Tuesday, February 11, 2020

Generic medicine drugs जेनेरिक औषधे

Generic medicine drugs जेनेरिक औषधे


 | जेनेरिक औषध फायदे | जेनेरिक औषधे मराठी | जेनेरिक औषधाची नावे | जेनेरिक औषधा विषयी माहिती | जेनेरिक औषधांची माहिती मराठी | जेनेरिक औषधांबद्दल माहिती pdf | जेनेरिक औषधांची नावे | जेनेरिक औषधांबद्दल माहिती मिळवा व त्याबाबत वर्गात चर्चा करा |  | जेनेरिक मेडिसिन | जेनेरिक औषधांबद्दल माहिती मिळवा व त्याबाबत वर्गात चर्चा करा | जेनेरिक औषधे मराठी | जेनेरिक औषधाची नावे | जेनेरिक औषधांबद्दल माहिती pdf | जेनेरिक औषधा विषयी माहिती | जेनेरिक औषधांची माहिती मराठी | जेनेरिक औषधांबद्दल माहिती मराठी

Image result for जेनेरिक औषध फायदे
जेनेरिक औषधे (प्रजातीय औषधे) म्हणजे अशी औषधे ज्यातील औषधाचे प्रमाण, त्याची गुणवत्ता,वहनाचा मार्ग, त्याचा उपयोग आणि त्याची कामगिरी ब्रँडेड औषधासारखीच असते पण त्याला कोणतेही ब्रँड नाव नसते. त्याचा रंग, आकार आणि पॅकिंग वेगळे असते. ही औषधे त्या त्या देशातील सरकारी नियमांप्रमाणेच तयार केलेली असतात. त्याच्या लेबल वर ते बनवणाऱ्या कंपनीचे नाव आणि त्या औषधाचे नाव लिहिलेले असते. त्यामध्ये ब्रँड नाव असलेल्या औषधामध्ये असलेला ड्रग असला पाहिजे. त्याच्या फार्माकोडायनामिक आणि फार्माकोकायनेटिक गुणधर्म ब्रँडेड औषधासारखेच असायला हवेत.

 जेनेरिक औषध फायदे 

जेनेरिक औषधांची मोठय़ा प्रमाणावर निर्यात करणाऱ्या भारतीय कंपन्या देशात मात्र ब्रॅण्डेड नावानेच औषधे विकतात. जेनेरिक औषधांमुळे श्रीमंत अमेरिका दरवर्षी शेकडो अब्ज डॉलर वाचवत असतानाच भारतात

जेनेरिक औषधांची मोठय़ा प्रमाणावर निर्यात करणाऱ्या भारतीय कंपन्या देशात मात्र ब्रॅण्डेड नावानेच औषधे विकतात. जेनेरिक औषधांमुळे श्रीमंत अमेरिका दरवर्षी शेकडो अब्ज डॉलर वाचवत असतानाच भारतात मात्र अनेक पट चढय़ा किमतीत विकल्या जाणाऱ्या ब्रॅण्डेड औषधांचाच बोलबाला आहे. या पाश्र्वभूमीवर जेनेरिक औषधे म्हणजे नेमके काय, भारतातील वास्तव व तज्ज्ञांचे मत याचा घेतलेला हा आढावा.
जेनेरिक औषधे म्हणजे काय? | जेनेरिक औषधे मराठी |
एखाद्या आजारावर औषध शोधण्यासाठी कंपन्यांकडून अनेक वर्षे संशोधन केले जाते. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर शोधल्या गेलेल्या फॉम्र्युलानुसार औषध तयार केले जाते. प्रत्यक्ष औषधाचे उत्पादन करण्याचा खर्च कमी असला तरी संशोधनावर केलेला खर्च भरून काढणे कंपनीला आवश्यक असते. यासाठी या औषधाची निर्मिती करण्याचा हक्क काही वर्षांसाठी फक्त त्या कंपनीलाच देण्यात येतो व ती औषधे कंपनीच्या नावाने (ब्रॅण्ड नेम) बाजारात येतात. या कालावधीत संशोधनाचा खर्च वसूल झाल्यावर इतर औषध कंपन्याही ही औषधे तयार करू शकतात. या औषधात वापरलेल्या रासायनिक संयुगावरून ती औषधे ओळखली जातात.
जेनेरिक औषधे स्वस्त का ? जेनेरिक औषधाची नावे |
जेनेरिक औषधांवरील संशोधनाचा खर्च संबंधित कंपनीने आधीच वसूल केलेला असतो. त्यामुळे केवळ औषधनिर्मितीच्या उत्पादन खर्चानुसार त्यांची किंमत ठरवली जाते. अर्थातच ही किंमत मूळ ब्रॅण्डेड औषधांपेक्षा खूप कमी होते. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या ब्रॅण्डेड औषधांची किंमत त्यांच्या जेनेरिक उत्पादनांपेक्षा सर्वसाधारणपणे पाच ते दहा पट महाग असल्याचे दिसते.
अमेरिकेतील चित्र जेनेरिक औषधा विषयी माहिती | 
अमेरिकेतील औषधांच्या एकूण बाजारपेठेत ८० टक्के वाटा जेनेरिक औषधांचा आहे. जेनेरिक औषधे वापरल्याने दरवर्षी अमेरिकेने शेकडो अब्ज रुपये वाचवले आहेत. २०१३ मध्ये जेनेरिक औषधांमुळे अमेरिकेचे तब्बल २१७ अब्ज डॉलर वाचले . यातील औषधे अमेरिकेत आयात केली जातात व त्यातही भारतात उत्पादन होत असलेल्या औषधांचा वाटा महत्त्वाचा आहे. गेल्या वर्षी भारतातील  रॅनबॅक्सी कंपनीच्या सर्व उत्पादनांवर बंदी घालण्यात आली. या बंदीचे कारण या औषधांचा घसरलेला दर्जा हे होते.
भारतातील परिस्थितीजेनेरिक औषधांची माहिती मराठी | 
भारतातील कंपन्या ५० हजार कोटी रुपयांची जेनेरिक औषधे निर्यात करतात. देशात मात्र ब्रॅण्डेड नावाने अधिक किमतीत ही औषधे विकली जातात. भारतात एकीकडे गरिबांसाठी सरकारी मोफत आरोग्यव्यवस्था असली तरी ब्रॅण्डेड औषधांमुळे रुग्णांना मोठी किंमत चुकवावी लागते. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, कर्करोग अशा आजारांवर नियमित व दीर्घकालीन औषधे आवश्यक असतात. या आजारांच्या रुग्णांना जेनेरिक औषधे उपलब्ध झाल्यास आर्थिक ताण नक्कीच कमी होईल. सरकारी रुग्णालयातही जेनेरिक औषधेच दिली जातात. जेनेरिक औषधांचे प्रमाण वाढवण्यासाठी गेल्या दशकभरापासून आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत. मात्र आजही काही अपवाद वगळता
 जेनेरिक औषधांची उपलब्धता वाढलेली नाही.
Image result for जेनेरिक औषध फायदे







एफडीएची भूमिका जेनेरिक औषधांबद्दल माहिती pdf | 
डॉक्टरांनी रुग्णांना औषधांची जेनेरिक नावे लिहून द्यायला हवीत, अन्यथा त्यांच्यावर कारवाई होईल, अशी भूमिका अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) घेतली आहे. जेनेरिक औषधांचे नाव लिहून दिल्यास रुग्णांकडे अनेक पर्याय उपलब्ध होतील व त्यामुळे ब्रॅण्डेड कंपन्यांची औषधे भरमसाट किमतीला खरेदी करण्याबाबत रुग्णाला विचार करता येईल, अशी भूमिका त्यामागे आहे. मात्र डॉक्टरांकडून याबाबत फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. जेनेरिक औषधांबाबत काही तक्रारी आल्यास त्याची तातडीने दखल घेतली जाईल, असेही एफडीएकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे.
औषधांमधील समस्या जेनेरिक औषधांची नावे | 
विविध कंपन्यांकडून त्यांच्या औषधविक्रीचे प्रमाण वाढवण्यासाठी डॉक्टरांना सवलती, भेटवस्तू दिल्या जातात, हे आता लपून राहिलेले नाही. त्यामुळे काही डॉक्टर जेनेरिक औषधांऐवजी संबंधित कंपन्यांची ब्रॅण्डेड औषधे लिहून देतात, असा आरोप केला जातो. मात्र सर्वच डॉक्टरांबाबत हे खरे नाही. जेनेरिक औषधे लिहून देण्यास हरकत नाही. मात्र अमेरिकेतील एफडीएप्रमाणे भारतातील एफडीए कार्यरत नाही, हे वास्तव आहे. त्यांच्याकडे पुरेसे मनुष्यबळ व यंत्रणा नसल्याने जेनेरिक औषधांची गुणवत्ता तपासून पाहिली जात नाही. ही औषधे योग्य प्रकारे तयार केली गेली नसल्यास त्याचा अपाय होण्याची शक्यता अधिक. अशा वेळी रुग्णांच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न डॉक्टर विचारत आहेत. तक्रार आल्यास एफडीए कारवाई करणार असली तरी मुळात रुग्णाच्या जिवाचा धोका कसा पत्करणार, अशी शंका डॉक्टरांना आहे.
जेनेरिक औषधांच्या दर्जाबाबत खरेच प्रश्नचिन्ह आहे. काही कंपन्यांनी तयार केलेल्या जेनेरिक औषधांबाबत शंका घेण्याचे कारण नसते. मात्र सर्वच कंपन्यांबाबत असे छातीठोकपणे म्हणता येणार नाही आणि त्यामुळे जेनेरिक औषधांच्या मोहिमेला वेग येत नाही. अनेक आजारांवरील जेनेरिक औषधे उपलब्ध नसतात किंवा त्यांच्या दर्जाबाबत शंका असल्याने आम्हाला ती रुग्णाला देता येत नाहीत.    
Image result for जेनेरिक औषध फायदे

– डॉ. पारुण वडे जेनेरिक औषधांबद्दल माहिती मिळवा व त्याबाबत वर्गात चर्चा करा | 
दर्जावर नियंत्रण राखण्यासाठी एफडीएचा कारभार सक्षम, भ्रष्टाचारमुक्त व प्रभावी होणे आवश्यकच आहे. संशोधन कंपनीने निर्मिती केलेल्या औषधांप्रमाणे जेनेरिक औषधे रक्तात आवश्यक तेवढी पातळी गाठत नाहीत व म्हणून ती प्रभावी ठरत नाहीत, असे औषध कंपनीकडून सांगण्यात येते. मात्र मुळात अत्यावश्यक ३४८ औषधांपैकी फक्त २० ते ३० औषधांबाबतच ही बायोइक्विव्हॅलन्सची समस्या आहे. भारतातील ब्रॅण्डेड औषधांचा बायोइक्विव्हॅलन्स औषध नियंत्रकांकडून तपासला जात नाही. त्यामुळे हा मुद्दाच गौण ठरतो.
जेनेरिक औषधे -- हा एक अत्यंत विशाल असा महासागर असून यात जितक्या डुबक्या माराल तितकी रत्ने निघतील.
पहिली गोष्ट म्हणजे जेनेरिक औषध म्हणजे काय. उदा पार्क डेव्हिस या कंपनीने क्लोरोमायसेटीन हे प्रतिजैविक शोधून काढले १९४७. टायफॉईड किंवा विषमज्वर यासाठी रामबाण असलेले हे पहिले औषध. शोध लावणाऱ्या कंपनिला तिच्या शोध लावण्याच्या प्रक्रियेसाठी आलेला खर्च भरून निघण्यासाठी पेटंट दिले जाते. या पेटंट द्वारे 20 वर्षेपर्यंत दुसरा कोणीही ते औषध बनवू/ विकू शकत नाही. ती कंपनी आपली मक्तेदारी वापरून औषध विक्री करू शकेल, ज्याद्वारे ती आपला नफा वसूल करू शकेल आणि पुढच्या अधिक संशीधनाला पैसा उपलब्ध होऊ शकेल हा पेटंट कायद्याचा मूळ हेतू. 
हे औषध १९४९ साली भारतात उपलब्ध झाले तेंव्हा एका (२५० मिग्रॅम) कॅप्सूल ची किंमत होती अडीच रुपये. दिवसाला सहा कॅप्सूल द्यायला लागत. म्हणजे रोजचा खर्च १५ रुपये. तेंव्हा सोन्याचा भाव होता ८० रुपये १० ग्रॅमला. 
आज क्लोरोमायसेटीनची किंमत आहे तीन रुपये कॅप्सूलला. विचार करा त्या कंपनीने किती नफा केला असेल ते.आमचे वडील सांगतात कि आमच्या आजोबाना आणि आमच्या काकांना टायफॉईड झाला आणि तो उलटला (relapse) त्यामुळे अगोदरच कुळकायद्यात जमीन गेलेली होती वर या उपचारांचा खर्च असल्यामुळे घरातील सर्वच्या सर्व सोने विकायला लागले. आमच्या कुटुंबाची परिस्थिती संपन्नावस्थेतून विपन्नावस्थेत गेली. 
पंधरा वर्षांनी जेंव्हा औषध पेटंट मुक्त होते तेंव्हा ते कोणतीही कंपनी बनवू शकते. आणि मग स्पर्धा सुरु होते. मग जो स्वस्तात ते औषध बनवू/ विकू शकतो तो या स्पर्धेत टिकतो. मग चांगल्या कंपन्या ज्यांच्याकडे ते औषध बनवण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध असते त्या ते औषध बनवण्यास सुरुवात करतात. 
अशी औषध बनवण्याची प्रक्रिया झाल्यावर औषधाचा दर्जा कसा असावा याची इत्यंभूत माहिती फार्माकोपिया नावाच्या पुस्तकात दिलेली असते. उदा IP किंवा INDIAN PHARMACOPOEA. हे पुस्तक भारत सरकार प्रसिद्ध करते. किंवा USP ( अमेरिकेचे) किंवा BP (ब्रिटनचे). 
प्रत्येक औषधात एका ग्राम मध्ये प्रत्यक्ष औषध कमीतकमी किती टक्के(उदा. ९९. ८७%), क्लोराईड किती(०.००१५%) , सोडियम किती, (ASH )राख किती इ. स्पष्टपणे दिलेले असते. असे घाऊक औषध विकणाऱ्या कंपन्या आपले औषध कोणत्या मानक पुस्तकाप्रमाणे आहे ते त्यावर लिहितात उदा. PARACETAMOL IP. किंवा IBRUPROFEN USP. (हे थोडेसे EURO ५ किंवा BHARAT ४ सारखेच आहे). 
 Image result for जेनेरिक औषध फायदे

एक लक्षात घ्या सर्वच औषध बनवणाऱ्या कंपन्या ती बाजारात विकतात असे नाही तर घाऊक प्रमाणावर वेगवेगळ्या कंपन्यांना विकतात.(आजकाल अशी घाऊक औषधे चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर स्वस्तात तयार होतात आणि ती जगभर निर्यात केली जातात.) घाऊक औषध विक्रेते मग ती औषधे मोठ्या कम्पन्याना प्रथम विकतात. कारण त्यांची ऑर्डर मोठी असते पण त्यांचे दर्जाचे निकष काटेकोर असतात. त्यांच्या दर्जात थोडी कमतरता आल्यामुळे नाकारलेली औषधाची बॅच मग ते छोट्या औषध उत्पादकांना विकतात. अर्थात हे फार गंभीर असेलच असे नाही. 
असे घाऊक औषध( BULK DRUG) विकत घेऊन चांगल्या कंपन्या आपल्या स्वतःच्या प्रयोगशाळेत प्रत्यक्ष चाचणी करून खात्री करून घेतात आणि ते औषध वापरून तुम्हाला मिळणाऱ्या गोळ्या सिरप इ औषधीत रूपांतर करतात. चांगल्या कंपन्या मग अशा औषधांना स्वतःचे एक नाव (ब्रँड नेम) देऊन ते बाजारात उतरवतात. उदा. क्रोसिन. यात पॅरासिटामॉल हे मूळ औषध असते. क्रोसिनच्या गोळीची किंमत साधारण १ रुपयाला एक आहे. त्याच ऐवजी सिप्ला या कंपनीचे PARACIP हे ७० पैशाला मिळते. इतर कोणती कंपनी तेच औषध पॅरासिटॅमॉल म्हणून बाजारात जेनेरिक म्हणून २० पैशात विकते. 
जोवर औषधाच्या दर्जाची खात्री देता येते तोवर जेनेरिक औषध देणे हे नक्की चांगले आहे. 
काही कंपन्या स्वतः आपले ब्रँड आणि जेनेरिक अशी दोन्ही औषधे बाजारात आणतात. उदा रॉक्सीडं नावाचे प्रतिजैविक(ANTIBIOTIC) अलेम्बिक या कंपनीचे औषध ७२ रुपयाला १० गोळ्या मिळत असे आणि तेच औषध जेनेरीक म्हणून ४० रुपये MRP चे मिळत असे. हे औषध ४० रुपयाला रुग्णांना मूळ किमतीत उपलब्ध करून द्यावे म्हणून द्यावे आम्ही विकत आणून ठेवले होते. पण रुग्णांना वाटत असे कि यात डॉक्टरांचा फायदा आहे त्यामुळे ते ७२ रुपये देऊन केमिस्ट कडून औषध घेणे पसंत करीत. यामुळे आम्ही नंतर असा रुग्णांचे पैसे वाचवण्याचा प्रयत्न सोडून दिला. असो. 
Image result for जेनेरिक औषध फायदे
या रणधुमाळीत मग हवशे नवशे गवशे सगळेच सामील होतात. मग नकली औषधे निर्माण होतात आणि हातोहात खपवली जातात. सरकारी रुग्णालयात असणारे खरेदी विभागाचे साटेलोटे पासून खाजगी औषध विक्रेत्या बरोबर बनवलेले लागेबांधे. यात म्हणाल तेथे आणि म्हणाल त्या किमतीची औषधे उपलब्ध असतात. भारतात मिळणारी २५ % औषधे नकली आहेत. म्हणजे चारात एका रुग्णाला मिळणारी औषधे नकली आहेत. हा बाजार २५००० कोटी ( होय पंचवीस हजार कोटी) रुपयांचा आहे.   
हि २५ % नकली औषधे सोडून देऊ. बाकी ७५% औषधे नकली नाहीत हे मान्य. परंतु त्या औषधांचा दर्जा जागतिक दर्जाइतका आहे का? हा एक मोठा गहन प्रश्न आहे. अमेरिकेतील FDA हे अत्यंत कडक असून तेथे नकली औषध बनवणार्यांना आणि विकणार्यांना जबर दंड आणि शिक्षा आहे. त्यामुळे तेथे जेनेरिक औषधे देण्यास डॉक्टरना किंतु येत नाही. आपले FDA काय आणि किती कार्यक्षम आणि प्रामाणिक आहे याबद्दल न बोलणे बरे. 
 | जेनेरिक मेडिसिन | 
साधे डोकेदुखीवर एस्प्रो (ASPRO) घ्या. हे ३५० मिलिग्रॅम ऍस्पीरिन असलेले औषध मायक्रोनाईजड कणाचे बनलेले असते. त्यामुळे तो गोळी आपल्या पोटात जाताच ताबडतोब म्हणजे १५ सेकंदात विरघळते. आणि याचा पूर्ण परिणाम १५ मिनिटात होतो. आपण डिस्प्रिनची गोळी पाण्यात विरघळवली आणि घेतली तरी असाच परिणाम दिसून येतो. याच ऐवजी हॅस्प्रो किंवा तत्सम जेनेरिक औषध असेल त्यात ३५० मिलिग्रॅम ऍस्पीरिनच असेल पण ते सूक्ष्म कणांचे ना बनवता साधे असेल तर ते पोटात विरघळायाला १५ मिनिटे लागतील. म्हणजे आपल्या डोकेदुखीपासून पूर्ण आराम व्हायला १५ च्या ऐवजी ३० मिनिटे लागतील. यात मूळ औषध चांगल्या दर्जाचे खरोखर आहे हे गृहीत धरले आहे. 
आता आपण मेट्रोनिडॅझॉल हे औषध घेऊ. आमांश किंवा अमिबिक डिसेंट्रीसाठी लागणारे औषध. हे औषध जठराच्या हायड्रोक्लोरिक आम्लात विघटीत पावते आणि शिवाय त्याच्या पदार्थामुळे जठराचा दाह होऊन आम्लपित्त होते. म्हणून ते एका इन्टेरिक कोटेड गोळी मध्ये मिळते. हि गोळी त्याच्या खास आवरणामुळे आम्ल वातावरणात विरघळत नाही तर अल्कलाईन वातावरणातच विरघळते. त्यामुळे औषधाचा परिणाम जठरावर होत नाही किंवा ते विघटन पावत नाही. आता मेट्रोनिडॅझॉलच्या २५० मिग्रॅमच्या जेनेरिक गोळीत तेवढे द्रव्य असेल पण जर ते इन्टेरिक कोटेड नसेलच तर रुग्णाला त्याचा फायदा होणार नाही उलट एखादा अन्य पॅथीवाला तुम्हाला ऍलोपॅथीची औषधे "उष्ण" पडतात म्हणायला मोकळा असतोच. 
याशिवाय औषध इंटेरिक कोटेड आहे पण त्याचे कोटिंग व्यवस्थित नसेल तर किंवा कारखान्यापासून रुग्णापर्यंत पोहोचण्यात होणाऱ्या हाताळण्यात जर त्याला भेगा पडल्या किंवा गोळीचा कोपरा तुटला तर या गोळ्यातील मेट्रोनिडॅझॉल बाहेर पडून रुग्णाला उपचार नाहोत अपायच होईल. 
जेनेरिक औषधांबद्दल माहिती मिळवा व त्याबाबत वर्गात चर्चा करा | या दोन्ही प्रकारांबद्दल डॉक्टरच्या हातात काय आहे? हे जेनेरीक औषध ना त्याने बनवले आहे ना त्याच्याकडे या औषधाचा दर्जा तपासण्याची यंत्रणा. परत रुग्ण बरा नाही झाला तर जबाबदारी डॉक्टरचीच असते. सुरुवात आपले निदान चुकले आहे का या शंकेपासून होते. निदानाबद्दल खात्री झाल्यावर रुग्णाने औषध व्यवस्थित वेळेवर आणि दिलेल्या डोसइतके घेतले आहे का याची शहानिशा होते.( औषध उष्ण पडते म्हणून तीन पैकी दोनच डोस घेणारे रुग्ण भरपूर भेटतात). आता निदान नक्की आहे आणि रुग्ण सुद्धा विश्वासू आहे आणि त्याने औषध व्यवस्थित घेतले आहे तरी उपचाराचा गुण का येत नाही हे पाहायला गेले तर औषधाच्या दर्जाबाबत शंका येणार.मग अशी परिस्थिती येण्यापेक्षा डॉक्टर सरळ प्रथितयश कंपन्यांची औषधेच लिहून देतात. याउलट जर तुम्ही उद्या टाटाने औषध कंपनी काढली तर ती औषधे देण्यास कोणत्याही डॉक्टरला शंका येणार नाही. कारण टाटांचे "नाव" आहे आणि आपल्या नावाला काळिमा लागेल असे ते काहीही करत नाहीत. हीच खात्री अगरवाल किंवा गोयल फार्मा कंपनी गुडगाव बद्दल देता येईल का? 
जेनेरिक औषधे मराठी | जर भारतात FDA ने सर्व औषध कंपन्यावर डोळ्यात तेल घालून पहारा ठेवला आणि जर औषध कंपन्याना उत्पादनाचा परवाना देताना अत्यन्त कडक अशी तपासणी केली त्याचबरोबर नकली औषधे बनवणाऱ्या कंपन्यांवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्यांना सज्जड शिक्षा झाली. असे झाले तर भारतात जेनेरीक औषधे देण्यास कोणत्याही डॉक्टरना शंका येणार नाही. 
अमेरिकेचे अन्न आणि औषध प्रशासन अशा प्रत्येक कारखान्यावर कडक नजर ठेवून असते उदा.  
आजची परिस्थिती काय आहे. मी जर जेनेरिक औषध म्हणून गंभीर असलेल्या मेनिन्जायटिसच्या रुग्णाला "मेरोपेनेम" लिहून दिले तर बाजारात त्याचे १२८ ब्रँड उपलब्ध आहेत. आणि त्यांची किंमत ९८० रुपयापासून २५०० रुपयांपर्यंत आहे.  Image result for जेनेरिक औषध फायदे

जेनेरिक औषधाची नावे | डॉक्टरने फक्त जेनेरिक औषधाचे नाव लिहून दिले तर आता सर्व निर्णय राह्तो केमिस्टच्या हातात मग जी कंपनी त्याला सर्वात जास्त कमिशन देईल त्याचेच औषध तो जेनेरिक म्हणून तुम्हाला विकणार. पण त्या कंपनीला हे औषध बनवण्याचा अनुभव त्याचे तंत्रज्ञान किती याचे केमिस्टला काहीच घेणे देणं नाही. यात रुग्ण दगावला तर केमिस्टची जबाबदारी शून्य. मार खाणार तो फक्त डॉक्टर.शिवाय त्याच्या बदनामीमुळे व्यवसायावर होणारा परिणाम वेगळाच. आज सर्व डॉक्टरना भीती आहे ती हीच कि केमिस्टने दिलेल्या जेनेरिक औषधाच्या दर्जाची खात्री कोण देणार. आजकाल लोकांचा धीर फार लवकर सुटतो आणि एकंदर सरकार आणि माध्यमे यांच्याकडून होणाऱ्या अपप्रचार यामुळे कोणताही डॉक्टर जरासुद्धा धोका पत्करायची तयारी दाखवत नाही. 
जेनेरिक औषधांबद्दल माहिती pdf | नकली औषध बनवल्याबद्दल त्या कंपनीच्या संचालकांना आणि ते विकल्याबद्दल केमिस्टला अटक होऊन त्यावर खटला चालून निकाल लागेपर्यंत बहुतेक वेळेस डॉक्टर वानप्रस्थाश्रमात पोचलेला असतो. 
आज डॉक्टर कमिशन मिळते म्हणून एखादे महाग औषध लिहून देतो त्यात त्याचा (गैर)फायदा आहे हे नक्की पण शेवटी स्वतःवर जबाबदारी असल्याने तो नकली औषध तरी नक्की देणार नाही. पैशासाठी फार तर नको असलेली व्हिटॅमिन्स, पूरक अन्न किंवा मिनरल्स सारखी भारंभार पण निरुपद्रवी औषधे लिहून देईल. 
 जेनेरिक औषधा विषयी माहिती | आम्ही दवाखान्यात रुग्णांना देण्यासाठी जेनेरिक औषधे ठेवली तेंव्हा त्याच्या घाऊक विक्रेत्याला विचारले कि याच्या दर्जाबद्दल तुमचे काय म्हणणे आहे? त्यावर तो प्रामाणिकपणे म्हणाला कि सर मी तुम्हाला आज फसवले तर उद्या तुम्ही मला दारात उभे करणार नाही.एवढेच नव्हे तर तुम्ही इतर डॉक्टरना सांगाल कि माझी औषधे नकली आहेत. मलाही धंदा करायचा आहे.त्यावर माझेही पोट अवलंबून आहे. तुम्ही निश्चित राहा कि मी तुम्हाला पुरवतो ती औषधे उत्तम दर्जाचीच असतील. 
आतापर्यंत जेवढे स्मरणात आहे तेवढे लिहिले आहे. जसे अजून काही आठवेल तसे यात भर घालीन.
जेनेरिक औषधांची माहिती मराठी | जेनेरिक औषधांबद्दल माहिती मराठी 

   | Generic Medicine  | Generic Medicine Definition  | Generic Medicine Meaning  | Generic Medicine For Lipitor  | Generic Medicine For Cholesterol  | Generic Medicine For Herpes  | Generic Medicine For Singulair  | Generic Medicine For Crestor  | Generic Medicine For Eliquis  | Generic Medicine For Lyrica    |  Generic Medicine Vs Branded Medicine  | Generic Medicine List  | Generic Medicine Information  | Generic Medicine Meaning  | Generic Medicine Definition  | Generic Medicine For Acid Reflux  | Generic Medicine India  | Generic Medicine Online  | Generic Medicine Companies  | Generic Medicine For Synthroid    |  Generic Medicine Vs Branded Medicine  | Generic Medicine List  | Generic Medicine In Hindi  | Generic Medicine In India  | Generic Medicine Satyamev Jayate  | Generic Medicine Wholesale Price List  | Generic Medicine And Branded Medicines Difference  | Generic Medicine Manufacturing  | Generic Medicine Kya Hai  | Generic Medicine Telugu    |  Is Generic Roxy And Generic Oxyconten The Same Med  | What Is A Generic Medicine For Effexor  | What Does Generic Mean In Medicine  | How Do You Identify A Generic Medicine  | Does Fentanyl Come In A Generic Medicine  | What Is The Generic Name Of Devilry Medicine  | What Generic Medicine Lowers Cholesterol  | What Is The Generic Medicine For Motrin  | What Is The Generic Name Of Fenbid Medicine  | What Does 'Generic' Mean  | What Is A Generic Medicine For Simvastatin  | What Is Generic Medicine For Byetta  | What Is The Generic Over The Counter Medicine For  | Is There Any Adverse Health Effects Of Generic Med  | What Is The Generic Form Of Cialas  | What Is Generic Medicine For Lotrel  | Is There Any Generic Medicine Of Salmeterol Flutic  | What's The Best Generic Cold & Flu Medicine  | Can You Give A Generic Medicine On A Prescription  | What Is Cephabell  | What Is Generic Medicine  | Where Can I Get Comprehensive Info On Branded Medi  | How Long Does It Take Before A Prescription Medici  | What Kind Of Generic Drug Or Medicine Can Avoid Ea  | What Does The Term Approved Name Of Medication Mea  | What Medicine Has K 30 On The Pill  | Can You Buy Paracetamol In America  | What Is A Generic Medicine For Femhrtr For Hormone  | What Are The Disadvantages Of Generic  | When Will A Generic Celebrex Be Available In The U  | What Kind Of Medicine Is G 4910  | Can A Pharmacist In The Uk Dispense A Branded Medi  | Is Akwa Tears A Prescription Only Medicine  | Is Ibuprofen A Brand Drug Or Is It Also Available  | Medicine Given Shows The Letter M615 Is It Levetir  | Is Zefu-500 A Generic Medicine  | What Is Another Name Naispan Is Known By  | What Is Meant Ip In Tablets  | What Kind Of Medicine Is Benzonatate  | What Is A Good Over The Counter Pain Relief Medici  | What Are Medicines That Relieve Pain Without Loss  | When Compared With Prescription Medicine Generic M  | Is Vet School The Same As Vet College  | Who Invented Claratyne  | What's The Best Local Medicine For Stomach Gas  | What Is Avodart Medicine  | What Is The Pet Medicine Hydroxyzine  | Is The Quality Of The Generic Medicine Cheaper Med  | Is Vecodin Or Hydocodone Stronger  | What Is Nitrofur    |  Generic Medicine  | Genetic Medicine    |  Generic Medicine In Hyderabad  | Generic Medicine Online  | Generic Medicine India  | Generic Medicine Search  | Generic Medicine News  | Generic Medicine Hindi  | Generic Medicine Pdf  | Generic Medicine Price  | Generic Medicine App  | Generic Medicine Online Shopping  | Generic Medicine Store  | Generic Medicine Website  |