Tuesday, January 28, 2014

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

मांसाहाराचा अतिरेक टाळा

थंडीचे दिवस म्हणजे मांसाहार करणा-या व्यक्तींची चंगळ! या दिवसांमध्ये जितकं गरमागरम खाण्याची तलफ येते, तितकंच चमचमीत, तिखटही खावंसं वाटतं. विशेषत: हिवाळ्यादरम्यान केल्या जाणा-या मांसाहारामुळे शरीर धष्टपुष्ट होतं. प्रकृतीस्वास्थ्य सुदृढ राहण्यासाठी घेतल्या जाणा-या परिपूर्ण आहारात मांसाहाराचा समावेश करणं गरजेचं आहे व तो नियंत्रणात करणंही आवश्यक आहे.
मांसाहारात समावेश होणारं कोंबडी किंवा बक-याचं मांस. या दिवसांत त्यांच्या मांसामध्ये चांगल्या प्रकारची चरबी अधिक असते. म्हणून यापासून तयार केले जाणारे पदार्थ अधिक चविष्ट लागतात. असं जरी असलं, तरीही सध्याच्या महागाईत आणि वाईट कोलेस्ट्रेरॉल वाढण्याची भीती बाळगून, आठवड्यातून एक-दोनदाच मांसाहार करणं, आरोग्यदृष्टया तसंच आर्थिकदृष्टयाही परवडणारं आहे. अंडी, कोंबडी, मटण, मासे हे मुबलक प्रथिनांचा स्रेत आहेत. यातील मेदामध्ये सॅच्युरेटेड (संपृक्त-घट्ट स्वरूपातील) फॅटी अ‍ॅसिड्स असतात. ती शरीराला अपायकारक ठरण्याची शक्यता असते. यामध्ये कबरेदकं जवळपास नसतातच.

मांसाहारातील प्रथिनं ही पूर्ण प्रथिनं मानली जातात. कारण त्यात लायसिन व मेथायोनिन ही दोन्ही अमिनो आम्ल योग्य प्रमाणात आढळतात, जे शरीरात चांगल्या प्रकारे शोषलं जातं. अंडयाच्या वापराबद्दल एक इशारा द्यावासा वाटतो. अंडय़ामध्ये दोन प्रकारची प्रथिनं असतात. एक अंडय़ाच्या पांढ-या भागात तर दुसरं पिवळ्या भागात असतं. पिवळ्या भागात कोलेस्टेरॉलचं प्रमाण खूप जास्त असतं. ज्याचा हृदयाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याचा धोका असतो. म्हणून अंडी खाताना त्यातील पांढरा भाग खावा. प्राणिज पदार्थामध्ये दूध हा स्निग्ध पदार्थ, बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांच्या नित्याहारातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे.

बीफ लीव्हर, कॅड लीव्हर ऑइल, तूप, लोणी यामध्ये 'अ' जीवनसत्त्व असतं, तर 'ड' जीवनसत्त्व कॉड लीव्हर, शार्क लीव्हर ऑइल, हॅलिबल (माशाचा प्रकार) लीव्हर ऑइल, दूध, तूप, लोणी यात आढळून येतं. 'बी कॉम्प्लेक्स' वर्गातील बी२ 'रायबोफ्लेविन' हे जीवनसत्त्व दूध व मटण यात आढळून येतं. बी६ 'नायसिन' हे जीवनसत्त्व मांसाहारी पदार्थामध्ये असतं. बी६ 'पायरिडॉक्सिन' हे जीवनसत्त्व लीव्हर, अंडयातला पिवळा भाग यांमध्ये असतं. 'सायनो कोबालमिन' (बी१२ 'बी' कॉम्प्लेक्स) हे जीवनसत्त्व बीफ, लीव्हर, मासे, दूध यामधून मिळतं.

मांसाहारातून जरी हे पोषक घटक शरीराला मिळत असले, तरी मांसाहार हा जपूनच करायला हवा. कारण तो पचवण्यासाठी लागणारी चांगल्या प्रकारची पचनशक्ती आणि ताकद प्रत्येकात असतेच असं नाही. म्हणूनच ते आठवडयातून एक-दोन वेळा आणि ठरावीक प्रमाणातच खावं. चिकन, मटण शिजवताना आयुर्वेदात असलेली दीपनपाचन द्रव्यं (आलं, लसूण, पुदिना, कोथिंबीर, काही गरम मसाले) योग्य प्रमाणातच वापरावेत. पदार्थ चमचमीत करण्याच्या नादात मसाल्यांचा अतिरेक व्हायला नको. कोंबडी वा मटण हे मुळातच मेद (चरबी)युक्त असल्यानं, त्यापासून पदार्थ तयार करताना, त्यात कांद्याचा व टोमॅटोचाही जास्त प्रमाणात वापर करावा. कांदा आणि टोमॅटोमुळे शरीरात मेदा (वाईट कोलेस्टेरॉल)चं प्रमाण वाढत नाही. सुकं वा ओल्या खोब-याचं प्रमाण खूपच कमी ठेवावं, कारण मुळातच मांसामध्ये चरबीचं प्रमाण जास्त असतं. वाटणाबरोबरच पदार्थ तयार झाल्यावर त्यावर चिरलेली ताजी कोथिंबीर घातल्यास तो पदार्थ खाण्यासही अधिक रुचकर लागतो.

हे अवश्य करा..

* गुलाबी, लालसर रंगाचं मटण हे ताजं आणि कोवळं (पटकन आणि मऊसर शिजतं) असतं. त्याऐवजी फिकट चॉकलेटी रंगाचं दिसणारं मटण हे शिळं आणि जून (शिजायला भरपूर वेळ लागतो आणि चिवट राहतं) असू शकतं, म्हणून मटण विकत घेताना खबरदारी बाळगा.
* मटण शक्यतो कुकरमध्येच शिजवावं म्हणजे वाफेमध्ये ते सर्व बाजूंनी व्यवस्थित शिजतं आणि त्याचा पचनास त्रास होत नाही.
* चिकन, मटण वा कोणत्याही प्रकारच्या माशांना कधीही दही लावू नये. हे दोन्ही पदार्थ विरुद्ध गुणात्मक असल्यानं त्वचेचे विकार होण्याची शक्यता असते.

Read More »

गुणकारी धणे

कोथिंबीर ही एपियसी कुळातील वनस्पती असून तिचं शास्त्रीय नाव कोरिअँड्रम सॅटायव्हम असं आहे. 
कोथिंबीर ही एपियसी कुळातील वनस्पती असून तिचं शास्त्रीय नाव कोरिअँड्रम सॅटायव्हम असं आहे. या वनस्पतीच्या पाल्याला कोथिंबीर असं तर फळांना धणे असं म्हणतात. हिंदीत 'धनिया', गुजराथीत 'कोनफिर', इंग्रजीत 'कोरिअँडर' अशी हिची नावं आहेत. ही वनस्पती भारतात सर्वत्र पिकवली जाते. हिचं मूळ दक्षिण युरोप आणि आशियामधलं असून युरोपात प्राचीन काळापासून ती लागवडीत आहे. या वनस्पतीची लागवड जिरायत आणि मिश्र पीक म्हणून उष्ण प्रदेशात मोठ्या प्रमाणात केली जाते. या वनस्पतीची उंची ४०-५० सेमी असून पानं दोन प्रकारची आणि खोड पोकळ असतं. तिची पानं लांब पिसासारखी दिसतात.

नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये या वनस्पतीला फुलं येतात. ती लहान, पांढरी किंचित निळसर असतात. त्यावर येणारी फळं अर्थात धणे हे पिवळसर करड्या रंगाचे असतात. आकाराने अर्धगोलाकार असून त्यावर उभे कंगोरे असतात. खोडं, पान, फळं या सगळ्याला काहीसा उग्र वास असतो. म्हणूनच या धण्याचा मसाल्यात तर पानांचा तिखट पदार्थात किंवा दररोजच्या स्वयंपाकात वापर केला जातो. धणे मांस, मासे आदी खाद्यपदार्थात अखंड वापरले जातात. फळ (धण्यांचे) आणि पानां (कोथिंबीरी)चे औषधी उपयोग भरपूर आहेत. कोरिअ‍ॅड्रॉल हे बाष्पनशील तेल यात असल्यामुळे कोथिंबिरीला स्वयंपाकात महत्त्व आलं आहे. औषधी उपयोग पुढीलप्रमाणे -

>धणे वायुनाशक, पौष्टिक, भूक वाढवणारे, पित्तप्रकोपरोधक आहेत.
>धणे रात्रभर पाण्यात भिजत घालून ठेवावेत आणि सकाळी उठून ते पाणी प्यायल्याने अंगातील उष्णता, दाह कमी होतो. मूत्रमार्गाची शुद्धी होते.
>वारंवार सर्दी-पडसं होत असल्यास धणे, दालचिनी, गवती चहा, तुळस आणि सुंठ यांचा काढा दिल्याने आराम पडतो.
>धणे किंवा कोथिंबीर शीतल असून रक्ती मूळव्याधीवर त्याचा काढा दिला जातो.
>धण्यापासून निघणारं तेल लहान मुलांच्या पोटदुखीवर अतिशय गुणकारी आहे. अतिसार होत असल्यासही धण्याचं पाणी प्यायल्याने आराम पडतो.
>खूप तहान लागली असल्यास धणे चावून खावेत किंवा धणे भिजवून ठेवलेलं पाणी प्यावं. तहान कमी लागते.

Read More »

जेवण्यापूर्वी..

धावपळीमुळे आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष होतं. अवेळी खाणं, उशीर झाल्यामुळे घाईत आणि न चावता खाणं, ऑफिसला अथवा शाळेत जायला उशीर होत असल्यास बरेचदा उभं राहूनच पोटात अन्न ढकललं जातं. पण…
धावपळीमुळे आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष होतं. अवेळी खाणं, उशीर झाल्यामुळे घाईत आणि न चावता खाणं, ऑफिसला अथवा शाळेत जायला उशीर होत असल्यास बरेचदा उभं राहूनच पोटात अन्न ढकललं जातं. पण यामुळे अन्न नीट पचत नाही व पचनासंबंधी आजार उद्भवतात. तसंच हल्ली प्रत्येकला भुरळ पडली आहे ती फास्ट फुडची. चमचमीत, स्वस्त दरात आणि कमी वेळेत मिळणारे फास्ट फुड सर्वाच्याच पसंतीस उतरत आहेत.

मात्र या पदार्थात शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असणारे घटक किंवा जीवनसत्त्वं कितपत मिळतात, तसंच ते बनवताना स्वच्छतेचं पालन किती होतं, हा विचार करणंदेखील आवश्यक आहे. अशा खाण्यामुळे आरोग्याचं नुकसान होतंय ही बाब लक्षात घेणं गरजेचं आहे. केवळ फास्ट फूड खाण्याला दोष देण्यात काय अर्थ आहे, कारण आपण निरोगी राहणं हे आपल्या रोजच्या आहारावर आणि ते सेवन करण्याच्या पद्धतीवरही अवलंबून आहे. म्हणूनच जेवताना काही गोष्टींचं पालन करणं आवश्यक आहे.

अन्न चावून खावं
ज्यांना वजन कमी करायचं आहे, अशा व्यक्तींनी किमान ३० ते ३५ वेळा अन्न चावून खावं. अन्न चावून खाल्ल्याने दात मजबूत होतात, भूक वाढते, अन्न पचतं आणि त्यामुळे पोटाचे विकार कमी होतात.

भूक लागल्यावरच खावं

स्वादिष्ट आणि आवडीचा पदार्थ समोर आल्यावर काही जण भूक नसतानाही पोटभर खातात. एखाद्या पदार्थाची चांगली चव लागली तर तो पदार्थ पुन्हा पुन्हा जाऊन खाणारी मंडळी आहेत. आधी खाल्लेलं अन्न न पचल्यामुळे शरीरातील अनावश्यक चरबीला पोषण मिळतं आणि वजन वाढण्याच्या शक्यता वाढतात. भूक नसतानाही खाल्ल्याने पचन होत नाही याशिवाय पोटामध्ये बिघाडही होतो.

वेळेत आणि वेळेवर खावे

खाण्यामध्ये किमान सहा तासांचं अंतर असावं. रात्रीचं जेवण लवकर घ्यावं. कारण रात्री आपल्या शरीराची हालचाल कमी होते त्यामुळे अन्न पचत नाही. दररोज तीन वेळा योग्य वेळेत जेवल्याने एकाग्रताही वाढते.

हात धुऊन जेवावे

जेवणाच्या आधी साबणाने हात स्वच्छ धुवावेत. हात न धुतल्याने हाताला चिकटलेले किटाणूसुद्धा खाताना आपल्या शरीरात जातात.

बसून जेवावे

जेवताना बसून खावं. चालत किंवा उभं राहून खाल्ल्याने पचनक्रियेवर परिणाम होतो. बसून जेवल्याने आपण समाधानाने आणि शांतपणे जेवतो. जाड होणं, अ‍ॅसिडिटी होणे आणि पोटांचे विकार होण्याची शक्यता असते.

जेवताना पाणी पिऊ नये

जेवताना पाणी प्यायल्याने पचनक्रिया बिघडते. म्हणूनच जेवणाच्या एक तास आधी किंवा नंतर पाणी प्यावं.

व्यायाम आणि जेवण

व्यायाम केल्यानंतर लगेच जेवायला बसू नये. व्यायाम केल्यानंतर किमान एक तासाचं अंतर असावं.

Read More »

गर्भाशयाच्या वृद्धत्वावर बोलू काही..

प्रजननक्षमता कमकुवत होणे म्हणजे गर्भाशयाला अकाली वृद्धत्व येणं होय. यात फोएटल पिरिएडचा कालावधी कमी कमी होत जातो. वयाच्या ३७व्या वर्षापर्यंत बीजांडाच्या संख्यांमध्ये तीव्र घट दिसून येते, त्यांचा दर्जा घसरतो आणि अखेरीस स्त्रीची प्रजननक्षमता क्षीण होते. परिणामी अकाली प्रसूती किंवा भ्रूणामध्ये विकृतीचं प्रमाण वाढण्याची शक्यता वाढते. मात्र ओव्हरियन रिझव्‍‌र्ह टेस्टिगसारख्या तपासण्यांमुळे या समस्यांवर आपण मात करू शकतो.
अमृता क्लिनिकमध्ये आली तेव्हा काहीशी अस्वस्थ होती. बरेच प्रयत्न करूनही तिची गर्भधारणा होत नव्हती. तसंच मासिक पाळीच्या वेळीही तिच्या पोटात असह्य वेदना होत होत्या. असं का ते तिला कळत नव्हतं. तिची चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की, करिअरला महत्त्व देणा-या अमृताचं वय जवळपास ३७ वर्ष होतं. त्यामुळे तिला हा सगळा त्रास होत होता.

आजकालच्या मुली करिअर ओरिएंटेड आहेत. त्यामुळे त्या लग्न उशिरा करतात. लग्नानंतरही त्या करिअरला महत्त्व देतात. मात्र करिअर केल्यानंतर जेव्हा गर्भधारणेचा विचार करतात तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. तोपर्यंत त्यांची प्रजननक्षमता कमकुवत झालेली असते. यालाच वैद्यकीय भाषेत गर्भाशयाचं अकाली वृद्धत्व अशी संज्ञा आहे.

प्रत्येक स्त्रीमध्ये बरीच बीजांडं निर्माण होतात, त्यांची संख्या स्त्री तिच्या आईच्या गर्भाशयात असतानाच निश्चित होत असते. स्त्री जन्माला येते तेव्हा या बीजांडांची संख्या निम्मी होते आणि वयात आल्यानंतर ठरावीक कालावधीत ही बीजांडं बाहेर टाकली जातात. ही प्रक्रिया सुमारे वयाच्या ३५व्या वर्षापर्यंत चालू राहते. यामध्ये काहीही बदल होत नाही आणि झालाच तरी तो बदल अतिशय अल्प असतो. जवळजवळ वयाच्या ३७व्या वर्षापर्यंत बीजांडाच्या संख्यांमध्ये तीव्र घट दिसून येते आणि अखेरीस एका बिंदूपर्यंत जाऊन पोहोचते, जिथे स्त्रीची प्रजननक्षमता क्षीण होते.

बीजांडांच्या संख्येत घट होण्याबरोबरच त्यांचा दर्जादेखील घसरतो. गुणसूत्रांच्या जोडीच्या असफलतेमध्ये वाढ झाल्यामुळे हा दर्जा घसरतो. परिणामी अधिक वय असलेल्या स्त्रियांमध्ये अकाली प्रसूती किंवा झालेल्या भ्रूणांमधे विकृती निर्माण होण्याच्या प्रमाणात वाढ होते. परंतु सर्वाधिक बदल बहुतेककरून प्रत्यक्ष मासिक पाळी आणि रजोनिवृत्ती सुरू होण्याच्या संक्रमणापर्यंत समजून येत नाहीत.

एंडोमेट्रिओसिस (अंतर्गर्भाशय अस्थानता) म्हणजे गर्भाशयाच्या बाहेर एंडोमेट्रियल टिश्यू आल्यामुळे होणारी स्थिती आणि यामुळे खासकरून मासिक पाळीच्या वेळी ओटीपोटामध्ये वेदना होतात. ओटीपोट संसर्ग, नर घटक इत्यादींसारख्या इतर जननक्षमता कमजोर करणा-या घटकांसहित तणावाचा त्रास, जीवनशैलीत बदल ही कारणंही या अवस्थेशी जोडली गेली आहेत.

अशा घटकांमुळे तीस आणि त्या पुढील वर्षामध्ये गर्भधारणेची प्राप्ती होणं अधिकच कठीण झालं आहे. सामाजिक कारणांसाठी हेतुपूर्वक जननक्षमता पुढे ढकलणा-या स्त्रियांमधील जननक्षमतेचे सामर्थ्य आणि ओव्हरियन रिझव्‍‌र्ह टेस्टिगविषयीची जागरूकता वाढवण्यासाठी वैद्यकीय विभागांकडून सक्रिय प्रयत्न झाले पाहिजेत.
ओव्हरीयन रिझव्‍‌र्हमध्ये घट होण्याची कारणे पुढीलप्रमाणे -

>अधिक वय
>एंडोमेट्रिओसिस
>अगोदरची गर्भाशय शस्त्रक्रिया
>ओटीपोटीचे दाहक रोग
>किमो, रेडिओथेरेपी
>आनुवंशिक समस्या
>ऑटोइम्युन (स्वयंप्रतिकार) कारणं

वरीलपैकी कोणतीही लक्षणं दाखवणाऱ्या स्त्रियांसहित ३० वर्षावरील सर्व स्त्रिया, ज्यांना कोणत्याही कारणांसाठी त्यांची जननक्षमता अधिक काळ टिकवायची आहे, त्यांनी ओव्हरियन रिझव्‍‌र्हची टेस्ट करून घेऊन त्यासंबंधित परिणामांविषयी सल्ला घेणं गरजेचं आहे.

ओव्हरियन रिझव्‍‌र्ह टेस्टिगसाठी आज अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. तथापि, आज सर्वाधिक प्रभावी टेस्ट म्युलेरियन हार्मोन आणि मासिक पाळीच्या फॉलिक्युलर काउंट या आहेत. या दोन्हीही टेस्ट एकत्रितपणे ओव्हरियन रिझव्‍‌र्हविषयी उचित कल्पना देतात.

विज्ञानाने अनेक मापदंड प्राप्त केले आहेत आणि गर्भधारणेमधील अनेक समस्यांवर आपण मात करू शकतो, हे सिद्ध झालं आहे. तथापि, स्त्रियांच्या प्रजननक्षमतेचे बायोलॉजिकल क्लॉक पाठी आणण्यात किंवा धीमे करण्यामध्ये आपण असमर्थ आहोत.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe