आजकाल कित्येक जोडप्यांना मुल लवकर होत नाही. त्यामुळे वंध्यत्वाची समस्या निर्माण होते. या वंध्यत्वामागे बरीच कारणं असतात. मात्र या कारणांवर मात करून आधुनिक उपचारपद्धतीचा अवलंब करून वंध्यत्वाचं निवारण करू शकतो. अशा या उपचारपद्धतीची माहिती करून घेऊया. मानव महानता, बुद्धिमता, सामर्थ्य आणि तर्कसंगतीची कौशल्ये यांमध्ये विकसित झाला असला तरीही, त्याला गर्भधारण क्षमतेमध्ये अपयशच आलं आहे. मानवाचं किंवा लोकसंख्येच्या जननक्षमतेची शक्ती म्हणजेच गर्भधारण क्षमता. सध्या मानवजातीमध्ये जननक्षमतेची शक्ती सर्वात कमी आहे. एकाच चक्रामध्ये जननक्षम जोडप्यामध्ये गर्भधारणा राहण्याचं प्रमाण जास्तीत जास्त ३० टक्के आहे. यामुळे वंध्यत्व किंवा सब-फर्टाईल जोडपे या विषयांवर चर्चासत्र होतात. जननक्षमतेमधील आव्हानं सब-फर्टिलिटी किंवा वंध्यत्वाची विविध कारणे आहेत. स्त्री जोडीदाराचे वय तसेच त्यांचे जतन अंडे टीटीसी (गर्भधारणेची वेळ) ठरवतात. ६-१२ महिने गर्भधारणेसाठी प्रयत्न केल्यानंतर वेळोवेळी निदान आणि मूल्यांकन करणं आवश्यक आहे. उपचारपद्धती युवा जननक्षम जोडप्यांमध्ये प्रत्येक महिन्यात गर्भधारणा होण्याची शक्यता २० टक्के असते. त्यामध्ये अंडमोचन किंवा शुक्रपेशींची संख्या कमी असणे यांसारख्या तक्रारी असल्यास, अंडाशयाचे विगमन (ओव्हय़ुलेशन) किंवा इन्ट्रायुटेराईन इन्सेमिनेशन (आययूआय)सारखे उपचार करून ही शक्यता सामान्य शक्यतेप्रमाणे (१५-२०) टक्केकरता येते. यापलीकडे, सहायक प्रजनन तंत्र आहेत. यामध्ये बंद झालेल्या अंडवाहिनींमधील आव्हानं दूर करणे, एन्डोमेट्रिओसिस, अॅनोव्हय़ुलेशन, शुक्रजंतूंची संख्या अति कमी असणे, वीर्य बाहेर पडल्यावर त्यात शुक्रजंतू नसणे, अंडाशयाचे जतन कमी असणे इत्यादी अडचणींवर इन व्ह्रिटो फर्टिलायझेशनच्या मदतीने मात केली जाऊ शकते. इन व्ह्रिटो फर्टिलायझेशन हे सर्वोत्तम प्रमाणित तंत्र आहे आणि ते आयव्हीएफच्या मदतीने पुढील पिढीमधील बाळाचे स्वागत करण्यासाठी उपयुक्त आहे. अंडाशयाच्या उत्तेजनावर नियंत्रण ठेवून, अंडयाची वाढ करणे, स्त्री शरीरामधून या अंडयांना बाहेर काढणे आणि नियंत्रित निकषामध्ये या अंडयांना शुक्रजंतूसोबत सुपीक बनवणे या मार्गाने आयव्हीएफ काम करते. पारंपरिक आयव्हीएफ मोठया संख्येत चांगल्या शुक्रजंतूसोबत या प्रत्येक अंडयांचा थर बनवून कार्य करते. तरीसुद्धा, शुक्रजंतूची संख्या कमी असते किंवा पुरुषांमध्ये शुक्रजंतू नसतात, तेव्हा या स्थितीसाठी इन्ट्रा सायटोप्लास्मिक स्पर्म इंजेक्शन (आयसीएसआय) हे तंत्रज्ञान वापरलं जातं. यात प्रत्येक अंडयामध्ये एक उत्तम शुक्रपेशी इंजेक्ट केली जाते, व त्यावरून फलन होते. त्यामधून तयार झालेला गर्भ पुढे पूर्ण विकसित होईपर्यंत नियंत्रित तापमान व वातावरणामध्ये इन्कीब्युटरमध्ये ठेवला जातो. त्यानंतर त्यामधून निवडक एक किंवा दोन गर्भ हळुवार माता बनू इच्छिणा-या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये टाकला जातो. आधुनिक वंध्यत्व निवारणाबद्दलच्या समजुती व व्याख्या (डिकोडिंग) न्यूनतम आवश्यक मात्रेमध्ये सर्वोत्तम अंडयांची वाढ करणे या आव्हानासाठी, सर्वोत्तम अंडं व शुक्राणू निवडणे आणि उच्चस्तरीय गर्भ तयार करणे हे आव्हानात्मक आहे. सरासरी ४० टक्केगर्भ उच्च प्रतीचे असतात. फारच थोडे वापर न करता येण्यासारखे असतात आणि उरलेले सरासरी असतात. या व्यतिरिक्त, आयव्हीएफमुळे गर्भधारणेचा दर ४० टक्केवाढतो. संशोधनानुसार असं लक्षात आलं आहे की, ३०-४० टक्के सर्वोत्तम गर्भ असतात म्हणून त्यामुळे यशस्वी गर्भधारणा होते. गर्भ तयार होतो, तेव्हा त्यामधील केवळ ३० टक्के अनुवंशिक स्वरूपात तयार झालेले असतात आणि प्रत्येक आयव्हीएफ चक्रामधून गर्भधारणा का होत नाही हा प्रश्न निर्माण होतो. कारण ते दिसताना व्यवस्थित असलं तरी प्रत्येक गर्भाची आतून व्यवस्थित वाढ झालेली नसते. नवीन काय? स्त्रीचं वय जसं वाढत जातं, त्याप्रमाणे तिचा गर्भ असामान्य होत जातो. तिच्या ४० वर्षाच्या वयातील १०पैकी केवळ २ गर्भ सामान्य असतात. ही फार मोठी संख्या आहे. या परिस्थितीचे उपचार घेणारे बरेच रुग्ण आणि उपचार करणारे डॉक्टर यांना याबद्दल माहितीच नसते. यासाठी पीजीएस हे नावीन्यपूर्ण तंत्र आहे. पीजीएस किंवा प्रिइम्प्लान्टेशन जेनेटिक स्क्रीिनग हे व्यवस्थित तंत्र गर्भाची बायोप्सी करण्यासाठी आहे आणि जेनेटिक स्क्रीिनगसाठीसुद्धा आहे ज्यामुळे सामान्य गर्भ निवडणे आणि तो गर्भाशयामध्ये सोडणे या बाबी शक्य होतात. ज्या जोडप्यांना याची गरज असते त्यांमध्ये गर्भधारणा वयापेक्षा जास्त वय असलेले (एएमए), वारंवार गर्भधारणेमध्ये अपयश आलेले (आरपीएल), वारंवार रोपण (इम्प्लान्टेशन) न होणे आणि शुक्रपेशींची संख्या फारच कमी असणे या प्रकारच्या रुग्णांची संख्या असते. पीजीएसमध्ये गर्भाचे तिस-या दिवशी तपासण्यासाठी आणि अहवालानुसार सामान्य गर्भाची निवड करून पाचव्या दिवशी तो गर्भाशयात सोडणे यांसाठी मदत करते. मग गर्भाचे सातव्या दिवशी रोपण होते. जनन क्षमतेसोबत काय चुकीचं घडू शकतं? आपण केलेला गर्भ सामान्य असल्याची खात्री केली तरीही, त्यामध्ये काय चुकीचं असू शकतं? सुपीक जमिनीमध्ये बी वाढते आणि तिचे फलन होऊन मुळे अंकुरतात आणि माता पृथ्वीकडून त्या गर्भाला पोषण मिळते. हेच गर्भाशयाच्या भित्तीवर होते, गर्भाशयाच्या स्तराला एक थर असतो ज्याला एन्डोमेट्रियल लायिनग असतात आणि त्यावरून स्पंजसारखा मुलायम बिछाना तयार होतो तो आईच्या उतींपासून तयार होतो. त्याला रोपण म्हणतात. कोणत्याही कारणांसाठी हा बिछाना निरोगी नसल्यास, गर्भाची वाढ होत नाही. गर्भधारणा होत नाही किंवा लवकर गर्भपात होतो. हा एन्डोमेट्रियल बिछाना निरोगी असल्याची खात्री करून आणि अडथळे किंवा आजारापासून मुक्त असणे हे सारखेच महत्त्वाचे आहे. गर्भाशयाचे मूल्यांकन दोन टप्प्यांत केलं जातं-मूलभूत अल्ट्रासाउंड किंवा थ्रीडी अल्ट्रासाउंड आणि हिस्टेरोस्कोपी. जननक्षमता उपचाराआधी हिस्टेरोस्कोपीवरून कोणतीही असामान्यता असल्यास ती लक्षात येते. तरीसुद्धा, योग्यपणे ठेवलेले गर्भ, सामान्य गर्भाशय पोकळीमध्ये रोपण होत नाही. अशा उदाहरणामध्ये एन्डोमेट्रियल रिसीप्टिव्हीटी एॅरे हे तंत्र उपलब्ध आहे, जे रुग्णासाठी रोपणाचा वैयक्तिक मार्ग उपलब्ध करतात. ईआरए विशिष्ट दिवशी परिणामकारक रोपणासाठी केले जाते. ही चाचणी उपचाराच्या एक महिना आधी केली जाते. ही गर्भ हस्तांतरण करण्यासाठीची अनुकरणीय पद्धत आहे आणि गर्भ हस्तांतरण करण्याऐवजी, हस्तांतरणाच्या दिवशी बायोप्सी केली जाते. ही बायोप्सी नंतर दोनशे वेगवेगळ्या जीन्ससाठी तपासली जाते ज्यावरून रिसेप्टिव प्रकार लक्षात येतो. यामुळे रुग्णासाठी व्यक्तिगत रोपणाचा मार्ग उपलब्ध होण्यास मदत होते. विविध उपचार प्रकार उपलब्ध असण्यासह प्रजनन विज्ञान फारच आवड निर्माण होण्यासारखे आहे- युटेरियन ट्रान्सप्लान्ट, युग्मकांचे स्टेमसेल निर्मिती आणि बरेच नवीन क्षेत्र यांमध्ये आहेत. चिकित्सकांची ही जबाबदारी आहे की त्यांनी व्यवस्थित संशोधन करून, सुरक्षित मार्गाने उपचार करून रुग्णांना लाभ करून द्यावा. |