यंदाची होळी जरी कोरडी होळी खेळणार असलात तरीही रंगांशी संपर्क हा येणारच आहे. नुसत्या गुलालातही काही रासायनिक द्रव्य असतात, त्याचा आपल्या शरीरावर आणि केसांवर परिणाम होतो. यंदाची होळी जरी कोरडी होळी खेळणार असलात तरीही रंगांशी संपर्क हा येणारच आहे. नुसत्या गुलालातही काही रासायनिक द्रव्य असतात, त्याचा आपल्या शरीरावर आणि केसांवर परिणाम होतो. मग अशा या रंगांपासून केसांचं आणि त्वचेचं नुकसान होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी? » रंग खेळायला जाण्यापूर्वी किमान पंधरा ते वीस मिनिटं आधी चेह-यावर सन्सक्रीम आणि मॉइश्चरायझर लावून ठेवावं. तुमच्या चेह-यावर पिगमेन्टेशनचा त्रास असेल तर तुम्ही उच्च प्रमाणात एसपीएफ असलेलं क्रीम निवडावं. » ऑलिव्ह तेल, खोबरेल तेल, बदामाचं तेल आणि मोहरीचं तेल चेह-यावर आणि शरीरावर तेल लावावं म्हणजे तुम्हाला त्यातून पोषण मिळेल. » तुमच्या टाळूवर खोबरेल तेलाने मसाज करा. कोरडय़ा आणि दुभंगलेल्या केसांसाठी गहू आणि खोब-याचं तेल गरम करून त्याचा मसाज करावा. त्यामुळे तुमच्या केसांची रासायनिक द्रव्यांमुळे हानी होण्यापासून बचाव होईल. केसांना संरक्षण मिळेल. यामुळे केसांमध्ये उडालेले रंग अगदी सहज निघण्यास मदत होईल. » तुमच्या ओठांना लिप बामचा जाड कोट लावा. जेणेकरून ओठांचा फुटण्यापासून बचाव होईल. » नखांना रंगहीन नेलपॉलिश लावावं. किमान दोन कोट तरी लावणं आवश्यक आहे. नखांना गडद नेलपॉलिश लावल्यावर त्यावरही तुम्ही रंगहीन नेलपॉलिश लावू शकतात. जेणेकरून नखांचं संरक्षण होईल आणि नखंदेखील चमकतील. » नैसर्गिक रंगांचा वापर करत असाल तरीही त्याचा अतिरेक करू नका. कारण कधी कधी कुंकू, हळद आणि चंदनाचादेखील एखाद्याच्या त्वचेला त्रास होण्याची अक्यता असते. हे रंग धुतले गेले नाहीत तरीही रॅशेस होण्याची शक्यता असते. म्हणूनच तुमची त्वचा तेलकट असेल तर चंदनाचा वापर करा. » रंग खेळल्यावर कधीही साबणाचा वापर करू नये. तसंच ताबडतोब साबणाचा वापर चेहरा धुण्याकरता करू नका. कारण साबणामध्ये अल्कलाईन असतं त्यामुळे त्वचा कोरडी होऊ शकते. म्हणूनच ताबडतोब क्लिनझिंग क्रीम किंवा लोशन लावा त्यामुळे त्वचा मुलायम होईल. त्वचेवर मसाज करा, त्यानंतर कापसाने पुसून काढा. » रंग काढण्यासाठी तिळाचं तेल वापरू शकता. त्याचा चेहरा आणि शरीरावर मसाज करा. यामुळे रंग तर निघेलच आणि त्वचेचं नुकसान होणार नाही. » केस धुताना प्रथम केसांवर भरपूर प्रमाणात पाणी घाला. म्हणजे केसांमध्ये अडकलेला रंग निघून जाईल. त्यानंतर सौम्य प्रतीचा श्ॉम्पू डोक्यावर घालून त्याने व्यवस्थित केस धुऊन घ्या. बोटांनी टाळूवर श्ॉम्पूने मसाज करा. त्यानंतर साध्या पाण्याने धुऊन टाका. » त्यानंतर एका मगमध्ये लिंबाचा रस घालून त्या पाण्याने सर्वात शेवटी केस धुवावेत. हे उत्तम कंडिशनर आहे. यामुळे टाळूवर असणारं अॅसिड अल्कलाईन संतुलित राहतं. » मेथीचे दाणे, आवळा पावडर, उकळलेली शिककाई आणि पाणी हे मिश्रण एकत्रित करून तो पॅक केसांना लावू शकता. याशिवाय मेंदी पावडर, चार चमचे लिंबाचा रस आणि दही यांचं मिश्रणही तुम्ही लावू शकता. हे मिश्रण एक तास लावून ठेवावं आणि नंतर केस धुवावेत. |