जोडप्याला प्रजननाचे प्रयत्न करूनही स्वत:च्या बाळासाठी गर्भधारणा राहात नाही अशा जोडप्यांमध्ये थर्ड पार्टी रिप्रॉडक्शनची किंवा सरोगेशनची मदत घेतली जाते. यात अंडं, शुक्रपेशी, गर्भ किंवा गर्भाशय यांचा वापर केला जातो. जे वंध्यत्व असलेल्या व्यक्तीला किंवा जोडप्याला पालकत्व लाभण्यासाठी तिस-या व्यक्तीने दान केलेले असतात. सामान्यपणे, या तंत्रज्ञानाचा वापर करण्याशिवाय गर्भधारणेची कोणतीही आशा नाही, असं वाटल्यानंतरच या पद्धतीचे प्रजनन गृहीत धरलं जातं. वंध्यत्व असलेले पालक तसेच समाजामध्ये या आधुनिक प्रजनन तंत्रज्ञानाबद्दल अनेकदा गोंधळ असल्याचं लक्षात येतं. याचं मुख्य कारण म्हणजे जननक्षमतेच्या मूलभूत आव्हानांना लोक समजून घेत नाही. त्याचप्रमाणे सत्य परिस्थितीचं केलेलं अवास्तव नाटकीकरण आणि खोटं प्रदर्शन यामुळे हा गोंधळ उडतो. यासोबतच, अनेकदा दात्यांची आणि सरोगेटची निवड उपलब्धता तसंच मूल्य, यशस्वी होण्याचं प्रमाण, धोके, कायदेशीर सूत्र आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नतिकता यांबद्दल प्रश्न विचारले जातात. कोणतेही वैद्यकीय उपचार आणि निर्णयासोबत, जोडप्याने उपचार प्रक्रियेबद्दल सल्ला आणि समुपदेशन करून घ्यायला हवं. तसंच आíथक आणि मानसिक अंमलबजावणी विस्तृतपणे करायला हवी. थर्ड पार्टी रिप्रॉडक्शन चालू करण्याआधी जोडप्याने, त्यांना डॉक्टरांनी सांगितल्यास त्यांच्या जननक्षमतेचं अन्वेषण करण्यासाठी सत्य चाचणी द्यायला हवी. दाता किंवा सरोगेटचे युग्मक किंवा गर्भ स्वीकारणं हा फार सोपा टप्पा नसल्यामुळे या गोष्टीला संवेदनशीलपणे हाताळायला हवं. हा उपचार घेत असलेल्या जोडप्याची गोपनीयता कठोरतेने पाळायला हवी आणि त्यांना याबाबतीत वास्तव अपेक्षा द्यायला हव्यात. » थर्ड पार्टी रिप्रॉडक्शन स्वीकारताना लक्षात ठेवायची काही महत्त्वाची सूत्रं : » एआरटी (असिस्टेड रिप्रॉडक्टिव टेकनिक) जोडप्याच्या संमतीशिवाय केली जाऊ नये. » एआरटीमधून जन्माला येणारं बाळ त्या जोडप्याचेच विवाहनंतर झालेले व दोन्ही जोडीदारांच्या संमतीने झालेलं बाळ असण्याची कल्पना केली जावी. » थर्ड पार्टी रिप्रॉडक्शन करायच्या जोडप्याला दाता अंडे, शुक्रपेशी, गर्भ किंवा गर्भाशय आणि सरोगसी यांमध्ये अनुभव असलेले व ज्ञान असलेले चिकित्सक आणि कर्मचारी यांचं मार्गदर्शन दिलं जाऊ शकतं. शुक्रपेशी दान नर्सिंगकपणे किंवा पुरुषांसाठी शस्त्रक्रिया करूनसुद्धा शुक्रपेशींची प्राप्ती होण्याची शक्यता नसल्यास जोडप्याला शुक्रपेशींचं दान केलं जातं. या दाता शुक्रपेशींचा वापर एकतर स्रीला गर्भवती करण्याच्या (आययूआय) किंवा (आयव्हीएफ) प्रक्रियेमध्ये तिच्या अंडयाला जननक्षम बनविण्यासाठी केला जातो. निश्चितच, या प्रक्रियेची अंमलबजावणी आणि यामध्ये समाविष्ट प्रक्रिया याबद्दल जोडप्याचं समुपदेशन केलं जातं. सर्व दाता शुक्रपेशींचे नमुने प्रस्थापित आणि नोंदणीकृत शुक्रपेशी बँकमधून उपलब्ध केले जातात. हे नमुने जननक्षम दात्यांकडून घेतले जातात. त्यांची संसर्गजन्य आजारांसाठी आणि सामान्य लैंगिक आजारांसाठी चाचणी केलेली असते. नवीन दाता किंवा माहिती नसलेले दाता यांचा कधीही वापर केला जात नाही. शुक्रपेशी बँकेने दिलेल्या कोड क्रमांकानुसार हे नमुने ओळखले जातात. अंड दान ज्या स्त्रियांच्या अंडयाचा कोणत्याही कारणांमुळे अवेळी ऱ्हास होतो, किंवा ज्या स्त्रियांचे अंडे तज्ज्ञ अधिका-याकडून मूल्यांकन करून कमी दर्जाचे असल्याचे लेखी दिलेले असते. त्या स्त्रियांना हा उपचार लागू केला जातो. अंड दात्यांना ओळखलं जातं, त्यांचं समुपदेशन केलं जातं, त्यांची वैद्यकीय तपासणी करून खात्री केली जाते आणि सुपररिव्होल्यूशन आणि ऊसाईट र्रिटायव्हल प्रक्रियेमधून, दात्यांच्या अंडाशयामधून अंडं घेतलं जातं. प्राप्तकर्ता जोडीदाराकडून मिळालेल्या शुक्रपेशींचा या अंडय़ांना जननक्षम बनविण्यासाठी वापर केला जातो. प्राप्तकर्त्यांच्या गर्भाशयामध्ये एक किंवा दोन परिणाम झालेले गर्भ पाठवले जातात. गर्भधारणा झाल्यास प्राप्तकर्ता शारीरिकरित्या पालक असेल परंतु बाळासोबत त्याचे जननिक संबंध नसतील. तिचा जोडीदार (शुक्रपेशी त्याने पुरवल्यास) शारीरिक आणि जननिक दोन्हीरीत्या त्या बाळासोबत संबंधित असेल. अंड दान कोणी करावे व कोणी करू नये? ती व्यक्ती निरोगी असावी आणि वैद्यकीयरित्या गर्भधारणेसाठी तयार असावी. त्यांचं समुपदेशन झालेलं असावं आणि स्वाक्षरीकृत संमती घेतलेली असावी. कोणत्याही स्त्रीने गर्भधारणा होण्याच्या आधी रुबेला किंवा जर्मन गोवर या लसी घेतल्याची खात्री करावी. दात्याची वैद्यकीय तपासणी केली जावी. दात्याचे वय २१ वर्षापेक्षा कमी किंवा ३५ वर्षापेक्षा जास्त नसावं. आयसीएमआर (इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च)ला दाता निनावी असणं आवश्यक आहे. अंड मातृपेशी दान करतो तो, कधीही सरोगेट आई म्हणून त्या जोडप्यासोबत वागू शकणार नाही. सरोगसी म्हणजे काय? सरोगसी ही वैद्यकीयरित्या आणि भावनिक स्तरावर गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. ज्याला वैद्यकीय आणि कायदेशीर व्यावसायिकांकडून काळजीपूर्वक मूल्यांकनाची आवश्यकता आहे. ज्यामुळे सरोगेट आणि पालक दोन्हींचे समाधान होतं. सरोगेट ही एक स्त्री असते, जी इतर जोडप्यासाठी किंवा स्त्रीसाठी गर्भवती राहते. जी स्त्री काही वैद्यकीय कारणांमुळे गर्भवती राहू शकत नाही आणि जिचे गर्भ यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकत नाही. अशा स्त्रीसाठी ही प्रक्रिया असते. भारतामध्ये आपल्या कायद्याने केवळ गर्भावस्थेमध्ये सरोगसीलाच परवानगी दिली आहे. ज्यामध्ये सरोगेट स्त्री बाळ हवं असलेल्या पालकांचे शुक्रजंतू व अंड घेऊन गर्भवती राहते. आवश्यकता असल्यास एक युग्मक दात्याकडून असू शकते, परंतु तो सरोगेटच्या गर्भाशयामध्ये हस्तांतरित केला जाऊ शकत नाही. जीसी गेस्टेशनल सरोगेटचा त्या बाळासोबत कोणताही जननिक संबंध नसेल. सरोगेट आईने काय करावे आणि काय करू नये? » सरोगेट आईचं वय २१ वर्षापेक्षा कमी किंवा ३५ वर्षापेक्षा जास्त नसावं. » स्त्रीने त्या विशिष्ट जोडप्याच्या बाळासाठी सरोगेट होण्याआधी तिची एआरटी चाचणी केली जाते (आणि त्याची नोंद ठेवली जाते) जेणेकरून त्यावरून ती स्त्री सर्व निकष पूर्ण करून यशस्वीरित्या पूर्णपणे गर्भवती राहू शकते का हे समजते. » स्त्री आणि तिचा पती यांचे मानसशास्त्रीय समुपदेशन केलं जातं, ज्यावरून त्यांना या अडचणीमध्ये काय अंमलबजावणी करायची हे समजतं. वैद्यकीय औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर पालक सरोगेटसह आणि तिचा पती कायदेशीर करारावर स्वाक्षरी करतात, ज्यावरून त्या स्त्रीला अशा जन्म देण्यासाठी कायदेशीररित्या सरोगेसी प्राप्त होते. त्यासोबतच सरोगेटची वैद्यकीय आणि सामाजिक काळजी घेतली जाते. » ज्या स्त्रीच्या आयुष्यात तीन गर्भधारणा झालेल्या आहेत अशी स्त्री सरोगेट म्हणून काम करू शकत नाही. » जोडपे भारतीय नागरिक नसल्यास हे तत्त्व फारच कठोरतेने पाळलं जातं. कायदेशीर विवाहित झालेल्या जोडप्याने त्यांच्या निवासी देशांमधून तसेच सरोगेसी स्वीकारण्यापूर्वी भारतीय अधिका-याकडून मंजुरी घेणं फार आवश्यक आहे. थोडक्यात थर्ड पार्टी रिप्रॉडक्श्नचा जेवढा जास्त प्रमाणात वापर होतो, तेवढेच त्यामध्ये नतिकता आणि कायदेशीर अडचणींना समजून घेण्याची आवश्यकता असते. या प्रक्रियेला शक्य तेवढं सहजतेने पुढे नेणं आणि निरोगी बालकाला जन्म देण्यामध्ये समावेश असलेल्या सर्वाना आनंद व समाधान देणं हे यामागचं अंतिम ध्येय आहे. तरीसुद्धा दाता आणि उपचार घेणारे जोडपे यांची आवड उपचार देत असलेल्या डॉक्टरकडून सुरक्षित ठेवली जाते. |