उत्तम आरोग्य आणि उत्तम सौंदर्य हवं असेल तर व्यायामाबरोबर योग्य आहाराचीही गरज असते. योग्य वेळी योग्य पद्धतीचा आहार घेतल्याने आरोग्य अबाधित राहते. त्या आहारात न्याहारीलादेखील महत्त्व आहे. म्हणून नेमकी न्याहारी कशी असावी हे जाणून घेऊया. सकाळची न्याहारी भरपूर करावी, असं आपल्याला कित्येकदा डॉक्टरांकडून सांगितलं जातं. जी मंडळी हेल्थ कॉन्शिअस आहेत त्यांच्या डाएटमध्येदेखील सकाळच्या न्याहारीला महत्त्व दिलं आहे. कारण सकाळी न्याहारी व्यवस्थित असेल तर दिवसभराच्या कामासाठी आपल्याला ऊर्जा मिळते, स्मरणशक्ती सुधारायला मदत होते, मानसिक स्वास्थ्य उत्तम राहतं. म्हणूनच सकाळची न्याहारी उत्तम असली पाहिजे. सकाळी न्याहारी केली नाही तर यापैकी कोणतीही गोष्ट होत नाही. म्हणूनच या न्याहारीत कोणते पदार्थ असावेत आणि त्याचा शरीराला काय उपयोग होतो याची माहिती घेऊया. चीझचा एक तुकडा + एक कापलेला टोमॅटो + एक कप ग्रीन टी यातून साधारण २५० कॅलरीज मिळतात. चीझमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असतं आणि टोमॅटो हे अँटिऑक्सिडंटचं आणि फायबरचं काम करतं. तर ग्रीन टीचं सेवन केल्यामुळे आपल्या मनावरचा मानसिक ताण कमी होतो. एक सफरचंद + मूठभर ड्रायफ्रुट्स +एक ग्लास दूध सफरचंदामुळे त्वरित ऊर्जा मिळते तर ड्रायफ्रुट्स रक्तातील साखरेची पातळी योग्य राखण्यास मदत करतात. आणि दुधामुळे तुमची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. अशा प्रकारच्या न्याहारीतून २०० कॅलरीज मिळतात. ब्राऊन ब्रेड आणि अंड + एक ग्लास दूध दिवसाच्या सुरुवातीलाच अंडं खाल्ल्याने दीर्घकाळ तुम्हाला भूक लागत नाही. म्हणजे त्यामुळे तुम्ही बाहेरचे पदार्थ सेवन करत नाही. कारण यातून शरीराला आवश्यक असलेली पोषणतत्त्व आणि प्रोटिनही मिळतं. तर ब्राउन अर्थात गव्हापासून तयार केलेल्या पावामुळे डाएटरी फायबर मिळतात, जे शरीराला पाचक असतात आणि त्यामुळे वजनही वाढत नाही. उकडलेली कडधान्य + ब्रेडचा एक टोस्ट + एक ग्लास भाज्यांचा ज्यूस यामुळे २५० ते ३०० कॅलरीज मिळतात. कारण उकडलेल्या कडधान्यात भरपूर प्रमाणात पोषणतत्त्व असतात. त्यातून मोजक्याच; पण अशा कॅलरीज मिळतात ज्यामुळे तुम्हाला दिवसभरात अशक्तपणा जाणवत नाही. मुसली (एक कप ओट्स, ताज्या फळांचे तुकडे, कडधान्य आणि ड्रायफ्रुट्स यांचं एकत्रित केलेलं मिश्रण) + एक कप दही ही मुसली तुम्हाला बाजारात मिळते. ही दुधातून घेतल्यास त्यातून २०० कॅलरीज प्राप्त होतात. कारण मुसलीतून शरीराला आवश्यक असलेल्या कॅलरीज मिळतात. तसंच त्यातून फायबर मिळतं तसंच आपली पचनक्रिया सुधारते, वजन नियंत्रित राखते. याबरोबर दह्याचं सेवन केल्यामुळे भरपूर जीवनसत्त्वं मिळतात. भाजलेलं धान्य + दही यातून २५० कॅलरीज मिळतात. कारण यात भरपूर प्रमाणात फायबरचं प्रमाण असतं. भाजलेल्या धान्याचं सेवन केलं तर भूक लागत नाही. हृदयाच्या स्वास्थ्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. तसंच त्यामुळे हाडं मजबूत होतात. तसंच पचनशक्ती सुधारते. भाज्यांचं सूप साहित्य : एक कप सालं काढून कापलेली काकडी, एक कप मध्यम आकाराचा कापलेला टोमॅटो, एक कप कापलेलं गाजर, एक कप दुधीचे तुकडे, एक कप बिटाचं साल काढून केलेले तुकडे, चार आवळे, एक चमचा लिंबाचा रस, कोथिंबीर किंवा पुदीना (आवडीनुसार), एक चमचा हळद, दीड चमचा काळं मीठ आणि दीड चमचा जिरं पावडर. कृती : सगळ्या भाज्यांचे तुकडे एकत्रित करून मिक्सरवर बारीक करून घ्यावेत. त्यानंतर त्यात लिंबाचा रस, जिरं पावडर आणि काळं मीठ घालावं. चांगलं ढवळावं. त्यावर कोथिंबीर किंवा पुदीना घालून सव्र्ह करा. पालक, बीट आणि टोमॅटो साहित्य : १५ ते २० पालकाची पानं, एक मध्यम आकाराचं बीट, २ टोमॅटो, लिंबू, मीठ, चवीनुसार मिरीपूड कृती : सगळं साहित्य एकत्रित करून मिक्सरला वाटून घ्यावं. त्यात पाणी आणि मिरपूड घालून सेवन करावं. दुधीचं सूप साहित्य : अर्धा किलो दुधी, एक ग्लास पाणी, मीठ, सैंधव मीठ आणि सजावटीसाठी पुदीन्याची पानं, कृती : पाणी घालून दुधी शिजवून घ्या. नंतर तो गाळून त्यात मीठ आणि सैंधव मीठ घाला. पुदीन्याची पानं घालावीत. आवळ्याचं सरबत साहित्य : अर्धा कप आवळ्याचा रस, दीड कप गूळ, अर्धा कप मध, अर्धा चमचा जिरेपूड, मीठ किंवा सैंधव चवीनुसार. कृती : आवळा, गूळ आणि मध एकत्रित करून घ्यावा. गूळ विरघळेपर्यंत ढवळा, नंतर त्यात पाऊण कप पाणी घाला. एकत्रित ढवळून त्यात जिरंपूड,२ मीठ किंवा सैंधव मीठ घालून सव्र्ह करा. |