Tuesday, February 24, 2015

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

वाढतं वय गर्भारपणाला धोका

वंध्यत्व ही आजकालच्या मुलींमध्ये सर्रास आढळणारी समस्या आहे.

वंध्यत्व ही आजकालच्या मुलींमध्ये सर्रास आढळणारी समस्या आहे. या वंध्यत्वामागे अनेक कारणं असली तरीही वय हे एक प्रमुख कारण असल्याचं मानलं जात आहे. वयाचा गर्भारपणाशी काय संबंध आहे हे जाणून घेऊ या.

हल्लीच्या मुली करिअर ओरियंटेड असतात. त्यांना स्वत:च्या पायावर उभं राहायचं असतं. करिअरच्या मागे लागल्यामुळे साहजिकच मुलींचं लग्नाचं वय वाढत आहे. त्यानंतर काही जोडपी प्लानिंग करतात. अशात त्यांचं मुल होण्याचं वय वाढत जातं. या सगळ्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होतो आणि त्यांना वंध्यत्वालाही सामोरं जावं लागतं.

पश्चिमी देशांच्या तुलनेत भारतीय महिलांची वयाच्या पस्तीस वर्षानंतर गर्भारपण प्राप्त करण्याची क्षमता कमी असते. नोवा आयव्हीआय फर्टिलिटी (एनआयएफ)ने वेळ आणि सत्य माहिती यांसोबत सुमारे ७ हजार अशा रुग्णांचा सर्वसमावेशक अभ्यास उपक्रम घेतला.

या अभ्यासामधून महत्त्वपूर्ण माहिती अशी समोर आली की, वय वर्ष ३१ नंतरच्या महिलांना व्यंध्यत्वाची जास्त अडचण येत आहे, आणि महिलांमधील अंडाशयाचा फारच कमी प्रतिसाद (पुअर ओव्हरियन रिस्पॉन्स) या कारणामुळे चिंता वाढवत आहे.

अभ्यासानुसार, व्यंध्यत्वासाठी उपचार घेत असलेल्या ६८ टक्के महिला या ३१ किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या आहेत, आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ३६ टक्के महिला ३१-३५ वयामधील तर ३२ टक्के महिला ३५पेक्षा जास्त वयाच्या आहेत.

नुकत्याच झालेल्या अभ्यासामधून असं लक्षात आलं आहे की, ३० टक्के महिलांना डोनर एग(दाता अंडे)ची गर्भवती राहण्यासाठी गरज भासते, कारण त्यांचे अंडाशय आधीपासूनच कमकुवत झालेले असताना त्या आयव्हीआय तज्ज्ञांकडे आल्या. पुढील अभ्यासावरून लक्षात आलं की, २५ टक्क्यांपेक्षा जास्त मासिक पाळींमध्ये एग डोनेशन करावं लागतं.

मागील तीन वर्षापासून व्हिट्रिफिकेशन हे यशस्वी तंत्र असल्याचं लक्षात आलं आहे आणि अधिक गर्भाचा वापर करून ३२ टक्क्यांहून ५१ टक्क्यांपर्यंत गर्भारपणाचा यशस्वी दर वाढला आहे. हे सर्व मासिक पाळीच्या जवळपास ३९ टक्क्यांमध्ये साध्य होतं. या अभ्यासामधून समोर आलेली बाब म्हणजे मोठय़ा संख्येतील उदाहरणांमध्ये पुरुष व्यंध्यत्व हे कारण असू शकतं. आज प्रत्येक चारपैकी एक पुरुष म्हणजे २३ टक्केजोडय़ा व्यंध्यत्व तक्रारीमधून जात आहे.

आयव्हीआय उपचार घेत असलेल्या स्पॅनिश महिलांचं वय भारतीय महिलांच्या वयापेक्षा जास्त आहे (३७ वर्ष विरुद्ध ३१.५ वर्ष) असे असूनही, ३१व्या वर्षीच्या भारतीय महिलेचं अंडाशय कार्य ३७ वर्षाच्या स्पॅनिश महिलेच्या अंडाशयाच्या कार्याइतकं असतं.

हा अभ्यास पुढे या माहितीचेसुद्धा समर्थन करतो की, भारतीय स्त्रीचा अंडाशयाचा प्रतिसाद फारच कमी आहे आणि भारतीय महिला फर्टिलिटी तज्ज्ञांना भेटण्यास विलंब लावत असल्यामुळेसुद्धा गर्भारपण प्राप्त होण्यासाठी विलंब होऊ शकतो.

मागील दशकांच्या तुलनेत सध्या भारतामध्ये आयव्हीएफउपचाराची स्वीकृती झाली आहे. फर्टिलिटी प्रिझर्वेशनसारख्या तंत्राचं यश मोठं आहे, आणि ती ३५ वर्षापर्यंत गर्भारपण लांबवण्याची इच्छा असलेल्या महिलांसाठीसुद्धा फायदेशीर आहे.

आज जागरूकता व स्वीकृती असली तरीही, लोक उपचार घेत नाहीत. भारतीय महिलांच्या अंडाशयाचे वय विदेशी महिलांच्या अंडाशय वयापेक्षा जलद गतीने वाढत असल्यामुळे त्यांनी गर्भारपण लांबवायला नको. जोडप्यांनी समजून घ्यायला हवं की वेळ फार महत्त्वाची आहे, विलंब केल्यास आनंदी कुटुंबाचं सुख हरवू शकतं.

आययूआय, आयव्हीएफ व अँड्रोलॉजी सेवा यांसारख्या महत्त्वाच्या प्रक्रिया पुरवण्यासह, एनआयएफ गर्भाचं व अंडय़ाचं जतन करण्यासाठी व्हिट्रिफिकेशन, एंब्रियोस्कोप व सर्वोत्तम गर्भाची निवड करण्यासाठी पीजीएस आणि गर्भ स्वीकारण्यासाठी गर्भाशयाची क्षमता निवडण्यासाठी ईआरए, यांसारख्या काही सुविधा आहेत. आयव्हीएफ-आयसीएसआयनंतर या सर्व प्रक्रिया गर्भारपणाची शक्यता वाढवण्यासाठी फायदेशीर आहेत.

अधिक माहितीसाठी : novaivifertility.com

Read More »

शांत झोपेसाठी..

दिवसभराची दगदग आणि पुन्हा दुस-या दिवसाचा ठरलेला व्यग्र दिनक्रम या दोन्ही गोष्टींमधील महत्त्वाचा भाग आणि गमावलेल्या ऊर्जेला कमवण्याचा मुख्य स्रेत म्हणजे शांत झोप.
दिवसभराची दगदग आणि पुन्हा दुस-या दिवसाचा ठरलेला व्यग्र दिनक्रम या दोन्ही गोष्टींमधील महत्त्वाचा भाग आणि गमावलेल्या ऊर्जेला कमवण्याचा मुख्य स्रेत म्हणजे शांत झोप.

मात्र कित्येक जणांना काळजी, चिंता, वाद अशा कोणत्याही कारणांमुळे ही शांत झोप मिळत नाही. अशी शांत झोप हवी असेल तर आपल्या दिनचर्येत काही बदल करणं आवश्यक आहे.

आजकाल बरेच जण रात्री झोप लागत नसल्याची तक्रार करत असतात. काही जणांच्या डोक्यात विचार असतात किंवा काळजीने ग्रस्त असतात अशा माणसांच्या झोपेवर परिणाम होतो. तर काही जणांना रात्री अपरात्री जागायची सवय असते.

दररोज जागरण केल्याने झोपेवर तर परिणाम होतोच मात्र पुरेशी झोप न मिळाल्याने त्याचा परिणाम शरीरावर होऊ शकतो म्हणूनच शांत झोप लागण्यासाठी काही उपाय करून बघा.

  • झोपण्याची एक निश्चित वेळ ठरवा.
  • रात्री झोपण्यापूर्वी दहा ते पंधरा मिनिटं बाहेर फिरून या.
  • लिखाणाची किंवा वाचनाची सवय असेल तर त्यासाठी जेवणाआधी वेळ काढा. रात्री झोपायच्या आधी वाचायची सवय असेल तर तर्कशुद्ध वाचायची सवय ठेवा
  • अतिशय दु:खद किंवा उत्सुकतेचं वाचन झोपण्यापूर्वी करू नये.
  • झोपण्याच्या जागी गोंगाट होणार नाही याची काळजी घ्या. तुम्हाला गोंगाट थांबवणं शक्य नसेल तर कानात कापसाचे बोळे घालून झोपा.
  • कोणत्याही प्रकारची औषधं घेत असाल तर त्यामुळे तुमचं मानसिक स्वास्थ्य बिघडणार नाही याची काळजी घ्या. जिथे शांत झोप येईल किंवा ज्या गोष्टींमुळे तुम्हाला झोप येईल अशा जागेची निवड करा किंवा तशा वस्तू तुम्ही तुमच्या खोलीत सजवा. 
  • तुमची उशी खूप हलकी किंवा खूप जड असू नये. 
  • झोपण्याच्या खोलीत हवा खेळती राहील याची काळजी घ्या. 
  • भरपूर किंवा अतिशय कमी पांघरूण घेऊ नका. 
  • पलंगावरील गादी जास्त दबली जाणारी नसावी. तसंच झोपण्याकरता पुरेसा मोठा पलंग असावा. 
  • रात्री घालायचे कपडे सैल असावेत. ते घट्ट असून नयेत
  • ज्यांना वाद घालण्याची सवय असते अशा माणसांशी रात्रीच्या वेळी बोलणं शक्यतो टाळावंच.
  • रात्रीच्या जेवणात आणि त्यानंतर खाल्ल्या जाणा-या कोणत्याही पदार्थात मीठ असणार नाही याची काळजी घ्या. ज्या पदार्थातून कॅल्शिअम मिळेल अशा पदार्थाचं सेवन करा. 
  • काही जणांना झोपण्याच्या खोलीत मंद उजेड हवा असतो तर काही जणांना काळोख हवा असतो. असं असल्यास झोपण्याच्या खोलीत त्याप्रमाणे सोय करावी. 
  • काहीही झालं तरी ठरावीक वेळेतच उठायची सवय ठेवावी. 
  • दुपारी झोपणं टाळावं. 
  • दररोज एखाद्या प्रकारची कवायत करा म्हणजे दिवसभराचा थकवा निघून जाईल. 
  • झोपण्यापूर्वी किमान दोन तास व्यसनाच्या आहारी जाऊ नका तसंच कॉफी किंवा चहा पिऊ नये. 
  • झोपण्यापूर्वी टीव्ही पाहायची सवय असेल तर शक्यतो मालिका टाळून विनोदी कार्यक्रम पाहावेत. 
  • झोपण्यापूर्वी तुम्हाला आवडेल असं मंद संगीत ऐकावं. म्हणजे छान झोप लागेल. 
  • रोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध प्यायला विसरू नका. 
  • एक कप पाण्यात एक चमचा मध घालून प्यायल्यास चांगली झोप लागते. 
  • चार ते सहा तास झोपही शरीराला पुरेशी असते. त्यामुळे जास्त झोपणं टाळावंच.
  • रात्री पलंगावर पडल्या पडल्या तीन मिनिटांपेक्षा अधिक वेळ दिवसभरातल्या घडामोडींवर विचार करणं टाळावं.
  • झोपण्यापूर्वी अंघोळ करण्याची सवय असेल तर त्या पाण्यात बेकिंग सोडा आणि राईची पावडर घालावी.
  • पलंगावर गेल्यावर प्रत्येक स्नायूंना आराम द्यावा. म्हणजे आराम पडतो. 
  • झोपण्यापूर्वी तुमच्या आयुष्यात घडलेल्या आनंदी घटनेचा विचार करत झोपा.

Read More »

तंदुरुस्त राहण्यासाठी 'गेट इन शेप'

गेल्या वर्षी लॅन्सेट या वैद्यकीय पत्रिकेत प्रकाशित करण्यात आलेल्या अध्ययनानुसार, यूएस आणि चीननंतर भारत हा जगातील तिसरा सर्वात जास्त लठ्ठपणा असलेला देश असून तिथे २७० दशलक्ष लोक गरिबीरेषेच्या खाली राहत आहेत.

गेल्या वर्षी लॅन्सेट या वैद्यकीय पत्रिकेत प्रकाशित करण्यात आलेल्या अध्ययनानुसार, यूएस आणि चीननंतर भारत हा जगातील तिसरा सर्वात जास्त लठ्ठपणा असलेला देश असून तिथे २७० दशलक्ष लोक गरिबीरेषेच्या खाली राहत आहेत. तसंच प्रत्येक पाच भारतीय स्त्रिया किंवा पुरुषांतील एक व्यक्ती लठ्ठ किंवा जास्त वजन असलेली असल्याचं स्पष्ट झालं आहे.

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, लठ्ठपणा हा काíडयोव्हास्क्युलर (हृदयासंबंधी) रोग तसेच ऑस्टियोआर्थरायटिससारख्या मस्क्युलोस्केलिटल (अस्थि आणि स्नायूविषयक) आजारांसाठी आणि काही प्रकारच्या कर्करोगांसाठी एक जोखीम घटक ठरत आहे. बैठी जीवनशैली, जंक फूड आणि साखरेचा अतिवापर यासारखे इतर घटक भारतीयांना नवनवीन आजारांना तोंड द्यायला भाग पाडत आहेत.

सडपातळ व निरोगी राहण्यासाठी, आपल्याला एक सक्रिय जीवनशैलीचं आचरण करणं अणि साखरेचा अतिवापर असलेल्या खाद्यपदार्थाचं सेवन करण्यावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे, मात्र ब-याच लोकांना साखर हे लठ्ठपणाचे मुख्य कारण आहे याची जाणीव नसते.

आहारात साखर जास्त प्रमाणात असल्याचे अनेक हानिकारक परिणाम होतात. आपल्या दैनंदिन आहारात साखरेचं प्रमाण कमी करणं गरजेचं असतं. साखर कमी झाली की वजन व्यवस्थित ठेवता येईल. म्हणूनच शुगरफ्री कंपनीद्वारे 'गेट इन शेप इंडिया' नावाची एक मोहीम आयोजित करण्यात आली होती.

माजी आर्मी मेजर विक्रम मोहन आणि क्रीडा शास्त्रज्ञ तसेच सेलेब्रिटी ट्रेनर श्यामलाल वल्लभजी यांच्यासोबत स्पर्धा करण्यासाठी अनेक तरुण-तरुणींनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमात विविध फिटनेस चाचण्या आणि पेंटबॉल किंवा क्रिकेटसारख्या खेळांच्या उपक्रमांद्वारे सहभागी स्पर्धकांच्या शारीरिक शक्तीला तसेच तग धरण्याच्या क्षमतेला आव्हान देण्यात आलं.

http://getinshape.in या संकेतस्थळाचं त्यावेळी अनावरण करण्यात आलं. या संकेतस्थळावरील विविध व्हीडिओमधून फिटनेसचं प्रशिक्षण, आहारासंबंधी सल्ला देण्यात आला आहे. इतकंच नाही तर तुम्हाला योग्य आकारात राहण्यास मदत करण्यासाठी ६६ टिप्स आणि तुमच्या रोजच्या आहारातील साखरेचे प्रमाण कमी कसं करावं याबाबतची माहिती त्या त्या क्षेत्रातील पोषणतज्ज्ञ, आहारतज्ज्ञ, प्रसिद्ध व्यक्ती आणि फिटनेसतज्ज्ञ यांनी दिली आहे.

Read More »

टणक कवचाचं कवठ

शास्त्रीय नाव फेरोनिया एलिफंट असं असून, ते रुटेसी या जातकुळीतलं फळ आहे. 

शास्त्रीय नाव फेरोनिया एलिफंट असं असून, ते रुटेसी या जातकुळीतलं फळ आहे. इंग्रजीत कवठाला वुड अ‍ॅपल, कर्ड फ्रुट, मंकी फ्रुट तर मराठीत कवठ असंही म्हणतात. मूळचे दक्षिण भारतातले असून पाकिस्तान, जावा, ब्रह्मदेश, बांगलादेश आदी ठिकाणी कवठाचे वृक्ष आढळतात.

या झाडाची उंची ६ ते ९ मीटर उंच आहे. फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात या झाडांच्या फांद्यांच्या टोकाला लहान आकराची फिकट लाल आणि आखूड देठाची फुलं येतात. मोहर आल्यानंतर साधारणत: २-३ महिन्यांनी फळे तयार होतात. ही फळं पाच ते साडेसात इंच व्यासाची असतात.

या फळाची साल कठीण असते. फळाचा रंग करडा असून, आत मृदू गर आणि लांबट बिया असतात. चवीला हे फळ आंबट-गोड आणि तुरट असतं. हे अतिशय पौष्टिक फळ असून कवठाच्या शंभर ग्रॅम गरातही ३१ ग्रॅम कबरेदकं आणि २ ग्रॅम प्रोटिन मिळतं.

पिकलेल्या कवठात बिटा क्यारोटिनचा उत्तम स्रेत आहे. याशिवाय जीवनसत्त्व अ, ब आणि कचा उत्तम स्रेत यात आहे. या फळापासून चटणी, मुरंबा, जेली किंवा बर्फी तयार करतात.

याचे फायदे जाणून घेऊया.

  • पित्तकरी प्रकृती असलेल्यांनी हे फळ सेवन करावं, कारण त्यामुळे पित्ताचे शमन होण्यास मदत होते. अंगावर पित्ताच्या गांधी उठल्यास कवठाच्या पाल्याचा रस काढावा आणि तो त्यांच्यावर लावावा. पाला दह्यात घालून आणि त्यात खडीसाखर मिसळून खाल्ल्यास आराम पडतो.
  • कवठ सेवनाने कंठाची शुद्धी होते त्यामुळे आवाज चांगला होतो.
  • दमा, क्षयरोग, रक्तविकार, उलटी, वातदोष, उचकी, विष, तृष्णा, ग्लानी आदी विकारांवर हितकारी असते.
  • उष्ण, पित्त, वात या तिन्ही दोषांचं संतुलन राखते.
  • शौचासह आव आणि मूळव्याधीचा त्रास होत असल्यास कवठाच्या बिया आणि धागे काढलेला गर ताकासह घेतल्याने त्याचा चांगला उपयोग होतो.
  • कवठापासून मिळणारा डिंक पारदर्शक, तांबूस आणि भुरा असतो.
  • याच्या झाडापासून मिळणारं लाकूड हे मजबूत आणि टिकाऊ असल्याने घरबांधणीसाठी आणि शेतीची अवजारं करण्यासाठी उपयोग केला जातो.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe