साखरेऐवजी म्हणजे साखरेला पर्याय म्हणून आणि साखरेपासून बचाव करणारे बरेच गोड पदार्थ आता बाजारामध्ये उपलब्ध आहेत. हे पदार्थ अतिरिक्त साखर खाणे टाळणा-यांसाठी वरदान ठरत आहेत. आपल्यापैकी कित्येक जणांना दररोजच्या जेवणात गोड खाण्याची सवय असते. म्हणजे नेहमीच्या पदार्थामधून साखर आपल्या पोटात जातेच मात्र याव्यतिरिक्तही केक, पेस्ट्रीज, कॅडबरी यांसारख्या विविध खाद्यपदार्थामधून अतिरिक्त साखर आपल्या पोटात जाते. साखर गोड, कमी खíचक, सहजतेने उपलब्ध होणारी असून ती व्यसन लावणारी आहे, परंतु काळजी न घेता त्याचे सेवन केल्यास ती आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, जास्त प्रमाणात साखर घेतल्यास, गंभीर वैद्यकीय स्थिती निर्माण होऊ शकते. दुर्दैवाने, पाश्चिमात्य अन्नपदार्थ खाण्याची सवय प्रचलित होत असल्यामुळे साखरेचं सेवन दिवसेंदिवस वाढतच आहे. खरं तर, भारत हा जगातील सर्वात जास्त साखर खाणारा देश बनला आहे. प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थामध्ये साखरेचं प्रमाण दिसत नसल्याने आपण दररोज पेयांमधून आणि खाद्यपदार्थामधून किती प्रमाणात साखर खातो याचं कोणाला भानच राहत नाही. त्यामुळे आपल्यापैकी बरेच जण साखरेचा अतिरेक करतात. कोल्ड्रिंकच्या साधारण आकाराच्या बाटलीमध्ये सुमारे ७ चमचे साखर असते, आणि कोका कोलाच्या सर्वात मोठय़ा (सिनेमा सìव्हग) बाटलीमध्ये ४४ चमचे साखर असते हे तुम्हाला माहिती आहे का? प्रौढांनी २० ते २५ ग्रॅमच साखर दररोज घ्यायला हवी. चॉकलेट, पेस्ट्री, कँडी, फास्ट फूड, ब्रेकफास्टची तृणधान्ये, आईस्क्रीम, कॅनमधील फ्रुट ज्यूस, सूप, अल्कोहोलिक पेय आणि डेझर्ट इत्यादींमध्ये साखरेचं प्रमाण अधिक असतं, जे ताबडतोब आपल्या शरीरामध्ये समाविष्ट होतं. ज्यामुळे लट्ठपणा, दातांची कीड, मधुमेह आणि प्रतिकारशक्ती कमी होणे यांसारखे आजार होतात. यामुळे चयापचय क्रियेसंदर्भातील एक किंवा अनेक आजारसुद्धा होऊ शकतात जसं की कोलेस्टेरॉल स्तर वाढणे, इन्शुलिन बाधा आणि उच्च रक्तदाब इत्यादी. वैज्ञानिकांच्या मते, साखर ही अल्कोहोलप्रमाणेच आपल्या शरीरासाठी हानिकारक असते, आणि अल्कोहोल साखरेचे किण्वन करूनच तयार केलं जातं यात पुढे आश्चर्य वाटायला नको. त्यामध्ये केवळ रिकाम्या कॅलरी असतात आणि आपल्या निभावासाठी आवश्यक असलेलं जीवनसत्त्व व खनिज त्यामध्ये नसतात. याचा परिणाम म्हणून, आपलं शरीरात आपल भूक लपूण राहते. यामुळे त्रस्त वाटतं. आपण खात असलेल्या अन्नाने आपलं पोट शांत होत असलं किंवा आपली भूक भागत असली तरीसुद्धा आपल्या शरीराला पुरेसे पोषणतत्त्व प्राप्त होत नाही. साखरेच्या अतिरिक्त सेवनामुळे होणा-या आजारांनी प्रत्येक वर्षी जगभरात सुमारे ३५ दशलक्ष लोक मृत्युमुखी पडत आहेत. ब-याच देशांमध्ये प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थ व पेयांवर 'साखर कर' लादावा आणि साखरेच्या सेवनासाठी कायदे व नियम घालावेत अशी मागणी होत आहे, यात काय आश्चर्य आहे? ही तर फार दूरची गोष्ट आहे; परंतु आपण हे नाकारायला नको की आपल्यापैकी सर्व जण आवश्यकतेपेक्षा खूप जास्त साखर खातो आणि त्यामुळे लट्ठपणा, मधुमेह आणि जीवनशैली संबंधित अनेक आजार यांची जणू साथच येत आहे. सुदैवाने, हळुवारपणे भारतीय साखरेच्या हानिकारक परिणामांप्रती जागरूक होत आहेत. बरेच लोक त्यांच्या साखरेच्या सेवनावर लक्ष देत आहेत. साखरेचं सेवन कमी करणं हा सर्वोत्तम उपाय आहे, परंतु ज्या व्यक्तीला गोड खावंसंच वाटतं आणि त्यांना साखरेवर नियंत्रण ठेवणं कठीण वाटतं, त्यांनी साखरेचे पर्याय वापरावेत. केवळ यामधील नियमन पाळावेत तसेच निरोगी जीवनशैली राखावी. साखरेऐवजी घेण्याच्या पदार्थाची प्रसिद्धी वाढतच आहे. साखरेऐवजी घ्यायचे पदार्थ साखरेसारखीच गोडी देतात परंतु त्यामध्ये फारच कमी किंवा शून्य कॅलरीज असतात. मधुमेह, लट्ठपणा आणि इतर आरोग्याच्या तक्रारी असणा-या लोकांसाठी असे पदार्थ सुचवले जातात. आरोग्याबद्दल जागरूक असणारे बरेच लोक साखर खाणं टाळतात आणि साखर शरीरासाठी विष बनेल अशा विशिष्ट प्रमाणानंतर ते साखरेऐवजी घेण्याचे पदार्थ वापरतात. खरं तर, कमी कॅलरी साखर घेणारे लोक उपाशी न राहता पुरेशा प्रमाणात कॅलरीजचं प्रमाण कमी करू शकतात. स्टेविया, अस्पार्टेम आणि सुक्रोलोज हे जगभरात उपलब्ध असणारे साखरेऐवजी वापरण्याचे पदार्थ आहेत जे सध्या भारतामध्येसुद्धा उपलब्ध आहेत आणि ते आपल्याला सुरक्षित प्रमाणात साखरेचं प्रमाण कमी करण्यास मदत करतात. साखरेऐवजी खाण्याच्या पदार्थाची या विविधतेमुळे खात्री होते. स्टेविया ही सामान्य साखरेपेक्षा ३०० पट जास्त गोड असते आणि तिला गोड पदार्थ म्हणून ७० देशांमध्ये मान्यता प्राप्त झाली आहे. जपानमध्ये स्वीटनर बाजारात याचा ४० टक्के भाग आहे. स्टेविया विविध लाभ देत असल्याने प्रसिद्ध आहे. तिच्यामध्ये कॅलरीजचं प्रमाण शून्य आहे. शून्य ग्लायकेमिक इंडेक्स आणि शून्य मेद आहे. ती रक्तदाब कमी करण्यात आणि रक्त शर्करास्तर कमी करण्यास मदत करते, असं अभ्यासावरून लक्षात आलं आहे. दुस-या बाजूने अस्पार्टेम ही कृत्रिम आहे; परंतु कमी कॅलरी, सॅकराईडविरहीत आणि सर्वात गोड साखर आहे जी यूएसमध्ये प्रसिद्ध आहे. ती सामान्य साखरेपेक्षा २०० पट गोड असल्यामुळे, तोच गोडवा येण्यासाठी ती फारच कमी प्रमाणात लागते. या उत्पादनाला २५ वर्षापूर्वी अन्न व्यसन म्हणून मान्यता दिली असल्याने अस्पार्टेम घेण्याबद्दल काही वेळा चिंता व्यक्त केली जाते. तरीही, युरोपियन फूड सेफ्टी अधिकारी(ईएफएसए)ने नुकतेच ती मानवासाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचं सर्व उपलब्ध अभ्यास आणि माहितीवरून घोषित केलं आहे. ज्या पदार्थाना फार काळ गरम करावं लागत नाही अशाच पदार्थामध्ये अस्पार्टेमचा वापर करावा आणि ज्या लोकांना फेनिल किटोनमेह आजार आहे त्यांनी हा पदार्थ सेवन करणं टाळावं. युरोपियन फूड सेफ्टी अधिकारी तसेच अमेरिकन फूड अँड अॅडमिनिस्ट्रेशन सोसायटीने या पदार्थाचे ४० मिग्रॅ / किग्रॅ सेवन दररोज करणं सुरक्षित मानलं आहे. सुक्रोलोज हे एकमेव स्वीटनर असून ते सामान्य साखरेपेक्षा ६०० पट गोड आहे. ती साखरेपासूनच बनले आहे आणि त्याची चवसुद्धा साखरेसारखीच आहे; परंतु ती कॅलरी किंवा काबरेहायड्रेट विरहीत आहे. याचे कोणतेही दुष्परिणाम किंवा विषबाधा नाही. तसंच मधुमेह असलेल्या लोकांसाठी उत्तम अन्नघटक म्हणून सुरक्षित आहे आणि तिचा वजन कमी करण्यासाठी कॅलरी व आणि साखर कमी खाणा-या लोकांसाठी सुद्धा वरदान आहे. याची चव फार छान असून तो बहुउपयोगी पदार्थ आहे. त्याचा पेय, घरातील स्वयंपाक आणि बेकिंग यामध्ये गोडवा आणण्यासाठी वापर केला जातो. आपल्याला निरोगी राहायचे असेल आणि वाढत्या वयात गंभीर आजारांपासून बचाव करायचा असेल तर आपण दररोजचे साखरेचे सेवन कमी करणं आवश्यक आहे यावर आरोग्य तज्ज्ञांनी भर दिला आहे. त्यांचा सल्ला ऐकण्याची ही वेळ आहे. साखरेऐवजी घेण्याचे पदार्थ गोड असतात; परंतु आपल्या शरीराला अतिरिक्त कॅलरी देऊन आणि रक्तशर्करेमध्ये वाढ करून एकूणच आरोग्याला असलेल्या धोक्यापासून बचाव करण्यासाठी ते सुरक्षित असतात. |