Tuesday, July 21, 2015

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

तोंड आलंय?

आपल्याकडे तोंड येणे हा वाक्प्रचार सर्रास वापरला जातो. कोणी पटकन काही बोललं तरीदेखील 'त्याला काय तोंड आलंय' असं म्हटलं जातं. पण जेव्हा प्रत्यक्षात तोंड येतं तेव्हा मात्र त्या रुग्णाचे हाल होतात. तोंड येतं म्हणजे काय होतं तेव्हा कळतं. हे नेमकं कशामुळे होतं. त्याची कारणं काय आहेत किंवा असं होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे हे जाणून घेऊ या.

त्या दिवशी चिरागला साधं जेवणही तिखट लागत होतं. इतकंच नाही तर पाणी किंवा दूध पिणंही कठीण होत होतं. त्याला तोंडच उघडता येत नव्हतं. घरगुती उपचार करूनही काहीच फरक पडत नव्हता. दोन दिवस झाले तरी काही कमी होत नाही हे लक्षात आल्यावर तो त्वरित डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी त्याला पाहून लगेच औषधं दिली. दुस-या दिवशी त्याला थोडंसं का होईना पण तोंड उघडता आलं. त्याला तोंड आलं होतं.

तोंड येणे म्हणजेच माऊथ अल्सर होणे किंवा स्टेमॅटायटिस. चिरागप्रमाणेच प्रत्येकालाच कधी ना कधी या त्रासातून जावंच लागतं. लहान असो वा मोठं हा तोंड येण्याचा त्रास कधी कधी उद्भवतो. लहानपणी पटकन कोणाला उलट उत्तर दिलं की पटकन म्हटलं जायचं की, 'कसा चुरूचुरू बोलतोय बघ, तोंड आलंय त्याला.' पण हा वाक्प्रचार जेव्हा प्रत्यक्षात येतो तेव्हा त्याचा कितीतरी त्रास होतो. खूप हाल होतात.

पाणी पिताना डोळ्यांतून पाणी येणे, शरीरातली उष्णता वाढणे, आळस येणे, कशात लक्ष न लागणे, सतत त्या जखमेकडे लक्ष जाणे, आवंढा गिळतानाही त्याचा त्रास होतो. याचं प्रमाण अधिक असेल तर काही रुग्णांना अशक्तपणाही येऊ शकतो. वारंवार या त्रासाला सामोरं जावं लागलं तर यामुळे बुद्धीची धार कमी होते किंवा स्मरणशक्ती कमी होते, कार्यक्षमता कमी होते. हा त्रास मोठय़ांप्रमाणेच लहानांनादेखील होऊ शकतो. या आजाराला वयाचं बंधन नसतं. अशा या अल्सरचे किंवा तोंड येण्याची कारणं काय आहेत ते पाहू या.
कारणं

» कुपोषण

» आहारदोष किंवा चुकीची आहारपद्धती आणि जीवनशैली

» जीवनसत्त्व नायसीन, रायबोफ्लॅवीन. फोलेट अ‍ॅसिड, जीवनसत्त्व सायनोक्लोमाइनच्या कमतरता

» दात, जीभ, हिरडया आणि तोंडाची पुरेशी स्वच्छता नसणे,

» दीर्घकाळ अँटिबायोटिक औषधाचे सेवन करणे,

» कॅन्सरच्या औषधाचा दुष्परिणाम होणे

» तंबाखूम दारू, गुटखा याचं सेवन करणे

» मानसिक ताणतणाव

» अपुरी झोप

» अति मसालेदार, तिखट अन्नपदार्थाचं सेवन करणे

» कमी प्रतिकारशक्ती

» जीवनसत्त्वांची कमतरता

» वारंवार टुथपेस्ट बदलणे

» कधी कधी काही स्त्रियांना मासिक पाळीपूर्वीदेखील तोंड येतं. पण ते मर्यादित काळासाठी असतं.

तोंड येणं म्हणजे नेमकं काय होतं?

तोंड येतं तेव्हा जीभ, गालाचा आतील भाग, टाळू, हिरडया, जिभेच्या कडा, ओठाची आतली बाजू पूर्णत: लाल होते. काही वेळेला पांढरट, पिवळसर गोल जखमा तयार होतात. इतकंच नाही तर कधी कधी घशाच्या आत किंवा जिभेवर पांढरट थर जमा होतो. अशा वेळी तोंडातून गरम वाफा निघाल्याचं जाणवतं. जिभेच्या कडा खडबडीत होतात. तिथेही फोड येतात.

कधी कधी ताप येतो किंवा अंगात कणकण जाणवते. पचनसंस्थेवर ताण पडून शौचाच्या तक्रारीही निर्माण होतात. त्याचबरोबर भूक मंदावणे, प्रतिकार शक्ती कमी होणे, इतर आजरावर सामोरे जावे लागतं. यासारख्या तक्रारी वारंवार तोंढ येण्याचे दिसून येतं. वारंवार तोंड आल्यामुळे अपचन, जुलाब, मोठया आतडयाचे विकार, मानसिक ताणतणाव अशा प्रकारांना सामोरं जावं लागतं.

थोडक्यत शरीरातील ब गटातील जीवनसत्त्वांचं प्रमाण कमी झालं की त्याचा मज्जा पेशींवर परिणाम होतो. त्वचा, ओठ, गालाचा आतील भाग, जीभ आणि घसा असे पचनसंस्थेतील महत्त्वाचे पाचकरस करणा-या ग्रंथी तसंच रक्त तयार करणा-या ग्रंथींचं जीवनसत्त्व बी गटामुळे होत असतं. मात्र या जीवनसत्त्वांच्या अभावाने खंड पडतो. आणि त्यांचं कार्य बिघडतं त्यामुळे तोंड येतं.

तोंड येऊ नये म्हणून काय कराल?

» तोंडाची आंतरबाहय़ स्वच्छता

» पान, तंबाखू, गुटखा यांसारख्या घातक घोष्टींचं सेवन पूर्णपणे बंद करावं

» आहारात जीवनसत्त्व आणि चोथायुक्त पदार्थाचा समावेश करावा.

» भरपूर पाणी प्यावं. दिवसभरातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे

» पुरेशी झोपही आवश्यक आहे. रात्रीच्या जागरणाने शरीरात उष्णता वाढते. त्यामुळेही तोंड येतं. म्हणून किमान सहा ते सात

» तास झोपणं आवश्यक आहे.

» तणावरहीत जगणं आवश्यक आहे. कोणत्याही गोष्टीचा मनावर ताण आल्याने त्याच्या परिणाम आपल्या प्रकृतीवर होतो.

» तोंड आलेल्या ठिकाणी ग्लिसरीन लावावं. आणि लाळ थुकून टाकावी. तोंडात कात धरल्यानेही आराम पडतो. मात्र त्वरित उपचार न झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

शरीराला आवश्यक जीवनसत्त्व कोणती?

» बी १ अर्थात थायमिन

» रायबोफ्लेवीन

» नायसीन

ही जीवनसत्त्व कोणत्या पदार्थातून मिळतील?

थायमिन : सर्व प्रकारची तृणधान्य, हातसडीचा तांदूळ, कोंडयासकट गहू, मोड आलेली कडधान्य, ज्वारी आणि बाजरी.
रायबोफ्लेवीन : दूध, तृणधान्य, डाळी यातून अधिक प्रमाणात मिळतं.

गर्भावस्थेतील स्त्रिया, थायरॉड ग्रंथीचे आजार, संतती नियमनाच्या गोळ्यांचे सेवन करणाऱ्यांना या जीवनसत्त्वाची अधिक गरज असते.

नायसीन : संमिश्र आहार. तृणधान्य आणि दूध.

Read More »

गुणकारी शेपू

काहीशा चवीला वेगळ्या असणा-या शेपूच्या भाजीला इंग्रजीत दिल व्हेजिटेबल, तर हिंदीत सावा आणि पंजाबीत सोया असं म्हणतात.

काहीशा चवीला वेगळ्या असणा-या शेपूच्या भाजीला इंग्रजीत दिल व्हेजिटेबल, तर हिंदीत सावा आणि पंजाबीत सोया असं म्हणतात.

या भाजीची लागवड भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या आणि उबदार वातावरणात होते. या भाजीची उंची साधारण एक मीटपर्यंत वाढते. या भाजीचा वापर भारताप्रमाणेच रशिया, युक्रेन, पोलंड यांसारख्या देशांतही केला जातो. दिसायला हिरवीगार असल्याने कोथिंबिरीच्या गटात मोडते.

मात्र हिची चव कोथिंबिरीप्रमाणे नसते तर हिला एक विशिष्ट उग्र चव असते. चवीला चांगली नसली तरी हिच्यात भरपूर औषधी गुण आहेत. इतर देशात या भाजीचा वापर सलाड, सूप यांसारख्या विशिष्ट पदार्थात केला जातो तर आपल्याकडे प्रामुख्याने भाजी आणि पराठा करून खाल्ली जाते. अशा या शेपूचे औषधी गुणधर्म जाणून घेऊ या.

» पोटाचे विकार, डोकेदुखी, किडणीचे विकार यासारख्या रोगांवर अतिशय उपयोगी आहे.

» शेपूच्या भाजीमध्ये लो कॅलरीज आणि उच्च प्रतीची पोषणमूल्य असतात.

» शेपूची पानं भाजलेल्या भागावर लावली तर लवकर आराम पडतो.

» या भाजीच्या सेवनाने कोणत्याही प्रकारचा संसर्ग होत नाही. म्हणून ही भाजी आहारात असावी.

» या भाजीच्या सेवनाने पचनशक्ती वाढवण्यास मदत होते.

» शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

» बी कॉम्प्लेक्स अािण व्हिटॅमिनचं प्रमाण अधिक असल्याने या भाजीच्या सेवनाने निद्रानाशाचा त्रास होत नाही.

» शरीरातील हार्मोन्स संतुलन राखण्यास मदत होते.

» मासिक पाळीचा त्रास असलेल्यांनी या भाजीचं आवर्जून सेवन करावं. यात असलेले फ्लेवनॉइड्स आणि पोषक मूल्यांमुळे मासिक पाळीच्या वेळी होणारा त्रास कमी होतो.

» शरीरातील रक्तातल्या व्हाईट कॉलेस्टेरॉलची पातळी कमी करण्याची क्षमता असते. त्यामुळे हृदय संरक्षक म्हणून काम करते.

» यात कॅल्शिअम अधिक प्रमाणात मिळतं. त्यामुळे गुडघेदुखी कमी होते. तसंच हाडांची झीज टाळण्यासाठी हाडं मजबूत करण्यासाठी याचा उपयोग होतो.

Read More »

मत्स्यासन

मत्स्य म्हणजे मासा हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. हे आसन केल्यानंतर स्थिती माशाप्रमाणे दिसते म्हणून या आसनाला मत्स्यासन असं म्हणतात. या आसनामुळे पाठीचा मणका, मानेचे सांधे, खांद्याचे स्नायू ताणले जातात. परिणामी सांधेदुखीपासून आराम मिळतो. तसंच मानसिक ताणतणावापासून मुक्ती मिळते. पचनशक्ती सुधारते. चरबी कमी होते. 

क्रिया

प्रथम पद्मासनात बसावे व हळुवारपणे हातांच्या मदतीने मागे झोपावे, मागे जाताना हातांचा व कोप-याचा आधार घेत हळुवार मागे जावं. हात वर उचलून तळहात खांद्यामागे/ बाजूला जमिनीवर टेकवा. तळहातांवर दाब देऊन अलगद मान जितकी मागे वळवता येईल तितकीच वळवावी तसेच पाठही ताणून छाती वर उचलावी. गुडघे जमिनीपासून दूर होऊ देऊ नयेत.

हातांनी पायांचे अंगठे पकडावे. सुरुवातीस जमत नसेल तर मांडयावर हात ठेवावेत. पूर्वस्थितीत येताना खूप काळजी घ्यावी. घाई करू नये. घाई केल्यास पाठीला व मानेला हादरा बसू शकतो. हातांच्या आधाराने पूर्वस्थितीत यावं. जसे हे आसन आपण सुरू केलं तसंच त्याच स्थितीत परत यावं. खांदे व डोके जमिनीवर टेकवत पाय सरळ करून थोडया वेळासाठी झोपा.
मत्स्यासन या आसनात सुरुवातीला २-३ मिनिटं बसावं.

घ्यायची काळजी

हे आसन करताना खूप हळुवारपणे करावं. मागे जाताना हातांचा व कोपऱ्यांचा आधार घेत मागे जावे व काही सेकंद थांबावं. नंतर हळुवारपणे मान वर करीत छाती वर आणावी व मानेला जास्त स्ट्रेच देऊ नये. आसन सोडताना हळुवारपणे हातांचा आधार घेत उठावं. उठताना घाई करू नये. विशेष म्हणजे हे आसन करताना योग मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्यासमोरच करावे.

फायदे

या आसनात पोटाला जास्त स्ट्रेच मिळाल्याने पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.तसेच पोटावरील चरबी कमी होण्यासही मदत होते. दम्याच्या व्यक्तींना हे आसन खूप फायदेशीर आहे. या आसनामुळे पाठीचा कणा मजबूत बनतो व पाठीचे स्नायू कार्यक्षम होतात.

हे आसन सर्वागासनानंतर लगेचच करावं; कारण सर्वागासनाने मानेला आलेला ताठरपणा व मानेतील स्नायू खेचल्याने स्नायूंना आलेली जडता दूर करते.

विशेष टीप

ज्या व्यक्तीना हृदयाचा हरिनया व पाठीचा त्रास असणा-यांनी हे आसन करू नये. गरोदर महिलांना हे आसन करू नये.

Read More »

कॅन्सरच्या आणि थॅलेसेमिक रुग्णांसाठी गझलांचा 'खजाना'

द  कॅन्सर एड असोसिएशन (सीपीएए), द पॅरेंट असोसिएशन थॅलेसेमिक युनिट ट्रस्ट (पीएटीयूटी) आणि द ओबेरॉय, मुंबई या संस्था कर्करोग आणि थॅलेसेमिक रुग्ण आणि मुलांसाठी हे निधीसंकलन वार्षकि आयोजनातून करतात.

द  कॅन्सर एड असोसिएशन (सीपीएए), द पॅरेंट असोसिएशन थॅलेसेमिक युनिट ट्रस्ट (पीएटीयूटी) आणि द ओबेरॉय, मुंबई या संस्था कर्करोग आणि थॅलेसेमिक रुग्ण आणि मुलांसाठी हे निधीसंकलन वार्षकि आयोजनातून करतात. अशाच प्रकारे कर्करोग सहायता आणि थॅलेसेमियावरील जागृतीच्या निधी संकलनासाठी 'खजाना' या गझल महोत्सवाचं आयोजन केलं आहे.

२४ आणि २५ जुलै २०१५ रोजी नरिमन पॉइंटच्या हॉटेल ट्रायडंट येथे संध्याकाळी ७.०० वाजता हा कार्यक्रम होणार असून गझलप्रेमींना भारतातील अगदी नामवंत कलाकारांच्या उच्च आणि दमदार अशा गायनाचा अनुभव घेता येणार आहे. या महोत्सवाचं हे चौदावं र्वष आहे.

या कार्यक्रमाची घोषणा करण्यासाठी गझल गायक पंकज उदास, अनुप जलोटा, गायिका रेखा भारद्वाज, शिवानी वासवानी, गायक जावेद अली, संदीप बात्रा, सुदीप बॅनर्जी, पंडित अजय पोहनकर, अभिजित पोहनकर, ज्येष्ठ रंगकर्मी सलीम आरिफ, छोटे कलाकार राशी हरमळकर आणि वारेन्यम पंडया, ओबेरॉय हॉटेलचे कार्यकारी उपाध्यक्ष देवेंद्र भारमा आणि सीपीएएचे अध्यक्ष वाय के सप्रू आदी मान्यवर मुंबईत एकत्र आले होते.

यंदा 'खजाना'मध्ये अनेक प्रतिभावान कलाकार सहभागी होणार असून त्यात अनुप जलोटा, रेखा भारद्वाज, तलत अझीझ, जावेद अली, पंडित अजय पोहनकर आणि अभिजित पोहनकर, संदीप बात्रा, सुदीप बॅनर्जी, शिवानी वासवानी आणि युवा कलाकार ऐशानी बॅनर्जी, राशी हरमळकर आणि वारेन्यम पंडया तसेच सदाबहार पंकज उधास यांचा समावेश आहे.

या कार्यक्रमाची थीम 'फ्रॉम लीजंड्स टू जेननेक्स्ट' अशी ठेवली आहे. दोन दिवस साज-या होणा-या कार्यक्रमातून संकलित होणारा निधी कर्करोग आणि थॅलेसेमिया यांपासून त्रस्त रुग्णांची निगा आणि त्यांचे पुनर्वसन यांसाठी होणार आहे.

प्रवेशिका

या कार्यक्रमासाठीच्या प्रवेशिका केवळ ऱ्हीदम हाऊस येथेच उपलब्ध आहेत.

निधी संकलनासाठी देणगी

या आयोजनामधून उभा राहणारा निधी हा कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन आणि पॅरेनट्स असोसिएशन थॅलेसेमिक युनिट ट्रस्ट यांना देणगीरूपाने दिला जाणार आहे.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe