिका अधिक लाभदायी आहे.

क्रिया

पद्मासनात अथवा मांडी घालून बसावं. पाठ, मान डोके ताठ ठेवावेत. हात गुडघ्यावर किंवा मांडीवर ठेवा. तोंड बंद ठेवा. लोहाराच्या भात्याप्रमाणे जलद व जोराने श्वास घ्या व तितक्याच जोराने श्वास सोडा. तसेच फुप्फुसाचे आकुंचन करा आणि नंतर फुलवा. हा प्राणायाम करताना मगरीच्या आवाजासारखा फस, फस.. फस.. असा आवाज येईल. श्वास घेताना झपाटय़ाने व जलद आत घ्यावा, व तसेच सोडावा म्हणजेच पूरक व रेचक याने भस्त्रिकाचे एक पूर्ण आवर्तन होईल.

हे आवर्तन पूर्ण होईल तेव्हा दीर्घ श्वास घ्यावा. जमेल तेवढय़ा वेळ श्वास रोखून ठेवावा. त्यानंतर संपूर्ण श्वास बाहेर सोडायचा. प्रत्येक आवर्तनानंतर थोडा वेळ आराम करावा व सामान्य श्वासोच्छ्वास करावा. यामुळे फुप्फुसांना थोडा आराम मिळतो. शक्यतो प्रथम एकच आवर्तन करावे.थंडीमध्ये हा प्राणायाम सकाळ-संध्याकाळ करावा. उन्हाळय़ात फक्त सकाळच्या थंड वेळीच हा प्राणायाम करावा.

फायदे

या प्राणायाममुळे गळय़ाची सूज कमी येते. कफ नाहीसा होतो. नाक व छातीत होणारा त्रास बरा होतो. तसेच दम व क्षय यासारखे आजार बरे होतात. या प्राणायामुळे कफ, पित्त व वायूने होणारा त्रास नाहीसा होतो.

शरीराला उष्णतेची आवश्यकता असल्यास हा प्राणायाम करावा. शरीरात त्वरित उष्णता निर्माण होते.
(पुढील भागात यापुढचे काही प्रकार जाणून घेऊ या.)

Read More »

रामफळ

सीताफळाच्या जातकुळीतलं म्हणजे काहीसं सीताफळाप्रमाणेच चव असणारं फळ म्हणजे रामफळ होय.

सीताफळाच्या जातकुळीतलं म्हणजे काहीसं सीताफळाप्रमाणेच चव असणारं फळ म्हणजे रामफळ होय. चवीला अतिशय गोड असून सीताफळाप्रमाणेच चव असते. शास्त्रीय नाव अनोना रेटिक्युलाटा असून, इंग्रजीत त्याला बुल्लक्स हार्ट किंवा कॉमन कस्टर्ड अ‍ॅपल असं म्हणतात. या झाडाची पानं पेरूच्या पानासारखी असतात.

झाड कमी प्रमाणात आढळत असून, ते उन्हाळ्यात येणारं फळ आहे. फळाचं आवरण तपकिरी किंवा केशरी रंगाचं असतं. फळ कच्च असताना तपकिरी असतं तर पिकल्यावर केशरी रंगाचं होतं.

खायला अतिशय चवदार आणि दिसायला आकर्षक असलेलं हे फळ रामनवमीच्या सुमारास पिकायला सुरुवात होते म्हणून याला रामफळ असं म्हणतात. भारताप्रमाणेच पाकिस्तान, बांगलादेश, तैवान, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि दक्षिण-पूर्व आशियात आढळते.

»  यात जीवनसत्त्व सीचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे याच्या सेवनाने पचनशक्ती सुधारते.

»  त्वचेचं आरोग्य सुधारतं. त्वचेवर काही जखमा किंवा कापलं असल्यास या फळाच्या सेवनाने आराम पडतो.

»  पोटॅशिअमचं प्रमाण अधिक असल्याने स्नायूंची वाढ होण्यास मदत होते.

»  या फळाची साल कीटकनाशक, रक्तस्तंभक म्हणून काम करते.

»  अतिसार होत असल्यास अर्ध कच्चं आणि अर्ध पिकलेलं फळ खावं आराम पडतो.

»  याचं पान अल्सरवरही फायदेशीर असते.

»  कॅन्सर प्रतिबंधक म्हणूनही काम करतं.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe