वंध्यत्व ही आजकालच्या मुलींमध्ये सर्रास आढळणारी समस्या आहे. वंध्यत्व ही आजकालच्या मुलींमध्ये सर्रास आढळणारी समस्या आहे. या वंध्यत्वामागे अनेक कारणं असली तरीही वय हे एक प्रमुख कारण असल्याचं मानलं जात आहे. वयाचा गर्भारपणाशी काय संबंध आहे हे जाणून घेऊ या. हल्लीच्या मुली करिअर ओरियंटेड असतात. त्यांना स्वत:च्या पायावर उभं राहायचं असतं. करिअरच्या मागे लागल्यामुळे साहजिकच मुलींचं लग्नाचं वय वाढत आहे. त्यानंतर काही जोडपी प्लानिंग करतात. अशात त्यांचं मुल होण्याचं वय वाढत जातं. या सगळ्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होतो आणि त्यांना वंध्यत्वालाही सामोरं जावं लागतं. पश्चिमी देशांच्या तुलनेत भारतीय महिलांची वयाच्या पस्तीस वर्षानंतर गर्भारपण प्राप्त करण्याची क्षमता कमी असते. नोवा आयव्हीआय फर्टिलिटी (एनआयएफ)ने वेळ आणि सत्य माहिती यांसोबत सुमारे ७ हजार अशा रुग्णांचा सर्वसमावेशक अभ्यास उपक्रम घेतला. या अभ्यासामधून महत्त्वपूर्ण माहिती अशी समोर आली की, वय वर्ष ३१ नंतरच्या महिलांना व्यंध्यत्वाची जास्त अडचण येत आहे, आणि महिलांमधील अंडाशयाचा फारच कमी प्रतिसाद (पुअर ओव्हरियन रिस्पॉन्स) या कारणामुळे चिंता वाढवत आहे. अभ्यासानुसार, व्यंध्यत्वासाठी उपचार घेत असलेल्या ६८ टक्के महिला या ३१ किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या आहेत, आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ३६ टक्के महिला ३१-३५ वयामधील तर ३२ टक्के महिला ३५पेक्षा जास्त वयाच्या आहेत. नुकत्याच झालेल्या अभ्यासामधून असं लक्षात आलं आहे की, ३० टक्के महिलांना डोनर एग(दाता अंडे)ची गर्भवती राहण्यासाठी गरज भासते, कारण त्यांचे अंडाशय आधीपासूनच कमकुवत झालेले असताना त्या आयव्हीआय तज्ज्ञांकडे आल्या. पुढील अभ्यासावरून लक्षात आलं की, २५ टक्क्यांपेक्षा जास्त मासिक पाळींमध्ये एग डोनेशन करावं लागतं. मागील तीन वर्षापासून व्हिट्रिफिकेशन हे यशस्वी तंत्र असल्याचं लक्षात आलं आहे आणि अधिक गर्भाचा वापर करून ३२ टक्क्यांहून ५१ टक्क्यांपर्यंत गर्भारपणाचा यशस्वी दर वाढला आहे. हे सर्व मासिक पाळीच्या जवळपास ३९ टक्क्यांमध्ये साध्य होतं. या अभ्यासामधून समोर आलेली बाब म्हणजे मोठय़ा संख्येतील उदाहरणांमध्ये पुरुष व्यंध्यत्व हे कारण असू शकतं. आज प्रत्येक चारपैकी एक पुरुष म्हणजे २३ टक्केजोडय़ा व्यंध्यत्व तक्रारीमधून जात आहे. आयव्हीआय उपचार घेत असलेल्या स्पॅनिश महिलांचं वय भारतीय महिलांच्या वयापेक्षा जास्त आहे (३७ वर्ष विरुद्ध ३१.५ वर्ष) असे असूनही, ३१व्या वर्षीच्या भारतीय महिलेचं अंडाशय कार्य ३७ वर्षाच्या स्पॅनिश महिलेच्या अंडाशयाच्या कार्याइतकं असतं. हा अभ्यास पुढे या माहितीचेसुद्धा समर्थन करतो की, भारतीय स्त्रीचा अंडाशयाचा प्रतिसाद फारच कमी आहे आणि भारतीय महिला फर्टिलिटी तज्ज्ञांना भेटण्यास विलंब लावत असल्यामुळेसुद्धा गर्भारपण प्राप्त होण्यासाठी विलंब होऊ शकतो. मागील दशकांच्या तुलनेत सध्या भारतामध्ये आयव्हीएफउपचाराची स्वीकृती झाली आहे. फर्टिलिटी प्रिझर्वेशनसारख्या तंत्राचं यश मोठं आहे, आणि ती ३५ वर्षापर्यंत गर्भारपण लांबवण्याची इच्छा असलेल्या महिलांसाठीसुद्धा फायदेशीर आहे. आज जागरूकता व स्वीकृती असली तरीही, लोक उपचार घेत नाहीत. भारतीय महिलांच्या अंडाशयाचे वय विदेशी महिलांच्या अंडाशय वयापेक्षा जलद गतीने वाढत असल्यामुळे त्यांनी गर्भारपण लांबवायला नको. जोडप्यांनी समजून घ्यायला हवं की वेळ फार महत्त्वाची आहे, विलंब केल्यास आनंदी कुटुंबाचं सुख हरवू शकतं. आययूआय, आयव्हीएफ व अँड्रोलॉजी सेवा यांसारख्या महत्त्वाच्या प्रक्रिया पुरवण्यासह, एनआयएफ गर्भाचं व अंडय़ाचं जतन करण्यासाठी व्हिट्रिफिकेशन, एंब्रियोस्कोप व सर्वोत्तम गर्भाची निवड करण्यासाठी पीजीएस आणि गर्भ स्वीकारण्यासाठी गर्भाशयाची क्षमता निवडण्यासाठी ईआरए, यांसारख्या काही सुविधा आहेत. आयव्हीएफ-आयसीएसआयनंतर या सर्व प्रक्रिया गर्भारपणाची शक्यता वाढवण्यासाठी फायदेशीर आहेत. अधिक माहितीसाठी : novaivifertility.com |