| ||||
आम्लपित्तावर आयुर्वेदिय उपाय
आपल्या शरीरामध्ये श्वसनसंस्था, मज्जासंस्था, पचनसंस्था अशा विविध संस्था कार्यरत असतात. त्यातील पचनसंस्थेअंतर्गत येणारी आम्लपित्त ही व्याधी आहे. आम्लपित्त निर्माण होण्यामागची कारणं शोधून ती टाळण्यावर भर द्यायला हवा. डॉक्टर, मला पित्ताचा खूप त्रास होतो. काहीतरी कायमचा उपाय सांगा हो, असे सांगत अनेक रुग्ण वैद्यांकडे येतात. छातीत होणारी जळजळ, तोंडाला येणारे कडवट, आंबट असे पाणी, सतत होणारी मळमळ आणि तीव्र डोकेदुखीने ग्रस्थ असलेले हे रुग्ण आम्लपित्त या रोगाने अत्यंत त्रासून जातात. उलटी होऊन गेल्यावर मग या रुग्णांना बरं वाटतं. काही जणांना तर घशात बोटं घालून उलटी करावी लागते. आपल्या शरीरामध्ये श्वसनसंस्था, मज्जासंस्था, पचनसंस्था अशा विविध संस्था कार्यरत असतात. त्यातील पचनसंस्थेअंतर्गत येणारी आम्लपित्त ही व्याधी आहे. आयुर्वेदिय शास्त्रज्ञांनी त्याचं स्वतंत्र रोग म्हणूनही वर्णन केलेलं आहे. शरीरामधील पित्त या दोषाच्या विकृतीमुळे निर्माण होणारा हा रोग अनेक व्यक्तींना त्रस्त करून सोडतो. आजच्या धावपळीच्या युगामध्ये तर हा त्रास असणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. असं का घडतं, याची कारणमीमांसा नीट समजून घेतली पाहिजे. आम्लपित्ताची कारणे : अतिशय तिखट, मसालेदार, चमचमीत जेवण करणं, अतिशय आंबट खाणं, अतिप्रमाणात चहापान करणं, मोठय़ा प्रमाणावर केलेलं मद्यपान, तंबाखूच्या सेवनाचं वाढतं प्रमाण, मांसाहाराचं वाढत चाललेलं प्रमाण, अतिजागरण, जेवणाच्या वेळेत असणारा अनियमितपणा, भूक लागलेली असताना आहार न घेणं, मानसिक चिंता अशी कारणं सतत घडत गेल्यास व्यक्ती आम्लपित्ताकडे वाटचाल करू लागते. इंग्रजीत यालाच 'हायपर अॅसिडीटी' असं म्हटलं जातं. आपल्या पचनसंस्थेत मुख, अन्ननलिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे इत्यादी अवयव आहेत. यापैकी जठराशी संबंधित असणारी आम्लपित्त ही व्याधी वेळीच लक्ष न दिल्यास गंभीर रूप धारण करू शकते. आम्लपित्ताची लक्षणे : सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तीव्र वेदना डोकेदुखी, घशाशी होणारी जळजळ, तोंडाला आंबट, कडवट पाणी येणं, उलटीची भावना होणं ही आम्लपित्ताची सामान्य लक्षणं होत. काहीवेळा यामध्ये आंबट व करपट ढेकर येणं ही देखील तक्रार असते. या सर्व लक्षणांचा आयुर्वेदाने आपल्या ग्रंथांमध्ये बारकाईने उल्लेख केलेला आहे. आम्लपित्तामध्ये पित्तदोषाचा उष्ण गुण वाढतो, त्याच्या उष्ण गुणामुळेच छातीमध्ये जळजळ होत असते. या सर्व लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. दुर्लक्ष केल्यास पुढे जठराच्या ठिकाणी व्रण निर्माण होण्याची शक्यता असते. याला अल्सर असं म्हणतात. अल्सर हा अत्यंत तापदायक असा प्रकार आहे. म्हणून आम्लपित्ताकडे वेळीच लक्ष देणं आवश्यक आहे. प्रतिबंधात्मक उपाय : वर सांगितलेली एकूण लक्षणं वाचल्यावर आम्लपित्त आपल्याला होऊच नये, असं सर्वाना वाटणं स्वाभाविक आहे. आपल्या सभोवताली आम्लपित्ताने त्रस्त रुग्ण अनेकांनी पाहिलेले असतील. त्यामुळेही आपल्याला यापासून मुक्तता हवी असंच मनापासून वाटत असेल, अशा सर्वानी आम्लपित्ताची वर सांगितलेली सर्व कारणं आपल्या बाबतीत घडणार नाहीत, याची जरूर काळजी घ्यावी. आपली दिनचर्या नियमित ठेवावी. आपला स्वभाव रागीट तसंच खूप चिंता करणारा असा असल्यास त्यावर नियंत्रण आणावे. व्यसनांपासून सदैव दूर राहावे. ज्यांना आम्लपित्ताचा त्रास नेहमी होतो अशांनीदेखील वर सांगितलेल्या कारणांपैकी आपल्या बाबतीत कोणती कारणं घडताहेत याचा पडताळा घेऊन ती कारणे पुढे घडणार नाहीत, अशी व्यवस्था करावी. रोगाची कारणं शोधून ती टाळण्याचा प्रयत्न करणं हा प्रत्येक रोगाच्या उपचारामधील एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, असा आयुर्वेदाचा सिद्धांत आहे. म्हणून आयुर्वेदिय चिकित्सा पद्धतीमध्ये रोगाच्या कारणांना खूप महत्त्व आहे. आम्लपित्ताचा त्रास असणारे अनेक रुग्ण सांगोवांगी उपचारांवर विश्वास ठेवून ते करत असतात. यापैकी काही उपचार हे तात्पुरता दिलासा देणारे असतात, तर काहींचे दुष्परिणामही (साइड इफेक्ट्स) असू शकतात. उदाहरणच द्यायचं तर सोडय़ाचं देता येईल. आम्लपित्ताचा त्रास होऊ लागला की रोग्यांना 'सोडा' पिण्याची सवय असते. सोडय़ामुळे वाढलेल्या पित्ताचं तात्पुरतं उदासीनीकरण होऊन तात्पुरतंच बरं वाटतं. पण ही सवय लावून घेणं चांगलं नाही. यापेक्षा अधिक पित्ताची निर्मिती होणं कसं टळेल, याकडेच अधिक लक्ष पुरविलं पाहिजे. साजूक तुपाचा वापर हवा : आम्लपित्ताच्या रुग्णांनी आपल्या जेवणामध्ये साजूक तुपाचा वापर भरपूर प्रमाणात करावा. तूप हे उत्तम पित्तनाशक असल्याने त्याचा या ठिकाणी चांगला उपयोग होतो. शतावरी, ज्येष्ठमध, दुर्वा या वनस्पती द्रव्यांचा वापर वैद्यांच्या सल्ल्याने केल्यास आम्लपित्तामध्ये लाभ होतो. आम्लपित्ताचा नेहमी त्रास असणा-यांनी मोरावळा खावा. (आवळ्याच्या मोसमामध्ये आवळा आणि साखरेचा पाक यांचा उत्तम संयोग असलेला हा मोरावळा तयार करून ठेवावा.) आवळा हा थंड गुणधर्माचा, पित्तशामक असल्याने त्याचा आम्लपित्तामध्ये उत्तम उपयोग होतो. आयुर्वेदातील पंचकर्मापैकी वमन आणि विरेचन या दोन कर्माचा, आम्लपित्तामध्ये चांगला उपयोग होतो. Read More »डॉक्टरांकडे जाताना एवढं ठेवा लक्षात!
आपण अनेकदा डॉक्टरांकडे जातो. तिथे गेल्यावर आपण कसं वागावं, कसं बोलावं, हे आपल्याला ठाऊक नसतं. कित्येकदा आपण तिथल्या कम्पाउंडरसोबत हुज्जत घालतो. आपल्या आजूबाजूलाही रुग्ण आहेत, याचं भान आपण विसरतो. म्हणून दवाखान्यात गेल्यावर काय शिष्टाचार पाळावेत, याची ही माहिती. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. काही डॉक्टरांकडे बाहेर छत्री ठेवण्याची आणि चपला बाहेर काढण्याची पद्धत असते, तेव्हा आत जाण्यापूर्वी चपला किंवा छत्री बाहेर काढून ठेवायला विसरू नका. दवाखान्यात शिरण्यापूर्वी पाय पुसूनच आत शिरावं. म्हणजे पायाचे जंतू आत येत नाहीत. दवाखान्यात 'शांतता ठेवा' असा फलक लावलेला असतो. तेव्हा आत शिरल्यावर शांततेचं पालन करावं. मोठय़ाने बोलू नये. सोबत लहान मुलं असतील तर त्यांना शांत करण्याची जबाबदारी आपल्यावर असते. ते काय करतात, कोणत्या वस्तू उचलतात याकडे आपण लक्ष ठेवावं. मोबाइल सायलंट मोडवर ठेवावा. दवाखान्यात गेल्यावर स्वागतकक्षात आपलं नावं, फाइल क्रमांक सांगावा. नंतर जागेवर जाऊन बसावं. स्वागतकक्षात जाऊन आपला नंबर कधी येणार, याची सतत विचारणा करू नये. प्रत्येकालाच त्रास होत असतो, याचं भान ठेवावं. शक्यतो शेवटचा नंबर विचारून त्याच्या बाजूला बसावं. सर्दी किंवा खोकला झाला असल्यास तोंडावर रुमाल ठेवावा. जेणेकरून शेजारच्याला काहीही त्रास होणार नाही. तसंच जवळ पाण्याची बाटली बाळगावी. उलटीचा त्रास होत असल्यास जवळ प्लॅस्टिकच्या पिशव्या ठेवाव्यात. आपल्याला कितीही त्रास होत असला तरीदेखील मोठय़ाने विव्हळू नये. आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. दवाखान्यात गर्दी असेल आणि एखादा अतिशय आजारी रुग्ण आला तर त्याला बसायला जागा द्यावी. डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी आपला केसपेपर घेऊन जावा. काही ठिकाणी रुग्णाला काय होतंय, याची आधी विचारपूस केली जाते. त्याची योग्य ती व्यवस्थित माहिती द्यावी. कारण ती माहिती थेट डॉक्टरांकडे जात असते. डॉक्टरांच्या कक्षात शिरल्यावर आपण कोणत्या वेळेला जात आहोत त्याप्रमाणे 'नमस्कार', 'हॅलो', 'सुप्रभात', 'गुड मॉर्निग', 'गुड इव्हनिंग' असे शिष्टाचारवाचक वाक्प्रचार वापरावेत. डॉक्टरांना आजाराची पूर्ण कल्पना द्यावी. त्यांच्यापासून काहीही लपवू नये. तसंच सांगताना आवाज किंवा उच्चार स्पष्ट असावेत. डॉक्टर सांगतील त्या सूचनांचं पालन करावं. घाबरून जाऊ नये. आपल्याला कोणता आजार झाला आहे, त्यासाठी कोणती काळजी घ्यायची हे जाणून घ्यावं. ईसीजी, एक्स-रे काढायचा झाल्यास त्याप्रमाणे तिथल्या कर्मचा-यांना सहकार्य करावं. डॉक्टरांनी सांगितलेल्या सूचना समजल्या नसल्यास त्यांच्याकडून किंवा तिथे असलेल्या अन्य कोणत्याही डॉक्टरांकडून समजून घ्याव्यात. पुन्हा दिलेली वेळ पाळावी. Read More »आपला 'आरोग्य'साथी, आपला डॉक्टर!
एक जुलै हा दिवस 'जागतिक डॉक्टर दिन' म्हणून साजरा केला जातो. जन्मदात्रीशी असलेलं आपलं नातं जितकं अवर्णनीय तितकंच 'जीवनदाता' म्हणावं असं नातं आपलं डॉक्टरांशी असतं. आज या डॉक्टर दिनानिमित्तच डॉक्टराच्या सेवाभावी वृत्तीला सलाम करणारा आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा लेख! आरोग्याच्या कोणत्याही कुरबुरी, तक्रारी उद्भवल्या की, आपल्या डोक्यात पहिलं नाव येतं, ते म्हणजे 'डॉक्टर'. एक अशी व्यक्ती जिच्यावर विसंबून आपण आरोग्याबाबतीत अगदी निश्चिंत होऊन जातो. खरं तर आपल्या जन्मापूर्वीपासूनच आपलं नातं डॉक्टरांशी जोडलं गेलेलं असतं. मूल या जगात येण्यापूर्वी जन्मदात्री आईच्या गर्भात दिसामाजी फुलणारा गर्भाश सुरक्षित असल्याचा दिलासा देण्यापासून ते सुदृढ बालक जन्माला येईपर्यंतचा साक्षीदार असलेली एक महत्त्वाची व्यक्ती असते ती, डॉक्टरच! त्यानंतरही आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर आपल्या आरोग्याच्या समस्या दूर करणारी, आवश्यकतेनुसार वेळोवेळी योग्य उपचार करणारी, आरोग्यविषयक योग्य सल्ले देणारी डॉक्टर ही एक महत्त्वाची व्यक्ती बनून राहते. आणि अगदी मृत्यूनंतरही शास्त्रीय खातरजमा करून देणारी व्यक्तीही डॉक्टरच असते. आणि शारीरिक उपचारच नव्हे तर डॉक्टरने दिलेला मानसिक आधारही रुग्णाला बरं करत असतो. थोडक्यात, आपल्या जन्म-मृत्यू दाखल्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रावर स्वाक्षरी असणा-या 'डॉक्टर' या माणसाचं आपल्या संपूर्ण आयुष्यातील स्थान फार महत्त्वाचं आहे. जीवनावश्यक सेवासुविधांमधील एक असणारी वैद्यकीय सेवा पुरविणा-या या डॉक्टरांविषयी आपण कधी मन:पूर्वक कृतज्ञता व्यक्त केल्याचं तुम्हाला आठवतंय का? खरं तर वेळप्रसंगी जीवावर बेतल्यास अगदी देवासारखेच भासणा-या डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणजे, 'जागतिक डॉक्टर दिन' अर्थात 'वर्ल्ड डॉक्टर्स डे'. भारतात हा दिवस १ जुलैला साजरा केला जातो. पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री आणि व्यवसायाने डॉक्टर असलेले डॉ. बिधान चंद्रा रॉय यांच्या वैद्यकीय कार्याला सन्मान करत भारत सरकारने १ जुलै हा त्यांचा जन्मदिवस 'जागतिक डॉक्टर दिन' म्हणून साजरा करण्याचं ठरवलं. त्यानंतर १९९१ सालापासून आपल्या देशात जागतिक डॉक्टर दिन साजरा केला जात आहे. वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या डॉक्टरांना डॉ. रॉय यांच्या स्मरणार्थ दरवर्षी या दिवशी 'डॉ. बी. सी. रॉय राष्ट्रीय पुरस्कारा'ने सन्मानित केलं जातं. या दिवशी विविध ठिकाणी डॉक्टरांसाठी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. सद्य परिस्थिती पाहता, वैद्यकीय क्षेत्रात आपल्या मागण्यांसाठी डॉक्टरांची सततची होणारी आंदोलने, उपोषणे आणि या घटनांचे सर्वसामान्यांवर होणारे दुष्परिणाम तसंच इतर क्षेत्रांप्रमाणेच या क्षेत्रातही बोकाळलेला भ्रष्टाचार.. तत्सम असंख्य गोष्टींमुळे एकूणच वैद्यकीय व्यवस्थेबद्दलचं सर्वसामान्यांचं मत काहीसं कलुषित झालेलं दिसतं. असं असताना आज हा दिवस नव्याने डॉक्टर-रुग्ण या नात्यातील विश्वासार्हता दृढ करण्याच्या उद्देशाने साजरा केला गेल्यास भविष्यात आंदोलनाप्रसंगी सर्वसामान्यांना वेठीस न धरण्याचे आशादायी चित्र आपण रंगवू शकतो. मुळात, समाजात चांगल्या-वाईट प्रवृत्ती समाजाच्या सर्वच स्तरावर आहेत. डॉक्टरही माणूस आहे, हे आपण विसरून चालणार नाही. आपल्या कर्तव्याप्रती दक्ष असणा-या, दिनरात्रीची तमा न बाळगता सेवेसाठी तत्पर असणा-या आणि संशोधनातून वैद्यकीय क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणा-या तसंच कित्येकांना नवं जीवनदान देणा-या अनेक डॉक्टरांची उदाहरणं आजही आपल्या आसपास दिसतात. त्यामुळे डॉक्टरांचा व्यवसाय आजही एक उदात्त व्यवसाय समजला जातो. आपणापैकी सगळ्याच लोकांचा डॉक्टरांशी आयुष्यात अनेकदा संबंध येतो. आज हा दिवस त्या चांगल्या गोष्टींची आठवण करण्याचा.. आपल्या डॉक्टरांनी आतापर्यंत आपल्या जीवनात सुदृढ आरोग्यासाठी केलेल्या मदतीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा.. आणि त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देण्याचा! आतापर्यंत आपल्या आरोग्याची वेळोवेळी काळजी घेत आलेल्या आपल्या डॉक्टरांना आजच्या जागतिक डॉक्टर दिनानिमित्त त्यांच्याही उत्तम स्वास्थ्यासाठी आरोग्यदायी शुभेच्छा देऊयात आणि त्यानिमित्ताने पुन्हा एकदा डॉक्टरांशी असलेलं विश्वसनियतेचं 'गृहीत' नातं अधिक 'हेल्दी' करूयात! Read More » | ||||
|
Monday, July 1, 2013
FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मà¤à¥à¤¤ मसà¥à¤¤ तà¤à¤¦à¥à¤°à¥à¤¸à¥à¤¤
Subscribe to:
Posts (Atom)